हारजित पर्व नवे - भाग 8
हारजित पर्व नवे - भाग 8
वेट प्रीती मला इतकच म्हणायचे आहे की हा मोहित का आपल्या दोघांच्या मध्ये सारखा सारखा येतो? काय हवंय आता त्याला. सुमित तो माझा एक्स बॉयफ्रेंड होता म्हणजे आता तो माझा मित्र असू शकत नाही का? तू का असा विचित्र अर्थ लावतो सगळ्याचा. ओके तुला पटते ना बाय म्हणत त्याने कॉल कट केला. प्रीतीला आता सुमित चा खूप राग आला होता. हा मोहीत का खटकतो त्याला इतका ? तो तसा फालतू मुलगा नाही जो मला त्रास देईल पण हे सुमित ला कोण सांगणार? जाऊ दे नको विचार करायला अस म्हणत ती आंघोळीला गेली. ती फ्रेश होऊन आली आई ला चहा बनवायला तिने सांगितले. तिने पाहिले सुमितचा मेसेज आला होता. तिला तो पाहायची इच्छाच नवहती पण शेवटी प्रेम होतं ना मन कस ऐकणार तिने पहिला मेसेज आय एम सॉरी जान. तू आवरून बस आपण डीनर ला जाऊ. मी येतो तुला घ्यायला. तिला समजेना असा कसा आहे हा? आता मोहीत वरून इतकं बोलला आणि आता लगेच माफी मागतो मग नको ते बोलतोच का? काय करू डीनर ला जाऊ की नको नाही गेले तरी चिडणार. हम्मम कैसा ये इशक है अजब सा रिस्क है...असेच मनात आले तिच्या. बर मी तयार राहते तू ये असा तिने सुमित ला मेसेज केला.
आठ वाजता सुमित प्रीती कडे आला. तिने डार्क ब्लू कलरचा टॉप त्यावर गोल्डन फ्लावर ची डिझाइन होती आणि व्हाईट लेगिन घातली होती. हलका मेकअप केला होता केस क्लिप ला लावून मोकळे सोडले होते. सुंदर दिसत होती प्रीती. सुमित ही व्हाईट टीशर्ट आणि त्यावर डेनिम चे जॅकेट जीन्स अशा लूक मधये आला होता. पण सगळ्यात त्याचे डोळेच खूप मस्त होते अगदी गहिरे तपकिरी खोल अथांग की समजनारच नाही इतके भान हरपून एखादा त्यात रमून जावा. प्रीती त्याच्या डोळ्यांवरच तर भाळली होती. खूप आवडायचे तिला त्याचे डोळे. ती त्याच्या कडे एकटक पहात होती. हॅलो काय विचार चाललाय मॅडम बस ना आत.सुमित बोलला तशी ती भानावर आली. हो बसते म्हणत कार चा दरवाजा उघडून ती आत बसली. काय पहात होतीस मी काही विचित्र दिसतो का? नाही रे . मग इतकं टक लावून काय बघत होती सुमित तिच्या जवळ येत विचारत होता. तो इतका जवळ होता की तिला त्याचे उष्ण श्वास जाणवत होते . तिचे हार्टबिट्स वाढत होते. त्याने तिच्या गालावरुन आपली बोट फिरवत म्हणाला,सांग ना काय पहात होती. काही नाही मॅड तुझे डोळे ?. कसे आहेत माझे डोळे. गडद तपकिरी खोल या डोळ्यात स्वतःला हरवून जावस वाटत. अच्छा मग कधी हरवून जाणार आहेस प्रितु माझ्या डोळ्यात.तो तिच्या नजरेत बघत बोलला. सुमित चल ना आता असा नको बघू मला लाज वाटतेय. तो बाजूला होतच नवहता म्हणाला,मला पण आवडेल तुझ्या सोबत तुझ्या डोळ्यात कैद व्हायला. आणि तो आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवणार तसे तिने डोळे बंद केले. सुमित ने हलकेच तिच्या कपाळावर किस केले. तिने डोळे उघडले त्याच्या कडे पहात हसत होती. चल ना सुमित. हा निघुया म्हणत तो परत तिच्या कडे झुकला.
आता काय सुमित? तिने विचारले आता असे म्हणत तो अजून तिच्या जवळ गेला तशी तिची धडधड वाढली,त्याने सीट बेल्ट घेऊन तिला बांधला आणि जोरात हसून म्हणाला किती घाबरतेस तू यार. हो आहे मी भित्री चल आता. मग दोघे निघाले. हॉटेलमध्ये मस्त गप्पा मारत त्यांनी जेवण केले. सुमित म्हणाला,प्रीती तु निवडणूक जिंकल्या बद्दल मामा एक पार्टी देणार आहेत काही ठराविक मोठी लोक असतील पार्टी ला. बहुतेक रविवारीच असेल तुला सांगेन मी. बर पण मी एकटी नसेन ना लेडीज म्हणून. नाही ग मामी आई बाबा तुझे आई बाबा पण असतील. मग ठीक आहे. आणि तेव्हाच आपल्या एंगेजमेंट ची पण बोलणी होतील. मला तर कधी एकदा आपली एंगेजमेंट होतीय अस झालंय. हो का इतका का उताविळ झाला आहेस. हा मग तू माझी आहेस असे शिक्कामोर्तब होईल ना! म्हणजे आता मी तुझी नाही आहे का? आहेस की जान माझीच तर आहेस पण साखरपुडा झाला की हाफ वाईफच होणार ना. पण आताच मला धीर धरवत नाही इतकी छान दिसतेस आज एकदम हॉट आय वॉन्ट टू किस यु. आधी जेवण संपव काही नाही बाकी मिळनार समजलं. काय तू ना माझ्या रोमँटिक मूड चा कचरा करतेस यार. जेव गप आणि मला कॉफी हवी ती सांग. बर राणी सरकार.जेवून ते घरी जायला निघाले. तिने कार मधये बसल्या बसल्या सीट बेल्ट लावला म्हणाली,लावते मी बेल्ट नाहीतर उगाच माझ्या जवळ यायचा बहाना असतो तुझा. असे काय मला तुझ्या जवळ येण्यासाठी बहाण्याची गरज नाही आणि पटकन त्याने तिच्या ओठाचे किस घेतले. सुमित हे चिटिंग आहे जा खडूस . चिटिंग नाही हे डेरिंग आहे आणि तो हासू लागला. ती खोटं खोटं तोंड फुगवून बसली. इतकी पण फुगू नकोस हा फुटून जाशील. सुमित तू ना असे म्हणत ती त्याला दंडा वर मारू लागली. आई शपथ काय हात लागतो तुझा. बघ जितके मारशील तितके किस घेईन हा तुझे . मग ती लाजून कार च्या बाहेर बघू लागली. रेडिओ वर तेव्हाच मस्त गाणं सुरू होत...
प्यार मांगा है तुम्हींसे ना इन्कार करो,
पास बैठो जरा,
पास बैठो ज़रा आज तो, इक़रार करो
कितनी हसीं है रात, दुल्हन बनी है रात
मचले हुए जज़बात, बात ज़रा होने दो
मुझे प्यार करो
प्यार माँगा है तुम्हीं से...
पहले भी तुम्हें देखा, पहले भी तुम्हें चाहा
इतना हसीन पाया, साथ हसीं होने दो
मुझे प्यार करो
प्यार माँगा है तुम्हीं से...
कितना मधुर सफ़र है, तू मेरा हमसफ़र है
बीते हुए वो दिन, ज़रा याद करो
मुझे प्यार करो
प्यार माँगा है तुम्हीं से...
हे गाणं ऐकण्यात सुमित आणि प्रीती गुंग झाले. त्याच्या हातात तिचा हात होता. सुमित तिच्या कडे पहात हसत होता. प्रीती ला घरी सोडून सुमित घरी गेला. आज रविवार होता आमदार साहेबांनी ठराविक परिचित लोकांना पार्टी ठेवली होती. सुमित त्याचे आई बाबा मामा मामी,प्रीतीचे आई बाबा असे सर्वजण होते पार्टीला. सयाजी हॉटेल ला पार्टी होती. प्रीती छान साडी नेसून आली होती.एका हातात बांगड्या दुसऱ्या हातात वॉच थोडा मेकअप सुंदर दिसत होती ती. सुमित ची नजर तिच्या वरून हटत नवहती. तिच्या जवळ जात सुमित बोलला, प्रितु जान कसली हॉट दिसतेस आज मस्त किस करावा वाटतो तुला. मॅड तुला दुसरं काही सुचत नाही नुसतं सारख तेच. तेच काय त्याने विचारले. गप बैस सुमित. मग मामा नी तिला आवाज दिला. ती गेली सुमित ला चिडवत. सुमितच्या आई बाबांशी तिची ओळख करून दिली मामींना ही ओळख करून दिली. प्रीती ने सर्वांना वाकून नमस्कार केला. मामा तिच्या बाबांना म्हणाले, बघा तुम्ही ठरवा तुमच्या पद्धतीने कधी साखरपुडा करायचा मग तसे आम्हाला कळवा. प्रीती सर्वांना आवडली होती. सुमित चे आई बाबा मामांचा खूप आदर करायचे त्यामुळे सुमितच्या लग्नाबाबत त्यांनीच काय तो निर्णय घ्यावा असे त्यांचे मत होते.हो चालेल प्रीती चे बाबा म्हणाले. आमदार साहेबांचे मित्र पण आले होते. त्या सर्वांशी मामानी प्रीती ची ओळख करून दिली. मग मामा आणि त्यांचे मित्र एकत्र जेवायला बसले आणि सुमित प्रीतीची फॅमिली एकत्र बसले. गप्पा गोष्टी करत सर्वजण जेवण करत होते.
सुमित प्रीती जवळजवळ बसले होते. काय मग प्रितु कधी करायची एन्गेजमेन्ट? ते मोठी लोक ठरवतील आपण नको काही ठरवायला ओके. काय यार तुला जरा पण एक्साईटमेंट नाही का? अजिबात नाही . हम्म हॉऊ अनरोमॅंटिक यु आर. असू दे मी जशी आहे तशी आहे. असेच मस्ती मध्ये सगळे जेवण करत होते. आणि नेमका मोहित त्याच्या मित्रांसोबत तिथे आला. त्याला बघून सुमितचे डोके आऊट झाले. तो त्याच्याकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहत होता. प्रीतीला ही ते समजले. सुमित म्हणाला,जिथे जिथे आपण असतो तिथे तिथे हा कसा काय टपकतो.सुमित त्याला काय माहीत आपण इथे आहोत ते हा निव्वळ योगायोग आहे आणि तसे ही एकाच शहरात आपण आहोत सो कुठे ना कुठे समोरासमोर येणारच ना.त्याच्या मुळे तू का तुझा मूड खराब करतोस. प्रीती हा माज्या डोक्यात जातो समजलं मी याला नाही टॉलरेट करू शकत . सुमित तुझं वागणं खरच विचित्र आहे. तू काही वेगळाच अर्थ का घेतो या सगळ्याचा. बास सगळ्याच लक्ष आपल्या कडे आहे उगाच वाद नको घालू. तेच म्हणते मी सुमित इग्नोर इट. मग जेवण झाल्यावर ते सगळे निघाले. जाता जाता मोहित बोललाच हैल्लो प्रीती कशी आहेस? मि छान आहे. झाले का जेवण? हो मोहित चल बाय म्हणत प्रीती हॉटेल बाहेर पडली. सुमित रागातच होता. बाय गुड़ नाईट सुमित म्हणत ती तिच्या आई बाबां सोबत निघाली. सुमित तिच्या शी बोललाच नाही. प्रीती घरी आली..
(क्रमशः)
