"पूर्ण-आत्मविश्वास"
"पूर्ण-आत्मविश्वास"
आहो मामी!कश्या तुम्ही? जानेवारीत आल्यान अमेरिकेतून!फोन नाही करायचा का मग?
अग बरी आहे मी!तू कशी आहेस?मध्यांतरी तेथे पड़ले ग!पायाला फ्रेक्चरहून राडघालून ऑपरेशन झाले!पण मी तरी मस्त फिरते,सांगितलेले व्यायाम करते आणि निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा बदल करून थोड़ वाचन करते.मुलगी आपल्या सासरी आणि मुल अमेरिकेत ह्या लॉकडाउनच्या वेळी,कंपनीचे काम मात्र घरातूनच करतात!मग मी कधी-कधी करते व्हिडिओ कॉल त्यांना.
अगदी कम्मालच म्हणायची मामी!कालच राणीचा फोन आलेला!तुम्ही उचलला नाही तर घाबरली ती! मग मावशीने सांगितले तिला आई बरी आहे ग! हे बरंय की ती जवळच राहते.
आहे त्या परिस्थितीला सामोरी जावस लागत! दूसरा पर्याय नाही, तुम्ही अजुनही आहेत सक्षम! अता मी सुध्धा पूर्ण-आत्मविश्वासाने म्हणेन मी सक्षम आहे.