Deepali Thete-Rao

Abstract Others

3.4  

Deepali Thete-Rao

Abstract Others

​हिरवं सपान...

​हिरवं सपान...

4 mins
267


दूरवर पसरलेल्या वावराकडे एकटक बघत बसला होता शानू. उन्हानं अंगाची काहीली होत होती. शरीर घामानं डबडबलं होतं. हवा कोंडून आल्यागत झाली होती. खांद्यावरच्या पैरणीनं त्यानं घाम पुसला. उगीचच जरासं इकडेतिकडे सरकत तो होणारी घालमेल कमी करण्याचा प्रयत्न करत होता. उकीडव बसून पायाला बी जड झालं होतं.    शेत पार कोरड ठिक्कर पडलेलं. जमिनीच्या भेगा दिसू लागलेल्या. नांगरणीची काम केव्हाच उरकली पण जून संपत आला तरी पावसानं तोंड फिरवलं होतं. आता उगवलं नाही तर.. काळीज धपापलं त्याचं. पोरं कशावर जगतील? लक्षुमी काय करील? कर्जही झालं होतं खूप..बापानं काढलेलं आणि शानूनं त्यात भर घालून अजून वाढवलेलं. त्या कर्जानं कंबरड मोडलं. पाऊस पाणी दगा देऊन राहीलं होतं.


सगळाच कारभार इपरीत तेचा. कंदी मणभर बरसंल..पार धुऊन काड़ल वावरतर कंदी असं त्वांड लपवून बसल म्होरलं वावर उजाड करून...सरकार मदत देत होतं पर ती तेच्यापत्तुर पोहोचती तोवर आकसून जात होती. कसं जगावं मानसानं... मेंदू इचार करून शिणून गेला. जीव द्यावा वाटू लागलं होतं.  काय बी पर्याव शिल्लक दिसत नव्हता. पाय 'घरात' अडकला होता पण गळा 'फासात' अडकू पहात होता.    तसं आज त्यानं पक्कच केलं होतं लटकायचं. म्हणून तर सकाळच्याला निघताना लक्षुमीच्या हातात बाजेखालच्या पेटीची चावी दिली होती. होतं तरी अस काय त्यात म्हणा.. एकेक करत सगळंच डाग़ नरपत सोनाराकडं गहाण पडलं होतं. दोन मण्यांचं डोरलं लक्षुमी तेच्या नावानं मिरवीत होती गळ्यात.... तिची भांबावलेली नजर टाळून पोराला पोटाशी धरलं एकवार...त्येला नवी वही, पुस्तक अन् पेन्शिल हवी होती साळंसाठी.....डोळ्यातली टीपं भाईर पडायच्या आदोगर शानू भाईर पडला.....त्यांना तसच अंधारात ठिऊन....   


तसा चौथीपर्यंत शिकलेला होता तो. गावातल्याच साळंत. फुडं काई जमलं न्हाई घरच्यांकडून.दिसभर गुरं, करडं हाकत रानातून फिरायचं अन् मावळतीला परतायचं. कदीमदी साळंकडं बगून रडू फुटायचं..बापाच्या हट्टाखातर शेतीमध्ये गुंतवलं स्वतःला. पुढच्या शिक्षणाची जिद्द होती...इच्छाही होती....पर समदं शेतीत जिरलं होतं. इचारांचं मळभ दाट झालं..बाहेरच्या हवेसारखं...कोंदट...गदगदून येत व्हतं उगाच. घराची.. पोराची.. लक्षुमीची आठवणं.. कालवाकालव होत हुती छातीत...कसं जगतील माझ्या मागंद्येवा ईरोबा तुच बग रं बाबा आता!"रं!! शानू येतो नव्ह भाकर खायलाआर आल्या धरून बसला हाईस हातावर हात धरून. तब्येत पाणी ठीक हाय नव्हशेतावर बी उशिरान आलास अरं तिकडं बांधाच्या बाजूनं तण वाढलय लईच. कालच बोललो व्हतो तुला. ते बी काढनास. झालंय तरी कायचल की रं बिगीनं." लखू लांबून हाळी देत इचारीत होता. "ऱ्हाऊ दे! म्या नाय येत. तुम्ही व्हा समदी म्होरं. आज मन न्हाय. म्या बसतू हितच" उपाशीपोटी तसाच बसून राहिला गुडघ्यात मान घालून पायाच्या अंगठ्यानं माती कोरत. विचारांच काहूर संपना.पारच कसनुसं झालं.


