"मदद गरजेची"
"मदद गरजेची"


लहान असताना बाबा सकाळच्या धावपळीत शाळेचे डब्ब्यांची तैय्यारी बरोबरच इतर घरकामात सुद्धा सुरूवाती पासूनच आईला मदत करायचे! आणि देवांची पूजा आटोपून जायचे ऑफिस ला. आम्ही बहिणी मात्र शाळेत जायचो आणि आईने सांगितलेले काही लहान काम करून बसायचो अभ्यासाला.
बाबांना संध्याकाळी पण उशीरच व्हायचा ऑफिसमधून यायला ! ते दोन टेबलाचे काम बघायचे.
एके दिवशी मी बाबांना सांगितले! तुम्ही घरातली कामं करता ! म्हणून सर्व-शेजारचे पाठीमागे चिडवतात! मला बरं नाही वाटत.
बेटा!सर्वांनी मिळून काम केली तरच लवकर उरकतात आणि सर्वांनास विश्रांति नको का मिळायला? घरातले काम करण्याने कोणी लहान नाही होत! आपल्यासाठीच करतो न? लोकांनी म्हंटले म्हणून काय झालं? ऐकावे जनाचे करावे मनाचे! हे नेहमीच लक्षात ठेवायचे बरं-का.