गजरा
गजरा
परिधीला ऑफिसमधून कशीतरी सुट्टी मिळालीच शेवटी! सासुबाईंना डोहाळजेवण करायचे होते तिचे.इतक्यात बघितले नितीनने की आईने बायकांना बोलावून घेतलं आणि तैयारी मात्र काहीच झालेली नव्हती. मग त्यानेच बागेतल्या झोक्याला मस्त शेवंती, झेंडूसह गुलाबाच्या फुलांचा फुलोऱ्याने सुशोभित केले. परिधीला स्वयंपाकघरात मदत करूनी पाच खिरीसुद्धा बनविल्या आणि त्याचबरोबर आणखी लागणारे साहित्यपण एकत्र करून ठेवले.
मग परिधीला म्हणाला तो लग्नाचा शालू नेसशील बरं का! आम्ही तुला नट्टापट्टा केल्याशिवाय अशीच ओटी नाही भरणार हो... नंतर माहेरीही जायचे आहे न् डोहाळजेवणासाठी आणि येतो म्हणून गेला बाहेर.
थोड्या वेळाने शेजारच्या बायका आल्या आणि जवळच्या नातेवाईकांसह कार्यक्रम सुरू झाला! तेवढ्यात नितीनने हाक दिली अहो डोहाळीनबाई घ्या हो तुमच्यासाठी गजरा.