Ranjana Bagwe

Children Stories Children

3  

Ranjana Bagwe

Children Stories Children

सानूल पण सोनूलभाग 6वा

सानूल पण सोनूलभाग 6वा

15 mins
299


"सावंतवाडीत असलेल्या मोती तलावाची अजून माहीती म्हणजे..हे तलाव त्या वेळी राजवाड्यातील लोकांसाठी बांधल गेल होत.तलावाची उंची फार कमी होती...व तलावाच्या आत मधे सात विहीरी देखील गुप्तपणे बांधण्यात आल्या होत्या...तलाव असल्या कारणाने या विहीरींचा कुणालाही सुगावा लागत नसे....त्या मुळे राजवड्या अतीरीक्त दुसर कोणी या तलावात उतरल्यास बुडत असे..तसेच पावसात या तलावाची पातळी वाढली की हे पाणी पूर्ण रस्त्यावर येवून समोरच असलेल्या सोनार आळीतल्या विठ्ठल मंदिरात शिरायचे...लोकांनाही बराच त्रास व्हायचा....पूढे राजवट संपली तस हे तलाव बि.एम.सी.च्या ताब्यात गेल...नतंर त्याची खोली वाढवून कठाडा बांधण्यात येवून विहीरी ही बुजवल्या गेल्या.. आणि तलावाच्या बाजूला गार्डन व ते दिव्या रोषणाईन शूशोभीत करण्यात आला.. या तलावात बरच सोन लपलेल असाव, असा अंदाज वर्तवला जायचा...त्या मुळे पदेशातील कंपणीने हे तलाव काही दिसांसाठी तेथील मातीवर संशोधनना हेतू मागीतला गेला होता.परंतू त्याना तो दिला गेला नाही हेही तेवढेच खरे....


कोकणात एखाद्या सणाची सूरवात झाली, की पूढचे सण कसे भरभर येतात कळतही नाहीत.नागपंचमीच्या नंतर नारळी पोर्णिमा,हिला पोवत्याची पुनव असही म्हनतात.या पूनवेला बहीण भावाली राखी बांधते.बहीण सासरी असेल तर ती मुद्दाम हून माहेरी येते ती केवळ भावासाठी...पण आमच्या घरी मात्र वेगळच असायच...म्हणजे भाई,बाबा,अन्ना,हे तिघही आपआपल्याला राख्या,बाजारातून घेवून यायचे..राजा महादेव यांना दाजी राखी आणि..मुळात रक्षा बंधन म्हणजे काय असत,हेच आम्हाला कधी कळायच नाही. नाना,ताता,दाजी,हे राखी म्हणून जाडसा धागा आणायचे आपल्या साठी,त्यालाच पोवत म्हणत...पूढे या पोवत्याच स्वरूप बदल गेल,आणि राखी तयार झाली.आणि आयेने किंवा इतरांनी आम्हाला रक्षाबंधनाच्या मागचा नेमका हेतू काय हे कधीच आम्हाला कोणी समजवलही नाही. त्यामुळे मी पण आयेला राखी आणायला सांगायची... मी आयेला आदल्या दिवशी बोलायची..

“आये माका पोवता घेवून ये हा”

“गो तूका कित्याक व्हया पोवता”

“अगे संगळे बांधतत मगे माका नको. मीया काय हात असोच रिकामो ठेव”

“पोवता भाव बांधतत भयनी नाय”

“तू माका हाड म्हणजे हाड”

“अगो खुळावलय काय! हातात काकणा घाल ती कदी घाल्लनस नाय”

“अगे काकणाचा नाय बोलन्नय गे ती आसत”

“तीच सांगतय घाल ती उद्या”

“माका काकण नको सांगलय मा तुका पोवता व्हया”

आये कुठे गेली आणि छान रबरी बागंड्या दिसल्या की मला घेवून येई,परंतू मला हातात रोज बांगड्या घालायला आवडत नसत.की डोक्यात फुले ही,माळायला आवडत नव्हती.त्या मुळे आयेन आणलेल्या

बांगड्या तशाच पडून असायच्या. म्हणून ती मला आता बोलत होती..

“अगो चेडवाची जात तूजी तूका पोवता बांदाची गरज नाय”

“असा कोणी सांगल्यान गे”

“मीया सांगतय ता आयक पुडे पूडे बोला नको”

“मीया पूडे बोलनय नाय पन तीया पोवता घेवन ये गे”

“तीया आता हयसून भायरा होशीत”

“आदी तीया पोवता माका घेवन येतलय काय ता सांग”

“थांब तीया तसा आयकाचय नाय वाडवनीच्या (केरसूनी़) मुगड्यान झोडतय(मारणे़) बग”

“जातय जातय पन माका सांग!! बाबान,भाईन,अन्नान,पण आणल्यान पोवता त्यांका कोणी गे पैसे दिले”

“तू आता हयसून ब-या बोलान जातय काय नाय”

“जातय जातय पण सांगान ठेवयतय माका पोवता व्हया म्हनजे व्हया समाजाला”

एवढ बेलून मी थांबत नसे.. बाहेर पळ काढी.पण आये नाही म्हणाली तरी दुस-या दिवशी बाजारातून आली एक चपटी पुडी अंगावर भिरकावत म्हणे...

“घे मार शिरा हातार”


मी पहिली पुढी उघडून पाहीली की रंगीत राखी नजरेस पडे त्याखाली सिल्वर पेपर कातरून मस्त राखी तयार केलेली असे...मी ती आयेकडूनच बांधून घेई..आये मोठ्या हौसेन माझ्या हातावर बांधी...असे आयेने माझे सर्व लाड तर पुरविले पण ज्या हातानी मला राखी बांधली त्या हाताची मी मात्र ऋणीच राहीली...खर तर राखी ही पवित्र मंगलेतेच प्रतीक मानल जाते. ती बहीन भावाला बांधून माझ्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे हे खर तर सूचवत असते...पण आम्हाला अर्थच कळायला वेळ लागला...पण ज्या आयेने राखी बांधली तीच मात्र मी रक्षण करायला हव तेवड केल नाही.तीला माझी खरच गरज होती.त्यावेळी मी मात्र संसारात गुतंलेली...एक सासरवाशीन कीती हतबल असते,ते तेव्हा कळल.खर तर लग्न झाल की आपणास वाटते,चला सुटलो आईबाबांच्या तावडीतून.पण ते खर नसते.आपण खर तर आई वडीलांच्या घरीच मुक्त असतो.ते आपल्याला जपत असताना जरा कूठे कडक पना दाखवतात,आणि आपनास वाटते.आमच्यावर सक्ती केली जाते...पन ती भल्यासाठी असते.तेव्हा ते उमजत नसत.जेव्हा उमजते तेव्हा सासरच्या बंधनात अडकलेलो असतो.. ते ज्या साच्यात ढालत असतात. त्याच आकारात वावरत असतो... व ते सांगतील तसीच वागत असतो..म्हणून कदाचीत लग्नाच दुसर नाव विवाह बंधन असाव..नतंर हेच बंधन जेव्हा तेव्हा आड येत असत...आये मला राखी बांधायची तेव्हाचा तो पोर खेळ होता परंतू आज माझ्या मनात कधी तरी येते.माझ्या साठी भाऊ,वडील तर कधी बहीनीची भुमिका घेनारी माझी आयेच होती......


पहिली नारळी पोर्णिमा,व रक्षा बंधन हे सण एकत्र येत असल्याने.आमच्या सावंतवाडीच्या मोती तलावात नारळ टाकण्याची प्रथा आहे...आम्ही दुपारी 4च्या सुमारास तलावजवळ पोचायचे आणि सुरक्षित जागा पाहून नारळ तलावात कधी टाकायला सूरवात करतात याची वाट पाहत बसू. सावंतवाडीत असलेला भोसले सावंताच्या राजवड्यातून पहीला नारळ तलावाला अर्पन करीत. विषेश म्हनजे हा नारळ सोन्याचा असे...तो आपल्याला मिळावा म्हणून पट्टीचे पोहणारे आधीच तलावात उतरलेले असायचे...बरोबर 5 वाजले की सर्वांच्या नजरा तलावाच्या समोर असलेल्या राजवाड्याच्या प्रवेश द्वारावर लागलेल्या असायच्या....प्रतिक्षेची घडी संपता संपत नसल्याने आम्ही माना वर करूण करूण,राजवाड्या जवळ पाहत असू..परंतू उत्सूकता मात्र शिगेला पोहचलेली असायची.अचानक उत्सूकता संपल्याची बातमी पहीली कानात वाजायची...कुणी तरी गर्दीतला अती उत्सूक असलेला,आणि राजवड्यावर जासूशी नजर ठेवून असनारा ओरडे.

“राज्याचो नारळ येता”

त्या सरशी आमच्या वखवखलेल्या नजरा त्यादिशेने वळायच्या..एक रथ असायचा त्यावर दोन तीन मानस स्वार असायची मधल्या व्याक्तीवर रंगीत छत्री धरलेली असायची...आणि रथाच्या दोन्ही बाजूनी बराच लवा जमा चालत यायचा... आणि संगती ढोल ताशाचा गजर... त्यात आम्ही राजाची मानस म्हनून माना गर्वान ताठरलेल्या. तर आपण राजा च्या लवाजम्यात सामील आहोत म्हणून काही हौशे नवशेही उगाच फुशारक्या मारत... तलावजवळ येताच आम्हाला काोण राजा कोण प्रधान यातल काही दिसायचे नाही. फक्त दिसे रंगित छत्री...मी मात्र राजाला पाहायचे कष्ठ न घेता ती छत्रीच

पाहायची...तीचे रंग मला आकर्षूण घेत....ही छत्री पून्हा माघारी फिरली की मला समजायच नारळ तलावाला अर्पण करूण राजा निघाला... मग मला प्रश्न पडे हा राजा आहे. तर गळ्यात मोत्याच्या माळा नाहीत...डोक्यावर मुकूट नाही..खर तर हा प्रश्न मला पूर्वीच्या राजांची चित्रे पाहून पडे.तर कधी जत्रेत नाटक असल की राजा आम्ही पाहायचो..पण त्या राजात आणि या राजात जमिन आस्मानचा फरक दिसे.... नाटक कंपणीचा राजा भरजरी पोषाखात येई.मग याच्या अंगावर भरजरी कपडे नाहीत.कमरेला तलवार नाही.की अंगावर भरजरी शाल नाही.. पण कोणाला विचारायचे तर भीती! म्हणून हा प्रश्न अनुत्तरीत राहीला. पण काही दिवसापूरता....नंतर मात्र कळायला लागला आता राजे महाराजांचा काळ उरलेला नाही. असो, बरेच नारळ पटपट तलावात पडत. तेवडे नारळ जलतरू वाले काडत पण० ते काडलेले नारळ काय करतात हे कळायच नाही....मग आमचा लवा जमा राजा सारखा आमच्या शेणा मातीच्या घरी मोठ्या दिमाखाने परते....


"कोकणातल्या कोकणात मायेची ऊब!

दिल नाही घेतल नाही तरी वावरतय सूख!

तू पना मी पनाच नसत कधी कौतुक!

वाटेतल माणूस देखील वाटतो देव दूत!


''ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कृष्ण जन्माष्टमीची चाहुल लागायची. हा सणआमच्या घरात मोठ्या उत्साहाने साजरा करत. याचं कारण म्हणजे आमची भावकी दहा घरा पैकी फक्त आमच्या व अन्य एकाच्या घरी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जायची. त्या कारणाने बरीच पाहुणे मंडळी आमच्या घरी संध्याकाळी कृष्ण जन्माष्टमी ला येत. चहा पाण्यापासून सर्वाची उठबस करावी लागे.त्यामुळे आम्हाला सकाळपासूनच कामाला लावले जाई. प्रथम घराची स्वच्छता शेण लिपंन करूण केल जाईल. जमीन शेणाने सारवली जाई. त्यासाठी आम्ही विहिरीवरून पाणी आणून दिल की, संध्याकाळच्या पूजेला हवी असलेली फुले मी आणि राजा जमा करून आणू. त्याच बरोबर अनेक तुळशीची पाने तोडून तोडून आणावी लागत. सर्वात महत्वाचे म्हणजे या उपासाला शेवग्याच्या पानांची भाजी लागे, ही भाजी शेवग्याच्या झाडावर चढून भाई काढून देई, सर्वात कंठाळवाणे काम म्हणजे ही भाजी साफ करायच मोठ काम वाटायच,भाजी भाईने काढून दिल्यावर आम्ही बांबूपासून बनवलेल्या चटईवर भाजी टाकत असू. या चटईला आमच्या गावात डाळी म्हणतात. या डाळीवर टाकलेली भाजी आम्ही भोवताली सर्व मुलं बसून साफ करू परंतु भाजी साफ करणे हे कंटाळवाणं काम असल्याने आमच्यात बरेच वाद व्हायचे, आणि दिवसभरात कोणी कोणी किती कामं केली याची यादी तयार होत असे, आणि ज्याने जास्त काम केली तो भाजी सोडून बाहेर जायचा. या साठी आधी आम्ही कामांची लीस्ट वाचून दाखवू, थोडी फार चीटींग करून त्यात न केलेल्या काम ही सामील करून घेवू,या लीस्ट मधे, कोंबडी घरात आली. तीला हाकवल, चहाचा रिकामी कप घरात ठेवला. अशी शुल्लक काम भरीस भर म्हणून टाकू.. आमच्या लिस्टमधे कामाचा हिशोबात अन्नाची बेरीज जास्त होवून हातोहात भाजी सोडून घरा बाहेर पडायचा. सर्वसाधारणपणे आमची लीस्ट काहीशी अशी असे...

“राजग्या चल भाजी सुटी करू या”

“गो मीया नाय मीया खुप कामा केलय”

“हा हा इलो मोठो कामा करनारो,ये तीया माझ्याच वंगडा

होतास,तेवा तू काय काम केलय ता माहेती आसा”

“या अन्नाक इच्यार,ये अन्नी मगासी मीया खळ्यातला गलास घरात व्हरान थेयल ता तू

बगलय मा”

“माका मदी घेव नको तूमी तूमचा बगा,माजी कामा मीया केलय”

“मगे आता सगळ्यानी कामा केल्यात मा तशी भाजी सुटी करा”

"मधीच भाई बोलून पूढे निघून जाई...


मग राहता राहिली मी आणि राजा, भाजीची पाने वेगळी करताना मजा वाटेनाशी झाली की आम्ही भाजीच्या बारीक असलेल्या काट्यांशी खेळत बसू...आणि तोवर खेळू जोवर आमच्या जवळ कूणा मोठ्या व्याक्तीची नजर पडत नाही, शेवटी कुणाचे ना कोणाचे तरी लक्षआमच्यावर गेले की, आम्हाला ओरडा मिळे,  अर्ध्यातली भाजी सूध्दा साफ हेत नसलेली पाहीली की, आमच्या हातातली भाजी मोठी माणसे हिसकावून घेत. आम्हाला बाहेर हाकलून लावत. हे काही वेगळे सांगायला नको. पण आम्ही मनातून खूप आनंदित होऊन मनातल्या मनातच बोलायचे सुटलो बाबा एकदाची !!असे म्हणत आम्ही पळ काडायचे, दिवसभर त्या दिवशी घरात ऊल्हास भरीत वातावरण असायच, संध्याकाळी पाचच्या सुमारास आमच्या घरात पाहुण्यांचे आगमण सोहळा चालू होई तो अगदी रात्री प्रर्यंन्त, पाहुण्यात जर का बाई माणूस असेल तर ते जेवणाला मदत करायला आत स्वयंपाक घरात जाई.पुरूष मंडळी बाहेर ओटल्यावर नाना,दाजी,ताता,यांच्याशी गप्पा मारत. छोटी छोटी मुले, मात्र आमच्या बरोबर खेळायला येत. मुल खेळायला आली की आम्हालाही अभिमान वाटायचा. याचं कारण म्हणजे एक तर कृष्ण जन्मा आमच्याच घरी साजरा व्हायचा. तो अन्यत्र कुठे व्हायचं नाही. म्हणून आम्ही जरा उगाच अकडू गिरी करायचो,ती मुले आमच्या मागे मागे असली म्हणजे आम्ही उगाच हे आण ते आण असं करत राहायचे,एरवी घरातली काम करताना आम्ही टंगळमंगळ करायचे या दिवशी मात्र मुद्दामून काम करायचो. त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांकडून आम्हाला शाबासकी किंवा कौतुकाचे दोन फुकटचे शब्द आमच्या झोळीत पडायचे. आणि त्यांच्या मुलासमोर आम्ही मोठे महान बनत असू.एरवी त्यांची मुले आम्हाला कधी रस्त्यात दिसली,की आम्हाला विचारत नसत त्यामुळे यांना आमच सामर्थ  दाखवायचा चांन्स आम्ही या दिवशी मात्र सोडत नसायचे.. संध्याकाळी भटजी आमच्या घरी कृष्णजन्माष्टमी ची पूजा सांगायला यायचे.ते पूजा करून गेले की आमच्या घरी असलेल्या पाहुण्यांना पाने वाढू.. घरात खास जेवण म्हणजे काळया वाटण्याची उसळ,शेवग्याच्या पानांची भाजी,आंबोळ्या, व गोड पदार्थ म्हणजे गव्हाची लापशी, सर्वांची जेवणं होईपर्यंत रात्रीचे अकरा साडेअकरा होत. त्यानंतर भजन मंडळी घरातली असल्याकारणाने सर्वजण भजन करत बसायचे.यात दोन चार बाहेरची मंडळी असायची.तशी ती कधी नाही आली तरी आम्हाला फारसा फरक पडत नसे.तबला,पेटी, झांज,नाळ, ही सर्व वाद्य कायमस्वरूपी आमच्याच घरी असल्याने, आम्हीही ती केव्हाही काढून वाजवत असू.सूर ताल मात्र जमायचे नाही एवढच त्याच्यासाठी आम्हाला कोणताही सण लागत नसे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी,रात्रभर भजन चाले.ते चारच्या सुमारास आटोपले की मोठी आई सर्वाना बुंदीचे लाडू दई या लाडवांना आम्ही खडखडे लाडू असे म्हणू पहाटे चारच्या नंतर घर रिकामी झाले की आम्ही मिळेल तिथे झोपत असू ते खूप उशिरा दुपारी आंघोळ करूनच जेवायला बसायचे. नंतर चार वाजता कृष्णाचे विसर्जन करायचे. आम्ही जवळच असलेल्या  विहीरी वर कृष्णाचे विसर्जन म्हणजे त्याला दोन चार पाण्याचे शिंतोडे टाकू, पून्हा कृष्णाला आम्ही घरी आणू.

