गज गामीनी
गज गामीनी


अजूनही खुणवीते तीची सावली मज!
अन आठवते तीची खट्याळ पणे मारलेली कोपरखळी.!
'सागर गात होता..तो कवि हृदयाचा असल्याने ,अगदी छोट्या गोष्टी जीव्हारी लावून घेण्याचा त्याचा छंदच जडला, म्हटल तरी वावग ठरू नये...
गतकाळीच्या स्मृतिना उजाळा देता देता तो अगदी फार खोलवर मन एका वेगळ्या कौतुकाच्या दिवशी काँलेजच्या सम्मेलन सोहळ्यात रूतल आणि आठवणीची जाळी विनत विनत निताच्या आयुष्यात त्याने प्रथमच प्रवेश केला, त्या दिवसाच्या चंदेरी दुनियेत गेला...
आज सकाळ पासून सागर मनात हूरहूर धरून होता काँलेजला गेल्या पासून पहीलच त्याने काँलेजच्या गँदरिंग मधे भाग घेतला होता..त्याने तयारीही मन लावून केलेली..परंतू पहील वहील स्टेजवर उभ राहून प्रेक्षकांच्या समोर परफॉर्मन्स करण हे त्याला या क्षणी तरी धोक्याच वाटत होत. कारण प्रत्येक गँदरिंगच्या वेळी..काही परफाँर्मन्स आवडती नसली ,की मुले टमाटर ,फळाच्या साली ,फेकूण मारताना ,त्याच्या पाहण्यात होत..एकूण आपलही असच काहीस होवू नये ,अस मनापासून त्याला वाटूण त्याची हूरहूर वाढली होती...
संध्याकाळी ठीक चारच्या सूमारास गँदरिंगला सूरवात झाली... मानवंदना भक्ती गीता बरोबर पवाड्याची रंगत,त्याला जोड म्हणून सुदंर ,लावणी, आटोपली ,आणि सागरच्या परफाँर्मन्सला सूरवात झाली..
पहीला सागर धडपडत स्टेजवर आला..खर तर त्याची एंन्ट्री सहज चालत स्टेजवर येण्याची होती..परंतू ऐन वेळी त्याच्या शूजची लेस या पायाची,दुस-या पायाच्या खाली आली आणि तोधडपडत स्टेज वर आला ..त्याच्या परफाँर्मन्सचा एक भाग समजून प्रेक्षकानी टाळ्यांचा गडगडाटात त्याच स्वागत केल..
'टाळ्याचा गडगडाट कमी व्हायच्या आतच सागरचा उत्साह द्वगुणीत होवून ..त्याच्या आत्मविश्वासाला बळ मिळाल आणि सागर स्टेजवर गाजला...तो सतसत 5वर्षे,, मागे वळून कधी पाहील नाही की,त्याला हार पाहावी लागली नाही ..सागर कविता करत राहीला...सर्वाना त्या आवडत राहील्या आणि लास्ट इयरला तो असताना, लायब्ररीत काही पुस्तक पाहण्यात दंग होता,कीअचानक एक तरूणी त्याच्या बाजूला येवून काही पुस्तक चाळत होती, तीला बहूतेक हव असलेल पुस्तकाचा ती शोध घेत असावी. तीची नजर सारखी चौकसपणे लायब्रीतल्या स्टँन्डवरच्या प्रत्येक रँकंवर येवून काही वेळ स्थीर होत होती...आणि अचानक तीला हव असलेल पुस्तक सागरच्या हातात पाहील्यावर ती थोडी खट्ट झाली...दोन मिनिट ती ते पुस्तक सागरच्या हाती पाहत होती..अर्थात सागर मात्र बेखबर होता... तीला हव असलेल्या पुस्तकावर तीची नजर टीकून राहीली आणि ती म्हणाली...
एक्सूज मी..
"""बोला"""
""तूझ्याजवळ असलेल पुस्तक खर तर मी घ्यायला आलेली""
"""मग""
"""मला देशिल का""
"""नाही हे मला हवय""
"""मी लगेच उद्या आणून देईन""
"""तूझ्या महत्वाच आहे का"""
""हो मला फक्त आजपूरत घरी न्यायला द्या """
तीच्या शब्दातला प्रामाणीकपणा पाहून सागरने ते पुस्तक काही न बोलता तीच्या हवाली केल..
सागरजवळच पुस्तक घेवून ती तरूणी जशी आली तशी गेलीही..
नाव, ना गाव ,सागर तसाच तीच्या पाठमो-या आकृती जवळ पाहत रीहीला..तीची सादगी नम्रपणा सागरला आवडला...त्याही पेक्षा तीची साधी राहणी फार आवडून तो तीथेच बसला , कधीही मुलीवर कविता न करणा-या सागरने,पहीली वहीली एक मुलीवर कविता रचला..
.
सादक बाधक तूझ रूप
मनामधी भरल
अन कैकजणीत राणी तूला मी हेरल
चंचल नजरा केसात गजरा
मुखडा तूझा साजरा!
अन गालावरची खळी पाहून मनात तू रूतली गं!!
चाल तूझी गं हंसावानी, लावण्यवती तू!!
अन पाटीवरली वेणी झुलते केवड्यातली नागीन!!
सोनचाफ्यावानी तुझी कांती !!
बट डुलते गाली!
पुरता भूललो तुझ्याच रूपावरी !!
तू व्हावीस माझी ही आस धरली मनी..
कविता जसी सागरने केली होती तीचा शब्दान शब्द तीच्या सौदंर्याचे वर्णन ततोंतंत खरा होता..
पुढले काही तास तरी ती भेटणार नाही.. हे सागरला माहीत असूनही तो तीच्याच विचारात होता.पुस्तक द्यायला ती नक्कीय़ेईल ,तेव्हा तीच नाव तरी कळेल,या विचारात सागर होता...
ती आली पुस्तक परत करूण ती गेली..तरी तीच्याशी काय बोलाव हे त्याला कळल नाही..अस ब-याच वेळा सागरला ती भेटत होती पण सागर मात्र ती जवळ येताच बोलन विसरून सारखा तीला पाहत राहायचा..ती नजरे आड होताच..पश्चताप करूण मौन व्रत घेवून घरी परतायचा..
आज मात्र सागरने मनाशी ठरवून टाकल,काही करूण तीच्याशी आज बोलायच..
परंतू नक्की ती कूठे भेटनार हे त्याला कळत नव्हत..
कारण सागरला ती लायब्ररी शिवाय कूठेच दिसली नव्हती..बर तीच्याकडून ती कोणत्या इयरला शिकते हे ही समजल नव्हत...
ती राहते कूठे?तीचे आईबाबा काय करतात??
आणि तीच नाव काय?हा सर्वात सागरला भेडसवनारा महत्वाचा प्रश्न होता...आणि त्याहून महत्वाच म्हणजे इतर काँलेजमधल्या मुली ग्रुप मधे असतात..मग हीच एकटीच कोणी नसल्या सारखी लायब्रीरीत येते ...काय.अन डोळ्यात मावत नाही तोवर गायबही होते...आज काही झाल तरी हीला नाव वैगरे विचारनारच असा विचार करूण सागर लायब्ररीच्या बाहेरच तीची वाट पाहू लागला...
एका विशिष्ठ वेळेवर ती येताना त्याला दिसली. येताना मात्र केवड्याच्या गंधाची महक सोबतीला तीच्या असल्याची जानीव सागरला झाल्यावाचून राहीली नव्हती..परंतू सागरने तीकडे दुर्लक्ष करूण ती जवळ येताच.तो तीला म्हणाला ...तूला मी कूठे कूठे शोधल,तूला माहीत आहे..तू कधीही तूझ नाव सांगितलस नाही..आजवर कधीच काही बोलली नाही...परंतू मला आज तूझ्या बद्दल पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तूला द्यावी लागनार,आणि ती मी तूझ्याकडून मिळवल्या शिवाय तूला जावू देनार नाही..
सागर बोलत होता.ती ऐकत होती..पण वाचा असून मुकी,कान असून बहीरी..अंगात चपलता असून ती निस्तेज,फक्त सागरला एकटक पाहात राहीली...
तीच्या नजरेत फक्त सागरला कसल्या तरी दु:खाची पिडा दिसत होती..
काही वेळ दोघ मौन राहील्यावर ,अचानक तीने सागरला मागून येण्याची खुणा केली..आणि सागर कुणी अज्ञात शक्ती खेचत असल्यासारखा भान हरपून तो तीच्या मागे निघाला..
चालत चालत ते दोघे निर्जन असलेल्या एका पडक्या वाड्याच्या बाहेर येवून थांबले...
तीथल वातावरण पाहून सागरच्या अंगावर शिरशिरी आली..पण तीच्या बद्दल अनेक गोष्टी जानून घेण्याच कुहूतवलापोटी त्याने तीथल्या सर्व गोष्टीवर दुर्लक्ष करत त्याने,प्रथम तीला म्हणाला..
