गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
हे पाहूया
लहान मुलाची पहिला गुरु आई असते, अगदी आपल्याला खाणे, पिणे, उठणे बसणे, शब्द उच्चार करणे, कोणती गोष्ट चांगली आहे कोणती गोष्ट नको हे ती शिकवत असते तिच्यामुळेच या सगळ्याचे ज्ञान मिळते .
लहान मूल आगी जवळ धावते तेव्हा आई त्याला हाsssss आहे जाऊ नको असं सांगत असते.
पण मूल कधीतरी डोळा चुकवून त्या आगीला हात लावायला जातं, आणि भाजल्यानंतर किंचाळून रडू लागतं पण तो त्याचा पहिला अनुभव हा गुरु असतो त्यानंतर ते आगी जवळ कधी जात नाही. असा आई आणि अनुभव या दोन्ही गुरूंना नमस्कार
त्यानंतर शाळेत जाऊ लागल्यानंतर शिक्षक हे आपला दुसरा गुरु असतात.
ते आपल्याला पुस्तकातून असणारे ज्ञान आपल्या डोक्यात भरवतात आता काही डोक्यात भरते काही डोक्यावरून जाते पण एकंदरीत शिक्षकांमुळे आपण बऱ्यापैकी शहाणे आणि शिक्षित होतो अशा त्या सर्व गुरुवर्यांना नमस्कार
तसेच शिक्षकांच्या आधी आपला पिता हा देखील आपला गुरु असतो घरातील ज्ञान आई देते तर बाहेरच्या जगातील ज्ञान वडील देतात खरे तर ते दुसरे गुरु आहेत
मग पुन्हा तेच आहे अनुभव आणि व्यवहार ज्ञान बराच वेळा आपल्याला आजूबाजूचे आपले नातेवाईक एखादी गोष्ट करू नको सांगत असतात ,पण आपण ती ऐकत नाही आणि मग स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याक्तीप्रमाणे त्या खड्ड्यात पडल्यानंतर आपण शहाणे होतो. म्हणून पुन्हा त्या अनुभव आणि व्यवहार ज्ञान नावाच्या गुरूंना नमस्कार
दत्तगुरूंनी एकूण चोवीस गुरु केले मुंगी, कबूतर, हत्ती, मधमाशी, बरेच काही त्या प्रत्येकाकडून चिकाटी सातत्य हे गुण घ्यावे यासाठी गुरूंनी स्वतः हे गुरु