STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

सेल सेल सेल

सेल सेल सेल

2 mins
5

*सेल सेल सेल......*
 हो! सेल शब्द वाचला, ऐकला, एडवर्टाइज पाहिली की आपण पहिलं त्या दुकानात जातो आणि कारण नसताना त्या वस्तू घरी आणतो. सेल या नावाची भुरळ पडते. खरं तर सेल म्हणजे विक्री. मग त्यांच्या दुकानात काही वर्ष पडून असलेल्या वस्तूंची विक्री ते कमी पैशात करतात. पण ते आपला पैसा जो लागलेला आहे तो मिळवतातच. आणि आपल्याला त्या कमी दरात मिळतात म्हणून आपण खरेदी करतो. खरेदी -विक्री,नफा - तोटा या तशा आता लहान गोष्टी वाटायला लागलेल्या आहेत. आपण याचा फारसा विचार करत नाही. पण सेल हा शब्द कानावर पडला किंवा वाचला की आपण हमखास त्या ठिकाणाला भेट देतो.नको असलेल्या वस्तू घरी आणतो,आणि घरामध्ये जागा नसेल तरीसुद्धा त्या साठवून ठेवतो. बघा प्रत्येक घरातला हा अनुभव आहे. प्रत्येक गृहिणीचा अनुभव आहे. पण आज मी बोलणार आहे ते गरजेच्या वस्तूंचा कधी सेल लागतो का? या विषयावर.. बघा तेल,गहू,आटा, साखर, डाळी इ. अन्नधान्य याचा जंगी, धमाकेदार सेल लागल्याचं ऐकलंय का कुठे पाटी लागली का हो? चैनीच्या वस्तू नेहमीच कसल्या ना कसल्या सेलवर धूम धडाकाने विकायचा प्रयत्न नेहमी चाललेला असतो. त्या प्रॉडक्ट्स वरती सूटही दिली जाते. चैनीच्या वस्तू घरी आणताना गरज नसताना आणल्या जातात तरी मन अशांत राहते. मी सेलच्या किमतीमध्ये घरी वस्तू घेऊन आलो. जी एक लाखांमध्ये वस्तू मिळणार होती ती मला 75000 ला बसली छान फुशारकीने आपण सांगतो. तरीसुद्धा कधी कधी मन अतृप्त राहते. बघा आपण कोक पितो या कोक मध्ये आपल्या शरीराला आवश्यक प्रोटिन्स,विटामिन्स काहीच नाहीये. एकदा तोंडाला लागलं की परत परत प्यावसं वाटतं. ही चैनीची वस्तू आहे.नाहक खर्च आणि आजाराला आमंत्रण आपणच देतो. पण आपल्या गरजा भागवण्यासाठी जी साधन लागतात उदाहरणार्थ अन्न, शिक्षण, कधीच सेल लागत नाही.' गरज ही शोधाची जननी आहे '. माणसाला गरज लागली की तो कर्ज काढून सण साजरा करतो. शिक्षण ही प्रक्रिया हल्ली फार महाग होत चालली आहे. मराठी मिडीयमला शाळेमध्ये पुस्तक मिळतात, परंतु इंग्लिश मीडियमला शाळेमध्ये पुस्तक मिळत नाहीत. आठवी, नववी, दहावीच्या मुलांचे एक पुस्तक हजार रुपएपर्यंत आहे. मग याचा सेल कुठे लागतं नाही. जीवनाच्या आवश्यक वस्तूंचा सेल कधीच लागत नाही. चैनीच्या वस्तूंचा सेल मात्र कायम चालू असतो. बऱ्याचदा आपण सेलच्या मागे लागतो काही वस्तू घरी आणतो नंतर आपल्याला कळतं की ही वस्तू खराब लागलेली आहे.पण आपल्याला दिलेल्या त्या पावतीवर असे लिहिलेले असते की वस्तू परत घेतली जाणार नाही. मग साडी, कपडे असू दे किंवा इलेक्ट्रॉनिकची साधी वस्तू असू दे मग अशा वेळेला आपल्याला नाहक त्रास होतो. म्हणून सेलच्या मागे पळू नये खात्री करूनच खरेदी करावे नाही त्या भूलथापांना बळी पडू नये....
 वसुधा वैभव नाईक
 धनकवडी जिल्हा पुणे
 मो. नं. 9823582116


Rate this content
Log in