STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy Classics

3  

Jyoti gosavi

Tragedy Classics

रघुवरा बोलत का नाही

रघुवरा बोलत का नाही

4 mins
0

गीत रामायणातील एका गाण्याचे रसग्रहण रघुवरा बोलत का नाही ज्यावेळी रावण रामाचे कृत्रिम मस्तक सीतेपुढे आणून टाकतो आणि आता तुझा राम मेला आता माझ्याशी लग्न कर असे तिला दूतांकरवी भासवतो तेव्हा सीतेने केलेला शोक आणि तिच्या भावना, मनाला अगदी स्पर्शून जातात. जेव्हा ही बातमी सीतेला कळते तेव्हा मी हे काय ऐकते काय पाहते असं कसं घडलंय रघुवरा तुम्ही माझ्याशी बोलत का नाहीत असा आर्त प्रश्न ती विचारते काय ऐकते काय पाहते काय अवस्था ही रघुवरा बोलत का नाही जाये आधी मरण पतीचे हे कैसे घडले दैवच अंती तुटून खड्गसे माझ्यावर पडले मृत्यूलोकी का हीन ठरल्या कौसल्यामाई रघुववरा बोलत का नाही पत्नीच्या आधी, पतीचे मरण हे असं कसं काय घडू शकतं असं कसं दैव एखाद्या तलवारीप्रमाणे माझ्या डोक्यावर पडले एवढ्या पुण्यवान कौशल्यामाई पण यावेळी त्यांचे पुण्य कामाला आलं नाही त्या पूण्यहीन झाल्या रघुवरा माझ्याशी बोला ना! का बोलत नाही ज्योतिषांची ग्रह गणिते का सर्व थैव चुकली अभागिनी ही दुर्दैवी सर्वस्वा मुकली धुळीत निजले पुरुषोत्तम का या मुढे पायी रघुवरा बोलत का नाही आपल्या लग्नाच्या प्रसंगी ज्योतिषाने एवढे चांगले मुहूर्त काढले होते ते सगळे कसे काय चुकीचे निघाले? मी एवढी अभागी कशी काय ठरले, आणि आता माझा प्राणनाथ पुरुषोत्तम राम या मूर्ख स्त्री पायी धुळीमध्ये असा पडला आहे. अहो बोला ना रघुवरा बोला ना ओळखिते मी कमल नेत्र हे ओळखिते श्रवणे सरे न का ही झोप राघवा दिनेच्या रुदने गती हीन का झाली सृष्टी सुन्न दिशा दाही रघुवरा बोलत का नाही हे कमळासारखे डोळे हे कान, मी ओळखते, ही दिन अभागी आपला स्त्री तुमच्यासाठी दिन पणे रडत आहे, माझ्यासाठी आख्खी सृष्टी थांबल्यासारखीच आहे सगळ्या दिशा सुन्न झाल्या आहेत पण तुमची झोप अजून का सरत नाही? तुम्ही का उठत नाही? रघुवरा बोला ना तुम्ही माझ्याशी बोलत का नाही? ओळखले मी नेत्र कर्ण पण स्वर्णध महाबाहू श्याम वर्ण ती मूर्त पुन्हा मी कुठे कशी पाहू नयन जाहले रडून कोरडे अंगाची लाही रघुवरा बोलत का नाही माझे हे महाबाहो पती त्यांचेच हे कान डोळे आहेत, ती निळी सावळी मूर्ती आता मी कुठे पाहू? कशी पाहू? माझ्या अंगाची अक्षरशा लाही लाही होत आहे पण तुम्ही काय उठत नाही रघुवरा बोला ना विवाह समयी शपथ दिली ती विसरलात सखया पुसल्या वाचून स्वर्गी गेला सोडूनिया जाया ऐकलेत का जनक नंदिनी आर्त तुम्हा बाही रघुवरा बोलत का नाही विवाहाच्या समयी जन्मोजन्मीची साथ देण्याची जी शपथ तुम्ही घेतली होती ती विसरलात आणि मला एकटीला सोडून तुम्ही स्वर्गीच्या पितरांना भेटायला गेलात, ही जनकाची मुलगी जनक नंदिनी आर्त स्वरात तुम्हाला हाका मारत आहे अहो रघुवरा बोला ना रघुकुल तीलका तुम्ही भेटला पितरांना स्वर्गी परक्या हाती सजीव उरली अर्धांगी मार्गी रघुकुल जाते शोभून दिसली रीत बरी का ही? रघुवरा बोलत का नाही तुम्ही स्वर्गात जाऊन पितरांना भेटलात , पण एका परक्या माणसाच्या हातात हे तुमची अर्धांगी मात्र जिवंतपणे अडकली आहे रघुकुळाला तुमच्या ही रीत शोभून दिसली का बरं! रघुवरा बोलत का नाही अहो माझ्याशी बोला ना अथांग सागर उल्लंघुनिया आला मज साठी काय जन्मले? कुलनाशिनी मी धरणीच्या पोटी जनके केले यज्ञ तयाची काय सांगता ही रघुवरा बोलत का नाही माझ्यासाठी एवढा मोठा समुद्र ओलांडून आलात त्यासाठी सेतू बांधलात माझ्यासाठी तुम्ही काय काय केलं नाहीत? पण मी मात्र दुर्दैवी ठरले ,अभागी ठरले, धरणीच्या पोटी जन्मून अशी काय मी कुलनशिनी निघाले की माझ्यात पतीला मारून बसले, माझ्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आलेली आहे, माझ्या वडिलांनी माझ्या प्राप्तीसाठी जे काही यज्ञ केले होते ते सारे आज व्यर्थ ठरले. अहो प्रियतमारंभवरा बोला ना हे लंकेशा ज्या शस्त्राने मारविले नाथा घाल घाव तू त्या शस्त्राचा सीतेच्या माथा रामा मागे अंती तरी जाऊ दे वैदेही रघुवरा बोलत का नाही शेवटी ती रावणासारख्या दृष्ट राक्षसाच्या हाती एकाकी, सापडलेली अबला स्त्री, तिची पूर्णपणे आशा रामा वरती होती. कधीतरी माझा पती येईल आणि या संकटातून मला काढून नेईल या एका आशेवरच ती त्या राक्षसांच्या पहाऱ्यात देखील आपला जीव जगवून होती. पण ती आशाच नष्ट झाली, तेव्हा ती रावणाला म्हणते हे लंकेशा रावणा ज्या शस्त्राने माझ्या नवऱ्याला मारलस, त्याचा घात केलास त्यात शस्त्राने माझा वध कर, आणि आता शेवटी तरी मला रामाच्या बरोबर जाऊ दे. एका कडव्यात ती अशी देखील म्हणते ही मला तुझी मुलगी समज, आणि माझ्या पत्नी बरोबर सती जाण्यासाठी तू मला परवानगी दे. असा तिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो ती हृदन करत असते त्याचवेळी तिच्यासोबत असणारी त्रिजटा नावाची राक्षसी, तिला हे मायावी शीर असल्याचे सांगते आणि ते शिर आपोआप नष्ट होते. त्यावेळचे सीतेचे ते रुदन , तो आक्रोश, हृदय पिळवटून टाकतो. असं हे गीत रामायणातील गदिमांच्या लेखणीतून उतरलेले , आणि बाबूजींच्या सुरांनी स्वरांनी सजलेले,एक आर्त दुःखी गीत, मनाला भावून जाते


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy