यशाचे मध चाखायचे असते
यशाचे मध चाखायचे असते
*यशाचे मध चाखायचे असते*
यश मिळवणे साधीसुधी गोष्ट नसते. यशाच्या वाटेत अनंत अडचणी असतात. अनंत माइल स्टोन असतात. ते पार करून यश संपादन करता येते पण हे यश संपादन करण्यासाठी ध्येयाचा ध्यास हवा असतो. तरच यशाची पुरती होते आणि यशाचे मध चाखायला मिळते.
फुलांवरून फुलांवर भिरभिरणारी मधमाशी जशी अथक परिश्रम करून मध गोळा करते, तसेच यशही सहज मिळत नाही. त्यासाठी मेहनत, संयम, जिद्द आणि सातत्य आवश्यक असते. प्रत्येक अपयशातून शिकत पुढे जाणारा माणूसच यशाचे गोड मध चाखू शकतो. आपली म्हण आहे "प्रयत्न रगडिता तेलही गळे "
"प्रयत्नांती परमेश्वर " कोणत्याही प्रयत्नाला कष्टाची साथ मिळाली की यश हमखास संपादन होते.
यशाचा मार्ग नेहमीच सरळ नसतो. त्यात अडथळे, संघर्ष आणि अनेक परीक्षा असतात. पण जो माणूस हार न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतो, त्यालाच यशाची गोड चव अनुभवता येते. त्या यशाची गोडी खूप अनोखी कविता असते.
यश हे नशिबाने मिळत नाही; ते कष्टाने कमवावे लागते. बरीचशी माणसं आपल्या नशिबावर अवलंबून असतात.
उदा :- ज्योतिषाने सांगितले आहे की तुमच्या नशिबात राजयोग आहे. तुमच्या घरासमोर गाड्यांची लाईन लागेल.
माणसाने काही हालचाल केलीच नाही तर त्याला राजयोग कसा लाभेल. माणसाच्या घरासमोर रांगा लागतील पण त्या दुसऱ्यांच्या गाड्या असतील याचे काय...
तर माणसाने भविष्यावर जास्त विश्वास न ठेवता, नशिबावर विश्वास जास्त न ठेवता, कार्याची पूर्तता करावी ध्येयाचा ध्यास ठेवावा आणि उत्तम कार्य करून, कष्ट करून उत्तम यश संपादन करावे.
म्हणूनच स्वप्ने पाहा, ध्येय निश्चित करा आणि प्रामाणिक प्रयत्नांची साथ कधीही सोडू नका. कारण मेहनतीच्या फुलांमधूनच यशाचे मध तयार होत असते. ते चाखण्याची मजा खूप न्यारी आहे.
यशाचे मध चाखायचे तर असते
म्हणून कष्टांचे फूल फुलवायचे असते...
जिद्दीची पंखे घेऊन नभात भटकायचे असते
स्वप्नांना उंच भरारी देत फिरायचे असते...
अडथळे आले तरी न डगमगायचे नसते
संकटावर मात करत चालायचे असते...
घामाच्या प्रत्येक थेंबातून
यशाची गोडी मिळवायची असते...
संयम, मेहनत आणि विश्वासाने,
ध्येयाची शिखर गाठायचे असते...
कारण यशाचे मध चाखायचे असेल,
तर प्रयत्नांची बाग फुलवायची असते....
वसुधा नाईक, पुणे.
