"मी सक्षम आहे"
"मी सक्षम आहे"
माझ्या पहिल्या बाळंतपण्याच्या वेळेस दवाखान्यात जवळ फक्त आईच होती. आधीपासूनच डॉक्टरांनी आम्हाला सावध राहायला सांगितलेले!कारण की पोटात बाळाची स्थिति विपरीतच असल्या मुळे ते लेबररूम मधे नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करतं होते. दाखिलहून तीन दिवस झालेले! रोजच्या प्रमाणेच सर्व जेवायला गेलेले घरी.
डॉक्टरांचे मात्र प्रयत्न सुरू होतेच! इतक्यात बाळाच्या आरोग्यासाठी त्यांनी लागलीच सर्जरीचे निर्णय घेऊन ताबडतोब मला त्यासाठी तैय्यार केले आणि आईला कंसेंट भरायला सांगितले! हस्ताक्षर केले तिने पण मनात कुठेतरी भीती वाटत होती!की सर्व-सुखरूप होईल की नाही. मला स्ट्रेचरवर घेऊन जातानाही भावुकतेने बघत होती! मी म्हंटले अग आई आजपर्यंत इतका संसार करून, आम्हाला पोसल! ह्यावेळी मनाला धीर देऊन माझ्यासाठी म्हण मी सक्षम आहे.