Swapnil Kamble

Abstract Romance Fantasy

2.6  

Swapnil Kamble

Abstract Romance Fantasy

गुलमोहर

गुलमोहर

2 mins
169


ती एक ओल्या सांजवेळची नशेली संध्याकाळ होती. पाऊस संततधार कोसळत होता. लोक कामावरून घरी परतत होते. लोकलमधून प्रवासी उतरत होते. स्टेशनला लागूनच एक वड़ापावची गाड़ी होती. कढईतून गरमगरम वडापाव... जाळीतून तप्त लाव्हा उकळतो तसे तेल उकळत होते. त्या तेलातून तो वडा भाजून करपून, सोलून आणि हजारो यातना भोगल्यावर तो बाहेर आला होता. तो कोणाच्या तरी मुखी लागेल. तप्त लाव्हारस कोणाच्या तरी पोटात शिरेल आणि त्यांनी अग्नी शांत करेल. पोटाची अग्नी शांत करेल....फक्त त्यासाठी तुला खूप फुफाट्यातून जावे लागेल. तेव्हा कुठे ही अग्नी शांत होईल. कढई कधीही कडकडीत तेलास घाबरत नसते. तेलाचे चटके सोसावे लागतात. त्याशिवाय त्याच्या हाताला चव येत नाही. तोंड फक्त खायला आणि जीभ फक्त चटके सोसायला.


एक सुंदर मुलगी ओलेचिंब केस. तिच्या केसातून पावसाचे पाणी ओघळत होते. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब पसरले होते. हिरवट पानावर जलबिंदू तरंगावे तसे. तिच्या चेहऱ्यावरून तरुण वाटत होती. एका हातात छत्री होती. छत्रीतून थेंबथेंब पाणी गळत होते. ती एका हाताने पाणी पुसते. एका हातात पर्स होती. त्यातून पैसे बाहेर काढते. वीस रुपयाची नोट तिच्या स्पर्शाने चिंब भिजून जाते. ती त्या माणसाला देते आणि म्हणते, "एक वडापाव द्या."


गरमगरम वडापाव खात खात रिक्षा पकडते.


मॅडम कुठे जायचे आहे...


गुलमोहर...


ओके..बसा..


दोन पॅसेंजर आत बसले होते. त्यामध्ये मीही होतो


भैय्या... मी दरवाजाकडे बसते


ओके..


भाईसाहब...आप सरको ...मॅडम को...बाहर की साईड बैठने दो.


आता ती एकीकडे आणि मी मधोमध होतो. ती वडापाव खात होती. वडापावमधून गरमगरम वाफा बाहेर निघत होत्या. ती फोनवर बोलत बोलत वडापाव खात होती. जेवढे चटके वडापाव खाताना तिच्या जिभेला लागत असतील तेवढाचा गारवा मला तिच्या बाजूला बसून लागत होता. रिक्षा हलतडुलत होती. तिच्या मांड्या माझ्या मांड्यांना घासत होत्या.


गुलमोहर... उतरो


"जागा गरम केली" एक जण बोलला.


"काय मस्त सांजवेळ आहे"


"तिला काटेही आहेत."


मी, थोडं रिलॅक्स बसतो. थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं.

आता.. कसं.. हलकं आणि रिलॅक्स.. मोकळं वाटतंय.

त्या लालभडक ड्रेसवरून माझी नजर हटत नव्हती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract