STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

गैरसमजाचे झाड

गैरसमजाचे झाड

2 mins
0

*-गैरसमजाचे झाड*-
 गैरसमज हे नात्यांमध्ये नकळत उगवणारे एक काटेरी झाड असते.मनाला घातले जाणारे बंदिस्त कुंपण आहे. गैरसमजुतेची बीजे बहुतेक वेळा अपूर्ण संवादातून रुजतात. एक छोटीशी गोष्ट मनात ठेवली की गैरसमज वाढू लागतो.संवाद साधताना गैरसमजाची ठिणगी उडाली की संवाद थांबतो. व्यक्तीवरचा विश्वास कमी झाला की त्या गैरसमजुतीच्या झाडाला खतपाणी मिळते. इतरांच्या नाहक बोलण्याचा प्रकाश मिळतो. गैरसमजुतीचे काटेरी झाड वाढत जाते. मग नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. मन कलूशीत होते. मनामध्ये वाईट विचारांना चालना मिळते. मनात एखाद्या व्यक्तीबद्दल अढी निर्माण होते. माणसं जवळ असूनही मनाने दूर जातात. समोर आल्यावर बोलतात पण पहिल्या पेक्षा जरा सांभाळून वागतात आणि बोलतात. संवाद साधताना एक गैरसमजुतीच रोप असते. ते वाढत असतं. म्हणून संवाद मनापासून होत नाहीत. गैरसमजामुळे प्रेम, मैत्री आणि आपुलकी कमी होते.माणसे दुरावली जातात. कधी कधी चांगली नातीही तुटण्याच्या मार्गावर असतात. गैरसमजुतीच्या काटेरी झाडाची मुळे अहंकार आणि संशयात खोलवर रुजलेली असतात. मीच मोठा आहे मीच हे करू शकतो. माझ्यासारखा दुसरा मोठा कोणी नाही. अशी भावना मनी रुजलेली असते. आणि त्यामुळे माणूस गैरसमजुतीच्या गर्तेत वाहत गेला की त्याची नाव किनाऱ्यावर यायला खूप अवधी लागतो. बऱ्याचदा ती नाव किनाऱ्याला लागतही नाही. मनात राग आणि दुःख साचत जाते.पण संवाद हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे.माणसाने संवाद वाढवावा. मनमोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतात.एकमेकांना समजून घेतल्यास नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येतो. माणसाने माणसाशी सदैव संवाद वाढवले पाहिजेत.विश्वास आणि प्रेमाने गैरसमजाचे काटेरी झाड उपटून टाकता येते. पण दोन्ही व्यक्तींची मनापासून इच्छा हवी. म्हणूनच नाती टिकवण्यासाठी संवाद आणि विश्वास खूप महत्त्वाचे आहेत.सर्वांनी भावनांशी नाते जपली पाहिजे. मग आठवते ही प्रार्थना... हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे.... भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उगवेल आहे खात्री, तो बरी देई आम्हाला काजव्यांचे जगणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..... वसुधा नाईक, पुणे मो. नं. 9823582116


Rate this content
Log in