Swapnil Kamble

Abstract Tragedy Others

3  

Swapnil Kamble

Abstract Tragedy Others

दुरावा

दुरावा

2 mins
279


तू, दूर गेलीस ,तर माझे मन खूप खिन्न,उदास राहील... माझे शरीर फक्त असेल पण त्यात आत्मा नसेल...हा दुरावा मी सहन करू शकणार नाही...ती ओढ मी सहन करू शकणार नाही...मी चुंबक प्रमाने तुझ्या आठवणीत रूतत जात होतो....लग्न करणाऱ्या पुरुषांना प्रेम करणे गुन्हा आहे..ते कोणाला जीव लावू शकत नाही...कोणीही त्यांचा आयुष्यात पुन्हा येऊ शकत नाही.त्यांना समाजाने आखलेलेया मर्यादांचे पालन करावे....मुंग्या प्रमाणे या संसार नावाचा गर्दीत चिरडून जावे...त्यांना मने नाहीत.ते रोबोट आहेत.

त्यांना भावना नाही.ते भावना उत्पन्न करू शकत नाही.त्यांना तो अधिकार नाही.ते माणूस आहेत पण ते आता पुरुष आहेत..लग्न झालेले पुरुष...त्यांना या गोष्टी वर्ज्य आहेत...ते कोणत्याही स्त्रीशी बोलू शकतात.पण त्यांना प्रेम करू शकत नाही.मी मनासारखे संगीत ऐकू शकत नाही.मी प्रेम गिते ऐकू शकत नाही. माझ्या भावना उभारून आल्या तर, त्यालां मुरुड घालावी.मी सौंदर्याचे वर्णन करू शकत नाही.मी फक्त माझ्या बायकोचा कुशीत रहावे.प्रेम भावना जागृत झाल्या तर ..त्याला दडपून ठेवाव्या लागतात.

लग्न झालेले पुरुष दारू पिऊ शकतो, व्यसन करू शकतो, जुगार खेळू शकतो, पण तो प्रेमात पडू शकत नाही, त्याला समाजात मान्यता नाही.त्याला कोंबून ठेवले जाते खूर्ड्यात, त्याला हलता येत नाही, डुलता येत नाही, मनोसाक्त वागता येत नाही, 


तो एक वावर बनला आहे;अडगळीच्या खोलीत.त्याने फक्त बैलासारखं कमवावे, नंदी बैलासारखे मान हलवावी, कामावर वेळेवर पोचावे, हफ्ते द्यावे,कर्ज फेडन्यासाठी त्याचा जन्म झाला आहे,स्वतःची स्वप्ने बांधून ठेऊन...फक्त वाल्मीकी सारखे खून, दरोडा घाळून,पैसे कमविण्यााठी जगणारा...मी एक पुरुष...ज्याचे स्वतःचे काहीच अस्तित्व नाही.... कशासाठी जगतोय माहित नाही...का जगतोय माहित नाही...फक्त जनवरा सारखं राबत राहीचे....बस...एवढेच माझे अस्तित्व.

तू जर मला विसरलीस...तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही.फक्त एका मंद आचेवर मी जगत आहे...तुझी एक सोबत च मला जगण्यासाठी प्रेरित करत आहे.. नाहीतर मी जगलो काय आणि मेलो काय काही फरक पडत नाही....

रोज तुझे स्वप्न पाहतो...त्या स्वप्नात तू आणि मी एकत्र बसलेले आहोत...खूप गप्पा मारीत आहोत...खूप रोमँटिक वातावरण होते.पण अचानक मध्ये माझी बायको येते आणि सर्व मूड खराब करून टाकते.तिचे मन मला दुःख व्हायचे नाही.ती खूप हळव्या मनाची आहे.ती माझा पाठलाग करीत आहे...आपण खूप लांब जात आहोत....आता दुरावा सहन होत नाही....मी माझ्या बायकोला नाही दुखू शकत....पण मला तू ही हवी आहेस...किती बरे झाले असते ना...जर का दोघांची मने एकच असती..

सकाळी बँक वाले दरवाजा ठोकवत होते.रूम चा हफ्ता मिस झाला होता.उद्या देतो म्हणून सांगितले.बायकोने जमा केलेली रक्कम मला दिली.

तू, आता कधी भेटशील ... तेवढेच मन मोकळे होते.. तुझ्याशी बोलून.....पण आता तू खूप दूर गेलीस आहेस...तू दूरच रहा.... बाय....आठवण येईल पण मनाला मुरड घालीन आणि त्या भावना पुन्हा उत्पन्न होऊ देणार नाही...कारण मी एक लग्न झालेला पुरुष आहे..त्याचा आयुष्यात दुसऱ्यांदा प्रेमाचा योग येत नसतो.आला तरी त्याला दुरावा सहन करावा लागतो....


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract