लढा जीवनाचा
लढा जीवनाचा
*दि. १६/१०/२०२६* *विषय - ती हरली नाही* आताची वसुधा पूर्वीची उज्वला होती. उज्वलाचे शिक्षण पूर्ण होण्या आधीच तिचे लग्न झाले. कॉलेजची 2 वर्षे अपूर्ण राहिली.वय वर्ष १७ पूर्ण होताच मागणे आले,तिचे लग्न १९८५ मध्ये झाले.. लग्न झाल्यानंतर दीड वर्षात जुळ्या मुलींना जन्म दिला. (१९८६ )स्वतःचे नीट आवरता येत नव्हते तर त्या दोन मुलींची जबाबदारी येऊन पडली. सर्वांच्या सहकार्याने मुली मोठ्या होऊ लागल्या. इकडे पतीची तब्येत साथ देत नव्हती. डोळ्याचे ऑपरेशन, मांडीचे ऑपरेशन, हाताचे ऑपरेशन,मेंदूचे 2 वेळा ऑपरेशन,गुडघ्याचे ऑपरेशन पायाच्या अंगठ्याचे ऑपरेशन, हार्टचे ऑपेरेशन होता होता वाचले, लंगचे ऑपेरेशन अशा छोट्या मोठ्या ऑपरेशनचे वैभवचे शरीर.. वसुधा १९८८ पासून शिक्षकेची नोकरी करतच होती. लहान मुलींचे आवरायचे त्यांना खाणे पिणे करून द्यायचं आणि शाळेत निघून जायचं. १९९७ मध्ये दुसऱ्या ठिकाणी नोकरी लागली व वसुधाची कसरत चालू झाली. शाळा नवीन सुट्ट्या नाहीत तसेच वैभव ला हार्ट अटॅक आला. शाळा,घर,लहान मुलं वसुधाची कसरत चालूच होती. यात एक आनंद म्हणजे १९९७ मध्ये मुलगा झाला. वैभव च्या आजारपणामुळे वैभवला २००१ साली बजाज कंपनीतून काढून टाकण्यात आले. आता मात्र वसुधाची प्रचंड धावपळ, मुलांचे करणे, नोकरी पाहणे,त्याचबरोबर आर्थिक अडचणींचा सामना करणे हे वसुधाचे सुरू झाले. त्यावेळी गरजा खूप नसल्याकारणाने कसे तरी भागत होते घर स्वतःचे असल्याकारणाने पैसा वाचत होता. २००९ / १० मध्ये वैभवला ब्रेन ट्यूमर झाला. नशीब तो कॅन्सरचा नव्हता. प्रथम रुबी हॉलमध्ये त्यांचे ऑपरेशन झाले.दुसरे ऑपरेशन लिलावती हॉस्पिटल बॉम्बेला झाले. वसुधाने ऑपरेशनच्या वेळी डॉक्टरांना एकच प्रश्न विचारला माझ्या नवरा मला मिळेल का??? कारण त्यांचे हाल मला बघवत नाहीत. डॉक्टरांनी वचन दिले तुझा नवरा तुला मी परत देणार. वसुधा खुश झाली. वैभव चे ऑपरेशन झाले आणि जरासा चेहऱ्यावर फरक पडला. ऑपरेशन करता वेळी एक वाहिनी धक्का लागल्यामुळे उजवा कान आणि उजवा डोळा निकामी झाला होता. शिवाय पॅरालिसिस अटॅक आला होता. पण वसुधाने हेही सर्व मान्य केले. आपला नवरा आपल्याला परत मिळाला यात तिचे समाधान होते. रुबी हॉल, लीलावती हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल,सह्याद्री हॉस्पिटल अशा अनेक हॉस्पिटलमध्ये वैभवला फिरवावे लागले होते.त्यातच तरुण वसुधाला पांचट डॉ. ना तोंड द्यावे लागले. अशा अनेक संकटांना पार करून २०१२ मध्ये जरा वैभव बरे वाटू लागले. आता मुलींची लग्न तयारी चालू होती. मुलींचे लग्न झाले दोघी सुखाने नांदू लागल्या. २०१२ ते २०२३ पर्यंत वैभव बरे होते. शारीरिक तक्रारी चालू असायच्या. एम.आर. आय. काढ, सिटी स्कॅन कर.अशा अडचणींना तोंड देत होतोच. २०२३ मध्ये मुलाच्या लग्नाची तयारी आणि वैभवचा एक्सीडेंट झाला. घरातच पाय घसरून पडले नऊ महिने जागेवर होते. मणक्यांना जबरदस्त मार लागला होता, मग काय वसुधाची धावपळ घर,शाळा, आता मुलं मोठी झाली होती परंतु घराचे काम काढले होते रेन्युअशनचे ती धावपळ. सर्व करता, करता नाकी नऊ यायचे, परंतु साहित्य क्षेत्रात असल्यामुळे देखील खूप कार्याची ओढ आणि लोक मान देत असल्यामुळे कार्यक्रमांची आखणी करावीच लागत असायची. अशातच मुलाचे लग्न झाले. मुलगा अमेरिकेत.. सगळी तयारी एकटीवर. वैभव व्हीलचेअरवर वसुधा सगळीकडे धावतीये, लग्नातल्या सर्व लोकांना सांभाळत होती.. अशातच लग्न पार पडले. वसुधाचा पण २०१३ मध्ये मोठा एक्सीडेंट झाला होता. वसुधाला खाली वागता येत नाही जिना जास्त चढायचा नाही. अजून उचलायचं नाही.. पण तरी आज ती उभी आहे का तर आपलं घर तिला सांभाळायचं आहे.... अशी वसुधाची कहाणी सफळ संपूर्ण... वसुधा वैभव नाईक धनकवडी,जिल्हा- पुणे मो. नं. 9823582116
