Sangieta Devkar

Abstract Romance

4  

Sangieta Devkar

Abstract Romance

हा,यही प्यार है (भाग 2अंतिम)

हा,यही प्यार है (भाग 2अंतिम)

7 mins
266


इकडे शरयु इंटर्नशिप करत होती. कॉल वर विराज आणि तिचे बोलने होत असे. शरयु ला अजुन जॉब मिळाला नव्हता. एक दिवस रात्री तिच्या बाबांना माइलड हार्ट अटैक आला. शरयु त्यांची एकुलती मुलगी होती. तिनेच धावपळ करून बाबांना हॉस्पिटल मध्ये नेले. दोन दिवसांनी तिचे बाबा घरी आले. मग ते म्हणाले की शरयु बाळा माझे काही आता खरे नाही. तब्येत कीती साथ देईल नाही माहित . मि असे पर्यंत तुझे लग्न व्हायला हवे. विराज ला अजुन दोन वर्ष बाकी आहेत. त्यानंतर तो लगेचच भारतात येईल की नाही येईल पुढचे काहीच आपल्याला माहिती नाही. तेव्हा तू त्याची वाट बघू नकोस.लग्न कर. पण बाबा विराज ने शब्द दिला आहे. तो येईल नक्की. शरयु पण मि तो पर्यंत जीवंत असायला हवा ना? बाबा ख़ुप इमोशनल झाले होते. मग शरयु चा नाइलाज झाला. एका नातेवाईकाने शरयु साठी एक स्थळ आणले मुलगा चांगला होता. त्याचा सव्हताचा बिझनेस होता. निशिकांत नाव होते. त्याला आई वडील आणि लग्न झालेली बहिन होती. शरयु त्यांना आवडली. विराजशी शरयु तिच्या बाबांच्या तब्येती बद्दल आणि तिचे लग्न ठरल्याचे बोलली. विराज ला हे सगळ अनपेक्षित होते पण तिचे बाबा थाबायला तयार नाहीत म्हणून मग विराज म्हणाला, शरू तुला जे योग्य वाटेल ते तू कर. हे सांगताना विराज च्या हॄदयाचे अगणित तुकडे झाले होते जे पुन्हा कधीच जोड़ता येणार नव्हते. शरयु चे लग्न झाले. निशिकांत ने तिला जॉब किंवा सव्हताची प्रैक्टिस करू दिली नाही माझा मोठा बिझनेस आहे तू काही करायची गरज नाही. असे तो बोलला होता. शरयु म्हणाली माझी डिग्री आहे तर ती वाया जाईल. मला करायचे आहे काम. तेव्हा निशिकांत रागात म्हणाला,मी जे सांगेन तेच तुला करावे लागणार आहे. मला उलट उत्तर करायचे नाही. मला न सांगता कुठलीच गोष्ट करायची नाही.

