सानूल पण सोनूल बालपण - भाग 8
सानूल पण सोनूल बालपण - भाग 8


जानेवारी फेब्रुवारी थोडी फार थंडी असायची. आणि वार्षिक परीक्षा ही जवळ येत असल्याची चाहूल असायची. वसंत ऋतूची चाहूल तशी डिसेंबरपासून असायची. पण खरा बहर फुलांना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात असायचा. आमच्या परसात खूप फुलांची वेग वेगळी झाडे होती. त्यात एक सुरंग नावाचं आंब्या फणसां एवढ हे ही झाड असते..यावर नाजूक बारीक फुले येतात...पण ती काडायला झाडावर पिशवी घेवून चडायला लागत.. त्याचा सुगंध दूरपर्यंत पसरलेला असतो. याचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे फुले फुलायच्या आधी काडायची असतात... कारण ही फांदीला भरपूर येत..त्या मुळे आम्ही ती आदल्या रात्री कळीच्या रूपात काडू.. उरलेली सकाळीच काडू ती जमनिवर टाकली तरी चालायची. कारण ह्या फुलांना बाजारात जास्त मागणी असल्याकारणाने रात्री गजरे बनवून ठेवायचे. ह्या कळ्या काढून आणल्यावर आम्ही त्या चाळणीत घेऊन धुवायचे किंवा बांबूपासून बनवलेल्या रवळीत घेऊन धुवायचे. ही फुलं काढायला झाडावर आई-बाबा किंवा मोठी आई चढायचे. धुतलेली फुलं निथळल्यावर, या कळ्या जमिनीला लागू न देता, आणि त्या ताटलीत घेऊन त्याचे देट तोडून दोन बाजूच्या पाकळ्याना पिळ मारूण देत असू..अशा साफ केलेल्या कळ्यांचा आये,बाबा,किंवा मोठी आई गजरे बनवत.. हे बनवलेले गजरे सुती कपड्यात बांधून ते कौलावर ठेवायचे..हे काम फार जोखमीचे वाटे..कारण एकही कळी जमनिवर पडली तर ती फुलत नसे...म्हनून ते तेवढेच कंटाळवाणे...आणि झोपायला फार वेळ होई एरवी आमच्या घरात नऊ च्या सुमारास सामसूम असे...पण या फुलामुळे झोपायला रात्रीचे बारा तरी वाजत. त्या वेळचे झोपायला रात्रीचे बारा वाजणे म्हनजे जागरनच असे..कारण सकाळी पून्हा लवकर उठून रात्री केलेले गजरे बाजारात नेवू विकायला लागत.. व सकाळी आणलेल्या फुलांचे गजरे पून्हा विकायला जाव लागे. म्हणजे बाजारात आमच्या दोन खेपा होत..
हे गजरे घेवून मी आणि बाबा सकाळी पहिले एसटी स्टँन्डवर जात असू.. कारण सकाळी 6:30च्या एसटीने लोक आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी येत व गजरेही घेत. त्यामुळे मी आणि बाबा दोन वेगवेगळ्या बाजूला उभे राहत असू.... बाबा बोलका असल्या मुळे त्याच्याजवळचे गजरे सकाळी नऊच्या आत संपायचे..मी मात्र हातात गजरे घेवून तशीच पुतळ्याप्रमाणे ऊभी राही...कोण स्वत: माझ्याजवळ येवून भाव विचारला तर 25 पैसे सांगायचे देताना 20पैशात देवून टाकायचे...त्यामुळे माझ्याजवळच्या गजऱ्यांना माझा हात एवढा आवडायचा की ते नऊ वाजले तरी तसेच असायचे. बाबाजवळचे गजरे संपले की तो माझ्या हातातले गजरे जवळजवळ हिसकावूनच घेई. जेवढ्या चपळतेन तो हिसकावून घेई तेवढ्याच चपळतेने तो विकायचा..ही..एवढ्या सर्वजनांच्या मेहनतीने. दिवस भराचे 20ते 25 रूपये जमा होत असत..आम्ही सर्वच मेहनत करून हे एवढेच पैसे नशिबी असायचे..जर का प्रत्येकी आम्ही त्याची वाटणी केली असती तर..आमच्या घरच्या जन गणनेनुसार आमच्या वाटणीस दोन रूपयेसुध्दा आले नसते..परंतु एकत्रीत घरचा छोटा मोठा खर्च मात्र निघायचा... हल्ली मात्र एकत्रीत कुटुंब पद्धत बंद होत चाललेली आहे.एकत्रीत राहण्याचे फायदे फारच कमी लोकांना कळतात.तरी डोळे झाक करूण वेगळ घर वेगळ बि-हाड प्रत्येकाला हव असत.थोडक्यात राजा राणीच्या संसारात तिसऱ्याला सामवून घेण्याची क्षमता नसते...परंतू आम्ही तेव्हा एकत्र होतो.म्हनून प्रत्येक गोष्ट आम्हाला साध्य होत गेली...माझ तूझ ,मी पण,हे सर्व मनात आलच नाही..फक्त मनात असायच ते माझी मानस...त्या साठी कोणतेही कष्ठ करायला आम्ही तयार असू...आपण घराला हातभार लावतो .हेच समाधान असायच.आज वाडवडींलानी कमवलेल,सर्व मुलांना हव असत...परंतू वेगळेचार होताना, वाडवडीलांचा ओझ मात्र वाहायला कोणी नसत...मुळात आपण त्यांच्या पासून आहोत.ते आमच्या पासून नाही...ही भावनाच मुळात मरत चाललेली आहे...
काही का असेना या फुलांच्या जीवावर मात्र आमचे दोन महीने मस्त जायचे...पण शाळेचा मात्र बट्या बोळ व्हायचा.या सिजन मधे मी जवळ जवळ एक महीना तरी गैरहजर असायची..त्याचा माझ्या आयेला कसलही दु:ख नसायच..मी मात्र आतल्या आत घरात कुणाला नाही, पण जे झाड आमच्या उदरनिर्वाहात भर टाकायचे त्यालाच दोष द्यायची.. या दिवसात एक गोष्ट छान असायची.ती म्हनजे आमची पूण्याची काकी तीलाही आम्ही आईच म्हनू ती जेमतेम पंधरा दिवसांकरीता राहायला येई...ती आली म्हणजे आम्ही फुले नीट करायला रात्री बसलो ,की आम्हाला झोप येवू नये म्हनून छान छान कथा सागत असायची..तीच्या काहाण्या फार गमंतीदार असत..ऐकताना आम्ही हसून हसून लोटपोट व्हायचे..आणि त्या काहाण्यातल टाँनिक आम्हाला तरतरी देई व झोप दूर पळे..आणि फुलेही साफ लवकर कधी होत कळायच ही नाही..
आमची ही आई स्वभावाने प्रेमळ तर होतीच शिवाय समजदार ही होती..तीली मानसांना आपलस करण्याची देवाने फार मोठी देणगी दिली होती. तिला तोड नाही.. आई आली म्हणजे तीही आमच्या संसाराला मदत करी..आईचा मुलगा त्याला आम्ही दादा म्हनतो...दादाही आमच्या घरासाठी मदत करी..आई व दादा यानी आमच्या घराला मदत रूपी जे साह्य केल त्याला तोड नाही..व ते विसरता ही येण्या सारखे नाही.. आमच्या अन्नाला पुण्याला नेवून कामालाही लावनारी आमची आई,व लावलेल्या कामावर जीद्दीने टिकून राहनारा अन्ना आईच्या मुलांच्या तोडीस उतरला हे तेवडच खर..आज अन्नाच्या हाताने होईल तेवढी मदत तो आम्हा भावंडाना करतो..आजही अाम्ही बिकट परस्थीतीत असलो की अन्ना ला सांगतो ..आम्ही सांगीतलेल्या प्राँब्लेम अन्नाने आपल्या परीने सोडवला नाही अस कधी आज वर झालेल नाही.. अन्नाची बायको माझी वहीनी देखील तीतकीच प्रेमळ आहे...मी पूण्याला गेली म्हनजे जसी आई मुली साठी करते तशी माझी वहीनी मला काय हव नको ते विचारून देत असते... अन्ना ने माझ्या करीता जे द्यायला सांगेल ते.मग ती साडी असो किंवा पैसे असोत वहीनी कधीही न रागवता आतल्या आत न धुमसता देते....त्या मुळे आई सारखी माया लावनारी वहीनी नशिबी लाभली हे तेवढच मोठ भाग्य...
माझ लग्न माझ्यापेक्षा मोठे असल्या दोन्ही भाऊंच्या अगोदर झाल..लग्न मूबंईत असल्या कारणाने,पूणेकर आई व दादा आम्हाला घेवून प्रथम पूण्यात आणले..तीथून मग मूबंईत आईची मोठी मुलगी आक्का हीच्या घरी आलो...माझे वडील नाना यांना दम्याचा त्रास व्हायचा..त्यामुळे ते येवू शकले नाहीत...मी त्यांची एक लेक असून माझ कन्यादान माझ्यासाठी कष्ट करणा-या आयेच्याही नशिबी नव्हते..व नानाच्या ही..याच दु:ख मला आजही होत.. आणि त्या वेळी तेवढच दु:ख नाना आयेलाही झालच असनार यात तिळ मात्र शंकाच नाही.परंतू काही गोष्टी आपल्या हाती नसतात.आणि विधिलीखीत जे असत तेच घडत..त्या प्रमाणे माझ कन्यादान दादानी केल..व भाऊ होताच पण कन्यादान करून वडील झाले..दादानी आजही हे नात घट्ट धरून ठेवल ...माझ्या परस्थीती मुळे मी दादाच्या घरी कसलेही मंगल कार्य असो कींवा आणखी काही मी कधीच तीथवर पोचत नाही .. त्याच सल मनात आहेच.पण मी जात नाही म्हनून...दादा मात्र माझ्या घरच्या मंगल कार्यात मी बोलवल आणि दादा आला नाही अस कधी होत नाही..दादा वहीनीला घेवून येतात..व आशिर्वादाच पाठबळ देतात...खरच दादांचे अगणित उपकार आहेत माझ्यावर ते कधी फेडायला या जन्मात तरी जमनार नाही. आणि पुढच्या जन्मात फेडेन अस म्हनारही नाही..कारण माझीही तशी ईच्छा नाही..कारण तूम्ही मोठे आहात आणि कायम माझ्यासाठी प्रत्येक युगात मोठेच असावे.व तूमचा आशिर्वाद मला मिळत राहावा ...अस मना पासून वाटते..
"नोव्हेंबर महिन्यात सरासरी प्रत्येक गावातील ग्राम देवतांच्या जत्रा चालू व्हायच्या...मी आणि राजा आमच्या नगावतल्या जत्रेत कोणी येवू ना येवू आम्ही दोघ मात्र जात असू .... आम्ही रात्री मन लावून दशअवतारी नाटक पाहत असू...रात्र भर जागरण करूण आम्ही सकाळी घरी आल्या आल्या झोपत असू तो दिवस आमचा झोपण्यात जाई...त्या दिवसा नंतर आम्ही घरी जत्रा करायचे ठरवू .गावात जत्रेत देव बाहेर काडतात ते महत्वाच्या ठीकाणी वहीवाटी नुसार जावून येत...तसे सर्वात आधी आम्ही दोन तीन बांबूच्या काट्या घेवून ...आये, माई, आते ,आणि आईच्या जुण्या फाटलेल्या साड्या घेवून त्या बांबूला बांधून देव फीरवून आणू..नतंर दशअवतारी नाटक करायचे त्या साठी लागनारी तलवार आम्ही नारळाच्या ज्या झावळ्या असतात त्याचा मधला चपटा भाग असतो. त्याला आम्ही पिडा म्हनू या पिड्याची तलवार कऱायचे.. नंतर आयेच्या फाटलेल्या साड्या अंगावर घालून झाल्या की मग तोंडाला रंग हवा असायचा..हा रंग आम्हाला घरच्या घरी उपलब्ध होई...कारण अस की आम्ही गणपतीला भिंतीवर कमळ काडत असू त्याला वेग वेगवेगळे रंग लावलेल असत..हेच रंग आम्ही तोंडाला फासून मेकअप करू...नाटकात राजाचा रोल करना-याला मिशी काडायची असे .हा रंग आमच्या भिंतीवरील कमळात नसायचा.. तो आम्हाला चुलीजवळ भाकरी भाजायला वापरात असलेल्या तव्यापासून मिळे.हा तवा चुलीवर ठेवून काळा होई..
,या कऴ्याला आम्ही घस म्हनू,ही तव्याची घस घेवून मिशि काडण्याच काम फत्ते होई....आता राहता राहत असे.ते नाटकाच नाव काय???
हे नाव आम्हाला सुचत नसे..आम्ही रात्र भर देवळात नाटक पाहू परंतू त्याच नाव गाव काही माहीत नसे..फक्त माहीत असे तो संकासूर..संकासूर आम्ही करत नसू...त्याला लागणारे काळे कपडे आमच्या जवळ नसत...नाव गाव नसलेल व जगावेगळ आगळ वेगळ नाटक आमचे आम्हीच करायला घेवू,, नाटक पाहनारा प्रेक्षक वर्ग तर कोणीच नसे..अशा वेळी आम्ही दोन्ही भूमिका पार पाडत असू..लढाईला सुरवात झाली...की मात्र आम्ही नाटक वैगरे विसरून मुळ रूपात येवून कोणी कुणाला ऐकत नसू...मधीच कुणी तरी आमच्या पैकी म्हणे..
"""ये मेल्यानू नाटक करतो मा आपून"""""
"""मगे काय जाला""
"""काय नाय रे पन भांडान कित्याक"""
""कित्याक म्हनान काय इच्यारतय,तो बग कसो जोरात तलवार चालयता माज्या हाताक लीगली मा"""
"""अरे चुकान लागली आसतली""
"""चुकान लागली मा मगे मीया राजा जालय तर हेनी पडान घेवक व्हया मा"""
""तर ह्यो माकाच उलटो सांगता माजी तलवार तुका लागली तर तू पडान घे"""
"अरे मगे पडाचा न्हय""
"""काय तीया मँड आसय,राजा कदी पडता"""
असं हे नाटक भांडणात रूपातंर होवून, मग मारामारी नावात बदली व्हायच...नाटक हे नाटक असत. ते तेवढ्यापुरत असतं.. हे कळत नसे..आज मात्र प्रत्येकजन खरे नाटकीमय जिवण जगत अाहेत... कारण आज-काल एकत्र कुठूब पद्दती बंद होत चालल्या आहेत.त्यामुळे प्रत्येक घरी मानस असूनही अवकळा आलेली. घरात इन मिन तीन मानसांत बोलन अगदी कमी होत. दोघ नवरा बायको सर्विसला एकाच मुल हव,ही प्रथा काहीसी चालू झाल्याच चित्र आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रा पाहायला मिळत. त्यामुळे त्या मुलाबरोबर खेळायला घरात कोणी नसल्याने ते मुल एक तर टिव्हीत किंवा मोबाईल किंवा आई वडीलांनी घेवून दिलेल्या गेम रूपी खेळण्यात रमते. त्यामुळे ते मुल साहजीकच आपल्यात रमत.परिनामी एकट पडत आणि एकलकोंड असत. क्वचित कुठल्या तरी घरी वस्कर मानस पाहायला मिळतात...नाही तर काही वयस्कर मंडळी मुलांना सेटल करून आपल्या गावात वेगळ बि-हाड थाटतात, कधी घरातील सर्व मंडळी कामावर गेलीली असल्याने घरी वयस्कर एकच व्याक्ती मागे असते. किंवा घरातील मानस कुठल्या ना कुठल्या कामात स्वत:ला वाहून घेत असल्याने, छोटी मुलं सोडली तर तीही घरी नसतात. सकाळी शाळेत जाणे उरलेल्या वेळात ट्युशनला. आणि संध्याकाळी आई-वडिलांबरोबर घरी येणे .एक प्रकारची मुलंही सर्विस करत असल्याची जाणीव होते. आजकाल अगदी मुल बालवीडीत गेल्या गेल्या ट्युशनला जात...तेव्हा हसू आल्याशिवाय राहत नाही .त्यामुळे क्लासेस कसे मस्त चालत असतात. क्लासेसची जेवडी जाहीरात मस्त तेवडीच फी ही भारीच असली, तर नवल नाही. त्यामुळे आमच्या मुलांवर क्लास मात्र वधारलेलेे, मुलांनी केलेल्या अभ्यासाकडे लक्ष देता येत नाही, म्हणून कमावण्याच्या नादात, ट्युशनला पाठवतो. परिनाम मुलांना शिकवण्याच्या निमित्ताने का होईना मूल जवळ येत होती..त्याचे आईचे संवाद होत..परंतू आता तस होत नाही..आई वडील मुलगा आणि सून आणि पाचव मुल यापैकी चौघे जण बाहेर जातात. मागे असनारी व्याक्ती बिचारी दिवसभर घरात असते. मग तिला दिवसभर एकटे एकटे वाटते छातीत जळजळते. करमत नाही .याचं कारण तीच्याशी संवाद साधायला जवळच कुणीच नसत.मानसातली माणुसकी संपल्याची जाणीव होते. काहीतरी करण्याची जिद्द माणसांमधे क्षणाक्षणाला वाढत आहे. त्यामुळे नातीगोती जपली जात नाहीत. सर्व नाती विसरून गेलेले आहेत. संध्याकाळी थकून भागून आलेली घरची सून कुणाशी बोलायला तीच्या शरीरात प्राण नसतो.
