Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Ranjana Bagwe

Inspirational Others


3  

Ranjana Bagwe

Inspirational Others


सानूल पण सोनूलबालपण भाग 4था

सानूल पण सोनूलबालपण भाग 4था

22 mins 302 22 mins 302

कोकणात तस फारस गरम होत नसे. परंतू गर्मी वाढली, की तप्त झालेल्या अंगाला पाहाटेचा गार वारा हलकेच थंड करतो.मंद मंद वा-याच्या झुळके बरोबर साखर झोपेला ऐन उठण्याच्या वेळी उदान आलेल असल ,की, कोकणवासी गोड स्वप्नाच्या जगात वावरत असतो.तो सूर्याची दोन उन्हे अंगावर घेत नाही. तोवर याचे बंद असलेल्या डोळ्या पूडची स्वप्ने नाचायची थांबत नाही.ती थांबली तर समजाव याला घरची धणीन चुलीवर शेकत असलेल्या भाकरीच्या गंधान झोपल्या जागेवरून उठण्यास भाग पाडलेल असाव...असा आमचा कोकण वासी खाण्या पिण्यात आपली दीरगांई करत नाही....लोक म्हणतात तुझ्या साठी काय पण..तसा याच्या मता नुसासार खाण्या साठी काहीपण...म्हणजे पोटासाठी कीतीही कोणतेही कष्ट करायला तो नेहमीच एका पायावर तयारच असतो......त्या साठी तो ऊन,वारा,पाऊस थंडी याची पर्वा करत नाही....हे ओघाने आलेच.

""मे महीना आला की आम्हाला फार खुषी होत असे . मे महीण्याची ही पर्वणी काही वेगळीच असायची. मला वाटते आपल्या महाराष्ट्रात या महीन्याची सर्व जन आतुरतेने वाट पाहत आसावे. हा महीनाच कोकणातल्या मानसांना चार पैसे गाठीला बांधण्याची संधी देतो. आम्हाला तर हा महीना म्हणजे देवाकडून आम्हाला मिळाले वर्दानच असायचा.मागे सांगितल्या प्रमाणे आमच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य .म्हणजे खाणारी तोंड अनेक कमवणारी व्याक्ती एक अशी परस्थीती.या मुळे हा महीना आमचा प्राणदाता अस म्हटल तरी वावग होणार नाही.मे महिन्यात आमची मात्र सुगीची पर्वणीच. आमच्या घरात आम्ही निदान या महीऩ्यात तरी आम्हाला खायला द्या अशी मागणी करत नसू.त्या मूळे घरातली मंडळीना देखील आम्हाला खायला काय द्याव ह्याची काळजी मिटलेली. घरातील सगळे मजेत असायचे. कारण आंबे गरे, करवंद,जाभंळे यांची मेजवाणी अगदी सकाळपासूनच मिळे .त्या मूळे आमची पोट कशी तृप्त झालेली.आणि मोठ्यानाही हीच मेजवाणी मिळे,वरून फणसाची भाजी भरपूर करूण ती दिवस भर खायचे,ओल्या काजूची भाजी,एक दिवसा आड घरी बनत असे. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे वर्ष भर कधी आम्हाला जास्त पैसे मिळायचे नाही. ते या महिन्यात मिळायचे.हे पैसे मिळवण्या साठी आम्ही आमच्या मालकीची अनेक काजूची झाडे पालथी घालायचो.आज मात्र परस्थीती वेगळी आहे.आज आमच घर सर्व गोष्टीन समृद्ध आहे.त्या मुळे आम्ही तीकडे पाहात देखील नाही.तेव्हाची परस्थीती नुसार आम्ही एक एक काजू बी शोधायला आमच्या झाडा अतीरीक्त दुस-याच्या हद्दीत कधी प्रवेश करायचो समजतही नसे.आणि इथल्या काजू बिया चोरून बिन भोभाट घरी यायचो.कधीतरी त्या काजू झाडांच्या मालकाची नजर चूकून आमच्यावर पडली तर तो दांडा घेवून तोंडाला य़ेईल ती भारीशी शिवी देत आमच्या मागे लागे..पण त्याच्या हातून आम्ही सही सलामत घरी येवू.पण आमची ही कारस्थाणे घरी पोचली.म्हणजे आम्हाला भरपूर बोलनी खावी लागत.पण ती आम्हाला एवढी लागत नसत.पण अती झाल म्हटल्यावर एक दोन चपराक गालावर ऊठत.परंतू काजू पूढे तेही फिक वाटे.परंतू मनाला खूप लागत असे .केव्हा तर आमच्या शेजारी असलेल सावंताचे एक घर बंद असे.त्या घरी एक भाडोत्री असे आई,व मुलगा ,त्याना आम्ही त्या काकीला बा, म्हणू तर मुलग्याला दादा ,या दोघींच लक्ष झाडावर नसे. तर मालकीन व तीचा मुलगा मुबंईला असत. मुलगा कधीतरी दोन दिवसा करीता येई,पण मालकीन तीला आम्ही आक्का म्हणू ती मात्र मधी मधी येवून जात असे..मग आम्हाला रान मोकळेच असायचे.बा त्या घरची देखरेख करायची.बा,च्या हातावर आम्ही तुरी देवून काजू बरोबर हापूसआंबे ,ही लंपास करायचो.जेवढे म्हणून काजू आम्ही गोळा करू ते दोन दिवसा आड बाजारात विकू,आलेल्या पैशात,आम्ही आईसक्रीम,पाव,बटर,गोळ्या घेवून उरलेल्या पैशात आठआण्याची साखर चार आणे खर्चून चहा पावर घेवू .आयेला पान सूपारी मनात आल व आठवण राहीली तर आणू..

सर्वात जास्त काजू आमचा अन्ना गोळा करी.तो कोणत्याही झाडावर झरझर चडत असे.राजा पण अर्धा अधिक झाडावर चडे,परंतू मला मात्र प्रयत्न करूनही कधी झाडावर चडता आले नाही.आम्हाला शाळा चालू झाल्यावर वह्या ,कंपास बॉक्स,पेन लागतील म्हूणून ती घेवून ठेवू,पूस्तक,मात्र आम्हाला गरीब विद्यार्थी म्हणून शाळेतून मिळत.ती आम्ही परीक्षा झाल्यावर परत करू,पून्हा नविन किंवा जूणी वापरलेली पुस्तक मिळत.जास्त जुणी फाटलेली असली की आम्ही ती प्रिंन्ट प्रेस मधून बायडींग करूण आणू.त्यालाही 25किंवा50 पैसे द्यावे लागत.तेही तेव्हा आम्हाला जास्तीच वाटायचे.

"पैशाला पैसा धान्याला धान्य जोडत जात ते काही खोट नाही.कारण या महीण्यात आमच्या जवळ पाहूण्यांची रांग लागायची मुबंईचे पाहूणे आणि पूण्याचे पाहूणे येत .त्यात पूण्याचे पाहूणे आमचे चूलत काका काकी त्यांची मुले मुले मोठी कमवती होती.ती आली म्हणजे आठ पंधरा दिवस कसे मजेत जायचे ही मंडळी घरात मिठा पासून ते पिठा पर्यन्त आणि तेला पासून मसाल्या पर्यन्त हव नको ते सर्व पाहायची त्या मुळे सकाळ संध्याकाळ हाता तोंडाची भेट कशी मजेत व्हायची.मासे मटण,कोंबड्या यांची नांदी सदा बहार असे.म्हणजे सोने पे सुहागा अस काहीस घरच वातावरण असायच.आमच्या आयेला पण ते वेगळे पैसे द्यायचे,आये त्याच पैशातून आम्हाला कधी मिळत नसलेले व पाहुण्याना आवडनारे वेगवेगळे पदार्थ आवडीने करूण पाहूण्याना वाढायची,हे करताना ती थकत नसे.आणि पाहुणे देखील आयेच कौतुक करत खात असत, आयेच्या हाताचे कांदे पोहे मिठक्या मारून खात असत.आयेच्या जेवणाला ही मंडळी नाव ठेवत नसल्याने आये ही आग्रह करूण खायला घालायची.आजही मी पूण्याला गेले तर आयेच्या जेवणाची आठवण काडत असतात.अशी कोणी आयेची आठवण काडली की मला आगळ वेगळ समाधान मिळत,डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या की गंगा जमुना गालावर आपसूक खाली येतात.त्या अलगद पदराने टीपताना,आयेला आठवणीची श्रद्धाजंली वाहील्याच,अदभूत समाधान मिळत हे समाधान मनाला एका वेगळ्य आंनदाची अनुभूती करूण देते. हा आनंद मनाला तृप्त करूण जातो.या तृप्ततेची भरपाई जगातली कोणतेही धन दौलत करू शकत नाही..आयेला कोणी पैसे देवो अथवा ना देवो.ही आपली कष्ठाची पदर मोड करूण आनंदी चेह-याने सर्वांचा करत असे.त्या साठी आयेने उद्याची पर्वा कधी केली नाही.तेच क्षेम गुण माझ्या अंगी अवतरल्या मुळे मीही स्वजनापासून ते आप्तजना आजही मनापासून करूण घालते.परिनामीआयेला त्यावेळी जेवढे समाधान मिळे अगदी तसेच समाधान मलाही मिळते..

आजही मला कोणाला काही करूण द्यायचे अलेल, तर मी सण सूद पाहत बसत नाही.मला जे पटत, मुलांना जे आवडते ते ते सर्व मी आवडीने करूण देते. त्या साठी मला उद्या काय?हा प्रश्न कधी पडत नाही.त्या मुळे मी सर्वीस करणारी असूनही माझा बैंक बँलेन्स खालीच आहे .त्याच मला काही वाटत नाही.

कारण घरातच नव्हे,तर बाहेरच्या मानसांच्या प्रेमा मुळे,माझ्या बैंक मधे आपूलकीचा एवढा बाँलन्स आहे,तो कीतीही काडला तरी समाप्त होण्यातला नाही ..माझ्या मते या बाँलन्स सारखा मानसाच्या आयुष्यात दुस-या कूठल्याही बँलन्सला किंमत नसावी......

डोंगरदऱ्यात वसलेल आपल कोकण ,प्रत्येक वेळी स्वर्ग सुखाची अनूभूती करूण देत असते. डोंगराच्या कपारीतून नाद घुमू लागला की घूं,घूं आवाज काडत वारा शिळ घालत आभाळी गवसणी घालू लागताच भुवरल्या लता वेली वनात नाचू बागडू लागल्या तरू ही त्याना साथ देत राहतात. उंच उंच झाडांना कवेत घेवून या वेली हीरव्या पानावर सुस्त पडूनन असल्याचा भास होतो.. वा-या वरती झाडांच्या डाहाळ्या डोलायला लागल्या की या वेली ही खेळ खेळू लागल्या की वाटते झोपाळ्या वर वेली झोका घेत घेत ..झाडेच यांना अंगाई गीत गावून आपल्या अंगा खाद्यावर निजवतात की काय अस वाटन स्वभाविक........


"मे महीना कसा भूर्रकन उडाला ,ते कळलाच नाही.

जून महीना लागला, आणि पून्हा एकदा आम्हाला शाळीची चाहूल लागली.आमचे सर्व लक्ष आता शाळेत लागण-या वस्तू जमवण्याकडे लागले.

काही अंशी आम्ही काजू बिया विकूण वस्तू गोळा केलेल्या,पण काही वस्तू आमच्या अवाक्याच्या बाहेर होत्या.त्या मोठ्यांच्या सहकार्याशिवाय येणा-या नसल्याने मला आये,व राजाला दाजी यांना घेयायला सांगणे भाग होते.परंतू त्यांच्या कडूनही ते सहज मिळेल अस नव्हत. त्या साठी आये कडे व दाजी जवळ रोज तगादा लावण भाग होत.पण अन्नाच तस नव्हत .अन्ना काहीने काही मागाव व ते आये कोणत्याही परस्थीतीत आणून देई .पण आमच्या वेळेला सर्वजण तंगळ मंगळ करत.अन्ना ने या वेळी मात्र जवळ जवळ सर्वच सामान स्वत:हून जमविले होते.मागे सांगितल्या प्रमाणे सावंताच्या घरी राहत असलेली भाडेकरू बा,ने दादाच लग्न केल होत.ही वहीनी आमच्या कोकणातली नव्हती ती घाटावरची होती.तीच्या आमच्या भाषेत जमीन आसमानाचा फरक असे .गमंत म्हणजे ती बोले ते आम्हाला कळत नसे.तर आम्ही बोललेल तीली कळत नसे.दोघांचा एक सारखा प्राँब्लेम असल्याने ती आम्हाला व आम्ही तीली हसू .तीची इतरत्र ओळख नव्हती.किंवा ती कोणा मध्ये मिसळत नसे म्हणून ती काही बोलायच झाल्यास आमच्याशी बोले.....

आम्ही तीथे सारखेच जात असू आम्हाला तीची संगत फार आवडे ती एवढी मोठी तर आम्ही 9वर्षाचे असू तरी आमचा तीचा ताळ मेळ जमे हे जरी चमत्कारीच होते..शाळेतून आलो की आम्ही दप्तर घराच्या बाहेरूनच घरात फेकू आणि वहीनेकडे धुम ठोकू,

तीच्या दारी आम्ही पोचताच वहीनी पहीली तीच्या भाषेत म्हणे..

"""काय.गं.शोभा.काय रे..राजा..तुम्ही उगवलसा ...ते बी एवढ्या लवकर...

आम्हाला फक्त सूर्य उगवतो हे माहीत होत..पण मानस उगवतात हे वहीनी कडून कळल...उगवल या तीच्या शब्दावर आम्ही खो.खो,हसू,तीचा तीला राग येवून ती आणखी रागात येवून म्हणे..

""काय की !रे दात काडतासा??म्ही तुमास्नी काय वावग बोल्ली!!

ती दात काडतासा म्हणाली ...त्यावर राजाची प्रती क्रीया फार मोलाची असायची...

""""अगे दात आमी नाय गे काडनो!!ते डाँक्टर गे आमच्या वाडीत काडतत गे!!!

"""शोभा बघलसा ह्यो कसा बोलतूया!!!

"""नाय गे वहीनी तीया ना त्याच्या नादाक लागू नको गे!!

पूर्ण आमच्या शेजारात फक्त हीच वहीनी मला शोभा म्हणून हाक मारी ते मलाही गोड वाटे..

पण आता आमच्या आणि तीच्या भाषेत भरपूर फरक असल्याने असा घोळ होई .आणि वहीनी रागात जाई...ती रागवली की आम्ही पण भांडण करून बाहेर तणतण,करत जात असू ,पण घरी मात्र जात नसू,,काही वेळाने तीचा राग शांत झाला की आम्हाला हाक मारी पण आम्ही रागात वो दिला नाही की ती म्हणे...

""चहा कोण पितय कपात ओतलीया""

भाषेची कशी गमंत असते ना...तीच्या ओतलीया,या शब्दाचे आम्ही दोन अर्थ करू..म्हणजे वहीनीच्या भाषेत चहा कपात ओतलीया ,म्हणजे मी चहा ओतली...पण आमच्या भाषेत वहीनी आम्हाला आपण हून बोलवते ... कपात चहा ओतली......या तूम्ही असा करायचो...आणि सर्वात आदी राजा चहाचा चाहाता असल्याने तो आधी धावत जात म्हणे...

"""इलय!!ईलय!!गे!!!

अशी ही वहीनी कोणाची कोण असूनही मला राजाला मायेन बांधून घेतलेल...पूढे बा वारली...वहीनी घाबरत असे ,मग आमचा घरोबा तीच्याच घरी वाढला तो आम्ही रात्री झोपायलाही तीच्याच घरी जायचो...तीला आम्ही एवढीसी असूनही तीला आमचाच आधार वाटे...आज पण मी माहेरी गेली की ती पहीली आस्थेने चौकशी करतेच ..शिवाय घरी बोलून मायेन करूणही घालते. परतीच्या वाटेला मी निघाली की,आईच्या मायेन तीच्या फाटक्या तूटक्या संसारातूनही काही वस्तू गाठीला बांधून देते.... आज मला देवाच्या आशिर्वादाने कशाचीच कमी नाही . परंतू ती ज्या प्रेमाण मला देते ..ते पाहून तीच मन न मोडता मी आवडीने घेते..दादाही आपूलकीने चौकशी करतो...मी आज आमच्या दादाने कमीत कमी 70री गाठली असावी...पण मी लहान असल्या पासून जी दादाला राखी बांधते ,ते आमच नात अजूनही तसच आहे...कधी धावपळीत वेळेवर राखी पाठवायला मिळाली नाही की मी आमच्या भाईच्या बायकोला काँल करूण दादाला राखी आणून द्यायला सांगते..तीही आणून राखी दादाला देत असते.... अस हे मायेन आपूलकीने वाढलेल नात रक्ताच तर नाही.पण वात्सल्याने बांधलेल आहे..कधी तरी अती सलगीने नाती तुटतात.पण आमच हे नात गेल्या कित्येक वर्ष आभादीत आपल्या सह्याद्री पर्वता सारख कणखर तर आहेच शिवाय त्याला अास्थेची कवच कुंडले रक्ताच्या नात्याहूनही भारी आहेत..


धरतीवरचा अमुल्य ठेवा, जपणे हे प्रत्येक मानवाच काम असत..तसच कोकणातल्या धरतीवर मालवण समुद्रात छत्रपती शिवाजी राजे याऩी बांधलेला किल्ला,कोकणतल्या अमुल्य ठेव्या पैकी एक आहे. कोकणतल्या अमुल्य ठेव्या बद्दल माहीती सांगायची झाल्या प्रथम ,सर्वाच लक्ष वेधून घेणारा हा कील्ला डोळ्या समोर येतोच...सिधुंदूर्गाच भूषण असनारा हा किल्ला जेव्हा  बांधलेल्या कारागीराला शत:दा सलाम करावासा वाटतो...त्याच्या रचनाकाराला सलाम ठोकावासा वाटतो..

सूरेख तटबंदी पूढे किल्याच प्रवेश द्वार अजूनही भक्कम 

रूपात किल्याच रक्षण करताना दिसत. भक्कम दगड वापरून पाण्यातला हाकिल्ला जराही डगमगला नाही हे विषेश कौतुकास्पद आहे...किल्यावरील बुरूज आजही काटक पणे शिवाजी राजेचा ईतिहास सांताना दिसतात.....खरच त्या वेळी पण्यात किल्ला कसा बर!बांधला असावा.....हा प्रश्न अनेकदा पडतो...


'''''''''मे महीना संपला सात जून उजाडला .आज आमच्या शाळेचा पहीला दिवस ,नविन वर्ग,नविन पूस्तके,नविन पाटी ,नविन पेन्सील ,सर्व काही नविन ,असायच.पण आमच्या बाबतीत फक्त वर्गच नविन असायचा.बाकी आमच्या जवळच शाळेत वापरण्यात येणार सर्व सामान अर्ध्या पेक्षा अधिक जुणेच असायच...परंतू त्या गोष्टीच कधी आम्हाला वाईट वाटायच नाही.शाळेत जान्यासाठी अवश्यक वस्तू मिळाल्या याच समाधान मात्र खूप असायच. शाळेचा पहीला आठवडा ,संपेपर्यन्त आम्हाला शाळेत शिकवत नसत.मग मजा मस्ती कळ काडणे.दुस-या वर्गात कानोसा घेवून झाकणे वैगरे चालू असायच.काही पालक याच महीण्यात मुलांची नाव घालायला किंवा आणखी कसल काम काडून मुख्यध्यापकना भेटून जात.ते पून्हा कधीच शाळेत दिसत नसत. मूल मोठ होवून दुस-या शाळेत जायला होई. तेव्हा कूठे ते हजेरी लावत.पण आपल मूल मधीच कोणत्याही गावातून त्या शाळेतून या शाळेत येत असे तेव्हा ही मोठी मानस शाळेत दिसत....

तसच आम्ही वर्गात दंगा करत असताना आमचे मुख्यध्यापक एका मुलीला घेवून आमच्या वर्गात आले...त्या बरोबर आमच्यात शांतता पसरली...

