"कारण"
"कारण"


देवाच्या इच्छे पुढ़े कुणाच कधीच काही चालत नाही हो!शेवटी फक्त मनात कारण राहून जातात.काहीच कल्पना नाही हो आम्हाला,दि.30-12-2021 रोजी हे ड्यूटीवर चांगल्या प्रमाणे गेलेले आणि एकाएकी त्यांना हृदयाघाता मुळे देवाज्ञा झाली हो.काहीच कळेनासे झाले!पण आपण म्हणतो न की आलेल्या परिस्थिति ला देवांची हीच आज्ञा म्हणून स्वीकारावे आणि पोरान कड़े बघून पुढ़चे पाऊल उचलावे!मार्ग आपोआपच मिळणार,मग तेच करत आहे आणि येजमानांनी माझ्यावर टाकलेल्या सर्व उरलेल्या जबाबदाऱ्यांना परमेश्वराच्या कृपेने पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न करणार आहे.झालेल्या किव्हां घड़लेल्या गोष्टींचे कारण शोधत बसले तर काहीच काम करू शकणारच नाही.ह्यासाठी मोम्सप्रेस्सोच्या मैत्रिणी आहेत की माझ्या बरोबर पाठींबा द्यायला उभ्या हो!मग कुणाची गरज कशाला भासेल मला.