"""तू ईथे राहते""
""हो""
""एकटीच""
""हो""
तीच्या उत्तराने सागरच्या मनात का कोण जाणे शंकेची पाल चुकचुकली तरी पण हीम्मत न हारता तो म्हणाला..
"""तू अश्या निर्जन पडक्या वाड्यात राहतेस,तूला भीती वाटत नाही."""
""नाही""
"""भीती कसली"""
""कसली म्हणजे.अग हा पडका वाडा, ही जागा इथल वातावरण हे सर्व जरा विचीत्र वाटत नाही""
"""नाही हेच माझ घर आणि हीच माझी कर्म भूमी ,जन्मभूमी,""
""म्हणजे""
"""सांगते ""
"""बोल पटकन""
आणि तीने बोलायला सूरवात केली
"""बाबा मी निघालीबर का काँलेजला""
"""विमे तू निघालीस""
""होय बाबा,तूम्हाला काही आणायच का""
""हो मग म्हणून तर अपंग असतानाही ही व्हीलचेअर ढकलत बाहेर आलो ना""
""बाबा कीती वेळा सांगीतल तुम्ही मी असताना स्वत:हाला अपगं समजू नका म्हणून,आईच्या माघारी मी कधीतरी तूम्हाला त्रास होईल,तूम्ही दुखवाल अस वागली का मी""
""नाही बाळा ,तू होतीस म्हणून अजूनही जीव धरून आहे मी""
""हो ना""
""हो"
""मग झाल गेल सार विसरत का नाही तूम्ही""
""कस विसरू तूझी आई अचानक गेली.आणि सर्व जबाबदारी तूझ्या एकटीवर आली. तूझ काँलेज,माझ अपंगत्व झेलत असते..मला हव नको ते पाहते..रातरातभर अपू-या वेळे अभावी जागून अभ्यास करते.तूझी ही देरीवरची कसरत पाहाताना मला मेल्याहून मेल्या सारख होत बघ""
""बाबा अस काही नाही तूम्ही उगाच मनावर घेता मला तूमच करायला बर वाटत..बर उशीर होतो मी निघते ..""
""जा पण माझ ते पुस्तक लायब्ररीतून आणायला विसरू नको"""
""कूठल ते गजगामीनी,""
""हो""
""बाबा अहो कीती वेळा ते पुस्तक वाचता आता पर्यन्त 50वेळा तरी वाचल असेल तूम्ही""
"""तरीही मला परत वाचावस वाटते""
""बर आणते ""
आणि विमा बाबाच्या विचारात काँलेजला जात असताना समोरून येणारा भरगाव ट्रकच्या खाली चिरडली गेली...आणि तीथेच तीची ज्योत विझली...परंतू आत्मा मात्र आजही बाबाला हव असलेल पुस्तक रोज लायब्ररीतून नेतो पण बाबा कधीच मिळाले नाही ते कूठे गेले कळल नाही...तरीही ती पुस्तक आज तब्बल 12वर्षे लायब्ररीतून नेते आणते , हे ऐकूण खर तर सागर घाबरला होता...परंतू आपण ज्या मुलीवर प्रेम केल ती मेली असून तीच अस्थीत्वच नसलेल्या आत्मावर आपण प्रेम केल,आहे ..तेव्हा हीच्या आत्म्याला शांती मिळावी या साठी काही करायला हव अस मनात आणून तो म्हणाला...
"""ज्या अर्थी तू बारा वर्षानी मला तूझी कहानी सांगितली त्या अर्थी मी तूला मुक्ती मिळवून देईन त्यासाठी मी काय करू तेवढ सांग"
"""माझे बाबा कूठे आहेत कसे आहेत..ते पाहून हे पुस्तक त्याना तू द्याव एवढच""
""" सागर तीथून निघाला होता.. पूढचे राही महीने त्याने विमाच्या बाबांना शेधण्यात घालवले...आणि अचानक एका आश्रमात ते त्याला मिळाले .भेट घेवून सागरने सर्व हकीगत त्याना बयान करून सरते शेवटी ते पुस्तक त्यांच्या हाती देवून ..तो निघाला..अर्थात पून्हा तो त्या पडक्या वाड्यापाशी आला होता..परंतू आज त्याला केवड्याचा सूगंध जानवला नाही की विमा दिसली नाही...खर तर बाबाना पुस्तक पाटवल्यावर त्या निरागस आत्म्याला शांती मिळाली होती..
पण सागर मात्र आजही तीच्या आठवणीत सूरात हरवून जातो..