परंतू जी मुलगी त्याच्या सोबत होती तीच्या वरूण कुजबूज आपसात सूरू...

"""पहीला=ये ह्या कोण रे""

दुसर="""मेल्या माका काय माहीत"""

तीसरा="""माका माह्यती आसा""आम्हा मुलात एक गमंत असायची.आम्हाला कुठला प्रश्न पडला ,किंवा काही गोष्टी माहीत नसल्या ,आणि नेमक आमच्या पैकी कुणाला माहीत असल ,आणि तो म्हणाला मला माहीत आहे.त्याच्या तोंडून एवढ ऐकताच आम्ही सर्व त्या मुलाला गराडा घालत विचारू,

"""व्हय काय रे आमका सांग"""

सांगनारा देखील जरा भावच खावून जगातला मीच पहीला सर्व ज्ञानी आहे असे भाव आणत म्हणे...

""अरे व्हय !सांगतय! पयला माका सोडा""!!"मग आम्ही त्याला सोडून अगदी मुंगी शिरेल एवढेच मागे सरकत असू...

आताही माका म्हाइती आसा. म्हटल्यावर आम्ही ऐकायला कान टवकारले पण गुरूजी वर्गात त्या मुलीला काही सांगण्या गुंग होते....म्हणून आम्ही जागा सोडली नाही एवढ..पण त्याला खुणेन विचारत होतो..."""

"""मेल्या बेगीन सांग कोण ता?

एक जण कानात बोलूनही झालेला""

"""तेवढ्यात तो मुलगा म्हणाला मिया ह्याका तीच्या आवशी बरोबर येताना बघलय"""

"""मेला !!!मेल्या ,तुका काय समजना नाय,,पडलय काय टकलेर ??आमी इच्यारतो ह्या कोण?? तर तुजा भलताच कायव!!

थांब ,तूका आता गुरूजी ,फक्त भायर जावंदे ,मगे तीया मेलय...आमच्या हातासून समज,,,

""हे अस असत लहान पण ,ना कळत !ना उगत !प्रश्न काय ?उत्तर काय ?हे सारच अनाड्या गोष्टी असतात.पण कुहूतवल मात्र भरमसाठ असत.आताही आम्हाला धीर नव्हता,गुरूजी कधी जातात.आणी कधी या मुलीची विचारपूस आम्ही करतो,अस झालेल....तरी बर त्या वेळी आमच्यात टीव्ही नवाची वस्तू अस्तीत्वात नव्हती.निदान गावी तरी नव्हती...नाहीतर ए.बी.पी.माझा,टीव्ही नाईन, आजतक,अशी न्युज चाँयनल असती तर मात्र आम्ही त्यांची एक्शन करत त्या मुलीची माहीती पुरवली असती....यात बरेच रीपोर्टर, वर्गातच तयार झाले असते..

आमची जिज्ञासा सिगेला पोचलेली गुरूजी त्या चिमुरडसी बोलत बसलेले...ते पाहून हळूच एक मुलगी म्हणाली देखील...

"""बगलय!!कसे गुलूगुलू गुरूजी बोलतत..आमच्या वगंडा केवा इतके बोल्लत नाय"""

"""ते ऐकूण बाजूची कल्पना लगेच म्हणाली..

""अगो तेनी नये कपडे घातल्यान बघ कसे ते ??वाटता ह्याका कालच कपडे आणले रंग बगा कसलो बरो दिसता..म्हणान गुरूजी जास्त बोलतत...

हे ज्ञान त्याच काय !आमच काय !तेव्हाच होत.....आणी मला वाटत ते एका ठरावीक वय़ापर्यंन्त सर्वात असत...एका एकी गुरूजी आम्हाला सर्वाना उद्देशून महणाले...

"""ही मुलगी आज पासून तुमच्या वर्गात बसनार!चालेल ना?

तेव्हा त्यांच्या प्रश्नावर आम्ही त्याना घाबरून मनातच दिलेल उत्तर..

""" आमी कसले नाय बोलतो!

आमका काय वर्गाच्या भायर जावचा नाय आसा!.

आता ता इला ना !

येद्या मुद्दाम आमच्या शाळेत, तर बसाना बाबडा!

वर्गात आरडाक आणकी एकाची भर ...

 असच मनात आपण मनात लहान आहोत म्हणून एखाद्या मोठ्या मानसा बरोबर खुप भांडतो. मनातून उदा..

घरात काही आम्ही सांडवल किंवा  दुसरी कसली चुकी केली तर कोणी आई ,बाबा ,आजी, म्हणजे कोणपण मारत असतात..आणि बोल बोल म्हनत असतात...

तेव्हा खर तर आपण मनातून त्यांच्या बरोबर भांडत असतो...डोळे मोठे झालेले,गाल लाल नाकावर राग हाताच्या मुठी आवळलेल्या,पण मोठ्याना ते समजत नसते..त्याना वाटते हा कोडगा झालाय..

पण तेव्हा आपण त्यांच्या तोंडाला तोंड लावत म्हणतो """"""मारताय कित्याक सांडला तर सांडला!!तूमच्या हातान पण सांडता तेवा तूमका कोण मारतला!!मीया नाहन म्हनान माका मारताय,,,,बर असो..

'''''गुरूजी गेले,आणि मी पहीली जाग्यावरून पटकन उठली तीचा हात धरून खाली बसवत म्हणाली...

"""ये गो हय माज्या बाजूक बस"":

ती बाजूला बसताच माझ निरीक्षण चालू झाल..

सुदंर नाजूक अशी ती ..गहूवर्णाची ती नाका डोळ्याने सुदंर दिसत होती..दोन वेण्या लाल रीबनीने वर दुमडून बांधलेल्या ..अगान मध्यम गुडगुडीत अशी गेोल गोल गाल ..मला पहील्याच नजरेस आवडली.. तीचा फ्राँक ने तर माझ मन वेधून घेतल...मस्त वेगळ्या रंगाततला कलर फुल नविन फ्राँक पाहून वाटल कोणी परी येवून आमच्यात बसली...होय खरच माझ्या नजरेत ती परीच होती.कारण आम्ही गावातली शेणा मातीत वावरनारी मुल...आणि ती आमच्या पेक्षा वेगळी साफ सुथरी !!ना पाय मळके ना हात मळके,नाही तर आम्ही पायात चप्पल नसल्याने सदैव पायाला मातीच,प्लास्टर असायच,हाताने कधी कुठलीही वस्तू पकडली की ते धुवायच् नाहीत ,काही खाल्ल असेल तर ते डाग अर्धे फ्राँकला अर्धे हाताला..फ्राँक कसला तो अर्धा अधिक रूमालच म्हणायला हवा,!नाक व्हावल ,तर पूस फ्राँकला,हाताला काय लागल ,तर पुस फ्राँकला,,म्हणजे शरीर झाकण्यासाठी असलेला फ्राँक आमचा ,पण त्याचा टाँवेल आणि रूमाल असा वापर करायचा.म्हणजे फ्राँक एक पण वापर अनेक मार्गासाठी व्हायचा .पण या मुलीच तस काही दिसत नव्हत,ती केवळ स्वच्छतेन म्हणा किंवा आणखी कशाने म्हणा ती मनात भरली ती कायमची..म्हनतात ना.. द फर्स्ट इम्प्रेंशन इज द लास्ट इम्प्रेंशन अगदी तसच काहीस तीन माझ्या ह्रदयात स्थान मिळवल होत.. ..मग हळूच तीच्या जवळ सरकत विचारल..

