Sangieta Devkar

Abstract Others

2  

Sangieta Devkar

Abstract Others

हॅप्पी प्रपोज डे

हॅप्पी प्रपोज डे

2 mins
122


काय यार कसला हॅंडसम आहे ग तो. अस आजच्या तरूणीच्या तोंडात हमखास हे वाक्य ऐकायला मिळते. जमाना बदलला तशी प्रेम करण्याची आणि तिला त्याला प्रपोज करण्याची पद्धतही बदलली. पूर्वी कट्ट्यावर मित्र मंडळी बसून मुलिंवर हमखास शेरेबाजी व्हायची. आता मात्र मुली ही यात मागे राहिल्या नाहीत. "आला बघ ग तुझा हिरो" . अस न घाबरता मुली ही मुलांवर शेरेबाजी करताना दिसतात. पूर्वी सारख आता वाट पाहायचा जमाना गेला. तिला प्रपोज कस करू ती हा बोलेल का? अजून किती दिवस वाट बघू अस विचार करण्याचा काळ मागे पडला. मी तिला डायरेक्ट विचारनार आहे बघू जे होईल ते होईल असा बिनधास्तपणे मुलीशी भिडणारा आज चा तरुण आहे तर मला तो आवडतो मी त्याला प्रपोज करणार आहे असं स्पष्ट बोलणारी आजची तरुणी आहे. मुलगा आहे म्हणून त्यानेच प्रथम प्रपोज करावे ही विचारसरणी मागे पडत चालली आहे. तिने मला मागणी घातली अश्या प्रेम कथा आता सर्रास पाहायला मिळतात. प्रेम आहे तर ते व्यक्त करायला हवे असा तरुणी विचार करतात. नकार किंवा होकर जे काही असेल तर सहज पचवतात. प्रेम हे दोघांचं असत मग तो विचारेल तोपर्यंत मी थांबू का? मी प्रपोज केले तर लोक काय म्हणतील ही विचारसरणी आता राहिलेली नाही. मला त्याच्याबद्दल भावना आहेत माझ्या क्रशला प्रपोज करायला काहीही हरकत नाही असे तरूणीचे ठाम मत असते.


पूर्वी प्रेमाचा संदेश त्याच्या किंवा तिच्या पर्यंत पोहचवण्यासाठी खूप मोठ्या दिव्यातुन जावे लागायचे. चिठ्ठी लिहून प्रेमाचा खुलासा करणे हा सोपा मार्ग होता. मात्र ही चिट्ठी कशी पोहचवायची? घरच्यांच्या हाताला लागली तर? असे संकट ही असायचे. आता मात्र सोशल मीडियामुळे प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग खूपच सोपा आणि मोकळा झाला आहे. फेसबुक, व्हाट्सअँप यावरच "प्यार का इजहार" केला जातो. इथेच प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात आणि इथेच ब्रेकअप ही होतो आणि जो तो आपल्या मार्गाने पुढे निघून जातो. होकार मिळो वा नकार दोन्ही पचवण्याची ताकद तरुणांमध्ये असावी. एकतर्फी प्रेम करून नकार आला तर प्रेयसीच्या जीवावर उठणे,ऍसिड हल्ला करणे, हे प्रेम असूच शकत नाही. उलट आपली प्रिय व्यक्ती सुखात आहे आनंदात आहे हे पाहणं म्हणजे खरे प्रेम होय.


प्रेम हे क्षणिक नसावं. त्या प्रेमात जीव ओतण्याची गरज असते. तरुणाईच्या भावविश्वातल्या प्रेम व्यक्त करण्याच्या पध्दतीत जरी बदल झाला असला तरी, त्यातील प्रेम भावना आणि शाश्वती तितकीच खरी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. नजरेतून प्रेम व्यक्त करत आपल्या भावना त्याच्या पर्यंत पोहचवणे आणि त्याचा होकार हा प्रवास तरुणींना हक्काचा वाटू लागला आहे. मग "तिने प्रपोज केले तर"?? काहीच बिघडणार नाही. पण पूर्वी चिठ्ठी लिहून गपचूप आपल्या प्रेम भावना तिच्या पर्यंत किंवा त्याच्या पर्यंत पोहचवण्यात जी मजा होती ती आजच्या फास्ट फॉरवर्ड जमान्यात नाही हेच खरं !आपण अगदी थरथरत्या हाताने, मनाने कबुली द्यायची आणि समोरच्या व्यक्तीने लाजून 'हो' म्हणत ते स्वीकारलं की जो आनंद वाटतो तो स्वर्गात मावणारा नसतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract