सानुल पण सोनूल बालपणभाग दुसरा
सानुल पण सोनूल बालपणभाग दुसरा
आठवणीच धुराळ फार छान असत. पुसट असलेल्या आठवणी जेव्हा उजागर होताना जी मनाला गोड अनुभूती होते,तो आनंद खर तर स्वर्गसुखा पेक्षा मौलीक असतो..त्या प्रमाणे माझ व राजाच शाळेत जायच ठरल्यावर दाजी पाटी कधी आणतो यावर डोळे लागून राहील्यास आश्चर्य अस नसाव..कारण जी वस्तू सुलभतेन मिळते,तीच महत्व फार कमी असत.उलट कीतीही कमी किमंतीची वस्तू जेव्हा मिळण्यास कठीण होते...आणि ती जेव्हा मिळते ,तेव्हा तू ब्रम्हाडांतल्या सर्व वस्तूपैकी अनमोल होते..
कोकण म्हटल की पहील डोळ्या समोर येतो तो साधा सरळ कपट नसलेला,मनाने भोळा असनारा, कोकणवासी,ही मंडळी ना श्रीमंत ,ना गरीब,मध्यम स्तरातील पण यांच्याएवढी आपूलकी माया दुस-या कूठल्याही राज्यात नाही हे ठासून सांगावस वाटते.आणि समाधानी एवढी असतात,की जे मिळेल त्यात समाधान मानाव ,जे आहे त्यातलाच एक घास दुस-याला द्यावा, अश्या स्वभावाची माणस,,कोकणात कूणाची भात कापणी असो ,या पेरणी असो,किंवा तरवा काडणे असो,किंवा ईतर कोणतीही काम,तीथ होत असताना त्यांना काही मधीच काही तरी घेवून जेव्हा घरची घरधणीन,बरोबर अकरा वाजता उकड्या तांदळाची पेज आणि मिठाच्या पाण्यात घातलेली कैरी(खारातला आंबा) घेवून जेव्हा शेतावर जेव्हा पोहचते .छोट्याश्या मेरेवर(शेतातली पायवाट) ती टोपली उतरूण सर्वांना पेज जेवू घालताना मधीच कुणी ओळखीचा माणूस तीथून जाताना दिसला की त्याला हाक मारावी...ती कोकणातल्या बोलीभाषेतून...
""""ये बाळग्या मेल्या खय गेल्लय"""(ये बाळा तू कूठे गेलेला)
""खय नाय गे वायच भात पिकला काय बगूक इल्लय""(कूठे नाही शेतात पेरलेल भात कापण्यास योग्य आहे की नाही पाहायला आलेलो)
""ये,मरे मेल्या निमरात तीरमीरलय आसतल,! वायच निवळ घे ये"""(मग येना जरा पेज घे उन्हात तू तिरमरला असनार)
""अगे आवशीन भाकरी भाजून दिल्यान ,ती खावनच इलय""(अहो आईने भाकरी दीलेली ती खावूनच आलो..)
"""ती रवली आजून जिरली आसतली तु निवळ घे""(ती अजून राहीली का ती जीरली असेल..)
""अगे नको तुमका पुराव व्हयो!!(अग नको तुम्हाला पुरायला हवी)
"""आमका पुरात काय नाय ता मी बगीन,"""(आम्हाला पूरनार की नाही ते मी पाहीण)
"""तू तसी आयकतय दे वायच""(तू तशी ऐकणारी नाहीस दे थोडी)
""आता कसा? बसा""(हा आता कस)
""अगे तूम्ही भात कापूक घेतल्यात की काय??(अग तूम्ही भातकापणी करायला घेतली का?)
"""होय रे ,मगे कामेरी गावनत नाय म्हनान जरा बिगीना कापून घेतो""(हा ना ,नंतर काम करायला मानस मिळत नाही.)
""होय गे बाये ह्या मातर खरा हा""(हो हे मात्र अगदी खर हं)
अशा प्रकारे वाटेच्या वाट सरूला , जीथे असेल तीथेच बोलवून आव भगत करावी ती कोकणातल्या मानसांनीच, आमच्या घरात त्या वेळी गरीबी नांदत होती.परंतू आमच समाधान मात्र तसल्याही परस्थीतीत टीकूण होत हे विषेश.घरातली चूल कधीकधी दोनदोन दिवस रूसलेली असली म्हणजे.चायच्या पाण्यावर पोटाला चिमटा मारून आम्ही वेलीची कंदमुळे खात बसू.त्यावरही पोटाने तक्रार केली तर (भेडल्या माड तोडून त्याचा गर पोटभर खावून मगच घरी येवू.परंतू कुणाच्या दारावर जात नसू.. दाजी ज्या विड्या वळायच काम करायचा त्याचा मोबदला दर सोमवारी मिळे,त्यात दाजी घरात हव असलेल खाण्याच सामन आणायचा.डाऴ ,तादुंळ,साखर,पावडर.अस कीरकोळ सामानही आणत असे त्याच बरोबर आम्हाला खाऊ आणत असे .पुढचे दोन दिवस परत असच हाय नाय ,अस चालायच..त्या प्रमाणे आज सोमवार असल्याने दाजीचा पगार!!! माझे आणि राजाचे डोळे एरवी खाऊवर लागलेले असायचे.पण आज दाजी बाजारातू पाटी आणतो की नाही ,यावर आमच सार लक्ष लागून राहीलेल.आमची घरे जरा उंचावरच होती .त्याला सर्व गाव वाले आमच्या सावंत या आडनावावरून सावताचे टेंब म्हनत,आमच्या घराकडून जरा पानंद वाट होती.अजूनही आहे.तीथून खाली रस्त्यावर यायला दोन मिनिट लागतात.रस्त्यावर आम्ही जात नसू कारण हा रोड मुंबई हायवे होता मुंबईच्या तशाच ईतर राज्यातल्या गाड्या याच मार्गाने ये जा करत. त्या मूळे आम्हाला जास्त रोडवर पाटवत नसत.परंतू आज दाजी पाटी आणनार म्हटल्यावर आम्ही दोघही दाजी बाजारात गेल्या पासून जवळजवळ चार वेळा तरी रस्त्यावर घरातील मोठ्यांची नजर चूकवून जावून आलो होतो.नतंर तर आम्ही रोड पासून बर-याच लांब अंतरावर आडोसा घेवून उभे होतो.आडोसा घेण्याचे कारण आम्हाला कूणी पाहून घरी नाव सांगू नये ,या साठी घेतलेली खबरदारी..काही वेळाने आमची प्रतीक्षा संपली लांबून भर ऊन्हातून दाजी येताना दिसला.दाजीला कूठेही पटकन कूणी ओळखाव, असा पेहरावा दाजी करायचा. सफेद लांब अस्तीनची पैरण त्यावर सफेद लेंगा ,याखेरीज दाजी दुस-या कोणत्याही रंगाचे कपडे वापरलेले आम्हाला आठवत नाही.दाजी उंच सडसडीत सावळा रंग असल्याने आमचा दाजी त्या कपड्यात आज कालच्या नेत्या सारखा वाटे.आणि दीजीत गूणही नेत्या सारखेच होते.पण कदाचीत आमच्या गरीबी मूळे दाजी नेता किंवा सरपंच बनला नसेल किंवा त्याला ते आवडतही नसाव, नक्की सांगता येत नाही.पण आमच घर गरीब असल तरी गावात, कायम मान आणी वजन होत, दाजी जसा जवळ जवळ येत गेला ,हे पाहूण आम्ही बाहेर आलो.पण दाजीची नजर आमच्यावर पडली..
"""तूम्ही दोघाय आडकुच्यात काय करताय?कोण तरी जनावर चावला तर कितक्याक पडात""(तूम्ही दोघ अशी आड वाटेवर का लपलात कसल तरी जनावर तुम्हाला चावल तर तै कीती महाग पडेल.)
मी काही बोलली नाही पण राजा मात्र दाजीला उद्देशून म्हनाला..
""दाजी तूजीच वाट बगतो""
""मेल्या माजी वाट कीत्याक बघतय !मीया वाटेत रवतलय की काय??(माझी वाट पाहायची काय गरज मी रस्त्यावर राहनार होतो का?)
"""नाय माका पाटी आनलय काय नाय??(नाही तू मला पाटी आनलीस की नाही ते पाहायला आलो.)
"" तूज्यार फटकी ईली ती!!आदी घराक चल मगे सांगतय""(तू आधी घरी चल)
दाजी पूढे आम्ही दाजीच्या मागे चालत होतो.अर्थात दाजीन पाटी आणली की नाही .हे खुणेन एक मेकांना विचारत घरी आलो. दाजी आमचा थेट स्वयंपाक बनवत असणा-या खोलीत जावून
""वहीनी,गे वहीनी ""
अशी हाक मारताच आमची सर्वात मोठी काकी ,जीला आम्ही सर्व भावंड आई म्हनू ,ती पूढे आली,,आमच्या या आईला एकच मुलगी अनू पण तीच लग्न झालेल होत.पण आमचे काकांना मात्र आम्ही कधी पाहीले नाही.अनू लहान असतानाच ते वारले होते... आणी आम्ही जन्माच्या आत अनूच लग्नही झालेल,.म्हणजे आमचे वडील लहान असताना आई लग्न करूण या घरी आली होती...परंतू जेव्हा तीला वैद्यव्य आल तेव्हा माहेरची मंडळी तीला न्यायला आलेली,पण आमची आई माहेरी मात्र न जाता आमच्यातच राहीली हे वाखण्या जोग,या आईने माझा मोठा भाऊ याला आपल्या नव-याचे नाव (बाबली)ठेवून उप नाव बाळा असे ठेवले.. त्याचे लाड आई सर्वात जास्त करी आईच्या हातात घरातील सर्व सूत्र होती लहान ते मोठ्या पासून सर्व आम्ही आईचा मान व शब्द राखायचे,आमच्या आई एवढा मान आमच्या घरात अन्य कूणालाच नव्हता.आणि कधी तो मिळालाही नाही..माझी आये,व राजाची माई ,याना कूणी फारस गृहीत धरायचे नाहीत.या दोन्ही जावा मागच्या पुढच्या असल्याने दोघात कायम दोन दिवसा आड जुगल बंदी असायची.आये पुढल्या दारी पडवीला जोडून खोली होती तीथच राहायची.तर मागल्या दारी असलेल्या खोलीत माई ,दोघाची डबल बारी चालू झाली की त्या कुणालाही ऐकत नसत.वरूण आमच्या मोठ्या माणसात सहन शक्ती भरपूर होती..की कोणीही दोघाना समजवणे तर दूर ,पण का भांडता म्हणून विचारतही नसत.आम्हाला यांच भांडण कश्या वरूण आहे हेच मुळात कळत नसे,पण दोघांच्या आवाजाने आम्ही बोर झालो, की मी व राजा दोघीना त्यांच्या खोलीत ठेवूण बाहेरूण कडी घालत असू.आणि आमच्या घरी धान्य ठेवायला आणलेले पार्ले बिस्कीटचे पत्र्याचे डबे,त्यात धान्य भरायला काही नसल्याने ते सदैव खालीच असायचे.ते घेवून लाकडीने मधल्या वळय मधे वाजवत बसू,वाजवण्याच कारण एवढच असायच की दोघींना कोण काय बोलत हे ऐकायला येवू नये,ही त्यावेळी आम्हाला सूचलेली सर्वात पावर फूल आयडीया,तीचा असरही तेवढाच जबर दस्त व्हायचा,कारण अस की दोघीना धड ऐकू येत नाही म्हटल्यावर दोघींचा मोर्च्या आमच्या जवळ वळायचा...पूढून पहीली आये मला शिव्या घालायची...
"""गो सोबा पयला दार उघडतय काय नाय!नाय तर तूझ्या पेकाटात लाथ घालतय काय नाय ती बघ"""(ये शोभा पहीला दरवाजा खोल नाहीतर तुध्या कमेरत लाथा घालीन)
"""तीकडून माई पण तशीच राजाला बोले नतंर आम्ही कडीचा आवाज न करता गूपचूप कडी काडून दोन तीन तासा साठी कूठेही गायब होत असू...हे पोती पूराण आमच्या घरी वरच्या वर चालूच असायच,,ते नतंर नतंर कमी होत गेल आये राहीली नाही आये अगोदर बाकी सर्व मंडळी गेली ...माई मात्र घरचा जूणा खांब अजूनही आहे...तीचा आशिर्वाद आम्हास आजही मिळत आहे आणि तो मिळत रहावा ही अपेक्षा....आईने (काकी मोठी) तीन घरासाठी उभा देह चंदना सारखा झिजवला परंतू तीला कधी कोणीच घरातून दुखवल नाही.कूणी बाजारातून काही आणूदे अगदी खायला सूध्दा ते आधी आईच्या हातातून मगच त्याच वाटप व्हायच..आज दाजीने पण सामान आणताच आईला एक एक करूण काडून देत होता. तस आम्ही मात्र श्वास रोखून आता पाटी केव्हा निघते हे पाहात होत.एक सामान दाजीने बाहेर काडल व पाटी दिसली नाही की आम्ही हीरमुसले होवू पून्हा पिशवीत दाजीचा हात गेला की यावेळी पाटी बाहेर येईल म्हणून चेहरा प्रफुल्लीत व्हायचा...आणि तो जीव घेणी प्रतीक्षा संपली यावेळी दाजीन पिशवीत हात घालून सुदंर सुबक लहानशी पाटी बाहेर काडली..राजाला दिली ...आम्ही दोघ फार खुष झालो..मी मात्र नाराज व खुष असे मिश्रीत भावाने पाटी पाहत राहीली...कारण राजाला नविन कोरी पाटी मिळाली..मला जुणी पण एवढही वाईट वाटल नाही .पण राजा खुष आहे म्हटल्यावर मीही त्याच्या आंनदात सहभागी झाले...आजही माझी तीच सवय कायम राखल्या बद्दल त्या देवाचे आभार मानावे तेवडेच कमी.....वाटत राहते..
दाजीन पाटी दिली ती घेवून आम्ही बाहेर आलो आणि ती गंमंत केली ती वेगळी परंतू तुर्तास मात्र जेव्हा पाटी मिळाली त्या दिवशी मला कविता करायला आली असती तर मी नक्कीच खालील कविता केली असती.
******मनमनाच्या वातीने पेटवल्या ज्योती****
****ऊजळूनी आशा .फुलविल्या दीशा!****
*******उमलत्या मनने आशेचे दिप लाविले चौफेर !*
*******कुरणातले दवबिंदूचे मोतीओजंळीत घेवूनी!*****
***उधळन केली दाही दीशा !*****
******नभीतल्या सूर्याचे तेज घेवूनी ईवलेसे !****
*********धरतीत पाय रोविले यशाचे******
""कोकणा सारखी हिरवळ कुठेस शोधून सापडत नाही .त्याही पेक्षा कोकणातल्या सुंदर मनाची माणसे देखील सापडणं कठीण .सुख व सुखाची व्याख्या काय? हे कोकणातल्या माणसाला सांगायची गरज नसते .राई एवढ सुख देखील पर्वताएवढे मानून घरात सण साजरा करावा तो कोकणातल्या माणसानेच ,पर्वता एवढ्या दुःखाचे ओझे राई समान मानून काही झालच नाही अश्या थाटात कस वागाव हे जर शिकून घ्यायच असेल तर कोकणातल्या माणसाकडूनच,
त्या प्रमाणे दाजीने पाटी राजाला दिल्यावर ,मी आणि राजा बाहेर अंगणात येवून दोघानी प्रथम आनंदत्सव साजरा केला.आणि एक दुस-याचे कौतुक करूऩ घेतले.बाकी कोण आमच्या आंनदात सामील होवो, अथवा न होवो ,आम्हाला काही सरोकार नव्हता.
नतंर पाटी घेवून आम्ही आमच्या वाडीतल्या असलेल्या मोजून चार घरात दाखवून नतंर घरी आलो.
आम्हाला सोन्याचा खजिना हाती लागल्यासारखा आनंद आमच्या तोंडावरून वाहत होता. तो अजूनही कमी न होता ,तो आणखीच वाडत होता.या आंनदात,दोघही एका जागी बसलो. पाटी मांडीवर घेऊन काही तरी लिहाव अशी इचिछा होवून आम्ही लिहायला घेतच होतो.की राजा म्हणाला..
"""सोबा खडू नाय माझ्या कडे"""(शोभा मला लिहायला पाटी पेन्सिल नाही.)
"""मगे रे आता काय करतलय""(मग आता काय करायच)
"""काय नाय तीया माका दी"""(तू मला दे)
"""माझ्याकडे बघ र् कितको बारीक खडू आसा ह्याच्यातलो तूका काय दीव""(अरे माझ्याच जवळ लहानसा आहे त्यात तूला काय देवू)
""गो न्हानसो तोडून दी गो मीया दाजीन माका आणल्यान काय दितय"""(लहानन देग)
"""तीया दिलय आणि मिया घेतलय"""(तू दीला व मी घेतला)
"""आवशीच्यान दितलय"""(आई शप्पथ देनार)
मला आणखी तानायला होईना मी जरासा खडूचा तुकडा राजाला दिला.पण आमच उसनवार चालूच असायच, पण घेतलेल कधी देत नसू,पण मागताना उसन दे , म्हनून मागायचो. खडू राजाला दिल्यावर,काय लिहायचं ,यावर बराच विचार करून झाल्यावर आमच्या बुध्दीलाे जे जमेल ,
तसे आडव्यातिडव्या रेषा मारल्या माझे पाहून राजाने तसच केल . उद्यापासून आम्ही शाळेत जाणार घरात सांगून टाकल, ... बाजार आणतात त्या पिशव्या घेऊन त्यात पाट्या भरल्या भिंतीला त्यावेळी खुंट्या होत्या ,आम्ही दोघांनी पिशव्या खुंटीलाअडकून ठेवल्या ,आता आणखी एक काम बाकी होतं आमच्या दोघानाही नवीन असे कपडेच नव्हते. आम्हाला वर्षातून एकदाच कधी तरी नवीन कपडे मिळाचे. ते धुवून धुवून वापरत असू, इथे एक गोष्ट लिहावीशी वाटते ती म्हणजे हल्लीची युवा पीढी मुद्दामून फाडून जीन्स व इतर कपडे वापरतात . असं का ?असे विचारले ,तर ही फॅशन आहे असं सांगतात .आमच्या वेळी देखील अशीच फॅशन असली असती, तर आम्हाला जुन्या कपड्या अभावी समारंभाला जाता येत नसे. ते या फॅशन मुळे आम्ही राजरोसपणे गेलो असतो. .... कोणी जुने कपडे दिले तर भरीला भर म्हणून ते ही चालून घेत असू,तसे मला माझी आये मात्र महिन्या दोन महिन्यात जुने खूप सारे कपडे आणून देत असे .माझी आई बाजारात लाकडाच्या मोळ्या विकायला जायची,तसेच कुणी शेण, किंवा गोव-या (शेणी) मागीतल्या तर आये, नेऊन देत असे, बाजारात सर्व वाणी समाज असल्याने त्यांच्या बायका जे काम सांगतील ते सर्व आये करत असे, पण मी त्या माऊलीच्या चेहरा कधीच थकलेला पाहीला नाही.तो सतत हसरा असे, त्यामुळे की काय आयेला सर्वजण काहीना काही काम सांगत असत,आणि आये
ती काम बिनबोभाट करून देई, आयेन त्यांची काम केल्यानंतर त्या बदल्यात कोण पैसे कोणी तांदूळ, गूळ किंवा डाळ ,फेकण्या जोग्या असलेल्या वस्तू ,आणि वापरून वापरून जीर्ण झालेले कपडे कधीतरी जास्तीचे राहिलेले शेळे अन्न देत. ते शिळे अन्न आणि जीर्ण झालेले कपडे आम्ही आनंदाने घालू, कपडे आमच्या मापाचे नसले तरी ढगळ कपडे आम्ही अल्टर न करता तसेच वापरू ,आयेने आणलेले शिळे अन्न तर आम्ही पंचपक्वान्न समजून खात असू, पहिल्यापासूनच मला जुने का असेनात कपडे घालायला भरपूर मिळायचे, आणि ही सर्व आयेची मेहरबानी असायची, कपड्यासाठी मी कधीही हाल काढलेले नाही .आणि आजही मला साड्या भरभरून मिळतात फरक एवढाच आहे .तेव्हा जुन मिळायचं, आणि आता नवीन मिळते .पण आजही ते दिवस मी विसरलेली नाही आजही माझ्या रीलेटीव नी घातलेल्या साड्या मला देऊ केल्या तर मी नाकारत नाही .या दिवसाची आठवण म्हणून आजही नेसते. आवडीने घालते. आणि त्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही ,कारण आजही माझ्या नजरेत जुन ते सोन, आहे. तेव्हाही ते सोनचं होतं. आजही ते सोनंच आहे वते उद्याही सोनच असणार त्यात बदल होणे नाही आणि मलाही तो करून घ्यावासा वाटत नाही....
कोकणातली हीरवळ पाहीली की मन कस हीरव गार होतअसत. हीरवळीतले दव बिंदू पाहीले की कुबेराने मोत्याचा खजीना इथेच रीता केला की काय,अस क्षणभर मनाला प्रश्न पडतो.कोकणातल्या धरतीवर पहाटेचे हे दव बिंदू चमचम करताना पाहीले की स्वर्ग ही कदाचीच यांच्यापूढे फिका पडत असावा ,दुर्वांकुरामधी लहान लहान रान रोपावर फुललेली पिवळीधम्म रान फुले पाहून वाटते मोत्याच्या सरीची शोभा वाडवायला मधीच सोन्याचे मणीओवले असावे ,वरूण राजाची कृपा झाली की धरती नव्याने हिरवा शालू घालून सुगंधीत नाना रगांच्या वेलीवर उमललेल्या फुलांची बुट्या शालूवर लेवून नटलेली पाहीली की मन हरखून जाते.पानो पानी नविन बहरलेली पोपटी रंगातली पाने,पाहून तर आंनद द्वगुणीत होतो.तरू शिखरावर बसून गात असलेली कोकीळा तीचा तो मंजूळ स्वर सकाळच्या प्रहरी कान तृप्त होतात. आजूबाजूला कोणी तरी तानपु-यातून मंजूळ स्वर छेडत असल्याचा भास होणे वावग नसाव. पूर्वेकडून सूर्याची लाल किंचीत सोनेरी छटा असलेला गोळा जस जसा वरवर येत जातो,तशी पूर्वेची लाली गडद पणे अवघ्या धरतीवर सोन्याची प्रभा फाकत सारी धरतीच सुवर्णमय होताना पाहीली की मंत्र मुग्ध होवून हे सौदंर्य डोळ्या पूढून जावूच नये अस मनापासून वाटत असते....अस कोकण आपल्याला लाभन ही खरच आपली पूर्व जन्माची पुण्याई म्हटल्यास वावग ठरणार नाही......
आज मी आणि राजा सकाळी जरा लवकर उठलो .शाळेत जायची हूरहूर गोड होती.त्यामुळे या कुशीवरून त्या कुशीवर सरखी मी करवटे बदलत होती.शेवटी नक्की कधी झोपली ते सागण कठीण,, सकाळी आम्ही पाळलेल्या कोंबड्याच्या बांगेने जेव्हा जागआली...नेमका वेळ आमच्याजवळ घड्याळ नसल्याने समजायला कठीण होत.पण बाहेर काळोख मात्र तेवडाच गडद वाटला.आये सर्वात लवकर उठणारी अजून तीही झोपलेली दिसली.मनाने समजून घेतले अजून अवकाश आहे.पण झोप मात्र शाळेत जाणार या गोड जाणीव पाई कोसो दूर पळाली होती.राजा बाजूलाच पहाटेच्या साखर झोपेत गोड स्वप्नाच्या जगात गटागंळ्या खात मस्त झोपलेला,एक वेळ मनाला वाटल याला उठवाव,पण मनाचा कौल न मिळाल्याने उठवणे जीवावर येवून,मीही त्याच्या बाजूला लोळत पडले.आणि अचानक टण् ...टण् ...असे घड्याळाचे टोले आमच्या बाजूला असलेल्या शेजारच्या घरातून सकाळच्या सामसूम असलेल्या वातावरणात स्पस्ट ऐकू आले.पण कीती टोले पडले हे समजल नाही....काही वेळात आये उठलेली दिसल्यावर उठायची वेळ बरोबर झाली हे लक्षात येवून मी पहीली उठली...राजाला त्याच्या साखर झोपेच खोबर करत जाग केल...तो ही आळोखे पिळोखे न घेता उठला हे विषेश....नतंर पटपट परस्पर विधी आटपून आम्ही पटकन घरात आलो . आमच्या घरात एकदम सकाळी सकाळी आमची आयेच प्रथम उठायची तीला कधी कोणी उठवलेल मला तरी आठवत नाही. जस घड्याळ आपली वेळ सांगायला चूकत नाही तसी आयेही सकाळी लवकर उठायला चुकत नसे, आये एकदा उठली की सार घर दणदणून सोडत असे...
"""उठा गो सांजावला"""
तीला मात्र कोणी दाद देत नसे. मग ही आणखी वैतागत म्हणायची..
"""उटणात नाय बगा मगो कीतक्या उजाडला,"""
तरीही कोणी उठत नाही म्हटल्यावर...
""""निजा गो निजा सात कामरा (पांघरूण) घेवन निजा""
पण आज मात्र तीला बोलायला चांन्स न देता आम्ही उठलेलो होतो..
आम्ही तयार होवून चुलीच्या पुढ्यात येवून बसलो. तसा आयेन गुळाचा काळपट चहा ,काळपट पडलेल्या दोन कपात ओतून आमच्या पूढे सरकवत म्हणाली...
""""घेया फुकांन पीया गरम आसा"""
खर तर मला कधी चहा आवडत नसे,त्यात करुन गुळाचा तर अजिबातच नाही. साखर कधी आमच्याकडे येतच नसे, कधी तरी सणावाराला साखर आमच्या घरी पाहुणी म्हनून फक्त दोन दिवसांकरता येई ,बाकी इतर दिवशी ती गायब असायची. गूळ साखरेपेक्षा खूप स्वस्त मिळत असल्या कारणाने ते आमच्या घरी कायम नांदायचे. त्याचा चहा सर्व जण मिटक्या मारत फुर्र..फुर्र...असा आवाज काडत प्यायचे. मला वाटते हा आवाज म्हणजे गुळाच्या चहाला दीलेली दाद असावी,असो, राजाचे माझ्या खूपच उलट होते .मला चहा आवडायचं नाही ,तिथे राजाला चहा शिवाय जमायचे नाही . त्याला सकाळी चहा मिळाला नाही, तो खूप किरकिर करत असे.असा आमच्या घरचा युनिक चहा कपात ओतलेला होता. एक घोट मी नावाला घेतला ,आयेला बोलायला विषय नको म्हनून,तो बळेच घेतला. राजाने मात्र आपल्या रोजच्या शैलीत टप्याटप्याने संपवला, मला चहा प्यायची सकाळी बिलकूल इच्छा नव्हती ,आयेची शब्दांची भूपाळी सकाळी सकाळी माझ्या नावाने चालू होवू नये, आणि ती आज तरी मला ऐकायची नव्हती. राजा चहा प्यायल्यावर आम्ही बाहेर आलो. कालच भरून ठेवलेल्या पाठीच्या पिशव्या काढून आम्ही बाहेर निघालो,आम्हाला पायात घालायला चप्पल नव्हती परंतू त्याची पर्वा न करत, आम्ही अनवाणी शाळेत जायला निघालो. आयेन घरातूनच ललकारी दिली. त्या ललकारी तून हूकमी आवाज खडखडीत बाहेर आला .
""शाळेत जाताय ?? उजेड घालूक,! ती सांभाळून जावा! माका तुमच्या बरोबर काय येवक जमना नाय!!""" (शाळेत जाताआहात उजेड पडायला तर व्यवस्थीत जा मला येण शक्य नाही.)घराच्या सर्वांनी आयेची ललकारी झोपेतही ऐकली यात शंकाच नाही. कारणआमचा दाजी झोपेतून खडबडून जागा होऊन बाहेर आला ,आणि म्हणाला
"""खराच शाळेत जाताय काय"???"
आम्ही मानेन होकार दिला.
""समाळून जावा !!पण जाताय खयल्या वाटेन ते सांगा!?""
आम्ही काही न बोलता आड वाटेकडे बोट दाखवले .ते पाहून दाजीने मान डोलवली.
आम्हाला शाळेत जायला दोन वाटा होत्या .एक डांबरी रस्त्याने जाणारी आणि एक शॉर्टकट स्मशानभूमीत जाणे ही वाट आमच्यासाठी सरक्षीत होती.या वाटेवर गाड्यांची भीती नव्हती.त्या कारणाने आमच्यासाठी ती सोईची होती..कसलीही भीती त्या वाटेवर नव्हती आणि ह्या वयात आम्हाला भीती काय असते .ती माहिती नव्हती .आम्ही दिवस भर कुठेही जंगलात फीरत असू याचा सूगाव घरी नसायचा. पण आज शाळेत जातो म्हटल्यावर काळजी पोटी आये दाजी सांगत होते.आणि महत्वाचे म्हणजे वाटेत लागनारी स्मशानभूमी ही सार्वजणीक नसून ती फक्त आमच्या सावंत भावकी साठी राखून ठेवलेली होती. आमची सावंतांची मोजून दहा घर त्यावेळी होती . त्या घरा पैकी कोणी एखाद्याला दवज्ञा झाली की या स्मशानभूमी त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार व्हायचे.हे संस्कार होताना आम्ही कित्येक वेळा त्या रस्त्याने जाताना पाहायचे, आणि दुसरी वाट डांबरी रस्ता हा मुंबई-गोवा हायवे असल्याकारणाने या मार्गावर अनेक वाहने जलद गतीन धावायची. त्यामुळे इथून संभाळून जाव लागे. मला डांबरी रस्त्यावरून जायला आवडायचे,पण कोणी जायला देणार नाही हे नक्की होते .परंतु काही वेळा आम्हाला इच्छा झाल्यास कुणालाही न सांगता त्या रस्त्यावरून जात असू, घरातल्यांना कधी माहिती पडल्यास दोन शब्द ऐकून घ्यावे लागायचे .आम्ही तेवढ्यापुरते ऐकायचं बाकी येरे माझ्या मागल्या आमचं चालूच असायचं. आम्ही शाळेत जाण्यासाठी अंगणातून बाहेर पडलो,तशी वाऱ्याच्या च्या वेगाने आये अंगणात आली आणि आमच्यासाठी चार गोष्टी सांगून निघून गेली .
भांडणा करू नको? जाताना एकामेकाचा,हात धरून जावा.! शाळा सुटली की सरळ घराक येवा.!!.सोबा तू मीया येयसर भायरच खेळ!! मीया घरात नाय आसय कामाक जातय"!!!"
एक ना दोन आयेच्या सूचनानी कंटाळा येऊ लागल्याने आम्ही पटपट तिथून निघून गेलो .तेव्हा आये बोलायची त्याचा राग आणि कंठाळा यायचा खरा!! पण स्वतःहा आई झाल्यावर आईची काळजी कीती रास्त असते,हे कळतय. आज आये असती, तर तिला बीलगत म्हणाली असती तू जे लहानपणी आम्हाला बोलत होतीस . ते योग्य होतं.आयेचे संस्कार व तीचा सडेतोड पणा माझ्यातही भिनला आहे.आज एवढे सामर्थ्य मिळाले की मी बिनधास्त माझी बाजू मांडते.त्या मुळे लिखाण करण्याची शक्ती मला माझ्या आयेमुळे मिळाली.हेही खर,आये तशी फार प्रेमळ होती.आयेला जर उपमा द्यायची झाली तर काटेरी फणसाची ,तो जसा बाहेरून काट्याने भरलेला असला तरी आतून त्याची फळे रसाळ गोमटी असतात .तशी माझी आये होती. काट्यासारखी वरूण कडक खरखरीत असली,तरी ती आतून मेनापेक्षा मऊ होती. तीच्या कडक स्वभावाचे काटे आम्हाला टोचत असले तरी ते आमच्या भल्या करतच होते .हे कळायला फार उशीर झाला.... आये साधी होती हे तीच्या सान्निध्यात वावरणा-याना कळायचे... परिस्थितीमुळे लिहायला खायला नसले तरी स्वाभिमान बाळगून असलेली आयेचा स्वभाव प्रेमळ मनमिळावू होता. ती सर्वांशी चांगली वागे,परंतु एवढीही साधी नव्हती की कोणी काही बोलले आणि ती निमूटपणे ऐकून घेण्यातली नव्हती. समोरचा जसा वागे त्यानुसार आमची आये वागण्यातली होती . कुणी काही पटकन बोलले ,तर त्याला सडेतोड उत्तर देऊन पुढच्या पुढे निघून जाणे हे आयेला बरोबर जमत असे.मग समोरच्याला काहीही वाटो, तीला पर्वा नसायची.एक घाव दोन तुकडे अशी भूमिका घेणारी आमची आये,आपल्याच तोंडातला घास दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या तोंडात कसा घालावा ,हा प्रश्न तीला कधी पडलाच नाही .आये कायम शुद्ध मालवणी बोलायची .समोर कोणी मोठा अधिकारी असो . तिला जे बोलायचं असेल, ते ती बोलायची . पुढे पुढे आम्हाला कळायला लागले, तेव्हा आम्ही आईला शिकवणीच्या स्वरात बोलायचे ,
"""आये असं कोणाकव पटकन बोला नको गे!!, लोकांका वायट वाटता""
तेव्हा ही तीच उत्तर ठरलेलं असायचं .
त्यांका वायट वाटता??तुमका नाय ना?मगे जाला तर""
"""अगे आमकाय वायट वाटता म्हनान तूका सांगतो""
""" बरा बाये,ह्याच्या पूढे इचार करून बोलांन""
आणि वेळ मारून न्यायची आम्हाला चांगलेच माहिती होते.आये तेवढ्यापुरती बोलते. पण पुन्हा मात्र हीच येरे माझ्या मागल्या चालूच असायचं........
क्रमश::::