विरह
विरह


"संध्याची लाली ढगा आड होताच.. ती देवघरात आली. मंद समईच्या तेवणाऱ्या ज्योती अलगद पुढे सरकून तिने आपल्या आराध्याला दंडवत घालून बाहेर आली...तुळशीला हळद कुंकवाचा मान देवून ती तीथेल्याच धक्यावर विसावली..मंद हवेच्या झुळकीसरशी जुईचा सुंगध तिच्या नखा शिखात घुमला,, मनमनात जुई चा मोह न आवरून ती जागची उठली..हळूच पाऊले टाकत ती अंगणातल्या कोप-यात लावलेल्या वेलीपाशी आली.. नवरी नटावी तशी जूई फुलांनी नटली होती..आज अचानक जुईला आलेला बहर पाहून ती क्षणभर सुखावली.. तीच्या स्पर्शाची अनूभूती घेण्या करता तीने काही डाहाळ्यावरून हात फिरवू लागली... जुईची सानूली फुले अगदी मंदमंद अंगाच्या सुवाहासाने प्रत्येक पानावर खुलून दिसत होती.. तीला आनंद होत होता.लेकूर वाळी जुईच भाग्य पाहून तीला तीचा हेवा वाटल्या शिवाय राहीला नाही.. तीने हळूच हात पूढे करून एक फुल अलगद हाती धरून ती तीला एक टक पाहू लागली.. अचानक तीच्या तोंडातून शब्द बाहेर आले..
"अगदी असच तर होत माझ तान्हूल""
मन द्रवल कंठ दाटला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले..ती सदगीत झाली..विरहाच्या भोव-यात अडकलेल मन तीच्या तान्हूल्याच्या आठवणीन गहीवरल, अंगातल अवसान गळून ती भूमीवर बसली.. दोन फुले जुईची ओजंळीत आलेली पाहून ती पूर्ण विरहात धायमोकलून कीती तरी वेळ रडत राहीली..दोन फुले हातात होती..त्यातल्या एका फुलाला डोळ्या ना लावत ती त्या फुलात तान्हूल्याचा स्पर्श आठवून ती भूतकाळी रमली..
"कालपासून सिमाला जरा कनकन होती अंग रसरसल्याने. डोळे बंद करूण ती बिछान्यावर पडून होती.. अचानक थंड स्पर्शाने तीने डोळे उघडले.समोर माऊला पाहून ती चकीत होत म्हणाली..
"माऊ तू केव्हा आली"
"आताच"
"दादा कूठे"
"तोही आला"
"तुम्ही दोघ शाळेतून एकटे आलात"
""नाही गं बाबा बाहेर सोडून गेले"
""बाबा आलेले"
"हो"
"ते बाहेरूनच गेले"
""त्यांना काम आहे म्हणाले"
"अरे बापरे नाहक त्याना त्रास झाला"
"अगं आई कीती काळजी करते,तूला बर नाही ना पडून राहा पाहू"
"मग मला भूका लागल्या खायला कोण देनार "
पिंटू आईला पाहायला आला होता.तो मधीत बोलला..
""थांब मी देते तूम्हाला खायला"
""काही नको आई तू झोप,दादा तू चल मी देते खायला तूला"
""अगं माऊ जमेल का तूला"
""न जमायला काय झाल"
"बर सावकाश गं"
"काळजी का करते,तू झोप"
""नाही बेटा तूला सवय नाही ना म्हनून"
""मी करीन तू आराम कर"
माऊ निघून गेल्यावर सिमाला तीचा गर्व वाटला,
""माझ एवढस पाखरू कीती समजदारीने वागतय "
ती मनाशीच पुटपुटली.. काही वेळाने दोन्ही हातात चहाचा कप पकडून माऊ सिमाच्या रूम मधे आली.सिमाचा डोळा लागल्याने तीला कस उठवाव अस माऊला वाटून ती आल्या पाऊली परत फीरताना तीथेत असलेल्या टेबला माऊ अडकली.हातातला कप पडता पडता राहीला,पण टेबलवर असलेला तांब्याने मात्र जमीनवर गडगड करत जावू लागला..आवाजाने सिमा उठली माऊच्या हाती चहाचा कप पाहून ती म्हणाली..
"माऊ तू अजून चहा प्याली नाही"
"माझा आणि दादाचा चहा झाला आई,ही तूला आणली"
""माझ सोनूल ते,एवढ मोठ झाल"
"नाही हं आई मी तुझी तान्हूलीच हं"
""बर बाई ,दे तो चहा माझ्या लेकीच्या हातचा पहीला वहीला चहा पिवूया"
सिमाने चहाचा एक घोट घेतला..ते पाहून अधीर झालेल्या माऊने प्रश्न विचारला..
""आई कसा झाला चहा,मला जमला का"
""अग जमला म्हणून काय विचारते,तूझा चाहा धावला की गं माऊ"
""धावला,म्हणजे गं आई,चहाही धावतो का"
"तस नाही गं,चहा मस्त झालाय पण जरा"
"पण जरा काय आई सांग ना" आईकडून कौतूक करण्यास उत्सुक असलेल्या माऊने विचारल
"अह काही नाही जरा ,अगदी जरा हं तुझ्या सारखा गोड झाला,एवढच"
"म्हणजे मला जमला नाही असच ना" माऊचा चेहरा ईवलासा झालेला पाहून सिमाने तीला मायेन जवळ घेत म्हणाली.
""माऊ तुझ्या सारखी मी होती ना तेव्हा माझ्या अन्नाना, म्हणजे तुझ्या आजोबांना चहा बनवून दिलेला...तेव्हा अगं माझा चहा पाहून अन्ना खुष झाले..आणि प्यायले ही मी विचारल अन्नाना, अन्ना चहा कसा झाला हो, ते म्हणाले तुझ्या आई पेक्षा भारी, मला आनंद झाला मी म्हणाली.अन्ना खरच,
ते म्हणाले अगदी खर तुझ्या आई सारखा,पण बाळा तू प्याली की नाही, नाही अन्ना मग जा पी, मी घरात माझ्यासाठी ठेवलेला चहा प्याली..आणि..
""आणि काय गं आई"
""माऊ तुला सांगते चहाचा पहीलाच घोट तोंडातून बाहेर आला,
""का गं आई ""
""माऊ अगं मी चहात साखरच घातली नव्हती"
""काय! तरी आजोबा काही बोलले नाहीत"
""नाही ना, त्याच मला कौतूक वाटल, आणि अन्नावर मी खुप प्रेम करू लागली"
""बघ तू अशी आहेस ना,मी चहा केला त्याच कौतूकच नाही,जा बाबा आम्ही नाही" आणि माऊ सिमा जवळून ऊठून जायला निघाली..ते पाहून सिमाने हात लांब करूण माऊला पकडण्याचा प्रयत्न करत म्हणाली..
"माऊ, ये सोन्या रगवली नको ना रागवू,ये ना ईकडे,ऐक सोन्या,ये माऊ,सिमा आपल्यात एवढी हरवली होती की ती माऊला हाका मारत होती..काहीशी भानावर येत तीने आपला हात सरळ रेषेत असून ती तोंडाने माऊ माऊ करत होती..ती भानावर येत अवती भोवती पाहील..तीच्या व जुई अतिरीक्त कुणी नव्हत...
माऊ ती सिमावर रूसून कधीच देवाच्या दरबारी हजेरी लावली होती परत कधी न येण्याकरता...