Sangieta Devkar

Abstract Romance

3  

Sangieta Devkar

Abstract Romance

हारजित पर्व नवे - भाग 6

हारजित पर्व नवे - भाग 6

4 mins
290


पण मोहित कसा आहे हे फक्त प्रीती जाणुन होती. सकाळी प्रिती ऑफिसला आली. सुमित तिच्या अगोदरच आला होता. गुड मॉर्निंग प्रीती. गुड मॉर्निंग सुमित तीही हसत म्हणाली. कॉफी घेणार का त्याने विचारले. हो चालेल. मग सुमित ने एकाला कॉफी आणायला सांगितले. मग उद्या निवडणूक तुला टेंशन नाही ना आले प्रीती? थोडी धाकधूक वाटतेय कारण काय होईल काही सांगता येत नाही पण मामांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो खरा ठरु दे. हो पण मला नक्की वाटते की तू जिंकणार प्रीती. बघु आता काय होतंय. एक जण कॉफी घेऊन आला. तो म्हणाला, सुमित भाई सगळीकडे प्रीतीताईंच्या नावाची चर्चा आहे आपण जिंकणार हे नक्की. कोणी सांगितले तुला हे. भाई तो आर के नगर चा आपला खबरी आहे की. अच्छा बर काही गोंधळ होतोय का तिकडे लक्ष द्या तुम्ही सगळे. हा भाई तुम्ही काळजीच नका करू. सुमित सगळं नीट होईल ना? अग हो नको काळजी करुस आणि मी आहे ना सोबत. तू आहेस म्हणून उतरले मी या राजकारणात. कॉफी घे नको विचार करू काही असे बोलून सुमित ने तिच्या हाता वर आपला हात ठेवला. प्रीती ला फोन आला तिने पाहिले तर मोहित होता म्हणून तिने घेतला नाही फोन. मग पुन्हा एकदा आला त्याचा कॉल तसा सुमित बोलला,कोणाचा आहे फोन घे ना प्रीती. नको मोहितचा आहे. असू दे घे.


मग तिने तो कॉल घेतला, हॅलो मोहित बोल, मोहित -- कशी आहेस प्रीती. मी ठीक आहे काही काम होते का? मोहित --- नाही ग काम नाही तुला ऑल द बेस्ट बोलण्यासाठी फोन केला. ओके थँक्स मोहित. मोहित-- तू नक्की जिंकणार प्रीती विश यु ऑल द बेस्ट. ओके बाय म्हणत तिने फोन ठेवला. मला ऑल द बेस्ट म्हणया साठी मोहित ने फोन केला होता प्रीती सुमितला सांगत होती. मी तुला काही विचारले का प्रितु? अरे नसते सांगीतले तर चिडला असतास ना! . अजिबात नाही . हम्मम्म इतकच म्हणाली ती. हा नेमका कसा आहे हेच अजून मला समजेना. कधी रुसतो कधी चिडतो कसे होणार माझे देव जाणे. हे मनातच बोलली प्रीती. संध्याकाळी सुमित तिला सोडायला निघाला. त्याच लक्ष होते तिच्या कडे ती सीट बेल्ट लावते की नाही पाहायला. तिने आज आठवणीने बेल्ट लावला, त्याच्याकडे बघत म्हणाली आहे लक्षात माझ्या. वा गुड गर्ल सुमित हसत म्हणाला. तिला घरी सोडून तो निघाला.सकाळी प्रीती लवकरच उठली. आज निवडणूक होती म्हणून तिने सिम्पल कॉटनची साडी नेसली आणि तयार झाली. सुमित तिला घ्यायला येणार होता. थोड्याच वेळात सुमित आला मग प्रीती देवाला नमस्कार करून आईबाबांच्या पाया पडून बाहेर पडली.


सुमित आज पहिल्यादा तिला साडीमध्ये पहात होता. खूप छान दिसतेस प्रितु आज. हो का? हो एकदम रापचिक. काही काय रापचिक काय?दोघे कार मधये बसले. सुमितने तिचा हात हातात घेतला म्हणाला,चांगल्या कामाला जाताना तोंड गोड करायचे असते हो ना? हो ना सुमित आपण जाताना ना मंदिरात जाऊ सोबत पेढेपण नेऊ. प्रीतीला माहीत होते तो कशाबद्दल बोलतो ते म्हणून ती मुद्दाम असे बोलली. अग मी स्वीट बद्दल बोलतो आहे तोंड गोड म्हणजे असे गोड असे म्हणत त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवले. तिने त्याचा हात बाजूला केला म्हणाली,आता फक्त पेढे खा सुमित हे स्वीट नंतर चल उशीर होईल. काय यार तू पण इतकी छान का दिसतेस मग मी कसा कंट्रोल ठेवू. ती हसली चल लवकर. हम्म त्याने पटकन तिला गालावर किस केले. ती लाजून हसत राहिली. तो पुन्हा तिच्या जवळ आला सुमित काय करतोस आपण रोडवर आहोत. हो म्हणूनच म्हणत त्याने तिच्या कमरेला सीट बेल्ट लावला. ओहह मला वाटले की. तिच्या डोळ्यात पहात सुमित म्हणाला, काय वाटले तुला ? काही नाही. सांग ना तुला काय वाटले.ती लाजून ब्लश करत होती काही नाही तू चल आता. मग त्याने ही हसत हसत कार सुरु केली. एफ एम सुरूच होते मस्त गाणे लागले होते.. 


ऐसे न मुझे तुम देखो

सीने से लगा लूंगा

तुमको मैं चुरा लूँगा तुमसे

दिल में छुपा लूंगा

तेरे दिल से ऐ दिलबर

दिल मेरा कहता हैं

प्यार के दुश्मन लोग मुझे

डर लगता रहता हैं धीमी-धीमी आग से इक शोला भड़काया है

दूर से तुमने इस दिल को कितना तड़पाया है

मैं अब इस दिल के सारे अरमा निकालूँगा

तुमको मैं चुरा लूँगा तुमसे...


प्यार के दामन में चुन कर, हम फूल भर लेंगे

रास्ते के काँटे सारे दूर कर लेंगे

जान-ए-मन तुमको अपनी मैं जान बना लूँगा

तुमको मैं चुरा लूँगा तुमसे...दिल मे छुपा लुंगा। 

 

सुमितपण या गाण्यावर शिट्टी वाजवत राहीला आणि तिच्याकडे पहात होता. तिचा हात हातात घेत होता. ती त्याच्या स्पर्शाने मोहरत होती. हा प्रवास संपूच नये असे तिला वाटत होते. समोरच्या आरशातून ती सुमितला बघत होती. काय इतकं एकटक पाहतेस जान? काय विचार काय आहे. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract