STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

चुका आणि शिका

चुका आणि शिका

1 min
0

*चुका - आणि शिका...*

 माणसाकडून चूक होत नाही असे नाही. चूक होते मुद्दाम केली जात नाही. पण हे चूक झाल्यानंतर ती सुधारणेही आपले काम आहे. माणसाच्या हातून चुका घडतात. आणि श्रेय हरवून बसतात. माणसाच्या ह्या चुकी मधून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. जणू काही आपल्याच रिकाम्या ओंजळीमध्ये आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. चूक सुधारणे हा मानवाचा गुणधर्म आहे. अशावेळी चुकीला माफी मिळते. परंतु पुन्हा पुन्हा तीच चूक करणे म्हणजे मुद्दाम केल्यासारखे आहे. त्या चुकीला मात्र माफी नसते. बऱ्याचदा अगदी नगण्य चुकीला सुद्धा आभाळाएवढी सजा मिळत असते. चूक आणि शिक्षा यांची कधीही ताळेबंदी मांडायची नसते. एक कृती, एक शब्द आपल्या चुकीला कारणीभूत असतो. यासाठी आपला शब्द आणि आपली कृती जाणीवपूर्वक योग्य तीच करावी. शेवटी काय तर एकंदरीत आपली चूक समोरचा पदरात घालणार नाही. आपली आई चूक समजावून घेईल पण चूक समजावूनही सांगेल परत ती चूक न करण्यासाठी. "चुका आणि शिका." ह्या म्हणीप्रमाणे चूक झाली असल्यास मान्य करावे आणि ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करावा. आपण मात्र सतत शिकत असतो. जीवनात चुकीला माफी नाही असे मात्र काही नाही बरं परत परत ती चूक केली तर शिक्षा मिळणार हे मात्र खरं..... वसुधा वैभव नाईक फोन नं. 9823582116


Rate this content
Log in