ती जेव्हा सोडून जाते
ती जेव्हा सोडून जाते


#FreedomtoLoveandMarry
ती माझ्या आयुष्यात फुल बहरून आली होती.ती जेव्हा जेव्हा खुश व्हायची, तेव्हा फुलेही सकाळची बहरून यायची.तिचे हसणे आणि तिचे डोळे खूपच नशेलि होते.ती जेव्हा रागात किंव्हा खूपच मूड ऑफ असायची तेव्हा तिने लावलेले फुलेही सकाळची निस्तेज असायची.मी कधी कधी बोलायचो की, आज बहुतेक तिचा मूड ऑफ असणार....आणि ते खरे ही वयाचे. जेव्हा जेव्हा ती खुश दिसायची तेव्हा फुले बहरून यायची. फुलांच आणि तीचं कनेक्शन अगदी घट्ट असावं असाच वाटत होत.
तिला मोग-याची फुले खूप आवडायची. सफेद रंगाचा तो मोगरा.....म्हणजे माझ्यासाठी ती एक पर्वणीच होती.
आमचे नातेही फुल आणि कत्यांचे होते.तिचे आणि माझे जवळीक संबद कसे निर्माण झाले ...ते माहीत नाही पण .... कदाचित ह्या फुलामुळे ती मायकदे आकर्षित झाली असावी.तिला सकाळची फुलांच वास घ्याची आवड होती.ती नेहमी गॅलरीत यायची.मी ही फुले पहायचो.ती समोरील बिल्डिंग मद्ये राहायची..आमचा बिल्डिंग सामोरा समोर होत्या.ती त्या टवटवीत फुळवरील दव बिंदू बनून माझ्या आयुष्यात आली होती.ती त्या फुळलना आपल्या भावना व्यक्त करताना अनेक वेळा मी पहायची.आम्ही त्या फुलांच्या पाकळ्या मधून आणि रंगातून संपर्क करत असू.ती माझे भाव ओळखत असे.मी ही तिला तिला साजेसे फुल दाखवून तिला इंप्रेस करीत असे.मी जेव्हा जेव्हा तिला फुल दाखवत असे तेव्हा तेव्हा ती त्याच रंगाची साडी परिधान करून यायची.मग तुळशीला पाणी वाहायची.ती जेव्हा अंघोळ करून साडी घालून कसे खुले करून यायची तेव्हा ती खूपच सुंदर दिसत असे.मी बगून डोळे बंद केले की, ती समजायची की, मला साडी खूप आवडली...तिने कोणत्याही रंगाची साडी घातली तरी ती मला आवडायची. एगदा मी तिचा स्केच काढला होता.ती सकाळची केसे विंचरताना...तिला तो स्केच येवढं आवडला की, ती मला रिक्वेस्ट करू लागली मग, मी तिला whatsapp वरती सेंड करतो...असे तिला इशारा केला.
कधी कधी मी ती फुले वेचताना, तर कधी ती फुले हुंगतना मी तिचे sketches काढत असे.आम्ही आमचा एकमेकांचा एवढी खूप जुळत होत्या.तिलाही चित्रं काढायला आवडत असे. त
िने काही चित्रे मला दाखवली होती.त्यामध्ये ती लव्हबर्ड चे चित्र मला खूप आवडले.
तिचे माझे नाते हे केवळ मैत्रीचे नव्हते की, प्रियकराच्या खांद्यावर डोकं ठेऊन त्यावर तिने झोपावे असेही माझे नाते नव्हते.आम्ही एक वेगळेच नाते निर्माण केले होते.ते होते .. भवनाचे ...असे नाते जे कधीच नष्ट होता येणार नव्हते. आमचे नाते ना बहीण भावाचे, की नवऱ्या प्रियकराचे...असे नाते आपण कधीच पाहिले नसेल....
आम्ही जरी आमच्या संसारात सुखी होतो.पण एक मनाने निर्माण केलेले नाते जे शरीर सुखासाठी नव्हते तर एक कलेचे केलेवर प्रेम होते.एक कलाकार दुसऱ्या कलाकाराची स्तुती करत असतो.आमची नाती ही खूपच जगावेगळी होती.ती मला म्हणायची की," माझे तस काही मनात नाही"
प्रेमापेक्षा जास्त निष्ठावंत आम्ही होतो.कधीही एकमेकांना पाण्यात पाहिले नाही.पण आमचा मध्ये खूप वाद व्हायचे.खूप राग द्वेष निर्माण व्हायचे.मग ती तर कधी मी तिला एक फुल देऊन खुश करीत असे.आमचे प्रेम तर या रंगबेरंगी फुलावर होत नाही त्या वासनेचा शरीरावर....मानून आम्ही एक वेगळेच जग निर्माण केले होते.
अचानक एक दिवशी ती दिसत नाही.मी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तिची वाट पहिली पण ती दिसली नाही..असे कितीं दिवस गेले पण ती दिसली नाही
तिला मी फोन वरती contact करण्याचं प्रयत्न करीत होतो.पण तिने एक अट घातली होती की, मला तू कधीही फोन करायचा नाही....म्हणून मी तिला माझ्या फोन वरून contact करू शकत नव्हता. पण मग मी whatsapp वरून तिला contact करण्याचं प्रयत्न केला.तो ही फोल ठरला.तिने माझा नंबर ब्लॉक केला होता.तिचे घर बंद होते.मी चौकशी केली तर समजले की, ती खोली तर कित्येक वर्ष बंद आहे....त्या खोलीत एक स्त्री राहायची ...पण तिने अचानक ती गायब झाली....त्या रात्री त्या खोलीत कोणीच रहायला आले नाही...मी म्हणालो असे कसे होईल...ती माझ्याशी बोलत होत.....ती तुझा भ्रम असेल.....
मी तिला इंस्टा आणि sharechat वरती सर्व सोशल साईट वरती शोधत होतो.पण ती मला कधीच सापडली नाही.....ती माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती ..तिचा आठवणी मात्र काट्या प्रमाणे बोचत होत्या.