वर्ल्ड विदाउट मोबाईल
वर्ल्ड विदाउट मोबाईल


हल्ली मला 50GB मोबाईल मेमरी insufficinet झाली आहे.मोबाईल मध्ये सतत नवीन नवीन अपडेट होणारे ॲप्स माझ्या मोबाईल मधील मेमरी खात असतात.ही एक प्रकारे कुरघोडी आहे एका मोबाईल ची आणि मेमरी ची.आमच्या प्रायव्हसी वरती जे एक अतिक्रमण आहे.आमच्या विचारावर घाला आहे.मोबाईल शिवाय आपले जग सुन्न आहे.पण सतत वाढत चाललेल्या घडामोडी, आपल्या मोबाईल मधील असलेले ॲप, आणि व्हॉटसअप ग्रूप आपल्या मोबाईल वरती आणि आपल्या मेमरी वरती अतिक्रमण करीत असतात.आपला बचत हिस्सा आपल्या कधून काढून घेतात.आणि त्याची प्रॉपर्टी कधी होते माहित नाही.आणि आपण त्याला डिलीट करीत नाही.कारण ते करायला आपले मन होत नाही.आपण जोडलो गेलो आहोत त्याच्याशी, त्याच्याशी आपली नाळ जोडली गेली आहे.ते आपल्या घरातील एक मेंबर बनले आहेत
मोबाईल एकदा माझा मोबाईल रेपैरिंग साठी दिला होता.अचानक माझ्या खिशातून मोबाईल बाहेर काढला तेव्हा माझे मन ते रेपरिंग ठेवायला मन होत नव्हते. सतत आपल्या शोबत असतो. सतत आपल्या जवळ असतो.आपल्या आठवणी त्यात अस्तात.आणि आपण त्या दूर करू शकत नाही.मोबाईल शॉप मध्ये जेव्हा तो रिपैरंग साठी देतो तेव्हा मला कसेतरी वाटत होते. स्वतःला एकटे फील करीत होतो.मोबाईल एक मित्र झाला होता.तो सतत आपल्या बरोबर असतो.आपल्या मनाशी कुठेतरी घनिष्ट मैत्री केलेली असते.माझ्या खिशात नेहमी असायचा पण आज माझा खिसा खाली खाली वाटत होता. सतत येणारे मेसेज आणि कॉल बंद झाले होते.कोणाशी संपर्क नव्हता.एकदा आपला रिचार्ज संपला की, आपण तातडीने रिचार्ज करतो.पण आता तेही मी करू शकत नाही.नवीन मोबाईल घेउ शकत नाही.कारण तो माझा सखा, मित्र सर्व काही काही..त्या दुकानदाराला विचारले की,…. “कितने मिनिटे मिलेगा “
“सर, एक घंटा लगेगा…..”
एक घंटा
एक तास मी काय करू…कुठे जाऊ …या गर्दीत खूप माणसे आहेत..पण तरीही मला एकटे वाटते….मोबाईल असला की, स्वतःला कंफर्ट फील असते.पण आता तोही नाही.काय करू… वर्तमान पत्र वाचायची सवय नाही.कुठे जाऊ….कुणाला कॉल करू…pco नाही.कुणाचा फोन घेऊ का…पण कोण मला त्याचा फोन देईल… कशाला देईल…आता एक तास काय करू….काही समजत नव्हते.मोबाईल ने आपले जीवन व्यापून घेतले होते.
कंटाळा आला तर….तर समोर एक चाहचा चे दुकान दिसले..
चल..जाऊन.चाहा पिऊ…
चाहा पिऊन झाला……
थोड रिलॅक्स फील केले…पण लगेच खिशात हात टाकला आणि फोन पे करायला मोबाईल शोधत होतो.पण नंतर आठवले की, आपण तर… मोबाईल रेपरींग ला दिला आहे.मोबाईल आल्या पासून …आपण खिशात सुट्टे पैसे ठेवत नाही.त्यामुळे चाहा साठी माझ्याकडे दहा रुपये पण नव्हते….मग आता काय करू…मोबाईल तर रेपैरींग साठी दिला होता.भाई……
पैसा देना पडेगा…
एक काम कर…माझ्या मित्राला फोन कर…
मित्राचा फोन नंबर मला आठवत नव्हता.
अरे.. बापरे!…
मोबाईल नव्हता तेव्हा आपल्या कडे… डायरी असायची त्यात आपण सर्वांचे फोन नंबर लिहून ठेवलेलं असायचे पण..मोबाईल आल्यापासून आपण..सर्व मोबाईल नंबर मोबाईल मध्येच सेव करून ठेवतो…..
“भाई…कुच्छ भी करो…..पैसा दे दो “
माझ्याकडे डेबिट कार्ड होते. घाई घाई मध्ये पॉकेट मधून कार्ड काढले आणि समोर एटीएम मधून पैसे काढला गेलो.पण तिथे नेटवर्क इश्यू येत होता….मग दुसरे कुठे एटीएम आहे का शोधत होतो..तो माणूस माझ्या मागून मागून येत होता…त्याने आपल्या दुकानावर एका त्याच्याच दुकानात काम करणाऱ्या काम करणाऱ्याला ठेवले होते.आणि तो दुकानदार माझ्या मागून आणि मी एटीएम च्या मागे…कुणाला फोन करू तर…कोणाचा नंबर माझ्याकडे नव्हता.आता सर्विकडे धावत होतो. त्यादिवशी नेटवर्क इश्यू होता.चालून चालून थकलो… आणि एक एटीएम मशिन दिसले पण….जवळ गेलो तर.. डोअर वरती वलोस्ड असे बोर्ड लटकवले होते.
अरे देवा!…आता काय करू….तो दुकानदार वैतागून म्हणाला….एक काम करो…पैसा रहिने दो…
त्याने पैसे घेतले नाही…मी म्हणाला की,..भाई एक काम करो…मेरा मोबाईल मोबाईल शॉप मध्ये हाई…एक काम “करो भाई… तुम थोडे दर रुख जाऊं ‘
नाही भाई…मेरा धंदा हाई..
टरेपास.. एटीएम मशिन नहीं मिल रही हाई..
ते दोघे पुढे पुढे निघतात….तो दुकदार रिक्षा ला आवाज देतो आणि म्हणतो…
.tmt बँक काहा है….
ओ बहुत दूर हाई……कित्ना भाडा हो गा ‘
भाई तुम्हारा जितना खर्चा होगा उतना दे दुंगा…लेकीन अभी तून मेरे साथ चलो… एटीएम से पैसे निकालके तुरंत दे दूंगा… फिलाल.. रिक्षा का भाडा तुम दे दो ” …मी म्हणालो.
आम्ही svc रोड मधून अंधेरी गाठली.तिथे tmt बँक होतो..आम्ही उतरतो..आणि घाई घाई मध्ये एटीएम मध्ये शिरतो.. कार्ड मशिन मध्ये इन्सर्ट करतो. आणि पासवर्ड टाकतो..घाई घाई मध्ये पासवर्ड चुकीचा टाकतो…पुन्हा पासवर्ड टाक
तो…. एटीएम हँग झाले होते… सेक्युरटी म्हणतो की….अभी पांढरा मिनट रुखं जाऊं.. फिर से ट्राय करना…..बाहेर एटीएम साठी लाईन होती.
“किधर फस गया” दुकानदार म्हणाला.
“सॉरी भाई ” मी
“मेरे वजसे आपको तकलीप हो गयी”
“औंर पंधरा मिनट “
एटीएम मध्ये टायमर टिक टिक वाजत होता. थोड्यावेळाने पुन्हा पुन्हा सिस्टीम चालू झाली.
मी एटीएम कार्ड आत टाकले…आणि पासवर्ड टाकतो…आणि एंटर करतो …
चुकून पासवर्ड रिसेट बटण दाबले गेले आणि….
प्लिज एंटर OTP असा मेसेज स्क्रीन वरती दाखवत होता .
सर, ओटीपी दालो… मोबाईल पे आया होगा.. सिक्युरिटी म्हणाला
मोबाईल तो मोबाईल शॉप मे हाई.. रिपैरींग के लिये…तो उस्को फोन करो..जल्डी …उसका नंबर मेरे पास नाही है…
“भाई..एक काम कर तू चल अभी” मैं तुझे पैसे देता हू लेकीन अभी याहा से चल ” दुकानदार.
क्या मुसिबत है… चाई फ्री मे देता तो परवडता …लेकीन मेरा वक्त भी गया ऑर पैसा भी गया…दुकानदार.
… रिक्षा…रिक्षा…. दुकानदार आवाज देतो.
“भाई डेपो ले ना”
दुकानाकडे रिक्षा थांबले
कितना पैसा हुआ….
चारशे रुपये भाडे झाले होते…
भाई बहुत बहुत शुक्रिया…
भाई ये मेरा ब्लड बँक का कार्ड है कभी किसी को लगा तो जरुरत मंद को दे देना….
कुच नहीं तो ये सही.. मारवाडी दिमाख है …. कुच तो लेलुंगा
त्यानंतर मी मोबाईल दुकानात जातो .तो पर्यन्त मोबाईल रिपेअर झाला होता.
“कितने पैसे”
“पांच सो “
मोबाईल चालू हो गया है
लेकीन सॉफ्टवेअर अपडेट होणे के लिये ऑर पंधरा मिनिटे लगेगा…
साबकुच इस मोबाईल में है..
पैसा कैसे मारू…
पांढरा मिनिटं मोबाईल चालू झाला एकदाचा!
जीवात जीव आला मोबाईल चालू बघून.मोबाईल नीट चेक केला.सर्व ओके होते.आणि त्याला मोबाईल वरती पैसे मारतो.पण सर्व्हर डाऊन दाखवत होते.आता काय..मग त्याला म्हणतो की, आपके पास कार्ड मशिन हैं..
हा, कार्ड ?
कार्ड काढायला हात टाकतो तेव्हा कार्ड पॉकेट मध्ये नव्हते
अरे,देवा! कार्ड मी एटीएम मध्ये विसरलो.
एक काम करता हु…मेरे दोस को…पैसा भेजने को बोलता हुऊ
“इस मोबाईल की सेवा तत्काळ बंद है ‘
दुसरा नंबर ट्राय करतो.
आउट ऑफ range
तिसरा नंबर लावतो
“रिचार्ज नहीं करणे से इस मोबाईल की, सर्व्हिस बंद की गाई है “
भाई, एक काम करो ..ये मेरा ब्लड बँक कार्ड कार्ड , आप इस राख दो… ओर मुझे पांच सो रुपये दे दो… मैं एटीएम जकर आता हु ….मेरा कार्ड भी मे भुल गया हु!
खूप विचार केल्यावर तो पैसे दे तो.
रिक्षाला हात दाखवतो.svc रोड अंधेरी लगेच मीटर
चालू करतो.मी अर्ध्या तासाने पोचतो. एटीएम मध्ये घुसतो. एटीएम चेक करतो. एटीएम मशिन वरती होते.लगेच एटीएम कार्ड आत टाकतो. पासवर्ड रिसेट बटण प्रेस करतो.OTP मोबाईल वरती येतो.पण जसा मी मेसेज ओपन करतो तेवढ्यात मोबाईल बॅटरी डाऊन होते. आणि मोबाईल स्विच ऑफ होतो.अरे आता काय करू..मग त्या गार्ड ला विचारतो चार्जिंग पॉइंट आहे का… योगायोगाने माझ्याकडे चार्जर होता. चार्जिंग फास्ट होत होती. दहा मिनिटे मध्ये तीस टक्के चार्जिंग झाली.मी फटाफट पासवर्ड रिसेट बटण दाबले आणि पहिला एटीएम कार्ड मधील पासवर्ड रेकवेर केले.आणि पैसे काढले त्या नंतर तीच रिक्षा घेऊन डेपो कडे गेलो आणि त्या मोबाईल शॉप चे पैसे देऊन टाकले.त्या नंतर त्या चाई वाल्यांचे पैसे देऊन टाकले.
एक महिन्यानंतर त्याचं चाई दुकानात गेलो.योगायोगाने त्या मालकाने मला ओळखले आणि म्हणाला सर, पैसे मत दे देना…आज से अप कभी कभी दुकान मे आईगे तो आपके लिये चाई फ्री हैं…
“नहीं…आज मेरे पास पैसे है..ओ भी कॅस है”
“पैसे की बात नहीं है.”
“तो क्या बात है”
आपको याद हैं…अपने ब्लड बँक कार्ड दिया था
हा..याद कार्ड के वाजसे
…ओ निगेटिव्ह ब्लड ग्रूप…जो बहुत रेरार हैं..जलदी मिळता नहीं है…आपके कार्ड के वजसेस एक मेरे कस्टमर को जरुरत था…मैने उसे दिया.ऑर उसकी जान बच गयी.
ये ती बहुत अच्छी बात है…..
अपने ओ नहीं दिया होता …तो आज ..उसकी जान नहीं बचती.
“ये सब मोबाईल के वाजसै हुवा हैं’
दुकानदार हसू लागला.मी चाइ पितो आणि त्याला थॅन्क्स म्हणतो.