जसा गॉगल घालाल तसे दिसेल.
जसा गॉगल घालाल तसे दिसेल.
*जसा गॉगल घालाल तसे दिसेल…*
माणूस जगाकडे जसा पाहतो, तसंच जग त्याला दिसतं.माणसाची सवयच आहे अशी.
डोळ्यांवर चढवलेला गॉगल फक्त उन्हापासून संरक्षण करत नाही, तर दृष्टीही बदलतो. काळा गॉगल लावला तर सगळं काळसर; रंगीत गॉगल लावला तर जगही रंगीत. प्रत्यक्षात बदललेलं जग नसतं, बदललेली असते आपली दृष्टी.
कोणी नकारात्मकतेचा गॉगल घालतो—त्याला प्रत्येक माणसात दोषच दिसतो, प्रत्येक प्रसंगात अडचणच भासते.
तर कोणी सकारात्मकतेचा गॉगल घालतो—तोच माणूस संधी शोधतो, अडचणीतून मार्ग काढतो. परिस्थिती एकच असते,संकटाला सामोरे जातो. अनुभव वेगवेगळा असतो.
आपले विचार, अनुभव, पूर्वग्रह आणि अपेक्षा हेच आपल्या डोळ्यांवरचे गॉगल असतात. जर ते स्वार्थाचे, अहंकाराचे किंवा द्वेषाचे असतील, तर जग कठोर आणि कुरूप वाटते. पण जर ते सहानुभूतीचे, कृतज्ञतेचे आणि आशेचे, प्रेमाचे असतील, तर हेच जग सुंदर आणि आपलेसे भासते.प्रेमळ वाटते.
म्हणूनच प्रश्न असा नाही की जग कसं आहे, तर प्रश्न असा आहे की आपण कोणता गॉगल घातला आहे. दृष्टी बदलली, तर सृष्टीही बदलते.म्हणूनच म्हटले जाते.....
जसा गॉगल घालाल… तसंच जग दिसेल.
वसुधा नाईक, पुणे.