आमच्या आम्ही चालू केलेली ही प्रथा आजही भावांच्या मुलांनी तशीच चालू ठेवलेली आहे आताही कृष्णाला विसर्जनासाठी नेतात पुन्हा घरी आणून ठेवतात. त्यावेळी आम्ही हे करत असले सण मनात अजुनी तसेच आहेत. आता या सणाला पहिल्यासारखी मजा येत नाही.कृष्णजन्म विसर्जन झाल्यानंतर आम्ही वाडीत दहीहंडी बघायला जायचो. दोन किंवा तीन थरांची ही दहीहंडी पाहताना आम्हाला खूप मजा येई.ही दहीहंडी फुटल्या वर आम्ही घरी येऊ. मात्र आजच्या चालू वर्तमान काळात दहीहंडी चे हिसक रूप पाहता मनाला खूप यातना होतात. आजचे मानवी देहाचे नऊ लावलेले थर पाहिल्यावर मन विचलित होऊन आता काय होईल ?नंतर काय होईल?अशी अनामीक भीती असते. खरंतर पहिल्याची दहीहंडी होती.तीच मुळात गोकूळी कृष्णाने मित्राबरोबर खेळ म्हनून खेळलेली, पण आज तीला जे स्वार्थ साधूचे रूप मिळाले, ते पाहून त्यावेळी त्या देवकी सूताने त्याची कल्पनाही  केली नसावी.आज आपल्या महाराष्ट्रातील बरीच मोठी मंडळी आपल्या स्वत:हाच्या प्रसीध्दी साठी कोणत्याही थराला जावू शकतात.याच जिवंत उदाहरण म्हनजे ही दही हंडी, मोठ्यामोठ्या हंड्या,तेवडीच मोठी बक्षिसे,आकाशाला गवसणी घालणारे हंड्या बांधून आपला स्वार्थ साधू पाहनारी मंडळीना या जागी आपल कूणी असत तर ??असा साधा प्रश्न पडू नये,हे नवलच, बक्षिसाच्या लोभापायी अनेक मंडळ दहीहंडीत मोठ्या प्रमाणावर भाग घेत आहेत. दहीहंडीला मानवी थरातला मुलगा कोणाच्यातरी घरातलाच एकच असू शकतो. किंवा किंवा हा थर लावताना एखाद्या मुलग्याला दुखापत झाली तर तो कायमचा अधू होऊन आई-बापावर एकतर बोज बनतो किंवा तो या संसारातून उठून ही जातो.आई बापाने अनेक कष्ट काढून वाढवलेली ही मुले कुणाचेही घरात न ऐकता दहीहंडी सामील होतात. दर वर्षी या ह्या दहीहंड्या मोठ्या प्रमाणात बांधल्याही जातात. आणि तितक्याच प्रमाणात एखाद्या मुलाचा मृत्यू किंवा अपंगत्व ठरलेलेच असतं.याला जबाबदार कोण ?दहीहंडी पथक,?आपल अस्थीत्व स्थापीत करू पाहानारी लालची मोठी मंडळी?की मुलांचे पालक??की सरकार??? याचे उत्तर कोणत्याही नेत्या पाशी नसणार. किंवा त्यात भाग घेणारे मंडळाकडे नसणार.हे नक्कीच प्रगतीसाठी सण साजरे केले जातात.आपले संस्कार जपण्यासाठी, पंरपरेचा मान राखण्या साठी...परंतू प्रगतीसाठी संस्कारात एखाद्याचा बळी जाऊ नये हे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातल्या नेतेमंडळी चा यावर कसला विरोधही नसतो.आणि त्यांचे लक्षही नसते.दहीहडींत हे स्व:ताहाच्या प्रगतीसाठी दही किती मोठी बांधायची याची चडाओढ चालू असते... 


"दसरा सणाला एवढ काही सांगण्या सारख काही घरी होत नसे...परंतू दिवाळी म्हटली, की आमच्या घरात तीकसं काही व्हायचं नाही.फक्त पहिल्या आंघोळीला चार वाजता उठून मस्त ऊठणे आणि लहानशी हमाम साबणाची वडी घरी आणत. ती इतकी लहान असायची की अंघोळ करताना ही वडी हातातून दहा वेळा तरी निसटत असे.. पण त्याचं कधी वाईट मात्र वाटत नसे, उलट मनाला स्वर्गसुखाची अनुभती होई.एरवी आम्ही कायमस्वरूपी 501 बार नावाच साबण यायचा तो साबण आम्ही कपड्याला ही अंगालाही असं टू-इन-वन मध्ये वापरत असू,डोक धुवायचे म्हटले,तरआये बाजारातून सोडा खार आणायची.हा सोडा खार पाण्यात टाकून आमची डोकी धुतली जायची. घरातली अंथरूण-पांघरूण या सोडा खार मधे धुतली जायची. समजा घरात साबण सोडा यापैकी काही उपलब्ध नसल्यास आम्हाला फारसा प्रॉब्लेम कधी येत नसे, आमच्या घरच्या परसदारी रिंग्याचे झाड होत, आम्ही ती ठेचून आंघोळीला कपड्याला वापरायचे.घरातली भांडी कधी साबणाने घासल्याचे मला तरी आठवत नाही. चुलीतल्या राखेने भांडी कशी स्वच्छ आणि लखलखीत दिसायची. आमच्याजवळ ही वस्तू नाही कसं करायचं या विचारआमच्या मनाला कधी शिवला देखील नाही.कधी हात पाय गाळून ही राहिलो नाही.जे मिळेल त्यात समाधानी आयुष्य आम्ही सातवी भावंडे जगत असू,आलेल्या परिस्थितीत मार्ग कसा काढायचा ही शिकवण घ्यायला आम्ही कुठला ना क्लास लावला,ना कोणी आम्हाला शिकवलं,परिस्थिती आम्हाला घडवत होती.आणि आम्ही घडतही होतो.पण कोणासमोर वाकत नव्हतो,कधी आई-वडीलांनी कधी कुणाकडून काही उसनंवार मागायला सांगितलं तर आम्ही जात नसू.आमच्या घरी कोणताही मोठा पाहुणा आला तरी आम्ही भावंडांनीं कधीच पुढे पुढे केलं नाही.दिवाळीला बाकी काही नसल तरी, बाबा,भाई, मस्त आकाश कंदील बनवत,या कंदीला साठी लागनारा पेपर बाजारातून खरेदी करून आणत.घराच्या बाजूलाच असलेल्या बांबुचा एक बांबू तोडून भाई व बाबा, त्याच्या पातळ लवचीक काट्या काढून आकाशकंदीलचा सांगाडा बनवायचे,सांगाडा बनवला की, मस्त रंगीत कागदाची कटींग करीत तो कागज चिकटविण्यासाठी आम्हाला गम लागायचा. तो भाई घरात असेल त्या पिठापासून तयार करत असे.आणि घरात कधी पिठ नसलं,तर शेवग्याच्या झाडाला कोयता मारल्यावर जो डिंक मिळे,त्याचा वापर आम्ही गम म्हनून करत असू,आमचा हा आकाशकंदील दिवाळीच्या आधी दोन दिवस तयार व्हायचा.भाई बाबा,यांच्या हातामध्ये एक प्रकारे आर्ट ची कला सुबक होती. कंदील इतका छान दिसायचं बाजारातून नवीन विकत आल्यासारखा हुबेहूब वाटायचा...तयार झालेला कंदिल कुठे लावायचा, हे आधीच भाईच ठरलेल असायच. भांईने ठरवलेली जागा ही एखाद्या मोठ्या झाडावर उंच असे,आकाश कंदील आमच्या घरापासून जवळ जवळ वीस वीस ते पंचवीस फूट उंचावरून लटकवला जायचा.

ही त्यावेळी गंमत वाटायची, नवल तर त्याहून असायच, की आपले भाऊ एवढ्या उंचावर कंदिल लावतात. तो उंचावरचा कंदिल लांबून पहिला तरी तो कुणालाही सहज दिसावा हा त्याचा मागचं निव्वळ हेतू असावा.अशी भाई बाबांची व्यवस्था चोख असे, कारखान्यातून विड्या वळायला घरी येत त्याना बांधण्यासाठी धाग्याने भरलेली रिळ येत,ही खाली झालेल रीळ भाई बांबूच्या एका टोकाला बांधून त्यात पातळशी रस्सी टाकायचा तिच एक टोक आकाश कंदिला बांधे व एक टोक रिळातून खाली सोडी. काठीला व्यवस्थित आंब्याच्या झाडावर चडून ही काठी व्यवस्थीत बांधली जाई..... अर्थात त्यातून एक दोरी खाली सोडलेली असायची संध्याकाळी पणती पेटवून,ती कंदील मध्ये ठेवली जायची.रीळातून जी दोरी सोडलेली असे ती दोरी हळूहळू खेचायला सूरवात केली की आकाश कंदिल कसा वरवर जायचा.ते मनोहर दृश्य पाहून आम्ही उड्या मारून टाळ्या वाजत असू त्या टाळ्यांच्या गजरात कंदिल आपल्या योग्य ठीकानी जाई.. अशाप्रकारे भाई आणि बाबा कंदील आकाशात अधांतरी लटकत ठेवायचे.कंदील वर जायला लागला खुश व्हायचं आणि मनात एक कल्पना यायची देवाचे विमान आमच्या घरावर येऊन थांबले की काय??? एकदा न राहून आयेला मी हाका मारत बाहेर बोलवल...

“गे आये पयली वायच भायर ये गे,”

 

आमच्या आनंदात आये सामील होई परंतू दाखवत नसे,ती माझ्या हाकेसरशी बाहेर येई..

“काय गो कित्याक बोलयतय”

“काय नाय गे ह्यो कंदील बग”

“बगलय गो दुसरा काय ता सांग”

अस एकीकडे म्हनत आये पन मन लावून कंदिल पाहायची, पण वरवर तस न दाखवता ती म्हनत असे..

“सिरा तूज्या तोंडांर पडला ता! माका कंदील बगूक बोलवलय!!माका काय काम नाय काय गो? तुज्या बरोबर नाचाक मीया रिक्याम टेकडा नाय”

“आसाने गे! तीया बगलयमा कंदील??वाटता मा

तूका देवावाचा इमान (विमान) आमच्या घराकडे येवन थांबला!!”

एकीकडे आये आपल हसू आवरत रागाने म्हणे... 

“ होय तर! तो महादेव भेटाक इलो तुमका !त्याका आणखी दुसरा काय काम नाय मगो”


आयच अनपेक्षित उत्तर माहीत असल्याने मला काही वाटायचे नाही.पण कंदील छान दिसतो ना!! तेच महत्त्वाचे! आज काल कंदिल कुणी बनवताना दिसत नाही...विकत कदिंल,विकत फराळ,जमल तर रांगोळीचे तयार साचे मिळतात,तेही बाजारूतून विकत आणतात. सर्व काही पैश्यात

मिळायला लागल्यावर,त्यातली गम्मंत नाहीशी होत चाललेली.त्यावेळी घरधरणीन,फराळ ती रात्र रात्र जागून करायची..आणि आग्रहाने खायला घालताना विचारायची कसा झालाय?घरातील मानसांची तीला दाद मिळाली की तीच ते मोठ बक्षिस असायच!! आता काही अवधीत सर्व काही मिळते... परंतू सणाची हौस मौज त्या रेडीमेंन्ड वस्तूत मिळत नाही. दिवाळीला फराळाने भरलेले डबे असतात..परंतू आता मुलांना ते खावू वाटत नाही...परंतू चायनीज म्हनून बाजारात आलेल्या कुसक्या नासक्या पदार्थाची वा!वाह!होताना दिसली की लहानपणीचा तो पोह्याचा चिवडा पाहताच तोंडाला सुटलेल पाणी,चकलीचा तळताना तो सुगंध नाकाणे पून्हा घेत घेत माजघरात पोचायचे,,आय़ेचा लक्ष नसताना एक चकली घेवून पळ काडायची मजाच काही और होती.. आता हे फक्त काही घरापुर्त मर्यादीत राहीलय!!


सण साजरे होत नाही अस नाही. ते होतात परंतू मानस बदलत चालली आहे.आपले संस्कार आपल्या मातीतली ती गोडी संपली... असं क्षणभर वाटत.. त्यावेळी आमच्या गावी विजेवर चालनारे दिवे नव्हते. पण रॉकेल घातलेली चिमणी घरातला काळोख दूर करायची. रात्रीचे घरात टिमटिम करणारे दिवे पाहिले की की मनाला आनंद होत असे. आज जो काही बदल घडतोय, तो काळानुसार बरोबर आहे. परंतू काळ बदलत असला तरी संस्कृती बदली होता कमा नये...नको असलेली आणि त्यावेळी काही घातलेली खुळचट बंधन जुगारली तरी चागलच. परंतू सणावारांची महतीही हरवता उपयोगी नाही... आमच्या लहानपणी जे मिळायचे त्यात खुशी ती असायची. आम्हाला पाहून समोरचा ही आमच्या खुषीत खुष व्हायचा. दाजी दिवाळी पहाटे आंघोळ आटोपल्यावर सातीवन या झाडाची साल काढून आणायचा. पण त्या झाडाच्या मुळाशी पहीले 5 ते 10 पैसे ठेवायचा...तेव्हा प्रश्न पडायचा याझाडाला कुठे जाता येत नाही. मग हे झाड पैशाच काय करनार? प्रश्न साधा होता.पण त्या मागच गमक नंतर उलघडल...


