मानसिक तणाव
मानसिक तणाव
मानसिक तणाव..
मानसिक तणाव माणसाला असला की त्याची शरीराची भाषा बदलते. यालाच आपण इंग्रजीमध्ये बॉडी लँग्वेज असे म्हणतो.
मानसिक तणाव असला की सतत चिडचिड होते. कारण नसताना एकमेकांवर ताशेरे मारले जातात. कधी कधी मानसिक तणावाखाली माणूस एकदम शांत होतो. डिप्रेशन मध्ये देखील जातो. किंवा मनातल्या पटकन बोलून रिकामे तरी होतो.
माणसाच्या शारीरिक हालचाली वरून डोळ्यांच्या हवभावावरून, चेहऱ्यावरचा एक्सप्रेशन वरून आपण त्याला मानसिक तणाव आहे का? तो आनंदात आहे का?दुखात आहे. हे आपण लगेच जाणतो.
शब्दांच्या दुनियेपेक्षा ही देहबोलीची भाषा अगदी दिसून येते. जाणवते.
मानसिक तणाव येतो हे बरोबर आहे. पण हा तळा कोणाशी तरी बोलून दाखवावा. मनातच ठेवला तर त्याला आजारांच्या माहेरघरात लोटले जाते. कधी लिहून रिकामे व्हावे.कधी खास मित्रांना सांगावे. कधी आहे बाबा जवळ बोलावे. कधी कुटुंबातील प्रिया व्यक्तीला बोलून दाखवावे. आपल्या मनातील काही गोष्टी शेअर केल्याने आपली तब्येत उत्तम राहते व योग्य सल्ला मिळतो. पण ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याकडूनच सल्ला घ्यायचा आहे. हे मात्र तेवढेच खरे.
आपण स्वतः विश्वासाचे रोप पेरले तर विश्वासाचे झाड उगवेल. त्याला विश्वासाची फुले येतील. तर चला एकमेकांच्या हृदयात विश्वासाची रोपे लावूया आणि मानसिकतेचा तणाव कमी करूया...
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे
मो. नं. 9823582116
