Supriya Devkar

Abstract Tragedy

3  

Supriya Devkar

Abstract Tragedy

हातावरलं पोट

हातावरलं पोट

1 min
285


मलिका कर्नाटकातून अर्थार्जनासाठी नवर्यासोबत महाराष्ट्रात आली होती. सागंली हे ठिकाण त्यांनी आपल्या निवार्यासाठी निवडल होते. नवराबायकोनी फिरून फिरून एका ठिकाणी स्वतःसाठी निवारा शोधलाच. आता काही महिने गेल्यावर चागंलाच जम बसला होता दोघांचा. 

मलिका चार घरची धुणीभांडी करत असे. तर तिचा नवरा सेंंट्रिरिकची कामं करायचा पण घरात पैसा देेत नसायचा.मलिका कष्टाळू तर होतीच पण स्वाभिमानी ही होती. कोणी घरात राहिलेले शिल्लक जेवण देऊ केेल तर मग ती काही न बोलता घेऊन जात असे. शिळे अन्न ती घरी जाता जाता जनावरांना खायला घालत असे. ती सर्वांशी आदराने बोलत असे. प्रत्येेकाच्या अडचणीत ती मदत करत असे.


एक दिवस  मलिका समोर रहाणाऱ्या वहिनींकडे आली आणि अचानक ती रडायला लागली वहीनीला काही कळेना त्या  तिला शांत करत पाठीवरून हात फिरवत विचारू लागल्या तशी ती बोलू लागली 'वहीनी हातावरल पोट असणं काय गुन्हा आहे काय? वहिनीला काही कळेना पण तरीही त्या काय  

झाले विचारू लागल्या. मलिका एका कामावर जात असे तिथेे ती स्वयंपाक आणि भांडी असे काम ती करत असे कामावरल्या मालकीणबाई भरपूर कामं करून घेत असत तरीही ती शांतपणे काम करत होती. मात्र तिची मालकीण तिनेच बनविलेेेले उरलेले अन्न तीन दिवस चार दिवस फ्रिजमध्ये ठेेवून मग द्यायची ही गोष्ट मलिकाला खटकायची.


माणसासारखी माणसं तरीही अशी वागतात याचा तिला राग यायचा. गरिबांच्या वाट्याला असले जीवन का असा प्रश्न तिला नेहमी पडलेेला असायचा. गरिबी आली म्हणून माणसं माणुसकीने वागू शकत नाही का?


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract