"डोळे भरून आले"
"डोळे भरून आले"


लहानशी अबोली रेणु सूर्याला अर्घ्य देऊन नमस्कार करतस होती गच्चीवर! आजी आली तिला बघायला! पहातेतर काय एक पाटी ठेवलेली, त्यांच्यावर सूर्याचे,कोरोनावायरसचे, आजोबांचे आणि एका परीच्या हातात कांडी धरलेले चित्र काढ़लेले.
मग आजीने आई-बाबांना पण बोलविले आणि दाखविले! तेवढ्यात रेणुला विचारलं!हे कशासाठी काढ़ले ग?
आजी! तू मला रोज झोपताना परीची गोष्ट सांगत असतेस न? म्हणूनच सूर्य बप्पाशी नमस्कार करून मनातल्या मनात विनंती करून मागितले की जादूची कांडी फिरवणारी परीशी भेटव! जर ती भेटली तर तिला म्हणेन मी, आजोबांना पुन्हा पाठव! मला बागेत जायचं फिरायला!ह्या कोरोनावायरसला लवकर पळवून लाव! त्यामुळे कोंडून ठेवलं आईने घरात! मित्रान सोबत खेळायचं आहे मला. तिने खुणांनी सांगितले सर्वांना! नंतर आजीचे डोळे-मात्र भरून आले.