येळ बी झपाट्यानं चालला हुता. त्यानं लाख ठरवलं पर जीव देऊ वाटत नव्हता. बावचळल्यागत झालं हुतं. काय करावं ठरनाच.  त्यानं मान वर करून चहूकडे नजर टाकली.  आकाशात काळे ढग जमा होत होते. अंधारून आलं अन् अचानक रापराप वेडावाकडा पाऊस पडू लागला. झपाटल्यागत तो दिसेल त्याला झोडपून काढत सैरावैरा धावत होता...वाऱ्यायाशी शर्यत करत.  माती आसुसली होती.... पाऊस सखा झाला होता.... त्याला भेटायला वार् याशी संधान बांधून तिनं वरवर गोलगोल फिरत धिंगाणा घातला. चहूकडे निसता धुरडा.  विजा लखलखू लागल्या. कुडाबाहेर निंबाजवळ सळसळत फिरली ढगातून निघालेली नागिण . निंबाखालचं मरी आईचं छोटस देऊळ. तिचाच पहारा व्हता शेतावरपाऊस अन् वारा दोग बी निंबाला असंss झुलवत होते  फुला-पानांचा आईला अभिषेक. पार सडा मांडला पार झोपडी बाजूनं. बेभान निंब अाडवा-तिडवा होत अंगात आल्यागत पिंगत राहिला. आता मोडतय जणू? निसतच झिंगतय कदीचं. शानूला भीती वाटू लागली. मनात काहीबाही विचार यायला लागले. आपुन बी पायाळू तं न्हाई.... इज चकाकतीया हितच डोईवर सारखी. पडली तर कुडासकट आपुन बी गपगार. 


इकडं तिकडं बघत त्यानं थोडंसं धुंडाळलं. तांब्याचा पोच आलेला गडवा हाती लागला. भीतीपोटी छातीशी घट्ट कवटाळला. तांबं रोखतय म्हनं इजंलाकिती बी मरायचं ठरीवलं तरी जगायची हाव..सुटत नव्हती. नुसतीच घालमेल.  इपरीतच होऊन बसलं व्हतं समदं. हळूहळू पावसाच तांडव ओसरलं. थकलेला निंब पानांवरचं पाणी निथळू लागला.   अम्रित पिऊन तृप्त झालेलं वावर डोळ्याला भूल घालत होतं. हिरवा शालू नेसलेली काळी माय अन् हिरवं सौभाग्यलेणं ल्यालेली त्याची लक्षुमी दोगी बी डोळ्यासमोरुन जाईनात. ©®दीपाली थेटे-राव"मातीच्या उरातलं बी तग धरून रहातया पान्याची वाट बगत अन् म्या इतक्या लवकर मान टाकली. कायतरी छोटामोटा जोडधंदा करू चालू. त्यासाठी म्हनं मदत करतय सरकार. उद्याच्यालाच जाऊन गाठतो तलाठ्याला." आनि आता या वर्षाला येईल पीक चांगलं..पावसानं अशीच साथ दिली तं. व्हईल समदं ठिकठाक. फिटल की कर्ज दमादमानं. जीव देऊन बी काय व्हनार. मागच्या च्या काळजाला घोर "हळवं होऊन त्यो म्होरं वावराकड बघत राहिला. आत्महत्येचा इचार मनाची येस ओलांडून भाईर पडला. त्यानं ठरवलं...." कष्ट पडू दे किती बी, मुलाला शिकवायचं...शेतकी कालेजात धाडायचं....चांगला प्रगत शेतकरीच करायचं. येऊ दे किती बी संकट पिक पान्यावर शिकून करील त्यो बराबर ऊपाय.... काळ्या आईचं पांग फेडायचं..तिच ऋण फिटतय व्हय कशानं! आरं ! लेकरासाठी माजी काळी माय सवताला नांगरून घेती. तरी बी दुखनं धरून पेरल्याच्या धा पटीनं परतून देती. आपन काय इचार करत व्हतो मरायचा. "माती हातात धरून त्यानं हलकेच ह्रदयाशी नेली....   


एव्हाना पाऊस संपून सांजच्या हलक्या उन्हाची तिरीप ढगांच्या आडून कुडापाशी निंबावर पडली.  तोच कणभर आशेचा किरण मनात सामावून... मणभर स्वप्नांचा उजेड नजरेत साठवून...शानू परत घराच्या वाटेकडे चालू लागला...... मातीच्या मनात दडलेलं "हिरवं" सपान शानूच्या काळजात तरारलं. 

इडापिडा टळू दे । बळीराजाच राज्य येवू दे।। 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract