Ranjana Bagwe

Inspirational

4  

Ranjana Bagwe

Inspirational

सानूल पण सोनूल बालपणभाग 5वा

सानूल पण सोनूल बालपणभाग 5वा

14 mins
298


कोकणचा महीमा अपंरपार आहे..ते कोकणात वावरल्या शिवाय कळत नाही.लाल ताबंड्यात मातीत मिसळल्या शिवाय कोकण कुणाला समजतही नाही.. गोडी गुलाबीत वावरणारा कोकणवासी ही कोकणची शान ..


कुणालाही आपलस करनारा कोकणवासी म्हणजे कोकणची आण...

 स्वअभिमानान जगणारा कोकण वासी म्हणजे मराठी बाणा...

जुलै-ऑगस्ट या महिन्यात पावसाळ्याचा हंगामी का काळ ,कोकणात आमच्या या वेळी भात शेती करतात. यावेळी छोटी मुलं आणि वयस्कर माणसेच फक्त घरी असतात. बाकी सर्व शेती करण्यासाठी बाहेर पडतात. ज्यांची शेती घरापासून लांब असते, ते सकाळी शिदोरी बरोबर घेऊन जात असत. आणि संध्याकाळी एकदमच घरी येत. आमची भात शेती जास्त नव्हती,परंतू घरापासून फार दूरही नव्हती.. दुपारी सर्व जण घरी जेवायला येत .माझे वडील नाना (भाऊ भाई )हे दोघे शेतीची कामे करत .बाकी कोण लक्ष घालत नसत. आणि लावणीच्या वेळी माई ,आई ,ही मदत करायला जात.आये मात्र गरज लागली तरच घरातल्या शेतीत जाई.अन्यथा ती आपली मोलमजूरी करी...

कधीही काम असून आये जात नसे, अस कधीही झालेल नाही..आमच्या घरात शेतात न जानारी मानस, आते, दाजी, ताता,व आम्ही ,भाई सोडून सर्व भावंड घरीच असू..परंतू नागंरणी संपली की पेरणी सूरू करायच्या वेळी आमची शाळा सुटली,की शेतीवर जात असू..कारण पेरणी केल्या नंतर पिक लपविण्यासाठी,त्या वरूण गुठा फीरवला जाई हा गुठा बौलांच्या मानेवर जू ठेवून तो बांधला जाई म्हणजे एक लांबलचक फळीच असायची. तिच्या दोन्ही बाजूला बांबूच्या दोन काट्या लावलेले असायच्या काट्याच्या साह्याने बैलांच्या खांद्यावर जूला बांधायचे .औत हाकनारा जो कोण असेल तो एक पाय गुठ्यावर ठेवायचा . गुठ्याची जी मधली जागा असे,त्यावर आम्ही दोन पायावर बसायचे. अौत फीरल की आम्ही पण फीरत असू. ती मजा काही औरच असायची .परंतु जसजसे आमचे वय वाढायला लागले तसा आमच्या बुद्धीचाही विकास होऊ लागला . लहानपणी ती घेतलेली गुठ्याची मजा आम्हाला नंतर येईनाशी झाली. आम्हाला असं वाटायचं आधीच शेतीत फिरून फिरून थकलेल्या बैलावर आपल ओझे त्यांच्यावर लादणे मनाला पटत नव्हते .बोलता न येणारी ही मुखी जनावर दुखलं खुपलं तरी सांगू शकत नव्हती.आणि कदाचित त्यांना कधी दुखतही असेल तर त्यांना आराम देणे तर दूरच पण चौकशीही आम्ही करत नसतो .म्हणून पुढे पुढे मी गुठ्यावर बसण्याचे टाळले .आणि मला मुक्या जनावरांच्या प्रती आपूलकी माया वाटू लागली...तशी मी त्याच्या अधिक जवळ जावून त्याना आजरून गोजंरून गवत ,पाणी देवू लागली....मुकी जनावरांना ही माया बरोबर कळते..

 माझ्या मनात प्राण्या बद्दल मोठी अस्था निर्माण झाली .आणि ती आजपर्यंत तशीच आहे . भटक्या कुत्र्याना हक्काने दोन-तीन बिस्कीटचे पुढे घेऊन खाऊ घालते. या भटक्या कुत्र्या पैकी एक एक कुत्री मला बरोबर ओळखते .मी कुठेही दिसली तरी ती माझ्या पायात अडखळत राहते .मला घरातून बाहेर जाताना पाहिल्यावर ती नेमकी माझ्या येण्याच्या वाटेवर थांबलेली दिसते . मुक्या जनावरांचे हे प्रेम पाहीले की वाटते.  फक्त यांना बोलता येत नाही एवढच..बाकी ही आपल्या उपकार कर्त्याला कधीच विसरत नाही. तशी ही कुत्री ,आमच्या घरी येऊन हजेरी लावते.. तिला मी मधुरा या नावाने हाक मारते.. मी मधुरा म्हणाली की बरोबर येते...अशी ही मुक्त जनावर कधीतरी मानसानाही मायेन बांधून घालत असतात. पाहुण्यांचा आदर करणे , मुक्या जनावरांच्या प्रती दया दाखवणे, हे दोन गुण मलाच नाही तर माझ्या माहेरच्या ही लोकांमध्ये आजही आढळतात .माझ्या माहेरी कुणीही येऊ दे त्याचा पाहुणाचार उत्तम प्रकारे निभवला जातो...आमचा हा वसा ,आमच्या वहीन्यानी उत्तम प्रकारे जपला.ते पाहून मन अगदी भारावून जाते.....

  श्रावणात मात्र फार मजा असायची , आपल्या हिंदू सणाची नांदी सूरू व्होवून ती अगदी गुढी पाडव्या पर्यंन्त चालते. कोकणात श्रवणात पहीला सण येतो नागपंचमी या सणाच्या आदल्या दिवशी बहीण भावासाठी ऊपवास करते.तो पूर्ण दिवसाचा ऊपवास नागपंचमीला नागदेवतेची पुजा करूण त्याचे पारणे फेडले जाते..

मी लहान असल्याने,व ऊपवास कसा करावा याच सम्यक ज्ञान नसल्याने म्हना, मी हा उपवास करण्यास सज्ज होवून सर्व घरांना सांगूण आले मी उपवास करणार...सरते शेवठी ही माझ्या मते गोड असलेली बातमी,आयेला सांगीतली, ती माझ्यावर ओरडत म्हणाली,,

"""सोबा तीया उपासाच्या भानगडीत पडा नको,ह्यो उपास खुप कडक धरूचो लागता,तुका तो जमाचो नाय,माका तुझे मुरवते राखाक येळ नाय आदीच सांगतय"""

""आये सारखच मला भाषण देनारी आमची पटेकर वहीनीने पण आयेचीच काँपी केली.तेव्हा मला नराहून तीला म्हणाली..

"""गे वैनी तीया आये सारखी बरी बोलतय,पन मीया उपास करतलय म्हनजे करतलय,समजला"""

"""कर बाबडा आमका काय तुका सांगाचा काम केला""

मी रागात येवून झणक्यात तीथून घरी येवून आयेला रागात येवून बोलली..

माका तू लाहे आणी दुद आनून देवक व्हया मीया उपास करूण प्याड (वारूळ)सुध्दा पूजून येतलय...

सकाळ झाली माझा उपवास चालू झाला वारूळ पूजून आली.चारघरात ऊपवासाची जाहीरातही केली.. हमी पत्र भरल,तेवड्या पुरती नाचली.संध्याकाळी पाच वाजता पोटाने गुपचूप पणे मला भूकेची सूचना दिली.आणि माझा चेहरा सुकून गेला..तरीही पोटाच्या सूचनेवर लक्ष न देता रात्री आठ पर्यन्त कसबस पोटात पडलेल्या भूकेच्या डोबांला थांबवल खर,परंतू क्षणा क्षणाला पोट भूकेची सुचना देत होत.तसी मी पाणी पित होती.सरत्या शेवठी पोटाचा पाणी पिवून नगारा झाला. तरी भूकेच्या सूचना माझ्या जीवाला स्वस्थ बसू देतील तर ना!

तेव्हा मला कळल भूक ,भूक असते,ती पाण्याने मिटत नसते.आणि जर का ती पाण्याने मिटली असती.तर गरीब कुणी नसत.व भुकेला कधी कुणी किम्मतही दिली नसती..भूक आहे म्हनून मानूस वनवन करतो.हे अगदी खर...

मी सारखी आत बाहेर करताना पाहून आयेने तेलातला शिरा करूण मला दीला.....

तो पाहून मी मनात आये बरोबर भांडली...

"""अगे शीरो कसलो दितय, हेनी माझा काय व्हताला जेवक घाल गे माका"""

मनातल हे गुपीत उघडपणे आयेला सांगून तीचा ओरडा कोण खाणार?? म्हनून मुकाटपणे शिरा खाल्यावाचून धडगत नव्हती..तरी एक आशा मनात घेवून मी आयेला विचारल..

"""गे उपसाक शिरो खातत .""

आये माझी हजारजबाबी होती. त्याप्रमाणे आये म्हनाली

""न्हान पेरानी खाल्यानी तर काय नाय"""

"""मोठ्यानी मातर खाता कमा नये""

आयेचा शब्द मला मात्र जादू वाटून मी तो शिरा एका दमात संपवला.एरवी मी कधी गोड नखाणारी पण त्या दिवशीच्या शि-यात काही तरी मँजीक होत.तो मला अम्रुताहून गोड लागला...कारण काय भुकेला कोंडा जरी मिळाला तरी तो गोडच.... आज कधी साजूक तुपात बनवलेला शिरा मला त्यावेळी आयेन तुपावाचून तेलात बनविलेल्या शि-याची बरोबरी करू शकत नाही.

 आमची आये जे काही घरात असेल त्यातच ती काही करून आमच्या पुढ्यात वाढायची तिच्या हाताची चव आमच्या तोंडात आजही रेंगाळते .तस जेवण आजही आम्हाला कोणाला बनवता येत नाही .असं वाटते आयेच्या हातात साक्षात अन्नपूर्णा होती. म्हणून तर ती काही करू देई तेआम्हाला गोडच लागे. आयेने केलेल्या जेवणाला कधी तुटवडा म्हणून पडायचं नाही. आम्ही पोटभर जेवूनही आये राजा,पुष्पा महादेव,बाबा,यानाही वाढी..टोपात आह् तोवर कुणी मागे आये वाढत राहायची..अस करताना तीचा चेहरा समाधाने झळकत असे....

आजकाल आम्ही बाजारातून वेगवेगळे मसाले वापरून सुद्धा आईच्या हातचं जेवणासारख जेवण बनत नाहीच..वरूण या बाजारी मसाल्या मुळे मालवणी जेवणाची लज्जत मात्र नाहीशी हेताना दिसते..आज काल जेवण कसही बनू दे,परंतू त्याला तेलाची करा व लाल रंग दिसला की आम्ही म्हणतो..

"""काय जेवाण मस्त केल्यान""

कोकणातली भाषा बदली नाही परंतू जेवणाची ती पद्दत मात्र बदलत चाललेली..आहे...असो

आईसारखे जेवण आज घरात बनत नाही. आम्ही जेवताना कुणी आले,तरी आये माझी पटकन समोरच्याला जेवण वाढी.

दुसऱ्याच्या भुकेची जाणीव असणाऱ्या आयेच्या मुलीने आज ऊपवास केल्यामुळे,तिलाही आतून माझ्या भुकेची जाणीव होत असावी .मी रात्री झोपताना ही ह्या कुशीवरून त्या कुशीवर सारखी तळमळत होती .आये माझी झोपलीच नव्हती .माझी जास्त तळमळ पाहून पहाटेच्या सुमारास मला गपचूप कानात म्हणाली ...

तुका भूकेन झोप येना नाय!  तुका पेज ठेवलय ,जा खा""

तू खाऊन घे मी उपवास धरला आहे .हे विसरुन पटकन उठून आईने ठेवलेली पेज पटापट प्याली.रिीकामी पोटाला जे सुचल नाही ,ते आता पोट भरल्यावर सुचायला लागल .आणि मी उपवास सोडल्याची जाणीव होवून पश्चताप हेवू लागताच.आणखी दुषणे कोणाला माझ्या चुकी मुळे देता न येवून ,स्वता:हाला दुषणे देत मी कधी झोपली समजल नाही.जेव्हा जाग आली तेव्हा घरची ऊठलेली होती..

 मी पाघरातून कानोसा घेतला आये नव्हती. कामावर सण असल्याने जाण्यातली नव्हती.. मग आये गेली कुठे मला चिंता..

 आणि आयेने मी उपवास सोडला ते सांगितल असेल ,आता मला सर्व हसनार राजा चिडवनार, काय करू बाहेर तर मी जावू शकत नव्हती .अन्याय केला तर नव्हता पण उपवास मोडला हेता..

एवढ्यात आयेचे शब्द कानावर आले 

"पाँर उठाक नाय आजून कालचो उपास लागलो वाटता"

तेवढ्यात पुष्पा आयेक म्हनाली...

"""व्हयगे ,व्हय,त्याका आदी चाय दी""

आयेन घरात येवून मला बोलली..

""उठ चाय खा मगे न्हा"

 मी मनात बोलते आयेन सांगितल काय सर्वांना की ही अशीच बोलतात.. मी बाहेर आले, मला कोण बोललेल नाही.म्हणजे आयेने काही सांगितल नाही..

बर वाटल मनाला..आपल्या मुलाची लाज राखली हे काम फक्त आईच मुलासाठी करू शकते...

दुपारी पुजा झाली.आम्ही जेवलो. नाग सोडून मी राजा आलो. काही वेळ आम्ही नाग सोडला तीथे खरा नाग येतो का?? म्हनून वाट पाहीली..मग कंठाळून घरी आलो..

सर्व सुस्तवली पन आये मात्र तरतरीत बाहेरच आमची वाट बघत..मला पाहताच आये कडाडली..

""गो फणी घेवन ये तुज्या केसार शिरा मारतय""

मी आज्ञाधारक आज तरी बनली कारण आषेन गुपीत राखलेल..

केस विंचरताना आयेची लाखोली...मला मारण्याच काम फणी करत होती..ती केसातून रक्तच काडत होती ..मी नराहून..

"""गे हळू उगय दुकतत केस""

"व्हय, मगे केसाची निगा राकाक व्हई समजला..डूकरासारख्या लोळतय""

 आयेची कका चालूच ही बारा खडी संपनार नाही हे जाणून राजा पळाला ,मग अंगणात आम्ही दोघ.हे पाहून आयेन विषय बदलेला ..जसा भूगेलाचा तास संपवून आयेन सामन्य ज्ञान विषय चालू केला..

""सोबा तुका आताच सांगतय परत जर केवा उपासाचा नाव काडलय, तर तगडे तोडून हातात दितलय ,समजला काय नाय, काय फोडून सांगा""

"""नको गे समजला कदीच नाय उपास करूचय""

 आयेने अजूनही कुणाला काहीच सांगितलं नव्हतं फक्त झालेली गोष्ट माझ्यात व आयेत मर्यादीत होती . त्यानंतर मी कधीही उपवास न करण्याचे मनाशी ठरवून टाकले ..पुढे मी कधी मोठी झाली तेव्हा उपास करायला लागली .मनात आणले असते तर घरात सर्वांना सांगून माझी आये मेकळी हेवून माझी फजिती केली असती .पण तिने माझ्या मनाचा विचार करुन कोणालाही काही सांगितलं नाही .हा विचार केला असावा किंवा आयेवर माझा असलेला विश्वासाला तडा जाऊ नये .म्हणून तिने कदाचित ही गोष्ट सर्वांपासून लपवली असेल .मी जशी अभ्यासात वगैरे हुशार होती. तशा माझ्या काही कमजोरी पण होत्या.. पण माझ्या आयेने कधी माझ्या कमजोरपणा चारचौघात उघडाकरून सांगितले नाही .चारचौघात मला लागेल असं बोलली नाही .अशी माझी आये जेव्हा मी कधी भावांच्या मुलांना लहानपणी बोलत असे. ही मला मुद्दाम येऊन म्हणायची....

"" कित्या बोलतय तेंका ईसरलय काय तुजे दिवस""

  मग मात्र माझी बोलती बंद होत असे .अशी माझी आये मला हमेशा हवीहवीशी वाटणारी, पण आई मुलांच्या ऋणात कधीच नसते. तर मुलं हीच आई बापाच्या ऋणात असतात .हे ऋण कधीही न फिटण्यासारखे असते .या आई, बाबा ,मुळे आम्ही या धरतीवर जन्म घेतला. हे विसरून चालणार नसत. त्यानी हे जग दाखवलं त्यांच्या ऋणातून कधीही मोकळं होता येत नाही .या जगात जर आपण कोणाचे कर्जदार असू.. तर ते फक्त आपल्या मातापित्यांचे असतो....हे कर्ज जन्माजन्मांतरी फिटत नसते...मग तो कुणी महा पूरूष असो..तो शेवठी कुणाच्या नाही पण माता पित्यांचा कर्जदार असतोच.....

पूर्व पुण्याईचा संचय झाला, की मानूस महाराष्ट्रात जन्म घेतो. त्यातही करूण तो जन्म केकणातला असेल तर सोन्याहून पिवळ.कोकणात दर्शन कराव ते निसर्गाच्या कुषीत आणि सागराच्या मिठीत वसलेल्या देवगड मधील कुणकेश्वराचे,सुबक मंदिर ,गाभा-यातली पिंडी क्षण भर मन मोहवून जात. मंदिराच्या मागच्या बाजूचा परीसर तीथली मोठमोठी झाडे,समोर निळाशार अथांग पसरलेला समुद्र त्याच्यात असलेली लहान मोठी शिवालये पाहून मनात येते, ते हा त्रिगुणत्मक स्वत:हाहू या सुष्टीच्या प्रेमात पडून वास्तव्यास आलेला असावा .जीथे देव सुष्टीच्या प्रेमात पडले, आपण तर माणूस.. मग मन सम्रमात पडते ते समुद्राला भर्ती आली तरी पाणी मंदिरात कधीच शिरत नाही.... हे नवल , आणि गर्वाने माना वर होतात.आपल्या भुमीत अशी नवलाई असल्याच पाहून त्या कुणकेश्वराला सांष्टाग दडंवत घालत त्याच्या चरणी मस्तक लिन होते.

शाळेतल्या दिवसात आम्ही न चुकता शाळेत जायचो.परंतु शाळा सुटल्यावर मात्र,इकडे तिकडे भटकत घरी मात्र सहीसलामत घरी येतअसू. उनाड गीरी खुप केल्या परंतू घरापर्यन्त कधी आमची कारस्थाने आली नाहीत..

 पाऊस वारा ऊन अशी मिश्रित निसर्गाची किमया पाहायला मिळते ती केवळ श्रावणात.....

कधी कधी इंद्रधणुष्य आकाशी अवतरला की आम्ही मोकळ्या धरतीवर उभे राहून रंगांची किमया पाहत बसायचो....

रंगात रंग पाहून वाटे देव,आकाशात मस्त चित्र काडतोय...

मग आपस मधे आमचे अंदाज बांधणे चालू असत.

"""राजग्या बघ मरे मळभात कायता""

""गो इंद्र धणुष्य तो""

"""माका ता माहेती आसा,पन मी सांगतय बग कसो काडलो तो"""

"""तर काय जाला !!देव कायव करूक शकता""

"""होय रे!देव कायव करीत .पण या मळभात ह्ये बाण काडताना तेचे रंग खालते पडले नाय कसे??

"""पडले तरी तूका दिसीचे नाय""

"""कसे ते""

"""गो मँडा पावस मदी च येवन जाता त्याच्यात कसे ते दिसतले"""

"""होय रे होय!!तूका बरा कळला 

अगो कोणय सांगाक शकता!!

""कसा ता!!!

""अगो काल शाळेसून घराक येताना पावस पडा होतो रस्त्यात तेवा नाय काय पाणयात रंग पेवा होते....ते देव धणुष्य रंगवताना पडलेले.."""""

"""हो रे खराच !मीया बघलय !पन माज्या मनात तसा काय येवक नाय कसा"""

 खर तर जे रंग आम्हाला रस्त्यावरच दिसायचे ,ते रस्त्यावरूण धावणा-या गाडीला इधंन,म्हणून पेट्रोल,किंवा डिजेल वापरतात,त्याचे काही अंश रस्त्यावर पडत,आणि पावसातल्या पाण्यावर ते तरंगत असायचे .त्यातून निळा ताबूंस रंग वर नजरेस पडत .ते साधारण आकाशातल्या इंद्रधणुष्यातल्या रंगा सारखे वाटायचे....आणि पावूस गेला .की आकाशात इंद्र धनुष्यही नसायचा,ना रस्त्यावरचे रंग ,मग आम्ही बांधलेल्या अंदाजाला दुजोरा मिळायचा....ही आमची मत असायची ,परंतू कधी कळत नसलेल्या प्रश्नांची उत्तरे मोठ्या जवळ मागायची सवय नव्हती. होईल ते आपणच आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून मनाच समाधान आपनच करून कस घ्यायच हे आम्ही च ठरवायचे.त्या मुळे की काय आम्ही आजही भावंड निर्णय घेताना मागे पूढे पाहत नाही.

श्रावणात आणखी एक मजा म्हणजे..देवांची पूजा आमच्या घरी ताता ,करीत असे...आमचे देव म्हणजे पाटेकराचे मंदिर लहानस होत...हे मंदिर म्हणजे पूर्ण गावासाठी नसून आमच्या साठीच होत...इथे आमचा ताता जावून पूजा करी...त्याला हवी असलेली फुले आम्ही सकाळी परडी घेवून जमा करू..... 

आणि फुल जमा करण्याच्या निमित्तान मात्र आम्ही पावसात भिजण्याचे काम जास्त करू.

मस्त पावसात भिजणे, आणि लाल तांबडी ,पिवळी, पांढरी,रंंगीत फूले गोळा करणे,त्यावरील जमा झालेले पावसाचे थेंब मला फार अल्हादायक करत...परडी फुलांनी अशी वरवर आली,की आम्ही घरी येवू..अंगणाच्या अगदी कडेला असलेल्या तुळशीला दोन फुले वाहील्या शिवाय परडी घरात नेत नसू...आमच ठरलेल असे,कूठे जाताना व कूठूनही आल्यावर तुळशी वृंदावनाला नमस्कार करू...अस करताना आम्ही आंघोळ केली काय ,नाही काय,आमच्या मनात किंतू पंतू येत नसे.अगदी नाँनवेज जरी खाल्ल तरी आम्ही,मनोभावे नमस्कार करत असू...त्या कारणाने मला आजही अस वाटते देव हा फक्त निरागस मनाचा म्हणजे शूध्द भक्तीचा भूकेलेला असतो..बाकी आंघोळ म्हणजे निव्वळ शरीराची सफाई होते.बाकी अतंर मनाची सफाई ही मनाच्या भोळेपणावर ,निरागसतेवर अवलंबून असते...त्यामुळे तनाच्या सफाई पेक्षा मनाची सफाई सर्वात महत्वाची वाटते...

 पावसाच्या पाण्याने भरलेले लहान लहान, डोह दिसले ,की मला आकर्षीत करीत,पुन्हा त्यात डुबकी मारायची इच्छा आवरत नसे... कसलीही काळजी न करता मी मनमुराद डुबक्या मारी...राजा पण सोबत असे.त्याच्या शिवाय मी कूठे जात नसे...आमच्या डुबक्या मारून झाल्या की, झाल्या की आम्ही भात शेतीच्या बांधावरुन फिरत राहायचे. आणि एखाद्या खेकडा आम्हाला दिसला की त्याच्या मागे मागे आम्ही जात असू ,तो खेकडा जोपर्यंत बिळात नाहीसा होत नाही ,तोपर्यंत आम्ही त्याच्या मागे लागलेले असायचे. आणि एकदा का खेकडा गायब झाला, मग आम्ही एकामेकाला आरोप लावू ...

"""" दोगातल्या एकान तरी ही कुर्ली धरूक व्हई व्हती नाय रे राजग्या"""

"""गो तीया माका सांगतय तर तीया धरूच्या होतय"""

"""तीया मँड आसय काय रे! मीया कदी धरलय तीया बगलय!!""

""मगे माका कित्याक बोलतय ! माका पन धरूक नाय येना""

आमची अशी भांडणाची जुगल बंदी चालू असताना ,जवळच भाई शेतीची कामे करत असायचा.आमची चँव चँव ऐकूण भाई आम्हाला उद्देशून म्हणायचा...

"""ये कीत्याक भांडताय काय जाला ,राजग्या काय जाला रे!!!"

""बग मरे भाई ह्या कसा भांडता ता!!!

"""मीया नाय रे भाई भांडनय"""

"""भाई ,ह्या खोटा बोलता"""

""नाय मी कीत्याक खोटा बोला मीया त्याक फक्त इच्यारल ती कुर्ली चला व्होती तर धरूक नाय कीत्याक"""

""पुरे करा मीया धरूण दितय येया हयसर""

 खेकडे पकडायचे काम आमचा भाई मोठ्या शिताफीने करी. मात्र मी व राजा कधी खेकडा पकडायच्या फंदात पडलेले नाही. खेकड्याची नांगी पाहून माझ्या चेहऱ्यावर आधीच बारा वाजलेले असायचे .राजाही तात्पुरता पुढे जायायचा,व परत मागे फिरायचा, जिवंत खेकडा कसा असला तरी आमच्या भाईच पकडत असे. भाई एवढा हुशार होता. एखादा विषारी साप, जरी आमच्या घराच्या आसपास दिसला तर तो त्याला मारल्याशिवाय सोडायचं नाही.परंतू बिन विषारी साप आमच्या घराकडे फिरताना दिसला तर त्याला काहीच करायचं नाही. आमच्या भाईला साप कोणता विषारी व बिन विषारी आणि सापाचे ज्ञान होते. एखाद्या विषारी साप असला आणि तो आपल्या सरळ मार्गाने जात असला तरी त्याला कधीच काही करायच नाही. असही भाईच मत असे..भाई दयावान होता . झाडावरून एखाद घरट पक्ष्याच पडल व त्यात पिल असली तर तो ,त्याना घरी उचलून आणून त्यांची सेवा करूण ती उडण्या जोगी झाली ,की त्यांना बाहेर नेऊन सोडत असे ,असा आमचा भाई माणुसकी व भूतदया खूपच जपणारा होता. आणि मुक्या जनावरांवर देखील तेवढाच प्रेम करायचा, मी लहान असताना भाईशी कधी जास्त बोलत नसे ,कारण आमच्या वयात 9 वर्षे पूर्ण गँप होता. मी लहान असल्याने माझ बोलन होत नसायच.पण मी जशी मोठी होत गेली ,तसी जास्तीत जास्त माझी आणि भाईची जवळीक वाढली.. मग मी भाईशी खूप बोलायला लागली ..भाई आमचा पहिल्यापासूनच काहीसा अबोल लाजवट होता .तो स्वतःहून कधी बाहेरच्या लोकांशी बोलत नसे. त्याला कूणी बोलत केल्यावर तो खुप बोले, आम्ही सर्व अंगणात बसलो, की भाई आमची खुप थट्टा करायचा, त्यात आम्ही काही बोललो की त्याच्यावर तो मोठा विनोद तयार करून सर्वांना हसवायची ताकद भाईत होती. हसून हसून आमच्या डोळ्यात पाणी यायच,पुढे कसली काम शेतीची करायला भाई बाहेर निघताना पहिला मला म्हणायचं.. 

"""सोबल्या काय करतय"""

"""काय नाय"""

"""येतय माज्या वंगडा"""

""""खडे""

अगो थय काल झाड पडला त्याची लाकडा तोडून आणूया"""

"""मीया नाय""

"""तीया काय करू नको फक्त ये गो जाला तरी ऊब्या रव"""

"""माका कंठाळे ईलो"""

"""तीया अासलय काय माका बरा वाटता,म्हनान बोलवतय""" 

मग मला त्याच मन मोडवत नसे.नंतर माझं लग्न झाल्यावर मी मुंबईवरून गावाला दोन-दोन महिने राहायला जायची .त्यावेळी देखील कुठल्याही कामाला भाई मला बरोबर घेऊन जात असे. कधी मी कपडे धुताना भाई आपले एक शर्ट आणून माझ्या कपड्यात टाकून मला बोले .....

 गो ह्या माजा एक शर्ट धु""""

""""मीया नाय धुवचय""

""तीया धुतय बरा गो म्हनान"":

""""तू कीतक्या माका चण्याच्या झाडार चडयलय तरी नाय धुवचय""""""

"""""बरा बाये आता धुव नको,उद्या धू "":""

''''''"'''''उद्याय नाय आनी आताय नाय"""""

मी अस लटक्या रागाने म्हणायची तरी देखील या भाईचे उत्तर ठरलेले असे ,

नको आज धूव,बादलेत ठेय,उद्या परत कपडे धुवक बसलय तेवा मातर इसरा नको""

"""मीया नाय बोलय मा""

 आज मी तुका आदी देवक नाय पन आज उद्याचा आजच दिलय तेवा तीया ती धुतलय माका माहीती आसा"""

आम्ही सर्व मंडळी मधल्या चौकात जेवायला बसल्यावर भाई विनोदावर विनोद करी,आणि आम्ही खोखो हसत असू . त्यावर मोठी आई रागवून म्हणे  

""बेगीना जेवा कसली हसताय,,

मग पटकन जेवन आटपून बाहेर निघून जाऊ ,असा माझा भाई या जगातून जातांना जाण्याची चाहूल कुणालाही न देता एकटाच गुपचुप निघून गेला. होळीच्या सणाची आमच्या गावची रंगपंचमी नवव्या दिवशी असते. त्यादिवशी भाई दुपारीच वाडीत फीरूण आला.. थकवा जाणवत होता, म्हनून अंथरूण घालून झोपला आणि घरात माझ्या वहिणीला सक्त शब्दात सांगीतले.. मी झोपतो कोणी आलं तर मला उठवू नकोस.. त्यामुळे वहिनीने संध्याकाळी सात वाजले तरी भाईला उठवायला गेली नाही. दिवेलागणीच्या सुमारास भाई उठत नाही .म्हणून वहिनी माझी त्याला हाका मारू लागली , पण भाई झोपेतच कुणालाही न सांगता या जगाचा कायमचा निरोप घेतला होता .जेव्हा मला कळले तेव्हा जेम तेम रीत्रीचे 11वाजलेले मी मुबंईवरून गावी पोहोचण्याचा रात्री बराच प्रयत्न केला. पण आजच्यासारखे त्यावेळी गाड्याची सोय नसल्याकारणाने मला भाईचे अंतिम दर्शनही झाले नाही.आज भाई ला जाऊन 18 वर्षे झाली .मी जेव्हा माहेरी जाते भाईचा फोटो हाँलमधे प्रथम दर्शनी पाहून मन भरून येते.. परंतु त्याच्या खोलीत बसली की वाटते भाई इथेच कुठे घरी वावरत असावा ,असा भास होतो. भावा-बहिणीचं नातं खरं तर थोड अलग असत... मायेच हे नात सर्वात जास्त जवळच ..असतेच.. बहीण भावा पेक्षा मोठी असो की लहान,ती आपल्या भावावर आई सारख प्रेम करते...भाऊही वडीलांसारखा बहीनीला आधार देतो, हे नात फुलत असते... कधी रागात तात्पूर्ते मावळतही असल, तरी एक दुस-या शिवाय दोघांनाही चैन पडत नसते..बहीन सासरी जाताना हा भाऊ लग्नाची तयारी मोठ्या हौसेने करतो.आणि लग्न झाल्यावर बहीन सासरी निघाली की ,ऐन वेळी हा गडी खेळातून बाद व्हावा तसा बाजूला जावून ओक्साबोक्सी रडतो..  मला समजायला लागल्यापासून आम्ही कधी भांडलो हे मला आठवत नाही.  भाईच्या अकस्मात जाण्याने मात्र मोठा धक्का बसला, तो मनात घट्ट पाय रोवून आहे .भाईचा विरह मला सहन होत नाही. त्या विरहात कधी कधी एकटीच जागते, अशीच एकदा भाईची आठवण येत असताना मी,पहील्यांदा एका पानावर काही तरी गीरपटलेली ही कडवी..


*का ?घेतला निरोप तू जगाचा*

**घोर लावूनी मना

अकस्मात निघून गेला*

 *काय चुकले आमचे *

गरीबीत वाढलो मनमुराद बागडलो*

हौसेचे दिस येता निसटूनी गेला!

भाकीत हे दैवाचे ते कुणा ना कळले!

स्मरण तव होता,अबोल झाली वाणी!

मुक्या मनीची दैना आसवांची रैना! 

तव भास तव आभास संगे घेवूनी!

झुळूक वा-यावरली सांगे कानी*

 पारिजातकात अवतारला तू अंगणा!

गंध आठवणीचा आजही दरवळे!

परी लुप्त होता झुळूक, गंध जाई वार-यावरी!

विनवणी तव पून्हा पून्हा ये पवन होवूनी!

पारिजातकाचा गंधात रंगूनी!

सुवास तुझ्या भेटीचा !

रात राणीच्या गंधात बहरला!

आठवता बोल तूझे गुज करती!

मन ही बावरले!रात राणी बनून

सडा पाड अंगणी !

सुगंध तुझ्याआठवणीचा !

बरसू दे माझ्या अंगणी! मागणे ते एकच!

भाई पूढल्या जन्मी तूच भाऊ म्हनूनी लाभू दे**


 मी किती आजारी असली तर मला पहिला तोंडात शब्द येते तो भाई .....असा माझा भाऊ जगात माझ्या पुरता तरी महान होता.आहे आणि पूढेही महानच राहनार...


 क्रमंश ...पूढे....Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational