The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Shobha Wagle

Abstract

5.0  

Shobha Wagle

Abstract

हसता हसता रडले

हसता हसता रडले

2 mins
680


एकदा शाळा सुटायच्या वेळेला रिमझिम पावसाची सुरुवात झाली. सकाळी शाळेत येताना चांगले ऊन होते. छत्रीचं ओझं कशाला म्हणून बऱ्याच जणींनी छत्र्या आणल्या नव्हत्या. मला शाळा जवळच होती. जरा पाऊस शिरशिरला तरी मला चालतो. छत्रीमुळे माझं जास्त काही बिघडत नव्हतं. उगीच ओझं कशाला म्हणून मी जास्त करून छत्री नेतच नव्हते.


सगळी मुले शाळा सुटल्यावर गेली. त्या नंतर वीस मिनिटांनी आम्ही शिक्षक निघालो. आम्ही निघताना पावसाची रिपरिप थोडी वाढलेली होती. काही जणी रिक्षाने गेल्या. माझ्या बरोबर दोघी जणी होत्या व एकीकडेच लहान छत्री होती. माझं घर जवळ होतं म्हणून त्या म्हणाल्या तुम्हाला घरी सोडतो व नंतर आम्ही रिक्षाने जातो. मी किती नको नको केले तरी दोघी ऐकचना. 


शेवटी 'वन बाय थ्री' करून आम्ही हळू हळू चालू लागलो. खरं म्हणजे माझं घर आणि शाळा दहा मिनिटांच्या अंतरावर. पण जरा पुढे आल्यावर धो धो पाऊस कोसळला व सोसाट्याचा वाराही आला. वाऱ्याच्या झोक्याने मैत्रिणीच्या हतातून छत्री निसटली व ती उडाली. ती पकडायला मैत्रीण धावली. पावसाने भिजलेली साडी, त्यात रस्त्यावर पाणीच पाणी. छत्री पकडण्या करता जी तारांबळ उडाली ते पाहून हसता हसता पुरे वाट झाली. आमची तिघींची छत्री करता झालेली पळापळ आणि वाऱ्याचे तिला इकडून तिकडे उडवणे ह्याने आम्ही चिंब भिजून गेलो. कपडे, पर्स, पुस्तके, वह्या सगळ्यांवरून पाणी निथळू लागले. आमच्या समोरून गाडीतून जाणारे येणारे ही आमच्याकडे पाहून हसत होते आणि आमच्या मधली एक शेरे मारत होती. त्याने एवढे हसले की आयुष्यात कधीच हसले नव्हते. 


मध्येच एक म्हणाली "It is really nice to be a child. Forget that we are school teachers and let's play in the rain." आणि खरंच दहा मिनिटे अक्षरशः लहान मुलांसारखे जगाची पर्वा न करता आम्ही पावसाचा आनंद लुटला. एवढे हसत होतो की डोळ्यांतून पाणी वाहत होते व समोरचे दिसत ही नव्हते. दारुड्यासारखे हेलकावे खात चाललो होतो. गाड्या पो पो करत हॉर्न वाजवत चालल्या होत्या व त्यांना ही लहान मुलासारखे आम्ही आवाज करून प्रतिउत्तर देत होतो. खरंच वयस्कर असून आम्ही तिघींनी एवढी मजा आणि एवढा हास्य स्फोट केला की हसता हसता डोळे पाण्याने डबडबले....


Rate this content
Log in