अशावेळी बोलणं सगळे अर्धवट राहते .परिणामी आजकालची घर यंत्रमानव वागत मशीनच्या रुपात धावत असतात. काहीतरी करण्याची जिद्दीत, लोभही वाढीस लागलेलाआहे. आपले छंद जोपासून पाहुण्यांचे स्वागत करणे .त्यांच्याशी गप्पा मारणे वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणे हे आता इतिहास जमा झाल्यासारखे वाटते .आमच्या लहानपणी येणारा पाहुणा सुखदुःखात सामील होऊन जायचं एकमेकांची खूप दुःख जाणून घेण्यात एक प्रकारची भावनिक गुंतवणूक असायची. पाहुणा होऊन जाणे , उंबरठ्याच्या बाहेरच चपलाचे ढीग पाहून मनाला प्रसन्नता जाणवायची, सुख दु:खात सामील होणे ,खळखळून हसणे, एकमेकास पाठींबा देणे.. व सामील होणे हे आता पहिल्यासारखं कुठे दिसत नाही. सतत काही हरवल्याची जाणीव होत असते .जेव्हा एखादी वस्तू मिळाल्याचं सूख मिळते,ती वस्तू सहज उपलब्ध होते .पण मनाला शांती मिळत नाही .याचे कारण मिळालेल्या वस्तूचे कौतुक करायला माणसंच नाही .माणसं असूनही ती आपल्याच विचारात मग्न झालेली ,असतात .मग ती वस्तू नकोशी वाटते. आयेने बाजारातून एक फुगा आणला होता. तो फुगा आम्ही सर्वांनी फुगवून पुन्हा पुन्हा हवेत सोडून देत असू हवेच्या दाबाने तो फूगा दूर पडे तो आणताना आमच्यात चढाओढ लागायची .तिला तोड नाही .आणि तो क्षण कोणत्याही पैशात मिळायचं नाही .फुगा फुटल्यावर जोरात चार घराला समजेल अस रडत असू. ती मजा काही वेगळीच होती .आणि आत्ता पहाडा एवढे दुःख मनातच मुरत असते. याची साधी जाणीव कोणालाच नसते .मोकळेपणाने कुणाला काही सांगता येत नाही. आम्हाला घरात कोणी मारले तरी, मी आणि राजा चार घर सांगून त्यांची सहानुभूती आणि खाऊ मिळवल्याशिवाय घरी येत नसू, आणि घरात कोणीच जोपर्यंत जवळ घेत नाही तोवर धुसमसत असू.., त्यावेळी मात्र कधी मनाला सभ्यतेच्या बंधनाने अडवलंच नाही ..आता या ढासळलेल्या बुरुजाला शिस्तीने बेजार केल्याचं दुःख वेगळच आहे. आजचा काळ पैशाचा असला ,तरी सहानुभूती मात्र हरवत चाललेली आहे. आजकाल प्रत्येक घरात माणूस कमी होत असल्याने घर अशीच भकास मालकाची वाट पाहत ताटकळत उभी असलेली दिसतात. प्रत्येक व्याक्तीत एक अभिमान निर्माण झालेला आहे. त्यामुळे कोण कोणाला विचारत नाही. त्यावेळची लोक जरी मुलाचा नामकरण विधी करायचा झाल्यास पंचवीस किलोमीटर पायपीट करून आमंत्रण देऊन येत असत .आता टेलीफोन आणि मोबाईल मुळे जग जितकं जवळ आलंय ,तितकच ते माणसांपासून लांब होत चाललंय......पहील सुख होत...त्या मुळे गरीबीच दु:ख नसायच समाधान असायच ते आपण सर्व एकत्र असल्याच...आयेन एकदा मजूरी करूण येताना पदराला बांधून मटणाच्या काही फोडी आणल्या होत्या...तेव्हा मी न राहून विचारलेल..
"""आये कोणी दिल्यान गे मटण""
"""कोण दिताला""
"""दिल्या शिवाय तीया आडलय"":
"""नाय गो ते माझ्या ताटलेत वाढल्यांनी .तूमका गावना नाय म्हनान त्या फक्त फोडी उचलून हाडलय..
"""अगे कित्याक तू खावचय ना""
"""नाय गो गळ्या खालसून उतराना"""
हे ते प्रेम जे दुर्मीळ झालय...ह्या प्रेमा खातर आम्ही गरीबीशी एकोप्यान लढलो....आणि एक वस्तू 7जनात वाटून खायला शिकलो... त्या मुळे आम्ही एकमेकात गुतंलो ते कधी आजवर वेगळे झालेले नाही..
एक हसरा चेहरा घरात असला की कठीणातल्या कठीण परस्थीत बळ मिळत...आणि त्या व्याक्तीमुळे ईतर सर्वांच्या चेह-यावर हासू उमटत असत.हस-या चेह-याच्या मानसात एवढे सामर्थ असते.त्याना जणू देवाकडून देणगीच मिळालेली असते.. असाच चेहरा आयेचा होता...विनोदी बुद्धी ,घरातली गरीबीला झाकत असे...आये जणू गुणाची खाण म्हटल तरी वावग ठरणार नाही.परंतू खाण सोण्याची असू की चांदी पितळेची.त्यात सोण्या चांदी बरोबर ईतर नको असलेल्या काही उपयोगात न येणा-या गोष्टी मिळतात.तस आयेत ही एक गुण आम्हाला आवडत नसलेला होता...तो म्हणजे ती जे सहज बोले त्या बोलण्यात एक प्रकारच टोचनार बोलन असे...यातूनच कधी तरी भांडणास काळ होई..बाकी तीच्या मनात काही नसे...पण मन हे अंतरात लपलेल असत...त्यात प्रेम दडलय,की,आणखी काही हे दिसत नसत.पण बोल मात्र कंठातून ,जीभेवर रूळत बाहेर पडतात.आणि नंतर कळत की निघालेले बोल अनमोल कीअनाठाई अाहेत.,बोल कडक असले की ते मन छेदनार एक अस्त्रच वाटत..असेच बोल काहीसे आयेचे असत.त्यामुळे घरातली,व बाहेरची देखील मंडळी दुखवली जात...आये कधीच नुसती रिकाम टेकडी बसत नसे...काही ना काही कामात ती स्वत:हाला व्यास्त ठेवत असे...अगदीच कुठे काम नसेल त्या वेळी देखील ही वाखळ शिवत बसे..वाखळाला आमच्या गावी गोधडी म्हनतात....आयेने गोधडी बनवायला घेतली , मला गोधडी धरायला सांगायची..मला हे फार कंठळवाण काम वाटायच .यात अर्ध्या पेक्षा अधिक वेळ आये बरोबर राहायला लागायच....सुईत धागा ओवून द्यायच काम ही गोधडी पूर्ण होईस्तोवर माझ्याच कडे असायच..मग मीही,आये गोधडी घेवून बसली की हळूच कलटी मारायला लागली की आयेची खाली मान असूनही मी तीला कशी दिसे हे मात्र कोडच होत..मी बाजूला होताच आयेचा अवाज घुमायचा...
""गो खय जातय"""
""कोण गे""
"""तीया ...गो...तीया..
"""मीया !!!नाय गे हयच आसय...
""असा मगे आता खय पळतय""
"""खयच नाय!!
मग माझे वडील नाना मधीच बोलत..
""जावदे तेका हय थांबान काय करताला"""
खरंच आपल्या मुलांच्या मनात काय चालय हे आई बाबांना बरोबर समजत... त्या काळी नाना आमचा अजारी असायचा .नानाला दम्याचा त्रास व्हायचा,पण जरा कूठे बर वाटल की नाना खांद्यावर नांगर टाकून शेतीच्या कामासाठी उपासी तपासी बाहेर पडे...त्याच अस बाहेर पडन भाईला पाहवत नसे..मग भाईची पाऊले देखील पंढरीची वाटेवर वारकरी चालतात,तसाच भाई आमचा नानाच्या मागे हळूच जावून नानाच्या खांद्यावरचा नांगर अलगद आपल्या खांद्यावर घेत असे.. त्या वेळी नाना काही बोलायचा नाही परंतू नानाच्या च्ह-यावरचे भाव भाईच कौतुकात करण्यात बुडलेले वाटत..व एक प्रकारच समाधान नानाच्या चेहऱ्यावर झळकत असे.. आपला मुलगा जेव्हा आपल्या बरोबरीने काम करायला लागला की प्रत्येक वडींलाचा उर कसा गर्वाने भरूण जातो..आणि आपण जग जिंकल्याचा आंनद त्यान मिळत असतो..तस काहीस नानाच व्हायच.. भाईने जे ओझ नानाच्या खांद्यावरून आपल्या खांद्यावर घेतल ते त्याने आपल्या अंतीम क्षणा पर्यन्त निभवल..भाई जस जसा मोठा होत गेला तशी आमच्या घरच्या परिस्थितीत सुधारणा होत गेली ...त्याच्यापाठोपाठ बाबा ही बाजारात दुकानावर काम करायला लागला...भरीस भर म्हनून शाळा शिकत असताना उर्वरीत वेळात अन्ना ही लाकडाच्या मिलवर काम करत असे..पुष्पा ही आमची बाजारात आयसक्रीम बनवायला जाई...एकूण आमची घरची सुधरणा होत होती..जीथे दोन टाईम हाता तोंडाची भेट मुस्कीलने होई तीथे,आता सकाळ संध्याकाळ आमची चूलीने रूसायच सोडून दिल होत.... साखर जी आमच्या कडे पाहुणी म्हनून सणावराला यायची ती आता रोज डब्यात ठाड मारूण बसायला लागली होती... पहीला गुळाने आमच्या घरी घेतलेला ताबा सोडला होता...ते फक्त कधी तरी हव असेल तरच येई... दाजीची पण पहील्या सारखी मदत होई .जोडीस जोड भरीला भर मिळत गेली..आणि घर आंनदात रमू लागल बाहेरची दोन मानस बसू ऊठू लागली...रूसलेली लक्ष्मी पून्हा मानान आमच्या घरी नांदू लागली, हे सर्व पाहून मी मात्र मनात हरकून जात होती...हरकन यासाठी होत की माझ्या जीवा भावाची मानस आता उपाशी मला बघावी लागनार नव्हती..
हे समाधान माझ्यासाठी फार मोठ होत..कारण या समाधाना पूढे सार जग माझ्या साठी फिक होत.. आता आम्ही शाळेत निघालो की आमच्या हातावर पाच दहा पैसे घरातून पडत होते. पुस्तक,खडू, पेन्सिल पेन वही जे शाळेत लागणार गरजेच साहीत्य सहज उपलब्ध होवू लागले.. अन्ना आता सीतवीत मी पाचवीत.आणि राजा मात्र चौथीत राहीला...त्या वेळी चौथीची परीक्षा बोर्डाप्रमाणे घेत असल्या कारणाने आमचे पेपर बाहेरून तपासले गेले होते...त्या मुळे राजा पून्हा चौथीत राहीला...पून्हा आमच्या परीक्षा झाल्या या वेळी आम्ही तीघही चांगल्या मार्कांनी पास झालो.. अन्ना ही सातवी बोर्डाच्या परिक्षेत पहील्या नबंरने पास झाला होता. आमची शाळा सातवी पर्यन्त असल्याने आता अन्नाची रवानंगी आता दुस-या शाळेत होनार होती..आणि राजाआणखीदोन वर्षे त्याच शाळेत राहनार होता... तर माझ 1वर्ष त्या शाळेत बाकी होत.. अन्ना आता दुस-या शाळेत जाणार ,त्याला शाळेचा गणवेष घालायला मिळनार म्हणून मी आतून नाराज होती.. आम्ही शिकत असलेल्या शाळेत गणवेष नसल्याने आम्ही एखदा सकाळी अंगावर चढवलेले कपडे दिवसभर वापरत असू..
पहिला कधी त्यांचा कंटाळा आला नाही.परंतू अन्ना दुस-या शाळेत जातो म्हटल्यावर मला कपड्याचा कंठाळा यायला लागला..जिवणाच गणित हे असच असत...जे मिळत नसते...मग आहे त्या गोष्टीत समाधान मानून राहव लागत.आणि एखदा का वस्तू सहज मिळायला लागल्या की पूर्वीची वस्तूचा टीटकारा यायला लागतो.माझही तसच काहीस होत... अन्नाचा दाखला वीडीतील गाजलेल हास्कूल वि.स.खांडेकर विद्यालयात झाल...त्याची चर्च्या घरात रंगत असताना मी ऐकत असे...मग त्याच शाळेत आपणही अन्ना बरोबर जाव अस वाटून मला देखील त्या शाळेच वेढ लागल.... मला वेढ लागल्यास नवल अस काहीच नव्हत...त्याशाळेचा गणवेष मला पहील्या पासून आकर्षीत करायचा.आता अन्नाला त्या शाळेत प्रवेश मिळाल्या बरोबर मला त्या गणवेषाने आणखी आकर्षीत करायला सूरवात केली..तर नवल अस नव्हतच..बाल मन ते शाळेच्या गणवेषात अडकत गेल...डार्क निळा स्कट,त्यावर आकाशी कलरचा शर्ट,निळा टाय,पाढं-या रिबन्स,खांद्यावर निळ्याच कलचे शोल्डर,पायात पाढरे शूभ्र शूज ,पांढरे साँक्स,एकदरीत तो गणवेष मला फार फार आवडायचा...एकदंरीत मी त्या शाळेच्या प्रेमात नव्हते ,तर गणवेषाच्या प्रेमात अडकली..आणि हाच लोभ मला नडला..ते कळायला उशिर लागला...पण मी अन्ना बरोबर त्याच शाळेत जाणार हे मनाशी ठरवल देखील..आणि मी एखदा ठरवल की ते करयची मग तीथे कूणाचही ऐकत नसे...आताही मी तसीच आहे.. माझ्यात बदल मात्र झाला नाही...मी आज देखील मनाच ऐकते दुसर कोण काही बोलते ते माझ्या पचनी पडत नाही...
मी अन्ना बरोबर शाळेत जानार हे आयेला सांगायच होत..पण कस तेच कळत नव्हत...आयेने परवानगी दिली असती हे तितकच खर होत...पण आधी ती काय करील याचा अंदाज नव्हता...पण मनान पक्क केल होत आयेला लाडी गोडी लावायची.. कारण शाळा सूरू व्हायला महीना बाकी होता....आयेशी बोलायला मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होती.. जिवणाच्या दृष्टिकोणातून साधरण पणे मागे पाहील तर अनूभव मिळतो...आणि पूढे पाहायच ठरवल तर मागील अनुभवावरून आशा..मिळते..याआशेच्या जोरावर आत्म विश्वास प्रबळ होत जातो..माझ्या मधे बाकी काही पाहण्यासारख नसल तरी आत्मविश्वास मात्र फार दाडंगा होता.. याच ईच्छा शक्तीच्या जोरावर मलाच काय पण राजा ला सुद्धा परवानगी वि.स.खांडेकर विद्यालयात जायला लवकरच मिळाली..याच सर्व श्रेयआमच्या घरी पुजा पाट सांगायला येत असणारे आमचे पौराणीक भटजी मुळे मिळाली.. कारण हे भटजी वि.स.खांडेकर विद्यालयात शिक्षक होते...त्यानीच आमच्या घरात सर्वांना एकदम शाळेत टाका अस सांगून आमचा बिन विरोध त्या शाळेत जाण्याची संधी मिळाली..आणि आम्ही तिघानीही वि.स.खांडेकर विद्यालयात प्रवेश मिळवला....
"मनाने काही करायचा ध्यास घेतला व ते आपण करण्यासाठी असमर्थ ठरत असलो, .तर मन पून्हा पून्हा तेच करायला भाग पाडत असते.. सतत मन मनाला विचारत असत.. अमुक गोष्ट करायला हवी होती..त्या प्रमाणे वि.स.खांडेकर विद्यालयात मोठ्या आंनदाने जसा सण साजरा करतात.त्या पद्दतीत आम्ही प्रवेश तर मिळवला... पण ईथे आल्यावर आम्हाला प्रत्येय आला.ही शाळा आमच्या जुण्या शाळेपेक्षा वेगळी वाटली.. इथली भाषा शूद्ध मराठीत, ती त्याच भाषेत बोलावी लागे...कूठे माझी शेणा मातीन लिंपन केलेली पूर्ण प्रार्थमिक शाळा,अन कूठे सिमेंट चुनखडी वापरून तयार केलेली ही शाळा..मला जरा अवघडल्या सारख वाटल.अन मनात आल आमच्या मनाप्रमाणे आम्हाला वाढवणारी,आम्हाला घडववणारी, आमची शाळा..दोघांच्या तुलनेत मला माझी जुणी शाळा सरस वाटायला लागली.मी शाळेत जाताच शोभा आली म्हनून माझ्या भोवती गरडा घालना-या मैत्रनी इथे दिसल्या नाही.मन खट्ट तर झालच,शिवाय इथली मुले,मुली जो वर्गात येई तो पहीले आमच्या तोंडाकडे पाहत होते.त्यामुळे आम्ही गावडंळ दुष्काळी भागातून ऊठून आलो की काय?असा मलाच प्रश्न पडत होता.. स्वतःला हीन असल्याची जाणीव मनात घर करू लागली.एक तर प्रथमच आम्ही या शाळेत आलेले,त्यामुळे आमची वेषभूषा तसीच गावंडळ दिसत होती..कारण अजून य़ा शाळेचा गणवेष आम्ही घेतला नव्हता..त्या मुऴे आम्ही खेड्यातून आले हे स्पस्ट दिसत होत..मी तर माझ्या वर्गात आजच आली हे कोणी पाहताक्षणी ओळखल असत.. मिडयम समाजातली पूरूष मंडळी मात्र श्रीमंत मानसात पटकन
सामवली जातात...कारण त्यांचा पोषाखात तेवढा फरक नसतो..परंतू मिडीयम समाजाची एखादी स्त्री मात्र तीच्या वेषभूषेनुसार ती सामवली जात नाही...ती पटकन ओळखता येते..माझ मन मात्र इथे रमेना ,मला सारखी माझ्या सवंगड्यांची आठवण येत होती.मी मनात म्हनत होते कूठली दुर्बुद्धी सुचली आणि मी इथे आली.. ही शाळा पाहून माझ्या जुण्या शाळेच कौतूक करायला मन उतावळी झाल.. माझ्या जुण्या शाळेची रीतच न्यारी होती. काही चुकलं माकलं तरी एकमेकाला समजून घेनारी कूठे माझी ती शाळा, कूठे ही शाळा जी मला गरीबीची जाणीव करूण देत होती. माझ्या त्या शाळेत शिकवत असणाऱ्या बाई गुरुजींवर आमच्या विशेष लळा होता .आम्ही थोडं कुठे उशिरा गेलो आमच्या घरात काही प्रसंग उदभवलेले असले ,तर गुरुजी आम्हाला समजून घेत . शनिवारच्या दिवशी आम्ही पाळीपाळीने वर्ग साफ करू त्यासाठी वर्गात बसायला नुसती जमीन असल्याकारणाने ती दर शनिवारी आजूबाजूला असलेल्या घरातून आम्ही शेण आणून जमीन सारवण करायचे.. आम्हाला मदत म्हनून काही मुलं पाणी आणून देत.त्या मुळे एकदम सातही वर्ग साफ करत असू. त्या शनिवारी आम्हाला विशेष काही अभ्यास नसायचा.. तेवढेच काम असायचं ते केल की सोमवारच्या गृहपाठाला सुट्टी मिळे..
"त्यामुळे माझी जुणी शाळाच सरस वाटली..मी शाळेत जाताच शोभा आली म्हनून माझ्या भोवती गरडा घालना-या मैत्रणी इथे दिसल्या नाही.मन खट्ट तर झालच,शिवाय इथली मुले,मुली जो वर्गात येत.व जसा कुठला तरी अजागळ प्राणी पाहात असल्यारख तोंड करत.आमच्या तोंडाकडे पून्हा पून्हा पाहत.त्यामुळे त्यांची नजर मला बोचरी वाटून मनात हीन भावना घर करत होती.
"एक तर प्रथमच आम्ही या शाळेत आलेले,कपडे साधेच रोज वापरातले असल्याने वेषभूषा तसीच गरीबीच प्रदर्शन करणारी, दुसर म्हनजे अजून य़ा शाळेचा गणवेष आम्ही घेतला नव्हता..त्या मुऴे आम्ही खेड्यातून आले हे स्पस्ट दिसत होत..मी तर माझ्या वर्गात मी आजच आली हे कोणी पाहताक्षणी ओळखल असत..माझ मन मात्र इथे रमेना ,मला सारखी माझ्या सवंदड्याची आठवन येत होती.मी मनात म्हनत होते कूठली दुर्बुद्धी सुचली आणि मी इथे आली.. ही शाळा पाहून माझ्या त्या जुण्या शाळेच कौतूक करायला मन उतावळी झाल.. मी माझ्या पहिल्या शाळेत असती तर खरच बर असत!कसे बसे चार तास भरून आम्ही घरी आलो...तर आये घरातच होती रोज मी आनंदी मनाने घरी येई, आज मात्र मी हिरमुसलेली होऊन घरी आली होती.माझ्या मनातून काही त्या जुन्या शाळेची आठवण जात नव्हती...काही गोष्टी पटकन विसरता येत नसतात.म्हनूनच मला अंगाखांद्यावर खेळवलेल्या त्या शाळेत पुन्हा पुन्हा जाव तीथल्या मातीत मला पुन्हा पुन्हा हरवून घ्यावस वाटत होत. मी रडताना, हसत हसत शिकताना मला त्या शाळेन सावरलेल्याची आठवण मनातून जात नव्हती,कुणी आमच्या बरोबर नसतानाही, आम्हाला तीथे प्रवेश मिळाला होता.. कधी कधी आमच्याजवळ शाळेच्या काही वस्तू नसायच्या त्याही याच शाळेतून मिळत होत्या..कधी तरी बाईनी दिलेली शिक्षा, गांधी जयंती दिवशी मी केलेले भाषण, त्या भाषणाला प्रतिसाद म्हणून सर्व वर्गाने माझ्यासाठी वाजवलेल्या टाळ्या, सरस्वती पुजनाच्या दिवशी आम्ही केलेले डांन्स, स्पर्धा, धमाल मस्ती, या सर्वांची मला आता आठवण येवून खुप जीव बेचैन होत होता. भूक ताहान विसरून मी त्या शाळेच्या मैदानात, खोखो ,लंगडी, लगोरी,लंपडाव, खेळाताना मनसोक्त मजा मारलेली मला आठवत होती.. आठवणीत मी स्वतःला एवढी हरवून बसले होते.. आये मला हाका मारत होती तेही ऐकू आल्या नाही.. एकाएकी आयेने माझ्या हाताला धरून हलवले व म्हणाली ..
""काय जाला अगो गप कित्याक ?खय लक्ष आसा तूजो! बरा वाटना नाय काय?""
"खरंच काही आठवणी इतक्या गोड असतात .त्या तहहयात मनात घर करूण राहतात..तशा माझ्या आठवणी तर नविनच होत्या..त्या तर उफळून वर वर येत होत्या. नवल असं काहीच नव्हत. आणि आयेला सांगतानाही भीती वाटत होती.या परस्थीत मी आयेच्या प्रश्नानां काय ऊत्तर देनार!!मला काहीच समजत नव्हत..तरी काही बोलायच म्हनून मी आयेला बोलून गेली..
"""काय नाय गे जाला,शाळा लांब आसाना म्हनान पाय दुकतात गे !!बाकी काय्येक नाय""
"""अगो मग तसा सांगाचय नाय!!थांब मीया पाय आवळूवन दितय""
आयेच प्रेम हे अस वर वर सागराच्या भर्ती प्रमाणे उचाबंळताना पाहून मनातून वाटल एकदम मोठ्याने भोकाड पसराव,आणि म्हनाव ..
""आये चुकलय गे मी..पण त्या शाळेत माका जावचा नाय!!परंतू मनातल विचार मनात दाबले,कारण मला हार मान्य नव्हती की मला कूणाला हसायला संधी द्यायची नव्हती. काही झाल तरी पूढे टाकलेला पाय पूढेच न्यायचा,माघारी पून्हा यायच नाही...मग जे काही होईल त्याला सामोर जायच.. अस मनात निर्धार करत मी आयेला म्हणाली..
"""नको गे तीतके काय दुकनत नाय!!!रवाने तीया नको आवळू, रोज आता चलाचा लागताला सवय जाली मगे काय वटाचा नाय"""
""" थोडा गरम पानी करूण दितय ता पायार घाल"""
आता मात्र आयेच मन मला मोडवेना ,
"""होय गे तीया गरम पानीच दे"""
आये पाणी आणायला आत गेली...
आयुष्य जगताना कितीतरी अनूभव मिळत असतात...काही चांगले काही वाईट...तरी ते अनूभवायला लागतात त्यातून कुणाची सूटका नसते...परंतू आहे त्या परस्थीतीतून मार्ग काडत राहील,की आपोआप सर्व प्रश सुटतात...वेळ लागेल पण पदरी अपयश पडत नाही .. आता अचानक मला नको वाटनारी वि.स. खाडेंकर शाळा.मात्र नंतर हवीहवीशी वाटायला लीगली होती...काही वेळ मात्र लागला...हे खर ,यातून एक गोष्ट शिकायला मिळाली,ती म्हनजे जिवनात सर्व काही मिळत,परंतू आपल्याला हव तेव्हा, हवस वाटल्या बरोबर मिळत नाही..त्यामुळे सर्व काही मिळवायला धीर मात्र हवा..धीर धरला आणि मनात अमुक काही करण्याची किंवा मिळवण्याची ईच्छा असली की सार लगेच नाही..पण क्रमवार मिळत जाते,यात शंका नसते, नशिबात असल ,आणि भाग्य उदयाची वेळ आली की आपण ईच्छिलेले सार कीही मिळतेच....मला ही सर्व कीही मिळाल परंतू माझ्या जुन्या शाळेप्रमाणे वि. स. खांडेकर विद्यालयातही मैत्रनी जीवापाड प्रेम करणा-या मिळाल्या..मी जेव्हा त्यांच्यासाठी काही करायच्या येग्यतेची झाली त्या वेळी त्या मात्र मला मिळाल्या नाही....पण या लेखणी द्वारे मी त्यांचे आभार मानू शकते...तवढ समाधान .... पूढे वि. स. खांडेकर विद्यालयात असताना जुण्या शाळेतल्या मित्र मैत्रनी मिळाच्या आम्ही कूठेही झाडाखाली बसून आठवणीत रमायचे...मजा मस्ती करायचे.. कधीकधी भांडन करूनच आपआपल्या घरी कधी पून्हा एकमेकांची तोंड पाहणार नाही .असे तो-यात निघून जावू..पून्हा आठ दिवस झाले की परत एकत्र यायचे..ह्याचे कारण आम्ही आमची भांडण कधीच घरापर्यंन्त न्यायचे नाही...त्या मुळे परत एकत्र यायचे..
आजही मला तशीच सवय आहे समाज सेवा करताना कुणाशी कधी खटके उडतातही परंतु बाहेर घडलेल्या गोष्टी घरी सांगत नाही...
(क्रमशः