स्थळ
स्थळ
*स्थळ*
स्थळ म्हणजे काय? तर स्थळ म्हणजे ठिकाण.स्थळ म्हणजे मुलीला विवाहासाठी आलेली मागणी.
दोन अर्थ या शब्दातून निघतात.
या दोघांची निवड योग्य असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचून आपल्याला आनंद मिळतो.
जे स्थळ मुलीला सांगून आलेले आहे ते योग्य असेल तर मुलीचा संसार सुखावह होतो.
पण दोन्हींची निवड चुकली तर ज्या स्थळाचा, ठिकाणाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे अभ्यास करायचा आहे अशा ठिकाणी आपण पोहोचत नाही, योग्य दिशा मिळत नाही. त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडते.
आणि जे स्थळ मुलीला सांगून आले आहे त्याची सुद्धा निवड चुकली तर मुलीला कायमचा त्रास होऊ शकतो.
म्हणून आलेल्या स्थळाचा विचार योग्य करून आपली मुलगी द्यावी व ज्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची आहे मग ते निसर्ग रम्य ठिकाण असू दे किंवा शासकीय ठिकाण असू दे आपण त्या ठिकाणाची चौकशी करूनच जाणे महत्त्वाचे ठरते.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा -पुणे
मो. नं. 9823582116