म्हनजे कूणाकडून कोणतीही वस्तू फुकट घ्यायची नाही...हे दाजीन तेव्हा तोंडाने न सांगता कृतीतून आम्हाला शिकवण दिली....आम्ही अस बरच काही घरातून शिकत गेलो... सातीवन झाडांची आणलेली सालीचा रस काडून तो आम्हा सातही भावंडांना प्यायला द्यायचा. तो आम्हाला नको असला तरीही तो बळजबरीने प्यायला लागायचा.कारण घरात अशी शिकवण होती. या दिवशी या झाडाचा रस प्यायला पाहिजे. आम्ही हसत हसत प्यायचे..हा काडा आम्हाला यासाठी दीला जायायचा की पोहे पचनाला जड असतात.आणि मुलांना ते बाधू नये,म्हणून ते खायच्या आधीची ही संजवणी बुटी असायची.. रसाच्या सेवना नंतर अर्ध्या तासाने उकडलेली रताळी, काळ्या वटाण्याची उसळ,गोड आणि तिखट पोहे,असा फराळ दिवाळीला पानात वाढून मिळे. त्याआधी हा फराळ देवाला नैवेद्य म्हणून दाखवला जाई. मग आमची पंगत बसून आम्ही पोटभर पोहे खाऊन झाल्यावर घरात सर्व रिकामी व्हायचे मग बायका मात्र घरातली छोटी मोठी काम करायची. या वेळी सुगीचे दिवस चालू होत. पावसाळ्यात केलेले पेरणीचे भात यावेळेस कापण्या योग्य व्हायचे. आणि आमची सहामाही परीक्षा याच वेळी असे.अशा परिस्थितीत आम्ही होईल ती मदत घरच्यांना करत असू.जेमतेम सहा ते सात दिवस परीक्षा असायची.. नंतर चार दिवस आम्हाला दिवाळीची सुट्टी असायची.यावेळी आम्ही शेतात जाऊन भात कापणीला मदत करू.ते घरी आणायला ही मदत करत असू, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या पुरातन असलेल्या देवालयातील सातेरी आणि कलेश्वर या देवांची जत्रा ही याच वेळेत यायची. हा जत्रोत्सव चालू झाला जत्रेसाठी पैसे हवे असायचे.घरातून आम्हाला जास्तीत जास्त चाराने किंवा आठ आणे, जास्तीत जास्त एक रुपया मिळायचा. ते आम्हाला पुरत नसत.म्हणून मी आणि राजा आम्ही दोघ, आमच्यासाठी शेत कापणी झाल्यावर,रिकामी कोपर-यात, पडलेल्या व चुकून राहिलेल्या भाताच्या लोंब्या जमा करायचें हे भात जमा करण्यासाठी आम्ही भात कापणी करून झालेले अनेक वाफे तूडवत अधिकचे भात जमा करू व ते विकून प्रत्येकी चार ते पाच रुपये कमवायचे.आणि जत्रेत मनाप्रमाणे खर्च करत असायचे..ते दिवस आठवले की डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात.


बालपण कसंही असलं तरी ते छान असतं निरागस असतं पण मनात असलेल्या इच्छा-आकांक्षा आकाशाला गवसणी घालणाऱ्या असतात. अंगात उर्मीचे तरंग रंग आनंदाने एकत्र झाले की कोणत्याही गोष्टीची कमी वाटत नाही. आहे ते आणि स्व कष्टाचे धन कमी नसतेच मुळात... अवघड असतं ते फक्त मनावर विजय मिळवणं, त्याला प्रलोभापासून दूर ठेवायचं.. मग ती प्रलोभने कतीही आकर्षित करो, आम्ही तिकडे दुर्लक्ष करत असू. मानवी

नात्यांच्या प्रेमात मात्र पडायचं हा स्वार्थ मात्र साधला. जर का जगात वास्तव्य करताना मानसांकडे दुर्लक्ष कधी करायचं नाही. याच मातीतली मानसं आपलीशी करायला फक्त गोड वाणी हवी असते...

(क्रमशः)


Rate this content
Log in