Sangieta Devkar

Abstract Romance

3  

Sangieta Devkar

Abstract Romance

हा,यही प्यार है (भाग 1)

हा,यही प्यार है (भाग 1)

3 mins
268


मे आय कम इन डॉक्टर? नर्स ने डॉ. विराज च्या केबिन बाहेरून आवाज दिला. येस प्लिज विराज म्हणाला. नर्स आता आली सर काल तुम्ही गेल्या नंतर एक पेंशट ऍडमिट झाली आहे त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता. झोपेच्या गोळ्याचा ओव्हर डोस घेतला होता. त्या आता शुद्धी वर आल्या आहेत. तुम्ही त्यांना चेक करता का? ओके चला कुठे आहे पेशंट म्हणत विराज नर्स सोबत निघाला. स्पेशल रूम मध्ये विराज आला आणि शरयू ला बेडवर पाहून शॉक झाला. शरयू तू म्हणत तिच्या जवळ गेला. शरयू शांतपणे त्याच्या कडे पाहत होती. डोळे खोल गेलेले,चेहरा पार सुकून गेलेला शरयू खूप विक दिसत होती. त्याने तिला चेक केले आता ती आऊट ऑफ डेनजर होती. नर्स यांच्या साठी आपल्या कॅन्टीन मधून कॉफी आणि बिस्कीटस मागवून घ्या. हे खाल्ल्याने यांना त्रास नाही झाला तर मग दुपारी लाईट फूड द्या. ओके सर म्हणत नर्स रूम बाहेर गेली. विराज शरयू जवळ आला म्हणाला, शरु काय अवस्था करून घेतली आहेस स्वहताची?

ती कॉलेज मधली अवखळ, बिनधास्त स्वहता वर प्रेम करणारी,स्वप्नाळू शरयू कुठे हरवली आणि तू सुसाईड करण्याचा प्रयत्न का केलास? शरयू च्या डोळ्यातुन पाणी वाहत होते. विराज काय सांगू तिला बोलताना ही त्रास होत होता. हे विराज ने ओळखले शरू तुला त्रास होतोय नको आता काही बोलूस आधी पूर्ण बरी हो मग आपण बोलू ओके. तिने फक्त मान 'डोलवली. तिच्या डोळ्यात पाहून वाटत होते की खूप काही सांगायचे तिला मन हलकं करायचं आहे. पण आता तिला विश्रांतीची गरज होती. कॅन्टीन बॉय कॉफी आणि बिस्कीटस घेऊन आला. त्याच्या मागोमाग नर्स ही आली. तिने शरयू ला उठून बसवले. कॉफी दिली तिला. नर्स यांच्या खाण्या पिण्या कडे तुम्ही स्वहता लक्ष द्या. आय विल पे द बील. ओके सर. आणि यांच्या घरून कोणी आले कसे नाही अजून आले की मला भेटायला सांगा. सर काल रात्री यांचे मिस्टर यांना घेऊन आले. सगळी प्रोसेस मी करतो म्हणाले पोलीस कम्प्लेन्ट सगळं पाहतो तुम्ही हिच्या वर उपचार सुरू करा. ती आजारी असते त्यामुळे आजाराला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे म्हणाले. व्हाट रबिश नवरा असा कसा असू शकतो आणि आपली पत्नी शुद्धी वर आली की नाही हे ही जाणून घ्यायला आला नाही. त्याने शरयू कडे पाहिले तिच्या डोळ्यात अश्रू होते. नक्कीच काही तरी प्रॉब्लेम आहे हे विराज ने ओळखले. शरयू काळजी नको करू मी आहे. अस बोलत विराज निघाला.

नर्स या माझ्या क्लासमेट आहेत यांच्या कडे जातीने लक्ष द्या इतकं बोलून विराज त्याच्या केबिन कडे आला. केबिनमध्ये आल्यावर त्याला कॉलेज चे दिवस आठवले .एमबी बी एससी च्या पहिल्याच वर्षी शरयु शी त्याची मैत्री झाली होती. एकदम खेळकर,बिनधास्त पणे आयुष्य जगनारी सव्हतावर भरभरुन प्रेम करणारी. अल्लड़ अशी शरयु म्हणजे उत्साहाचा खळखळून वाहनारा झराच जणु!. त्यांच्या ग्रुप मध्ये सर्वाना प्रिय होती शरयु. विराज तर तिला भेटला तेव्हा पासुनच फिदा झाला होता तिच्यावर. मैत्री तुन ते दोघ कधी प्रेमाच्या प्रवासाला लागले हे त्यांना समजलेच नाही. विराज दिसायला ऊंचा पूरा उजळ टोकदर नाक आणि फ्रेंच कट बियर्ड असा. गहिर्या ब्रावुनिश डोळ्याचा विराजच्या प्रेमात शरयु ठार वेडी झाली होती. तो नेहमी तिला विचारायचा शरू असे काय खास आहे ग माझ्या डोळ्यात ज्यावर इतका जीव लावतेस? तेव्हा ती म्हणायची राज माझ सगळ जग आहे रे तुझ्या डोळ्यात. मला माझ्या जगा पासून कधी दूर नको करू. नाहीतर मि ही संपुन जाइन. नाही ग मी कधीच तुला माझ्या पासून दूर नाही करणार आय प्रॉमिस डंबो. हे संभाषण विराज आठवून त्याला हसु आले कारण तो शरयू ला डंबो म्हणायचा हे तिला अजिबात आवडत नवहते. काही ही नावाने बोलतो तू राज मला नाही आवडले . असे बोलून ती रुसुन बसत असे पण तरी ही तो तिला डंबोच म्हणायचा. ख़ुप प्रेम करायचे दोघ एकमेकांवर . लास्ट इयर झाल्या नंतर शरयु ने तिच्या घरी विराज बद्दल सांगितले. तिच्या घरी विराज आवडला होता. लवकरच एंगेजमेंट करू असे ठरले होते. पन विराज ला मास्टर्स करायचे होते म्हणून तो दोन वर्षा साठी परदेशी जाणार होता . तो म्हणाला त्याचे मास्टर्स पूर्ण झाले की एंगेजमेंट करू. विराज मग रशिया ला निघुन गेला. त्याला सर्जन व्हायचे होते

क्रमश


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract