सानूल पण सोनूल बालपण - भाग 7 वा
सानूल पण सोनूल बालपण - भाग 7 वा
भाग 7 वा
''दसरा सणाला एवढ ,काही सांगण्या सारख काही घरी होत नसे...परंतू दिवाळी म्हटली, की आमच्या घरात तीकसं काही व्हायचं नाही .फक्त पहिल्या आंघोळीला चार वाजता उठून मस्त ऊठणे आणि लहानशी हमाम साबणाची वडी घरी आणत. ती इतकी लहान असायची की अंघोळ करताना ही वडी हातातून दहा वेळा तरी निसटत असे.. पण त्याचं कधी वाईट मात्र वाटत नसे, उलट मनाला स्वर्गसुखाची अनुभती होई. एरवी आम्ही कायमस्वरूपी 501 बार नावाच साबण यायचा तो साबण आम्ही कपड्याला ही अंगालाही असं टू-इन-वन मध्ये वापरत असू,डोक धुवायचे म्हटले ,तर आये बाजारातून सोडा खार आणायची हा सोडा खार पाण्यात टाकून आमची डोकी धुतली जायची. घरातली अंथरूण-पांघरूण या सोडा खार मधे धुतली जायची. समजा घरात साबण सोडा यापैकी काही उपलब्ध नसल्यास आम्हाला फारसा प्रॉब्लेम कधी येत नसे, आमच्या घरच्या परसदारी रिंग्याचे झाड होत, आम्ही ती ठेचून आंघोळीला कपड्याला वापरायचे .घरातली भांडी कधी साबणाने घासल्याचे मला तरी आठवत नाही. चुलीतल्या राखेने भांडी कशी स्वच्छ आणि लखलखीत दिसायची. आमच्याजवळ ही वस्तू नाही कसं करायचं, हा विचारआमच्या मनाला कधी शिवला देखील नाही.कधी हात पाय गाळून ही राहिलो नाही.जे मिळेल त्यात समाधानी आयुष्य आम्ही सातवी भावंडे जगत असू,आलेल्या परिस्थितीत मार्ग कसा काढायचा ही शिकवण घ्यायला, आम्ही कुठला ना क्लास लावला ,ना कोणी आम्हाला शिकवलं ,परिस्थिती आम्हाला घडवत होती .आणि आम्ही घडतही होतो .पण कोणासमोर वाकत नव्हतो,कधी आई-वडीलांनी कधी कुणाकडून काही उसनंवार मागायला सांगितलं तर आम्ही जात नसू. आमच्या घरी कोणताही मोठा पाहुणा आला तरी आम्ही भावंडांनीं कधीच पुढे पुढे केलं नाही .
दिवाळीला बाकी काही नसल तरी, बाबा,भाई, मस्त आकाश कंदील बनवत. या कंदीला साठी लागनारा पेपर बाजारातून खरेदी करून आणत. घराच्या बाजूलाच असलेल्या बांबुचा एक बांबू तोडून भाई व बाबा, त्याच्या पातळ लवचीक काट्या काढून आकाशकंदीलचा सांगाडा बनवायचे,सांगाडा बनवला की, मस्त रंगीत कागदाची कटींग करीत तो कागज चिकटविण्यासाठी आम्हाला गम लागायचा. तो भाई घरात असेल त्या पिठापासून तयार करत असे.आणि घरात कधी पिठ नसलं ,तर शेवग्याच्या झाडाला कोयता मारल्यावर जो डिंक मिळे,त्याचा वापर आम्ही गम म्हनून करत असू,आमचा हा आकाशकंदील दिवाळीच्या आधी दोन दिवस तयार व्हायचा. भाई बाबा,यांच्या हातामध्ये एक प्रकारे आर्ट ची कला सुबक होती. कंदील इतका छान दिसायचं बाजारातून नवीन विकत आल्यासारखा हुबेहूब वाटायचा...तयार झालेला कंदिल कुठे लावायचा, हे आधीच भाईच ठरलेल असायच. भांईने ठरवलेली जागा ही एखाद्या मोठ्या झाडावर उंच असे, आकाश कंदील आमच्या घरापासून जवळ जवळ वीस ते पंचवीस फूट उंचावरून लटकवला जायचा.
ही त्यावेळी गंम्मत वाटायची, नवल तर त्याहून असायच,की आपले भाऊ एवढ्या उंचावर कंदिल लावतात. तो उंचावरचा कंदिल लांबून पहिला तरी तो कुणालाही सहज दिसावा हा त्याचा मागचं निव्वळ हेतू असावा .अशी भाई बाबांची व्यवस्था चोख असे, कारखान्यातून विड्या वळायला घरी येत त्याना बांधण्यासाठी धाग्याने भरलेली रिळ येत ,ही खाली झालेल रीळ भाई बांबूच्या एका टोकाला बांधून त्यात पातळशी रस्सी टाकायचा तिच एक टोक आकाश कंदिला बांधे व एक टोक रिळातून खाली सोडी. काठीला व्यवस्थित आंब्याच्या झाडावर चडून ही काठी व्यवस्थीत बांधली जाई..... अर्थात त्यातून एक दोरी खाली सोडलेली असायची.. संध्याकाळी पणती पेटवून ,ती कंदील मध्ये ठेवली जायची .रीळातून जी दोरी सोडलेली असे ती दोरी हळूहळू खेचायला सूरवात केली की आकाश कंदिंल कसा वरवर जायचा. ते मनोहर दृश्य पाहून आम्ही उड्या मारून टाळ्या वाजत असू त्या टाळ्यांच्या गजरात कंदिल आपल्या योग्य ठीकानी जाई.. अशाप्रकारे भाई आणि बाबा कंदील आकाशात अधांतरी लटकत ठेवायचे .कंदील वर जायला लागला खुश व्हायचं आणि मनात एक कल्पना यायची देवाचे विमान आमच्या घरावर येऊन थांबले की काय??? एकदा न राहून आयेला मी हाका मारत बाहेर बोलवल...
""""गे आये पयली वायच भायर ये गे,"""
आमच्या आनंदात आये सामील होई परंतू दाखवत नसे, ती माझ्या हाकेसरशी बाहेर येई..
""""काय गो कित्याक बोलयतय""
"""काय नाय गे ह्यो कंदील बग"""
""""बगलय गो दुसरा काय ता सांग"""
अस एकीकडे म्हनत आये पन मन लावून कंदिल पाहायची, पण वर वर तस न दाखवता ती म्हनत असे..
"""सिरा तूज्या तोंडांर पडला ता! माका कंदील बगूक बोलवलय!! माका काय काम नाय काय गो? तुज्या बरोबर नाचाक मीया रिक्याम टेकडा नाय"""
"""आसाने गे ! तीया बगलयमा कंदील?? वाटता मा तूका देवावाचा इमान (विमान) आमच्या घराकडे येवन थांबला!!""
एकी कडे आये आपल हसू आवरत रागाने म्हणे...
""" होय तर!तो महादेव भेटाक इलो तुमका ! त्याका आणखी दुसरा काय काम नाय मगो"""
आयच अनपेक्षित उत्तर माहीत असल्याने मला काही वाटायचे नाही .पण कंदील छान दिसतो ना!! तेच महत्त्वाचे! आज काल कंदिल कुणी बनवताना दिसत नाही...विकत कदिंल ,विकत फराळ ,जमल तर रांगोळीचे तयार साचे मिळतात ,तेही बाजारूतून विकत आणतात. सर्व काही पैश्यात मिळायला लागल्यावर ,त्यातली गम्मंत नाहीशी होत चाललेली. त्यावेळी घरधरणीन ,फराळ ती रात्र रात्र जागून करायची..आणि आग्रहाने खायला घालताना विचारायची कसा झालाय?घरातील मानसांची तीला दाद मिळाली की तीच ते मोठ बक्षिस असायच!! आता काही अवधीत सर्व काही मिळते...परंतू सणाची हौस मौज त्या रेडीमेंन्ड वस्तूत मिळत नाही. दिवाळीला फराळाने भरलेले डबे असतात ..परंतू आता मुलांना ते खावू वाटत नाही...परंतू चायनीज म्हनून बाजारात आलेल्या कुसक्या नासक्या पदार्थाची वा!वाह!होताना दिसली की लहानपणीचा तो पोह्याचा चिवडा पाहताच तोंडाला सुटलेल पाणी,चकलीचा तळताना तो सुगंध नाकाणे पून्हा घेत घेत माजघरात पोचायचे,,आय़ेचा लक्ष नसताना एक चकली घेवून पळ काडायची मजाच काही और होती.. आता हे फक्त काही घरापुर्त मर्यादीत राहीलय!!
सण साजरे होत नाही अस नाही. ते होतात परंतू मानस बदलत चालली आहे. आपले संस्कार आपल्या मातीतली ती गोडी संपली...अस क्षण भर वाटत.. त्यावेळी आमच्या गावी विजेवर चालनारे दिवे नव्हते. पण रॉकेल घातलेली चिमणी घरातला काळोख दूर करायची. रात्रीचे घरात टिमटिम करणारे दिवे पाहिले की की मनाला आनंद होत असे .आज जो काही बदल घडतोय , तो काळानुसार बरोबर आहे.परंतू काळ बदलत असला तरी संस्कृती बदली होता कमा नये...नको असलेली आणि त्यावेळी काही घातलेली खुळचट बंधन जुगारली तरी चागलच .परंतू सणावारांची महती ही हरवता उपयोगी नाही... आमच्या लहानपणी जे मिळायचे त्यात खुशी ती असायची. आम्हाला पाहून समोरचा ही आमच्या खुषीत खुष व्हायचा. दाजी दिवाळी पहाटे आंघोळ आटोपल्यावर सातीवन या झाडाची साल काढून आणायचा. पण त्या झाडाच्या मुळाशी पहीले 5 ते 10 पैसे ठेवायचा...तेव्हा प्रश्न पडायचा या झाडाला कुठे जाता येत नाही.मग हे झाड पैशाच काय करनार?
प्रश्न साधा होता.पण त्या मागच गमक नंतर उलघडल...
म्हनजे कूणाकडून कोणतीही वस्तू फुकट घ्यायची नाही...हे दाजीन तेव्हा तोंडाने न सांगता कृतीतून आम्हाला शिकवण दिली....आम्ही अस बरच काही घरातून शिकत गेलो...
सातीवन झाडांची आणलेली सालीचा रस काडून तो आम्हा सातही भावंडांना प्यायला द्यायचा. तो आम्हाला नको असला तरीही तो बळजबरीने प्यायला लागायचा.कारण घरात अशी शिकवण होती. या दिवशी या झाडाचा रस प्यायला पाहिजे. आम्ही हसत हसत प्यायचे..हा काडा आम्हाला यासाठी दीला जायायचा की पोहे पचनाला जड असतात .आणि मुलांना ते बाधू नये ,म्हणून ते खायच्या आधीची ही संजवणी बुटी असायची.. रसाच्या सेवना नंतर अर्ध्या तासाने उकडलेली रताळी, काळ्या वटाण्याची उसळ ,गोड आणि तिखट पोहे ,असा फराळ दिवाळीला पानात वाढून मिळे. त्याआधी हा फराळ देवाला नैवेद्य म्हणून दाखवला जाई. मग आमची पंगत बसून आम्ही पोटभर पोहे खाऊन झाल्यावर घरात सर्व रिकामी व्हायचे मग बायका मात्र घरातली छोटी मोठी काम करायची. या वेळी सुगीचे दिवस चालू होत. पावसाळ्यात केलेले पेरणीचे भात यावेळेस कापण्या योग्य व्हायचे. आणि आमची सहामाही परीक्षा याच वेळी असे.अशा परिस्थितीत आम्ही होईल ती मदत घरच्यांना करत असू.जेमतेम सहा ते सात दिवस परीक्षा असायची.. नंतर चार दिवस आम्हाला दिवाळीची सुट्टी असायची .यावेळी आम्ही शेतात जाऊन भात कापणीला मदत करू .ते घरी आणायला ही मदत करत असू, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या पुरातन असलेल्या देवालयातील सातेरी आणि कलेश्वर या देवांची जत्रा ही याच वेळेत यायची. हा जत्रोत्सव चालू झाला जत्रेसाठी पैसे हवे असायचे .घरातून आम्हाला जास्तीत जास्त चाराने किंवा आठ आणे, जास्तीत जास्त एक रुपया मिळायचा. ते आम्हाला पुरत नसत .म्हणून मी आणि राजा आम्ही दोघ, आमच्यासाठी शेत कापणी झाल्यावर ,रिकामी कोपर-यात, पडलेल्या व चुकून राहिलेल्या भाताच्या लोंब्या जमा करायचें हे भात जमा करण्यासाठी आम्ही भात कापणी करून झालेले अनेक वाफे तूडवत अधिकचे भात जमा करू व ते विकून प्रत्येकी चार ते पाच रुपये कमवायचे .आणि जत्रेत मनाप्रमाणे खर्च करत असायचे..ते दिवस आठवले की डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात. बालपण कसंही असलं तरी ते छान असतं निरागस असतं, पण मनात असलेल्या इच्छा-आकांक्षा आकाशाला गवसणी घालणा-या असतात . अंगात उर्मी चे तरंग रंग आनंदाने एकत्र झाले की कोणत्याही गोष्टीची कमी वाटत नाही.आहे ते आणि स्व कष्टाचे धन कमी नसतेच मुळात..........
अवघड असत ते फक्त मनावर विजय मिळवण ,,त्याला प्रलोभापासून दूर ठेवायच..
मग ती प्रलोभने कतीही आकर्षीत करो,,आम्ही तिकडे दुर्लक्ष करत असू..
मानवी नात्यांच्या प्रेमात मात्र पडायच हा स्वार्थ मात्र साधला..
जर का जगात वास्तव्य करताना मानसांना कडे दुर्लक्ष कधी करायच नाही.. याच मातीतली मानस आपलीसी करायला फक्त गोड वाणी हवी.
कोकणातला माणूस आणि पंढपूरची विठाईच आई लेकराच नात ,जस लेकरू आपल्या आईच्या वात्सल्याला तहानेलेल असत. तसा कोकण वाशी विठाईच्या दर्शनाला तहानेलेला असतो.जिव्हाळा व जिवाच मोल अनमोल होत विठ्ठलाच्या दर्शनाने..
कार्तीक महीण्यात येनारी एकादशी..म्हणजे विठ्ठल रखुमाईची वारी ... कोकणातले अनेक वारकरी संप्रदाय पंढपूरला जातात.शूध्द भक्तीची ही सुदंर धवल कपड्यातली वारी टाळ मृदुंगाच्या तालात विठ्ठलाच नामस्मरन अंखड मुखात घेत तहान भूक विसरत निघाली की रस्त्या वर जणू वैकुंठ अवतरल्याची जाणीव होते.युगे युगे कटेवर हात ठेवून माऊली जणू यांच्या प्रतीक्षेत ऊभी आहे..प्रेमा पोटी..भंगवत रूपी सावळ्याची प्रतीक्षा कधीच संपत नाही. हा पांडूरंग
केवळ भक्तीचा भूकेला असतो. त्याच भक्तीची कास धरलेली असते..कोकणातल्या मानसाने,भक्तीची कास अखंड ठेवण्या करीता वारी ही पंढरीची होत असते..
दिवाळी संपली की लगेच चार दिवसानी तुळशीच्या लग्नाची तयारीे प्रत्येक घरोघरी जय्यत अससायची. कोकणात हिंदूच एकही घर तुळशी वृंदावीना दिसनार नाही..प्रत्येक घरा समोर अंगण मधीच घराची शोभा वाडवत तुळशी वृंदावन ऊभ असत. वर्ष भरातील सर्व ऋतूना अंगावर झेलीत,ही जननी प्रत्येक घराची शोभा वाडवत असते...तीचे हे पांग फेडायला वर्षातून एखदा संधी उपलब्ध होत असते...ही संधी साधून प्रत्येक घरोघरी या तुळशी मातेच लग्न वर्षातून एखदा करायची प्रथा युगे युगे रामायण काळा पासून सूरवात झालेली.ही परंपंरा जपत आजही तुळशीचे लग्न केल जाते. त्यावेळी लग्नात आम्ही मुले फार धमाल करायचे.. या लग्नाला तसा फारसा खर्च नसायचा ,त्यासाठी फक्त पावसाने खराब झालेल्या अंगण आणि तुळशी वृंदावन मातीचा असल्याकारणाने त्याची डागडुजी करायला लागायची .ती आम्ही बिन बेभाट करायचे . आमच्या घरच तुळशीवृंदावन हे मातीचं होतं त्यामुळे तिला आम्ही घर रंगवायला आणलेली माती वापरून तिलाही रंगवायचे ज्यादिवशी तुळशीचे लग्न असेल त्या दिवशी आम्ही स्वकष्टाने पांढरा दगड बारीक करून त्याचं रांगोळीत रूपांतर करून ठेवलेलं असायचं त्यांच रागोंळीने तुळशी पुढे रांगोळ्या काढायचे...नाव फक्त रांगोळी असायच,चित्र तर आम्ही शाळेत चित्र काडायला शिकवत तो चित्र कलेचा तास आम्ही अंगणात पूर्ण करू, आमच्या चित्रकलेच्या तासाला आम्हाला अंगणही छोट पडायच...चित्र कसली ती!!!कोणी पाहीली तर कुणालाही वाटाव की रांगोळी अंगणात सांडवलेली असनार.... घरात कधी कधी शेण सारवायचा कंठाळा आला की मोठी मानस शेणात पाणी टाकून ते पातळसर पाणी करत , आणि हे पाणी घर भर शिपंडत ,याला कोकणातल्या भाषेत शेण शिंताडा केला अस म्हनतात...तसच काहीस आम्ही रांगोळीने अंगणभर
रांगोळी -शिंताडा करत असू...
चित्रे काडण्यात आमच्यात हुशार आणि बाई मानसांनाही मागे टाकनारा अन्ना होता...बाकी माझी तर नुसती बोंब असायची..आवळे व चिंचा तुळशीवृंदावनात भाई किंवा बाबा आणून टाकत , नाना (वडील) आमचा ऊस आणून तुळशीत ऊभा करी त्याला वाड म्हनत असू..आमच्याकडच्या रिवाजानुसार बांबूची एक का
ठी, एक दिंड्यांची काठी, भाई तुळशीत उभ्या करायचा तुळशी मातेला सजवून संध्याकाळी लग्न लावण्यात येई.तुळशीचे लग्न करताना नवरामुलगा म्हणून प्रत्येक वेळी बाबाला वराच्या रूपात ऊभ केलं जायचं, या शिवाय दुसरा वर आमच्या घरात मिळत नसे.लग्नाच्या नंतर पूढचे काही दिवस आम्ही बाबाला चिडवण्यात घालवत असू....आमच्या चिडवण्या मुळे तुळशीविवाहासाठी नवरा मुलगा, कोण तयार व्हायचाा नाही..अगदी लग्न घटीका जवळ येवून ठेपली तरी आमच्या घरातील अविवाहीत वर गायब व्हायचे..त्या मुळे मोठी आई वैतागत म्हनायची..
""""घरात पाच पाच नवरे आसान एक पन तुळशीकडे ऊभो रवना नाय काय जाला रे तुमका???राजग्या तीया तरी जा रे"""
"""गे आई मीया न्हान आसय गे!!आणि शाळेत जातय मा"""
"""मेल्या शाळेत गेलय तर काय जाला, जा उभो रव """
"""मीया नाय तीया अन्नाक सांग गे तो बघ बसलो,आणि तो मोठो पण आसा"""
अन्नाचा नाव वरासाठी आमच्या पैकी कुणी सुचवल की समजून जाव...आपली जशी जेवणाची न्याहरीची वेळ होते.,तशी अन्नाच्या हातचा मार खाण्याची वेळ जवळ आली आहे...
आता राजाने तर जाहीर पणे नाव सुचवल होत...गुपचूप इशा-याने बोट दाखवल तरी चालल असत...पण कृती करूण झाली त्याला नंतर कोणी काही करू शकत नाही....
मी मात्र विस्फारलेल्या डोळ्यानी राजाकडे पाहात राहीली ..
मनात मात्र माझ्या एक कडव आल...
नाच रे मोरा आमच्या घरात...राजग्या तुजी पाळी!!
अन्ना घालतलो गाळी!!अस मनात येत तेवड्यात अन्ना बिजली कडकडावी तसा खणखणीत आवाजात राजाला म्हणाला...
""""ये मेल्या तुका सांगत मा ती!!!माजा नाव कित्याक पूढे केलय!!!तुका ढवळा ढवळ करूकच व्हई..नाय तर जमना नाय....मेल्या चल भायर तुजा आता मीयाच होकले शिवाय लगीन लायतय...
ही अशी डबल बारी बंद होता होत नसे....मग मात्र सर्वाला कंठाळून बाबा आमचा वर म्हनून पूढे जो आला तो आगदी त्याच लग्न होई पर्यन्त तुळशीच्या लग्नात बिन बोभाट बाबाची एक मताने निवड व्हायची.
मग हे लग्न एकदाच पार पडल
की प्रत्येकाला कुरमुरे वाटत, अशाप्रकारे एका घराच लग्न संपलं की ,आम्ही अनेक घराच्या लग्नात हजर असायचे, आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे या लग्नाला जाताना नवीन कपडे हवेच असे नसे.त्यामुळे आम्ही कुठेही केव्हाही लग्नाला हजर राहू व कूरमू-याने पिशवी भरून आम्ही घरी यायचो.अस काही कूठेही प्रोग्राम असला की राजा आणि माझी जोडी तिथे हजर असायची .आम्ही प्रत्येक क्षणाचा आंनद अगदी बेमुराद लुटायचे. आज मात्र परिस्थिती तशी राहिलेली दिसत नाही कुठल्याही सणाचा आनंद आम्ही घेत असून तसा आनंदात कोण आजकाल घेताना दिसत नाही शहराकडे राहत असलेल्या मुलांना तर तुळस कोण ?तीच लग्न का लावतात ?ही माहिती असणे तर दूरच ,पण तुळशीचे लग्न असते हेच माहिती नसते . आज जग नुसत नविन नविन फँशनच्या विळख्यात अडकत चालय.. पालक वर्ग देखील सकाळ पासून बिजी असतो.. त्यांना आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यावी पण ते दूरच राहिलं .परंतू आपल्या गावी आज अमुक सण आहे..त्याच महत्व अस असत..किंवा अस आहे ..अशी माहेती देखील सांगायला जड जाते..आपल्या सणांची महती आणि माहिती फक्त हातावर मोजण्याइतपत घरांना माहीत असते.बाकी काही सण काही घरातून इतिहासजमा झाले... मुलांना सण म्हणजे फक्त दिवाळी-दसरा आणि गणपती या सणा अतिरिक्त त्याला सण माहिती नाही .तेव्हा प्रत्येक सण वार गरीब असो की श्रीमंत सारेजण रितीरिवाजानुसार साजरे केले जायचे. तुळशीच्या लग्ना नंतर दोन महिने तरी आमचे कुठलेही सण नसतात. व आमची नित्याची कामे ठरलेलीच असायची शाळेतून घर घराकडून पून्हा नदीवर आंघोळीला जावू या वेळात नदीच पात्र थोड कमी होई, पाण्याचा कमी झाल्याने आम्ही शाळेतून आल्यावर किती आघोंळीला जात असू.. पाण्यात मस्त पोहूण घरी येऊ फेब्रुवारी च्या नंतर हे पाणी आठल जायच, त्यामुळे उरलेले पाणी खड्डयात जमा व्हायचे तेव्हा आम्ही नदीवर जाण सोडत असू.. साधारणपणे डिसेंबर महिन्यापासूनच थंडीला सुरुवात होई.शाळेत जाताना अनवाणी असल्याने आमचे पाय थंडगार व्हायचे .चालताना जरा जास्तच त्रास व्हायचा. या अतिरिक्त अंगात आमच्या रोजच्या कपड्या शिवाय घालायला दुसऱे कपडे नसल्याकारणाने अंगाला देखील थंडी झोबंत असे.. पायाला खाली पडलेल्या दवा मुळे त्रास व्हायचा. तरी त्या थंडीत चालताना एक वेगळीच गंमत वाटे.धुक्यातून वाट काढत काढत आजुबाजुला फुललेली जास्वंद गुलाब झेंडू इत्यादी फुले पाहून मनमुराद प्रकृतीला दाद द्यावीशी वाटायची....तेव्हाची थंडी..अनवानी पाय असल्याने.एखादा खडा टोचला की आई आठवायची.. थंडी मुळे आणि लाल माती मुळे पायाला भेगा पडत...गरम कपड्याची कमी असल्याने अंगावर देखील चरे पडत तरीही आम्ही त्याही परस्थीत अनवानी चालत जावू...आज पैशापेक्षा कपडे आणि एक चप्पल जोडा पेक्षा जास्त सर्व आहे...तरी मन भरत मात्र नाही...परीनामी मानसांच्या गरजा वाडत आहे...गरजांचा अंत नाही त्या अनियमीत चालूच आहेत ...परंतू मानूस त्यांच्या मागे धावत असतो...तो कुठेही थांबायला तयार नसतो....जेव्हा थांबतो.. तेव्हा त्याला कळत देखील नाही....की आपन गरजांचा पाटलाग करत करत मृत्यू हे स्टेशन गाठलेल ....
"खरोखर प्रत्येकाने एखदा तरी बालपणात हरवून पाहव..
नुसत्या उनाड्या करताना वाटेतली ती मस्तीअनूभवावी,आमराईत धावताना हळूच वा-याशी ही पाटशिवणीचे खेळ खेळावे..पून्हा पून्हा या देहाला बालपणात नटवून पाहव, वाटेतल्या वाटेत घडी भरचा विसावा घ्यावा ,तीथेच कुणी तरी संवगंडी भेटावा..क्षण दोन क्षण शब्दांची देवान घेवान असावी.मैत्रीची गाठ तीथेच बसावी...परतीच्या वाटेवर आपूलकी जपावी...श्रद्धेने भक्तीची दोन फुले तीथच अर्पावी .अशी मैत्री आयुष्य भर टीकली, तर त्या मैत्रीचा गोडवा कायम मन मनात रूजला की त्याची पाळे मुळ कशी मनात घट्ट रूजलेली असतात...
डीसेबंर महीना लागला की आमचे सण देखील थंडी मधे लोक विसावा घेतात .तसे हे
गडप झालेले असतात...परंतू याच महीण्याच्या लास्ट विकला ख्रिश्चन धर्माचा सर्वात मोठा सण नाताळ येतो..गमंत म्हनजे यांचा हा सण दरवर्षी न चुकता 25 तारखेला असतो..हे विषेश.त्या मुळे आम्ही हा सण कधीच विसरत नसू.माझी आये ,आमच्या घरापासून 25मिनिटाच्या अंतरावर एक ख्रिश्चन धर्माच घर होत.तीथे आये नेहमी त्यांच्या शेतातली कामे करी...कधी कधी त्यांची अधिक जमीन असल्या कारणाने ते आयेलाही भाजी पाला लावायला सांगत . आये मग तीथे स्व:ताचा मळा पिकवी...आणि त्यांचही काम करी..या मळ्यात आये भाजी पाल्या बरोबर कांदा ,मिरची, व चवळी, यांच ब-या पैकी पीक घेई...आये जो भाजी पाल्याचा मळा लावी त्याला आम्ही पोरसू म्हनू या पोरसात मी देखील आये बरोबर पाणी शिपांयला जाई..त्यावेळी त्याच्या घरी जाई.त्यांच आडनाव बस्ताव अस होत...या बस्ताव कुठूबांला फक्त चार मुलीच होत्या...तीघाची लग्न झालेली होती तर चौथी बेबी ही 9वीला शिकत होती...हळू हळू मी आणी बेबी बरच बोलत असू...बेबी माझ्या पेक्षा निदान 9 वर्षे तरी मोठी असल्याने मी जरा हातच राखूनच बोले पण बेबी मात्र माझ्याशी काही बोले....शाळेत काय झाल वैगरे ती चवीने वर्णन करी..
मला सर्वच काही कळत नसे .पण पांगूळ बैल घेवून जसा मानूस दारात येतो...तेव्हा तो अधिक धन मिळाव म्हनून काही ना काही चांगल बोले,त्यावर हा पांगूळ बैल मान डोलवत असतो,अगदी तशीच मान मी बेबी बोलताना डोलवी...पूढे पूढे बेबी मला काहीना काही खायला देई...मी पण ते अगदी आपूलकीने घेई..
काही दिवसांनी तर ही बेबी मला चक्क जेवणाचा आग्रह करी...मला जीतीच बंधन माहीत नव्हत ,बंधन फक्त एकच होत .ते म्हणजे पोट भर पोटाला हव...आये तर त्यांच्या घरी पाणी पण प्यायची नाही..
पण मी मात्र बेबी मला जे देई ते खात असे..
गावात त्या वेळी जातीय वाद समुळ नस्ट झाला नसल्याने मी गुपचूप बेबी जवळ जेवत असे. व घरी कूणाालाही सांगत नसे..
परंतू आयेला मात्र माहीत असाव कारण बेबी कडे जायला लागल्या पासून मी भूकभूक करत नसे..पण तीन कधी जानवू दिल नाही..बेबीने देखील कधीच याची वाच्यता बाहेर केली नाही..नाताळाच्या आधी एक दिवसापासून मी बेबीजवळ नाताळ संपेपर्यन्त जात नसे...परंतू बेबी मात्र
मला जे काही घरी बनवलेल असे ते राखून ठेवत असे..आणि मला कुणा करवी निरोप पाटवी..
मी गेली म्हनजे मला पहीली ओरडे नतंर जे काही केलेल असे ते खायला घाली..पण जेवण देत नसे .कारण नाताळाच्या दिवशी त्यांच्याजवळ घर डुकराच मटण बनवल जाई....त्या मुळे ती मला शिजलेल काही देत नसे सुख खाण मात्र भरपूर देई...माझ्या साठी रीबन बांगड्या वैगरे नविन देत असे...25 डिसेबंरला आम्ही चर्च जवळ नाताळ पाहायला ऊभे राहीलो की ओळखीची मानस आम्हाला कुल्फी घेवून देत असे...अश्या प्रकारे 8ते 10 कुल्फ्या आम्हाला मिळाल्या की आम्ही घरी येवू...मी चौथीला गेले आणि बेबीचे वडील वारले..
नंतर बेबीच्या आईने घर विकले ...तीची मोठी मुलगी पण वारली....मग बेबीला घेवून ती मूबंईला गेले...नंतर एकदा बेबी मला भेटली तेव्हा मी 6वीत होते.लग्न झालेल होत .नवरीच्या रूपात बेबी सुदंर दिसत होती..त्या वेळी देखील बेबीने मला 10रू .दिले नतंर मात्र भेटली नाही परंतू तीच्या उपकाराची जानीव मनात घर करून राहीली...जात ना ,पात ,ना, मायेच, ना धर्माची .कोणाची कोण, पण जीवाला जीव दीला तुकड्यातला तुकडा तोंडात घातला...मागे पूढे न पाहता नविन नविन कपडे सणा वाराला घालायला देनारी बेबी मोठ्या बहीनी सारखी माया लावून गेली..परजात असून बेबीने लावलेला लळा,आठवतो. आणि त्यावेळी धर्म भ्रष्ट झालाय अस टाहो फोडना-या मानसांना सांगावस वाटत...जाती धर्म हा पोटाला माहीत नसतो. त्याला एकच धर्म समानतेचा माहीत असतो...जाती धर्म पोट भरलेली मानस पाहत असतात. परंतू काही मानस त्याला अपवादही असतात...भूक लागली, आणि ती सहन करण्यापलीकडे गेली की जगण्यासाठी काय हव असत...फक्त अन्न.तेव्हा जात दिसत नाही .धर्म दिसत नाही.जानवते ती भूक ,ही भूक मानसात फार मोठा बदल घडवते.जे कुणी केल नसेल ते करायला लावनारे मानसाचे पोट असते..पण पोट भरून देखील नको ते करणारी मानस मात्र हैवानच असावी...बेबी गेली त्या नंतर मी बरीच उदास झाली मात्र काही दिवसात सावरली...आणि नेहमी शाळेतून सूटली की रस्त्याने घरी येई वाटेत चर्च दिसली की बेबीची आठवण येई .मग तीथेच घुटमळत राही..अशीच एखदा घुटमळत असताना चर्चभोवती असलेल झाडानी वेढलेल कंपाऊन्ड जवळ लक्ष गेल तीथे लाल काही तरी दिसून कुहुतवल पोटी पूढे जावून पाहीले . आणि दप्तराची पिशवी बाजूला ठेवून मी आणखी जवळ गेली . आणि माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही . एका झाडाच्या बुंध्या जवळ नविन कोरी एक लाल साडी,लाल बांगड्या,लाल रीबन,लाल गंधक काजळ डबी आणि काही चिल्लर ठेवलेली पाहीली .आणी मनाला लालचेन घेरल..मी पटकन आजू बाजूला कुणी पाहात नाही ही खात्री करूण घेतली..आणि पटापट साडी अतीरीक्त सर्व सामान माझ्या पिशवीत भरून तीथून निघाली...साडी आवडली होती..पण आयेन विचारल तर काय सांगनार .शिवाय ती लपवनार कुठे या विचाराने घेतली नाही....नेलेल्या सर्व वस्तू मी बरेच दिवस वापरल्या...मग मोठी होत गेली तेव्हा कळल की मी ज्या वस्तू घरी आणून मजेत वापरल्या...त्या कुणी तरी उतारा करूण ठेवलेल्या होत्या...आणि तेव्हाच कळल की भीती पोटी ब्रम्हराक्षस देखील दिसतो...पण मला काही माहीत नसल्याने मला काही झाल नाही...करणी करतूत असले प्रकार भोळ्या भाबड्या लोकात तेव्हाच येतात..जेव्हा व्याक्ती घरासाठी दिवस भर राबून देखील हाती काही लागत नाही...घरात अजारपण आ वासलेल पाहील की मानूस हताश होवून जातो..अश्या परस्थीत त्याला चांगल वाईट दिसत नसत..दिसत असत ते घर आणि प्रपंच.त्यासाठी तो काही करायची त्याची तयारी असते...याचाच फायदा आजकालचे बाबा लोक घेतात... अशा बाबाच कसलस नावही असत..परस्थीने म्हणा काम नाही म्हना,किंवा पैसा घरात टिकत नाही म्हना,किंवा घरच्या कलहाला कंठाळून भोळी लोक या बाबाजवळ जातात... जाताना खाली हात कस जानार म्हनून कोणाच तरी उसनवार करून नारळ ,अगरबत्ती,हार,केळी घेवून बाबाच्या दरबारी पोचला की हाच बाबा त्यांनाच प्रश्न ही विचारतो आणि उत्तरही विचारत असतो...
परस्थीतीतला मानूस:"बाबा घरात सुख नाही .काम नाही.मुल अजारी""
बाबा:'''बस बालका मला सांग तुझ कुणाशी भांडण झालेल""
मानूस:हो बाबा शेजारच्या घरी""
बाबा:""कीती महीने झालेत""
"""मानूस:""बाबा 6 महीने""
बाबा:""बापरे तरी बरा अजून जगलास आता पर्यन्त तू जायला हवा होतास पण पूर्वजांची पुण्याई ने जगलास,पण मला सांग भांडण कशावरून झाल"""
मानूस:"""दोघाच्या घराच्या मधी असलेल्या कुपंनावरून""
ही गमंत अशी असते..म्हनजे बाबा प्रश्न आपल्यालाच विचारतो..उत्तरही आपल्या कडून घेत असतो...परिनामी आपन त्यावर अती विश्वास टाकून कायम लोकांच कर्ज आणखी वाडवून त्याला ही कळत नकळ पोसत असतो...म्हनजे घरची जबाबदारी पार पाडता पाडता बाबाची ही जबाबदारी घेतलेली असते... अंधश्रद्धा असावी पण आपल्या देवघरातील देवापाशी गावातल्या मंदिरा पाशी परंतू नुसता आपसात कलह लावना-या बाबापाशी ती नसावी एवढच...आज कालच्या दुनियेत आपन वावरतो तीथे भूत नाहीशी झालीच...परंतू आपलीच वागणूक भूता सारखी पाहून खरोखरची भूत मात्र गायब झालीत हे नक्की...
क्रमश.
पूढे...