ऋतू चार
ऋतू चार
*चार ऋतू*
हो! बरोबर वाचलेत उन्हाळा, हिवाळा,पावसाळा हे तीन ऋतू जलचक्राचे आहेत. पण जिव्हाळा हा माणुसकीचा एक ऋतूच आहे.
जिव्हाळा हा मानवाने निर्मित केलेले उत्तम नाते आहे.
प्रत्येक मानव हा आपल्या स्वभावानुसार बारमाही सुद्धा हा जिव्हाळा ऋतू आनंदाने जपून ठेवू शकतो.
या ऋतूमध्ये मात्र आयुष्यात असे लोक जोडले जातात की ते तुमची सावलीसारखी काळजी घेतात. तुमच्या मनाचा आरसा बनतात. आरसा कधीही खोटे बोलत नाही. आणि सावली आपली साथ कधीही सोडत नाही. त्याप्रमाणे प्रेम दिले आणि प्रेम घेतले की जिव्हाळा ऋतू आपसुकच बाराही महिने आनंदाने चालणारा ऋतू आहे.
निसर्गातील प्रत्येक फूल देवाच्या चरणी अर्पण केले जात नाही. त्याप्रमाणे काही नाती सुद्धा अगदी मनात खोलवर रुजली जात नाहीत. काय आहे माहित नाही. पण मला असे वाटते की याला कारण राग, लोभ, मत्सर, द्वेष इत्यादी कारणामुळे कदाचित मनात अढी निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्या मनात ही नाती रुजली जात नाहीत.
जशी काही मोजकीच फुलं देवाला अर्पण केली जातात तशी काही नाती सुद्धा मनामनात जपली जातात आणि तीच अतिशय जिव्हाळ्याची होतात आणि जिव्हाळा हा ऋतू कायम मनात रुजला जातो.
अनमोल हा खजिना मानवाचा
तूच निर्माण केलास हा जिव्हाळा
सर्व माणसांबद्दल असावा सर्वाना
एकमेकांबद्दल मृदु कनवाळा...
वसुधा वैभव नाईक,पुणे
मो. नं. 9823582116
