गुगल पे
गुगल पे
*गुगल पे*
आजचा मानव हा तंत्र युगात वावरत आहे. पर्समध्ये पैसे नसतात किंवा अगदी कमी असतात, पण आपल्या मोबाईल मध्ये "गुगल पे " मध्ये पैसे असतात.
या गुगल पेची एक खासियत आहे खर्च करा, पैसा द्या,पण हा पैसा पण किती वापरतोय हे आपल्याला कळत नाही. पैसा आहे खर्च करा असे होते.
आपण घरी आल्यानंतर हिशोब केला तर आपल्याला समजते की आपण जी गरज आहे त्या वस्तू फार कमी प्रमाणात घेतल्या गेल्या आणि ज्या नको आहेत त्याच वस्तू खरेदी करून आपण घरी आलो आणि त्यासाठी पुष्कळ पैसे आपण खर्च करून आलेलो आहोत. आपल्याला खर्चाचा ताळमेळ राहत नाही किंवा लागत नाही.
पूर्वीची म्हण होती 'अंथरून पाहून हातपाय पसरावेत.'
आपल्या पर्समध्ये जेवढा पैसा असायचा तेवढाच आपण खर्च करायचा खर्चाचा ताळमळ लागत होता. आता मात्र या गुगल पे वरून पैसे खर्च करताना, आहेत पैसे खर्च कर नाहक वस्तू खरेदी केल्या जातात, आणि हिशोब लागत नाही आणि एक वेळ अशी येते की बापरे! आज आपण खूप पैशांची उधळपट्टी केली आता पुढे काय???
मग डोक्याला हात आणि विचार चक्र चालू असे होते.
त्यासाठी मित्रांनो गुगल पे आहे म्हणून खर्च जास्त करू नका जिथे आवश्यक आहे तिथे गुगल पे चा वापर नक्कीच करा किंवा सगळीकडे करा पण आपल्या खात्यात खरंच पैसे किती आहेत, आणि आपल्याला किती खर्च करायचे आहेत याचे भान मात्र राहू द्यावे.
एक उदाहरण देते माझ्या बाबतील काल घडलेले -
उदा - डी मार्ट वर खरेदी केली असता टॅक्स खूप जातो. हे अनुभवाने मी ओळखले.
करोना नंतर काल मी डी मार्ट ला गेले. मध्ये चार वर्षे शांत राहिले. कारण डी मार्ट ला जाण्याविषयी उत्सुकता होती ती जरा कमी झाली होती. पण काल घरातील काही वस्तू ज्या मला तिथेच घ्यायला आवडतात मी गेले आणि तिथे गेल्यानंतर खरेदी झाली. हे खरेदी अगदी घरातील काही जीवनावश्यक वस्तूंची होती.
डी मार्ट ला गेलो पण जवळजवळ आमचे बिल 15000 झाले. तिथला जो आकर्षकपणा आहे वस्तूंचा आणि रु. चे लेबल लावलेले pअसते एकावर एक फ्री, वीस टक्के,तीस टक्के फ्री त्यामुळे माणसाला मोह होत जातो आणि माणूस नको ते खरेदी करून बसतो. काल माझ्या बाबतीत तेच झाले अंदाजे मला जे जीवनावश्यक वस्तूंचा खर्च 5000 अपेक्षित होता परंतु वस्तू इतक्या सुंदर, देखण्या आकर्षक होत्या की मोह टळला गेला नाही.आणि नाहक दहा हजारांची आणखी खरेदी आम्ही केली. मी हे का सांगते तर पर्समध्ये होते फक्त तीन हजार रुपये पण पर्स मधले तीन हजार रुपये ते काहीच उपयोग होणार नव्हता मग गुगल पे आम्ही केले आणि एका खात्यातून माझ्या 15000 जात नव्हते म्हणून मग दुसऱ्या खात्यामध्ये मी बघितले तर ज्या खात्यातून मला पैसे द्यायचे होते तिथे अगदी पाच हजार शिल्लक होते हे लक्षात आले नाही, पण दुसरी बँक जर का त्या गुगल पेला जॉईन नसती तर कदाचित मला तिथल्या काही वस्तू तिथेच ठेवून यावं लागलं असतं,म्हणजे काय तर गुगल पे खर्च करताना आपल्याकडे किती पैसा आहे, आणि खरंच जीवनावश्यक वस्तू लागत आहेत का याचा विचार काल माझ्याकडून झाला नाही. म्हणून आज हा लेख आपल्या सर्वांसाठी गुगल पे मध्ये पैसे आहेत म्हणून खूप खर्च करू नका. वाटेल तसा पैसा उडवू नका. अर्थात हे प्रत्येकाच्या जीवनावरती अवलंबून आहे गरजेच्या वस्तू चैनीच्या वस्तू घेताना विचार करावा एवढेच माझे म्हणणे आहे.
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