"""गो तूजा नाव काय??

तीला जणू या प्रश्नासाठी घरून तयार करूण पाटवलेल असाव..ती पटकन उत्तरली...

'''माझे नाव सुनिता भगवान राणे."""

एका झटक्यात नाव सांगून मोकळी नाहीतर मी!! कोणी कधी विचारल  

""गो तीया सावतीनीचा चेडू ना?तुजा नाव काय गो??""

मग मी उवाच

""माजा नाव""

""व्हय गो तुजाच इच्यारतय""

मग आळोखे पिळोखे घेवून फक्त आपल तेवढ नाव सांगून मोकळ व्हायच ,बाकी वडीलांच नाव, आडनाव ,ते सेफ डीपाँजीत मनात असायच....

पण हीने पटकन नाव तेही पूर्ण सांगून मोकळी...

मली तीच कौतुक वाटून

""तीया इलय खैयसून ""

""मुबंईतून""

"""क...काय?मी जवळ जवळ किंचाळली...

म्हनजे ह्या रोज शाळेत मुबैंसून येताला ?कसा ता???मला कधी न सुटनारा प्रश्न होता.कारण सर्व सांगत मुबैंक जावक एक रात गाडेयेत बसाचा लागता, तेवा खय मुबैय येता...मगे ह्या येताला कसा शाळेत..हा प्रश्नाच उत्तर अर्थात तीच देणार म्हणून मी परत तीला बोलती केली.

""तीया रोज मुबैंसून येतलय??

"""होय!""

हे उत्तर तीला माझा प्रश्न न समजून दिलेल होत..मी तीला बरेच प्रश्न विचारले भाषे अभावी तीने उत्तर दिली नाही. मग शाळा सुटली.ती दुपारी पून्हा दोनला भरे .कधी एकदा दोन वाजतात, आणि मी पून्हा तीला कधी भेटते ,अस होवून गेल...दुपारी घरी काय शिजल न शिजल, जे होत ते पोटात ढकलून मी शाळेला निघाली .राजा तयार नव्हता. मला धीर नव्हता.अधीर मन तीच्याकडे धाव घेत होत..कसा बसा राजा आला ..मी माझ्या मनात चाललेल्या घालमेलीचा राग राजावर काडत होती...

"""ये तुका बेगीना येवक येना नाय!

"""इलय मा बेगीना ""

"" व्हय तीया बेगीना इलय मीया बोलयलय ""

""पण ईलय मगो !मगे जाला तर !""

शाळेत राजा मुळे उशिर झाला त्या मुळे शिक्षा होनार ती कसली ओणवे रहा,शाळेभोवती डोक्यावर दप्तर घेवून धावा,किंवा उठाबशा,या पैकी काही..पण आज पलीशमेंन्टची काळजी नव्हती .काळजी होती.ती सुनिता मला सोडून दुसरीकडे बसली तर??

मन अधीर कुणा भेटण्यास बचैन असेल, तर रस्ता कोसे दूर वाटतो.आमच्या घराकडून शाळेचा रस्ता 20 मि.वर पण हा रस्ता आज पार करताना फार दूरदूर वाटला..

शाळेत मी धडपडत पोचली..ती मुलगी मी सकाळी बसवली होती ,तीथेच बसलेली पाहीली ,मन आनंदीत होवून हर्षाने नाचायच बाकी होत ,कारण शाळेच्या चालू वर्गात तस करण म्हणजे शिस्त मोडण्याची भीती....

मी तीच्या बरोबर बसली आमच्या गप्पा रंगल्या आणि पूढे पण रंगत राहील्या..ती हुशार मीही हुशार दोघ शेरास सव्व सेर ,असूनही मी माझा पहीला नंबर कधीच सोडला नाही...पण ती मात्र कायम 2रा नबंर घेवून पास व्हायची...पूढे पूढे समजल तीचे आई वडील मुबंईत असतात.ती आजी आत्या बरोबर ईथे आली होती...आई वडील दोघ सर्वीस करत ,हीला पाहायला कोणी नसल्या कारणाने तीला इकडे पाटवलेल..मी आणि ती खास मैत्रणी झालो ,एवढे की दोघांना एकदुस-या शिवाय करमत नसे...तीला मुबंई वरून खावू कपडे येत.ती खावू दप्तारातून लपवून मला आणत असे...तीच्या कपड्याची मी फँन होती...ती 5वी पर्यन्त. मी 5वीत गेली पास झाली. आणि मला हायस्कूलचे वेध लागले..आणि ती माझ्या पासून वेगळी झाली ती कायमची..मी हायस्कूला जावूऩ तीला मुकले ,ही माझी जिवणातली पहीली चुकी होती....नतंर गाठ होत नसे, कारण आमचे रस्ते वेगळे, शिवाय ती कोलगाव नाक्यावर राहायची.. मी माटेवाडा झिंरग मधे..म्हनजे माझ्या घरा पासून खूप दूरच तीथ जाण शक्य नव्हत...

त्या नतंर मला ती कधी तरी दिसे..नतंर दिसलीच नाही ती आज पर्यन्त ती सध्या कुठे आहे.काय करते.लग्न झाल का??शक्षण पूर्ण केल की नाही...हे सर्व प्रश्न आजहीअनुत्तरीत आहेत..परंतू आजही तीला भेटण्यासाठी मन आसूसलेल..आहे भविष्यात मला कुणी विचारल तूझी ईच्छा काय तर मी, सांगेन मला माझी ही मैत्रीण एकदा तरी मिळावी ,तीची माझी भेट त्या पांडूरंगाने या वाटेवर तरी घडवून आणावी .... ही आशा...


कोकणातल्या अनमोल ठेव्यातल एक अनमोल ठीकाण म्हणजे सावंतवाडीतील माटेवाडा इथे असलेल आत्मेश्वराच मंदिंर व तीथेच असलेली दीड फुटाची पाण्याची तळी.. आत्मेश्वर मंदीर खुप साध असून उंची ही बेताची आहे पूर्वी काळच हे मंदीर शूशेभीत तर आहेच शिवाय देवळाच्या गाभा-यातील पिंडी देखील विलोभनिय आहे.

समोर असलेली तळी ही कायम स्वरूपी दुथडी भरूण वाहत असते.हे फार मोठ सावंतवाडीतल नवल आहे. हीची अख्याईका सांगितली जाते....परशूराम या भुमीवर भ्रमन करताना ते तहानेन व्याकूळ झाले सभोवताली पाणी मिळाले नसल्याने त्यानी आपल्या हीती असलेल त्रिशूळ जमनित मारल...त्या सरशी तीथे गंगा अवतरली...आणी त्यात प्रतीक म्हनून ही तळी दीड फूट असूनही कायम भरूण वाहताना मी पीहील आहे...आज मात्र ह्या तळीला कठडा बांधून घेतलेला आहेे......

'''दैवगती काही वेगळीच असते.देव एकाला देत असतो .तर दुसऱ्याला त्यावेळी रीताच ठेवत असतो .नशिब आणि आयु घेवून मानूस जन्माला येतो.परंतू कर्मा नुसार देव त्याला देत असतो, ते वेगळे,परंतू नशिब आणि वेळ याची योग्य सांगड बसली म्हनजे मानसाच भाग्य बदलायला वेळ लागत नाही.याचे जिवंत उदाहरण म्हणजे आमचा राजा ,आये सकाळी चहा बनवून ती मला कपात ओतून दिल्या पासून ओरडत असे.

'''''पी,गो,पी,,पण मी लक्ष देत नसे, तर दुसरीकडे राजाला चहा पी म्हणून सांगनारही कोणी नसे.कारण घरात चहा बनवयला चहाची सामग्री नसेल तर कोण लवकर उठण्याचा प्रश्नच नाही.आणि जर का कुणी घरात उठली तर आपला मुलगा शाळेत असाच जातो. म्हटल्यावर मनाला दु:ख होणे स्वभाविक होत.निदान त्या वेळी मला ते कळत नव्हत,पण आता कळतय की आम्हाला वाढवताना परस्थीती नुसार आई वडील कीती लाचार हतबल झाले असतील, आये त्याला कधीकधी चहा घ्यायची परंतु एखाद्या दिवशी आयेला कळायच नाही की घरात चहा बनला की नाही...माझही तसच व्हायच,नाहीतर आयेन मला ओतलेली चहा मी राजाला गुपचूप देवून आली असती...नतंर मात्र मी पहीली उठली की आई चहा बनवायला उठली की नाही ,ते पाहायची.,नाही उठली तर समजून जायची,आज माझ्या राजाला चहा मिळनार नाही...मग आयेन ओतलेला चहा मी दुस-या कपात ओतून राजाला मागील दारी नेवून देत असे,,अस करताना मी या कानाची खबर त्या कानाला होवू द्यायची नाही...आजही माझी ती सवय तशीच जपून ठेवलेली आहे.आताही कुणाला मदत करायची झाल्यास मी घरात कुणालाही कळू देत नाही.... 

आताही राजा पिर पिर करत शाळेत निघाला खरा,पण त्याची पाऊले मात्र काही भरभर उचलत नव्हती .,एक प्रकारे मला राजाच वाईट वाटत होत.तर दुस-या विचारा अंती मला पटत होत ,चहा नसला म्हणून कुणी शाळेत जावूच नये का?आलेले दिवस झेलायला काय हरकत आहे .दिवसच ते !कधी तरी बदलनार!!आता बदलायला उशिर होईल पण आपण मोठे झालो म्हणजे दीवसही नक्की बदली होतील.... असे विचार मनात आले की मी राजाला म्हणायची.

"""ये राजग्या आता पूरे कर रे तूजा चाय पुराण ,आणि बेगीना पाय उचल ""

"""तीया तसाच बोलतलय,तुका गावता चाय""

""ये माका चाय गावना नाय रे आये दीता,आणी शाऴा सुटली मा ,मगे घराक बेगीना जावया !,आयेन चाय टोपात थेयलेली अासली मा,तर तुका पयली दीतय,!मगे तर जाला!!

आता चल बेगीन """

यावर राजा नीरूत्तर व्हायचा.म्हणजे मनाला कुठे तरी आशा असते.की घरी गेल्यावर चाहा मिळनार...

म्हणून मानसांना आशा नेहमी पाळाव्यात.आशेला पालवी चैतन्याची असते...म्हणजे आशा काय किंवा स्वप्न काय नावे अलग असली तरी विषय एकच असतो...

मनी इच्छा असल्या की त्या पूर्ण करायला मनात नविन ऊभारी भरलेली असते..

तसा राजा कसातरी शाळेत येई..

 नतंर नतंर त्याची ती रूसण्याची व माझी त्याली विणवण्या करण्याची सवयच होवून गेली..कधी तरी मी दुर्लक्ष करी.कारण एकच गोष्ट सातत्यान घडयला लागली की .पहील्या सारख तीकडे लक्ष द्यायला तो उत्साह राहत नाही. 

 आज राजाची पीरपीर जरा जास्तच वाढली होती. त्याला कारणही तसंच होतं कालपासून राज्याच डोकं दुखत होत. ते थांबत नव्हतच.ब-याच उशीराने तो झोपला.होता .त्यावेळी आजच्यासारखे डॉक्टर जवळपास नसायचे आणि आम्हाला जास्त कधीच डॉक्टर जवळ जायला लागत नसे. कधी कधी मला राज्याला किंवा आम्हा कोणाही भावंडाना बर नसल म्हनजे... आयुर्वेदिक उपचार घरात केले जायचे...त्यात सुरपीन,किरायत,अडूळसा,यांचा सामवेश असायचा, ताप आला की वरील पैकी औषधांचा काडा प्यायला मिळे...तोडांचा चंबू करूण हा काडा गीळायला एक मिनिटही लागत नसे... जसे सण कधी तरी येतात,तसा हा ताप कधी तरी यायचा. सणाला काही चांगल गोड धोड खायला मिळे...आणि ते खा म्हणून कुणाला आग्रह करायची गरज पडायची नाही..तापात काडा प्यायला आम्हाला घरचे आग्रहा सोबत डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने जवळ घेत काडा पाजीत..पूढचे दोन दिवस गरम पाण्या शिवाय पाणी पियला देत नसत..एवढी काळजी घरची घ्यायला लागली की तापही कधीच फुर्रर्र व्हायचा,

 आये वेगळे जेवण करायला लागल्यावर माझ्यासाठी पेज किंवा भात खोलीच्या बाहेर एका टोपलीखाली झाकून ठेवून ती कामावर जाई, खोलीला बाहेरून टाळे लावून ती बाहेर निघून जात असे. याचं कारण घरात काही असलं नसलेला मी माझ्या घरातल्यांना वाटत असे,आयेची बोलनी व बराच मार खायला लागे. पण मी काही केल्या सुधरत नव्हते .मला दुसऱ्यांना काही देवून खूप सुख समाधान मिळे. आणि तीही आपलीच भावंड म्हटल्यावर आयेची बोलनी फीकी पडत,

 आयेने कंठाळून मग खोलीला टाळ लावत जायची.मला काही पेज किंवा भात टोपली खाली झाकून खोलीच्या बाहेर ठेवी. घरी आल्यावर राज्याला काहीच खायला नाही म्हटल्यावर आयेने जर भात ठेवला असेल तर तो आम्ही वाटून खाण्यात जड जात नसे.पण पेज ठेवली तर मात्र वाटून खाण अवघड होई,मग फणसाच्या झाडाची मोठी पाने काडून ती झाडूच्या काडींच्याच्या साह्याने द्रोण करून पेज वाटून खाऊ .या वेळी वाईट कधीच वाटायच नाही.पोटाला आधार मिळाळ्याच समाधान मात्र व्हायच..परतून कधी ही आठवण आली की कंठ दाटल्या शिवाय राहत नाही. माया ममता ही कुणाकडून उसनवार घेवू शकत नाही .ती मुळातच अंगी भिनलेली असायला हवी...आमच्यात माया होती..जीव्हाळा होता..त्याच्या आधाराने आम्ही घडत गेलो आणी घडलो देखील...टाकीचे घाव जोवर सोसले जात नाही तोवर दवाची मुर्ती देखील घडत नसते..आम्ही तर हाडा मासाचे बनलेले.एक एक संकट पार करत करत आम्ही घडत गेलो.तेही समाधान ..

 ""शाळा सुटली म्हणजे मागे सांगीतल्या प्रमाणे सरळ घरी नजाता,किंवा मधली शाँटकट वाट नधरता,आम्ही आता रस्त्यानेच घरी जायचे..

घरी जाताना प्रथम हनूमान मंदिरीत घटका भर बसू..ईथे आम्हाली काही खायला किंवा पाच दहा पैसे देवाच्या पुढ्यात मिळत ते पैसे देवाचे आहेत ,,अस कधी वाटलही नाही,तेच पैसे घेवून आम्ही तीथल्याच दुकाणात खावू घेवून व वाटून खाऊ..कधी पैसे मिळाले नाही की खोब-याच्या तुकड्यावर भागवाव लागे...

पूढे थोडस चालत गेलो की,

पाटणकर आतेच घर लागे.ही आत्या दीजी,नाना,ताता,यांची मानलेली बहीण होती.तीला 5मुली व लास्टचा एक मुलगा संजय आमच्याच वर्गात होता.. संजयचे वडील मुबंईला नोकरीकरत व इकडे गावी आत्या घर संभाळत असे..काका महीण्याला मनिआँर्डर पाटवत असे.ते व्यवहाराला पुरत नसल्याने आत्याने घरच्या पडवीत चहाच दुकान थाटलेल होत...त्या मुळे ताता सोडला तर दीजी,नाना, याना सकाळचा चहा आणि सकाळीच काहीतरी केलेलं खाऊ त्या दोघांना ती न चुकता देत असे . आत्या आपला संसार काटकसरीने करी, त्याही काटकसरीत ती दाजीला ,पाच किंवा दहा रुपये देताना मी किती तरी वेळा पाहिलं होत. दाजीने कधीच देताना मी पाहिलेच नाही. तिच्या घरावर जेव्हा जेव्हा संकट येई त्या त्यावेळी दाजीं खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राही. आते जे काही घरात गोडधोड किंवा सणसूद साजरा करी,ती आवर्जून आमच्या घरी पाठवून द्यायची, तशी आते खूप प्रेमळ होती .सख्या भावापेक्षा जास्त प्रेम ती दाजी ,नाना, ताता, यांच्या वर करी..तीला सक्का भाऊ होता. किंवा बहीण होती .हे आम्हाला कधी कळलंच नाही. किंवा तिच्या घरी येताना कोणाला आम्ही कधी पाहिलेच नाही .पाहुणे म्हणून तिच्या घरी जाणारे आमचे पुण्याकडचे काकी आणि आम्ही तेवढेच .तीचे रोजचे पाहुणे दाजी,नाना, होते. दाजीला, नानाला ,तिने कधी राखी बाधंलेली आम्हाला आठवत नाही. पण नातं मात्र तिने आयुष्यभर निभवल, पुढे पुढे हे भावा-बहिणीच्यां नात्याच रूपांतर पाहुण्यात झाल, आतेची चार नंबरची मुलगी मंगल, आमची वहिनी , बाबा ची बायको , दाजी नानांची सून म्हणून आमच्या घरात आली. बाबा व मंगलचा विवाह झाला. आणि हे नातं कायमचं जपल गेल आज आमचा भाऊ बाबा ,हयात नाही त्याचप्रमाणे दाजी नाना ,ताता, पाटणकर आते,काका, या पैकी कोणी हयात नाहीत.परंतु आठवणी मात्र तहहयात जिवंत आहेत. आज वहिनी आमच्या घरी खूप आनंदात आहे .तिची मुले मोठी झाली.. नाना , दाजी,यांनी मानलेल्या बहिणीला लास्ट पर्यन्त साथ दिली.. 

असे हे भावा बहिणीचे मानलेलं नातं अखेरपर्यंत टिकून राहिले हे विशेष...आज यातील कोणीही मंडळी हयात नसली तरी आठवणीने मात्र उजाळा मिळून यांच प्रेम मात्र आमच्या घरात अमर झाले.....

क्रमंश....पूढे.....

 कला गुणांची खाण असलेल्या कोकणात अनेक कला मानसांच्या अंगी भीनलेल्या आहेत.अशीच एक कला सावंतवाडीतील चितार आळी इथे आहे.या कलेला कूठल्याही राज्यात तोड नाही...ही कला आहे लाकडी खेळणी,ही सीवंतवीडीतील प्रमुख कला आहे .पंगारा या लाडापासून उत्तम उत्तम खेळणी बनवली जातात. त्याच प्रमाणे.आणखी काही शो साठी ठेवण्यात येणा-या वस्तूही मोठ्या कलाकुसारीन बनवल्या जतात.यात पारामुख्याने लाकडी खेळण्या बरोबर आंबा ,पेरू, जांभळ ,ऊस,द्राक्षे पाहाताच खरी वाटावी इतकी ती सुबक बनवली जातात.या कलेची जाेपसना आजही सावंतवीडीत मोठ्या आवडीन जपतात.....या खेळण्याना विदेशातही मागणी आहे...हे विषेश...

'शाळा सूरू होवून जून संपत आलेलाअसताना,शाळेच्या वाटेवर आणखी एक मैत्रिण भेटली.ही खर तर आमचे पुण्यात असणा-या काकांच्या घरी भाड्याने राहायला आलेली..ती पहील्या दिवशी शाळेत आली आम्ही पाहीली मात्र सूनिता ने जस मन मोहवून घेतल तस काही वाटल नाही.परंतू ही मैत्रीण मात्र बनली.हीच नाव ज्योती अनिरूद्ध भागवत ब्राम्हण समाजाची असल्याने तीही शूध्द मराठी छान बोले ..इग्रजानाही लाजवेल अशी गोरी पान असल्याने.ती सर्वात उठून दिसे..पूढे आम्ही तीघ छान मैत्रणी झालो.आमच्या काकांच्या घरी राहत असल्याने मी तीच्या घरी जाई...तीची आई प्रेमळ नाजूक प्रक्रुतीची होती.तीला जेवना अतिरीक्त काम जमत नसल्याने.आणि माझा घरोबा तीथे वाढल्याने ती मला लहान लहान कामे सांगे मीही ती पडत्या फळाची आज्ञा म्हनून करत असे...

पूढे नंतर मी शाळेतून सरळ तीथेच जाई...तीला मी काकी म्हणून हाक मारी...ज्योतीचे वडील हे तहसीलदार होते....तेही प्रेमळ असल्या कारणाने माझी उपस्थी कधी त्याना खलत नसे...मग तर मी बिनधास्तपणे तीथेच ठाण मारूण बसे...कधी तरी मी आणि ज्योती त्यांचे कपडे घेवून ते नदीवर धूवूण आणू...ज्योतीची आई मला गरमा गरम जेवण वाढी....परंतू आम्ही मराठी ते ब्राम्हण म्हणून पंगतीला न बसवता ,ती बाहेर हाँल मधे मला केळीच्या पानात जेवण वाढी..तीची जेवण वाढण्याची पद्दत फार सुदंर होती.पानावर भात त्यावर वरण वर तूपाची धार,बाजूली लिंबाच लोणंच आेली सुक्या अश्या दोन भाज्या अस परीपूर्ण पान वाढून मला देई पाणी भरून तांब्या बाजूला ठेवी ..मला प्रथम प्रथम पंगतीला वाढत नाही म्हणून खराब वाटे पण...पण काही दिवसातच मी तीथे रमली...केळीच्या पानात वाढलेल जेवण फार रूचकर वाटे.आणि त्याही पेक्षा महत्वाच ती माऊली मला कधीच शिळ पाक वाढत नसे.व कोणताही पदार्थ मला पानावर वाढल्या शिवाय राहत नसे .हे विशेष.कधी कधी ती मला ज्योती बरोबर काही आणायला दुकानात पाटवी...व आम्हाला दोघीना समान पैसे खावू साठी देई...एक मात्र नक्की होत...मी गेली नाही तीकडे कधी की ही माऊली मला बेलवायला पाटवत असे....

पूढे ज्योतीच्या वडीलांची पून्हा बदली झाली..तेव्हा या कूठे अहमद नगरला शिप्ट झाल्या जाताना मला जवळ बोलवून या माऊलीन माझी पापी घेतली...पुढचे दोन दिवस मी ज्योती गेल्याच्या दु:खात नव्हती तर मला जेवू खावू घालनारी माझ्या आये सारख प्रेम करनारी ही माझी दुसरी जणू आईच गेल्याच अनोतान दु:ख झाल.ज्योती 2वर्षे आमच्या बरोबर शिकली पण तीने कधीही श्रीमंतीचा गर्व केला नाही.सुनिता पन सुखी होती.या दोघात माझीच परस्थी गरीबीची होती .परंतू कधीई आमच्या मैत्रीत मात्र ती आड आली नाही..ज्योती नतंर कधी मिळाली नाही.पण तीच्या माऊलीला मि विसरलेली नाही.तीने केळीच्या पानात जेवायची लावलेली सवय मात्र मला आजही आहे..मुबंईत पाने मिळत नाही.तेव्ही मी मंडईतून पाने आणते.माझी ही सवय माझ्या मुलांनाही लागली.

शाळेच्या वाटेवर अनेक सोबती मिळाले काही लक्षात राहण्या जोगे तर काही लक्षात असूनही त्यांच्याशी कसलाच सरोकार . नव्हता..मैत्रणी मिळवणे हे काही मोठ आव्हान नसत,अव्हान तेव्हा सूरू हेते.जेव्हा लाभलेली मैत्री कशी जोडावी हे खर आव्हान इसत. आम्ही तीघही तीसरीत गेलो आणि आम्हाला त्या वर्गात नापास झालेली मिथा नावाची मैत्रीण मिळाली...

साधी सिंपल कुणाच्या अद्यात मध्यात नसनारी ,मिथा आमच्यात पटकन रूळली..अभासात प्रगती साधारण होती...परंतू स्वभाव गोड...हीच्या घरी बरीच फळांची झाडे होती...आंबा ,फोपळी,प्रमाणे अनेक फुलझाडे होती..

यांचा सुखी परीवार हेता .हीच घर बागेतल्या उत्पन्नावर चाले..ही येताना आम्हाला बरीच फळे खायला आणि..कधी कधी तर चक्क चीकूनी भरलेली पिशवी वर्गात आणून वाटी.....मिथाची साथ आम्हा फक्त सहा महीने मिळाली...मिथा एकटीच आई घरात नसताना विहीरीवर गेली.ती पून्हा कधीच परतली नाही .तोल जावून .मिथा विहीरीत पडली तीथे कुणी नसल्याने नक्की कशी पडली कूणाली कळलही नाही...आम्हाला खुप उशीरा तीच्यावर सर्व सोपास्कार झाल्या नंतर कळल...मधल्या सुट्टीत आम्ही मिथाच्या घरी नुसते जावून आलो...परंतू नुसते उभे राहून पून्हा शाळेत आलो अर्थात यायला उशिर झाल्याने ..आणि शाळेत कुणालाही न सांगता गेल्यामुळे शिक्षा मिळाली...काही.. ऋणानुबंध अगदी जवळचे असतात.मागल्या जन्माच काही शिल्लक राहीलेल्या गोष्टीची पूर्तता या जन्मात करावी लागते म्हनतात...

तसी ही मिथा तिसरीत नापास होते काय!आमची मैत्री होते काय?सर्वांना आपलस करूण मिथा अचानक आमच्यातून कधीही न येण्यासाठी निघते काय

हा निव्वळ योगा योग होता.की पूर्व जन्माी राहीलेली अधुरी सोबत या जन्मी देखील तसीच ठेवून ,मनाला चटका देत निघूनही गेली...मला तीची आठवण आजही येते....सुगंध फक्त फुलात असतो अस नाही..आठवणीचाही सुगंध असतो..फरक एवढा की हा कुणाला जाणवत नाही ...मात्र ज्याच्या त्याच्या हृदयात तो दरवळत असतो......

क्रमंश..


पूढे....


Rate this content
Log in

More marathi story from Ranjana Bagwe

Similar marathi story from Inspirational