शरयु ला समजले की असल्या हेके खोर आणि तापट माणसा शी तिची गाठ पडली आहे आता येथून सुटका नाही. निशिकांत ख़ुप डॉमिनेट स्वभावा चा होता. तो म्हनेल तसच सगळ घरात होत असे. आई वडिलांचे पण त्याच्या समोर काही चालत नव्हते. शरयु शी सुद्धा तो ख़ुप रुड वागत असे. प्रेम त्यातला हळूवार पणा,ओढ़ नाज़ुकपना निशिकांत च्या गावी ही नव्हते. फ़क्त तिला ओरबड़ायचे आणि सव्हताला हवे तसे शारीरिक सुख तिच्या कडून घ्यायचे इतकेच त्याला माहित होते. तिच्या लग्ना नंतर सहा महिन्यातच तिच्या बाबांचे निधन झाले. आई एकटी त्यामुळे आपले दुख कशाला आईला सांगून अजुन तिच्या काळजीत भर घालायचे असा विचार करून ती गप्प राहिली आणि निशिकांत चा उद्दाम पणा सहन करत राहिली.तो फ़क्त आणि फ़क्त डॉमिनेट करत राहायचा तिला. विराज ची ख़ुप आठवण तिला यायची. विराज चे हळवे प्रेम,तिच्या बद्दल त्याला वाटनारी काळजी सगळ सगळ तिला आठवत राहायचे मग नकळत पणे निशिकांत आणि विराज मध्ये तुलना करायची. विराज ख़ुप संमजस आणि प्रेमळ होता त्याच्या अगदी उलट निशिकांत होता. तिच्या लग्नाला दोन वर्ष होत आली होती. आता निशिकांत ला त्याच मूल हवे होते पण शरयु ची मनस्थिति मूल जन्माला घालन्यास अनुकूल नव्हती. तिला आपलेपना,जिव्हाळा हवा होता. मना पासून समजून घेणारा जोड़ीदार हवा होता. पण यातले काहीच तिच्या नशिबी आले नाही. त्यामुळे ती सतत उदास निराश राहु लागली. सव्हता साठी जगायच जणु विसरूनच गेली. सव्हताच्या कोषात ती राहु लागली. ख़ुप क्वचित निशिकांत तिला बाहेर घेऊन जात असे कारण त्याचा संशयी स्वभाव ! तिने ही एकटीने बाहेर जायचे नाही. त्याला कशाचा ही संशय आला तरी तो तिला मारहाण करत असे. शरयु ख़ुप एकटी पडली होती. राहुन राहुन तिला विराज ची आठवण यायची. पण विराज च्या आठवणीत अश्रु ढाळण्या शिवाय ती काहीच करू शकत नव्हती. हळू हळू ती डिप्रेशन मध्ये जावू लागली. एकटीच विचार करत बसायची. त्यात तिला दिवस जात नव्हते म्हणून निशिकांत तिला घालून पाडुन बोलत असायचा. मग सासुने ही तिला वांझ ठरवून टाकले. हिला घटस्फोट दे आणि दूसरे लग्न कर असे तिची सासु निशिकांत ला म्हणत असे. शरयु ला समजत नव्हते की काय करावे यातून मार्ग कसा काढ़ायचा. सतत चिंतेत असायची ती. मग एक दिवस तिने सव्हताला संपवन्याच्या हेतुने तिच्या सासु कड़े असणारया झोपेच्या गोळ्या घेतल्या. निशिकांत घरी आला तेव्हा त्याने बघितले मग तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन आला. ती गेली तर उगाच आपल्या वर खुनाचा आरोप येईल म्हणून तिला लगेच हॉस्पिटल ला घेवून आला. पण ती यातून वाचली तर तिला पुन्हा घरात नाही घ्यायचे हे त्याने ठरवले होते. शरयु जेव्हा शुद्धिवर आली तेव्हा एकदाच निशिकांत ने हॉस्पिटल मध्ये फोन केला होता. त्याला समजले की ती आता ठीक आहे मग त्याने पुन्हा काहीच चौकशी केली नाही की शरयु ला भेटायला आला नाही. आता दोन दिवस झाले होते शरयु अजुन हॉस्पिटल मध्येच होती पूर्ण बरी झाली होती.

सकाळीच विराज तिला भेटायला तिच्या रूम कड़े गेला. शरु कशी आहेस आता त्याने विचारले. मी ठीक आहे राज . मला स्वप्नात पण नव्हते वाटले की तू मला असा अचानक भेटशील? शरू यालाच तर डेस्टनी म्हणतात ना! पण मला सांग तू आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केलास? आणि तुझे मिस्टर कुठे आहेत ? ते तुला भेटायला ही आले नाहीत? राज मला मरायचेच होते रे मला नको आहे माझे जीवन. काहीच नाही माझ्या आयुष्यात. विराज तिच्या जवळ बसला तिचा हात हातात घेतला म्हणाला,काय झाले मला सांग शरू. अग अशी निराश उदास शरू मी कधीच पाहिली नव्हती. कीती आनंदी आणि बिनधास्त जगत होतीस तू. कुठे हरवली ती माझी अवखळ शरू ? तुला अस उदास नाही पाहु शकत मी. आणि सव्हता कडे बघ कीती अशक्त झाली आहेस तू. विराज तुझी शरु कधीच मरून गेली रे आता फ़क्त हे शरयु चे शरीर दिसते आहे तुला. शरू मला सांग सगळ काय असे घडले तुझ्या बाबतीत की तू जीव देण्याचा विचार केलास. मग शरु ने तिची कहानी विराज ला सांगितली. आणि सांगता सांगता त्याला मीठी मारून रडू लागली. त्याने तिच्या डोक्या वरून हात फिरवला म्हणाला, ख़ुप सहन केलेस तू . मला एकदा सांगायचे तरी होते. कस सांगनार होते राज माझा नवरा सायको आहे रे. त्याने लग्न झाल्या झाल्या सगळ्या मित्र मैत्रीणी चे नम्बर मला डिलीट करायला लावले. आणि माझा ही नम्बर त्याने चेंज केला. तो सतत माझ्या वर नजर ठेवून असायचा. शरू बास आता ,आता तू बिलकुल रडायचे नाहीस. मी आहे सोबत तुझ्या. तुझ्या नवरयाला घटस्फोट दे आणि या लग्नातुन कायमची मुक्त हो. हो विराज आता मी परत त्याच्या कड़े जाणार नाही. आणि त्याला ही मी नको असेन म्हणूनच तो मला भेटायला ही आला नाही. नको काळजी करू शरू मि आहे . राज मी घरी जावू शकते का? मला आई ला भेटायचे आहे आता मि तिच्या सोबतच राहीन. तुझ्या आई ला हे सगळ माहित आहे का? नाही राज आई ला टेन्शन नको म्हणून मि तिला काहीच सांगत नव्हते. पण आता सांगेन . ओके शरू उद्या तू घरी जावू शकतेस. शरयू ला आता ख़ुप हलक आणि मोकळे वाटत होते. आता आपण परत निशिकांत कड़े जायचे नाही हे तिने ठरवले. दुसऱ्या दिवशी विराज हॉस्पिटल ला आला आणि शरयु कड़े गेला. शरू कसे वाटते तुला आता? छान वाटते राज आणि आज आई ला भेटणार मि म्हणून आनंदी ही आहे. शरू एक सांगू त्याने तिला विचारले. हो सांग ना राज. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले म्हणाला,शरु मी आज ही फ़क्त तुझ्या वरच प्रेम करतो आहे. मि तुला विसरु शकलो नाही. तुझे ही माझ्यावर प्रेम आहे का? राज माझे प्रेम आहे तुझ्यावर पण आता कसे काय आपण एकत्र येणार. म्हणजे काय म्हणायचे शरू तुला? विराज तुझे ही लग्न झाले असेलच ना मग? हे ऐकून विराज मोठ्याने हासु लागला. का हसतो आहेस राज? वेडा बाई माझे अजुन लग्नच नाही झाले आहे. काय ? तू लग्न नाही केलेस राज? का? तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला हो नाही केले मि लग्न शरु कारण माझी एकच शरयु होती जिच्या वर मी जीवापाड़ प्रेम केले. दूसरी कोणी या तुझ्या जगात (आपल्या डोळ्या कड़े इशारा करत )विराज म्हणाला, भरलीच नाही ग आणि तू बोलायचीस ना कि माझ्या या डोळ्यात तुझ जग सामावलेले आहे मग या तुझ्या जगात दूसरी शरयु कशी काय येऊ शकेल? तिचे डोळे भरून आले त्याने तिचे अश्रु पुसले . राज इतक प्रेम करत होता तु माझ्यावर? हो शरु आणि आयुष्यभर करत राहणार होतो. पण माझे प्रेम खरे आहे म्हणून तू मला पुन्हा भेटलीस. मग विराज ने त्याच्या शर्ट च्या खिशा तुन एक गुलाब बाहेर काढला तिच्या समोर गूढघ्या वर बसला तिला तो गुलाब देत म्हणाला, विल यू बी माय वैलेंटाइन डंबो? राज नो से डंबो म्हणत ती हसली. सांग ना शरु . आज वैलेंटाइन डे आहे .आय विल बी. ती म्हणाली. मग विराज ने तिला आपल्या मिठित कैद केले म्हणाला,मी पण आई ला भेटायला येऊ ना? हो म्हणत शरु ने आनंदाने डोळे बंद करून त्याच्या मिठितील उबदार प्रेम श्वासात भरून घेत राहिली. समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract