वाटाड्या
वाटाड्या


दरी डोंगराच्या कपारीतून नाद घुमवत वाहत असलेला अवखळ वारा,सोबतीला हिदोंळ्या लाटेवर स्वार झालेल्या वेली.. वेलीच्या तालावर बागडत असना-या अनेक झाडांच्या डाहाळ्या,सळसळ करत असनारी पाने,मोहक मन पिसारा मनाचा फुलवत ते मनोहर दृश्य पाहात तो डोंगर उतरनीला लागलेला वाटाड्या.. देहावर अंग झाकायला घातलेली पैरण,तीला साजेस अस धवल गिरी प्रमाणे दिसनारे काहीसे मळकट असे धोतर, डोईवर मुंडासा, कमरेला बांधून घेतलेला एखादा जुनाच असा टाँवेल, खांद्यावर विसावलेल काबंळे, रंग काळपट पायी चामडी चप्पल, हाती तीन घुंगरू असलेली काठी , तिचं बुड जमिनीला टेकताच, छम, असा आवाज, करारी मुद्रा निम गोरा रंगाचा तो वाटड्या जणू कुस्तीतला पैलवान वाटावा अशा निधड्या छातीचा तो वाटड्या उंच पूरा बहुतेक पन्नाशीच्या पूढे वय झुकत असलेले, पाहूण कुणीही नवलाने त्याच्याजवळ पाहात राहावे ,अस व्यक्तिमत्व दिसत होत..
सूर्य मावळतीली झुकला.. धरतीवर लाल रंगाची छटा डोगंरमाथ्यावर झाडांच्या शिखरावर विसवताना,किचिंत ती पिवसर दिसत होती..
वाटेवरून छम, छम हातातील काठीचा आवाज करत जात असनारा तो वाटाड्या,चालत चालत डोंगराच्या पायथ्याशी आला.. थकलेल शरीर तीथल्या दगडावर विसावल. कपाळीचा घाम पुसल्यावर पाण्याची धार आपसूक तोंडात जावी अशी थकलेल्या शरीराची मागणी असावी..म्हणूनच समोर दोन हात दुरीवर असलेल्या मातीच्या रांजनातल पाणी घेण्यासाठी तो उठला नाही.. समोरून येत असनारी एक दहा वर्षाच्या चिमुरडीने त्याच्या मनाचे भाव ओळखले असावे.. ती चपळगतीने रांजनापाशी पोहचली,ग्लास भरून पाणी काही वेळात त्या वाटाड्या समोर धरून म्हणाली..
"घ्या पाणी प्या" काही न विचारता त्याने ग्लास तोंडाला लावून गटगट पाणी प्यायला, हाताने तोंड पुसत,दुस-या हाताने ग्लास तीला देत तो उत्तरला..
"पोरी कोण गं तू,?मला पाणी हव हे तूला कस कळल?"
"सोप आहे,तुम्ही घाम पुसत असताना मी पाहील,वाटल तुम्हाला पाण्याची आवश्यकता आहे. आणि बघा माझा कायास खरा ठरला"
""हो गं हो"
""बाबा एक विचारू"
""विचार की"
""तुम्ही रोज हा डोंगर चडता,पून्हा खाली येता,मी पाहात आले तुम्हाला परंतू तूम्ही डोंगरावर कशाला जाता? हे कोड काही केल्या सुटत नाही. तेवढं मला सांगाल का?
मुलीची गोड वाणी ऐकूण तो मंत्रंमुग्ध झालेला, ईवलीशी ही पोर कशी सुंदर तोलून मापून बोलते! ह्याचे कौतुक वाटून तो म्हणाला.
"मला सांग तू मला डोंगरावर जाताना नेहमी पाहतेस, परंतू मी तूला कधी पाहील नाही"
""तुम्ही कसे पाहाल त्या तीथून झाडा आडून मी तुम्हाला पाहत असते"
""बर पण मी येईस्तवर तू ईकडेच असते"
""हो"
"मला यायला दोन तास लागतात"
""तेही माहीती आहेत मला,तुमचा रोजचा हा चडउतार पाहूनच मला दया येवून आज तुमच्या समोर आली..
""खरच मला पाणी हव होत.परंतू थकलेले शरीर ऊठायची तसदी घेत नसाताना सुकलेल्या जिभेला ओलावा दिलास,दे तुझ भल करो"
""तुमचही"
"माझ का गं पोरी"
""तुम्ही न चुकता कीती तरी वर्षा पासून हा चडउतार करत आहात,नियमात खंड नाही की कधी आळस नाही"
""हो पण तू ईवलीशी असताना तूला कस माहीत मी हा डोंगर चडतो उतरतो"
"मला सर्व माहीत असते"
""तेच विचारतो कस काय?
"ते व्हय मला माझ्या बाबानी सांगितले की"
""कोण गं तूझे बाबा!मला नाव सांग ना!
"महादेव "
"कोण महादेव"
"ईथेच पलीकडे राहतात"
""हो का?पण पाहील नाही मी"
""मी देईन ओळख करून पून्हा केव्हा तरी"
""हो हो"
""पण तुम्ही सांगा ना वर रोज का जाता?
""ते व्हय,माझी रखमा माऊली वसलि तिथे डोंगरावर
""कोण ही "
""आमची कुलाची मालकीन रखमा माऊली"
""म्हणजे देवी"
""तस समज"
""एवढ्या वर कस काय"
""ते माहीत नाही पण माझे बाबा म्हणाले नारायणा ही आपली कुलाची मालकीन,हीची भेच वरच्यावर घेत जा,मग बाबा गेले मग मला ध्यास लागला हीच्या दर्शनाचा,"
""पण रोज का येता कधी तरी या की"
""नको मला तीला पाहील्यावर सुख मिळते"
"पण आता तुमचा देह थकला की"
""तेही आहेच"
""मग सोडा आता"
""ते शक्य नाही पोरी जीवात जीव पायात बळ असे पर्यन्त येत जाईन"
""हो पण एकटे तुम्ही त्यात वय वाढते,मधीच तुम्हाला काय झाले तर कस कुणी पाहील"
""तीच पाहील की,आता कस तु पाहील तशीच तीही पाहील"
""तीला कस समजनार ती मुर्ती ना
""मुर्ती असली तरी तीला जानीव आहेच माझी,म्हणून तर हा डोगंर नेहमी चडतो,तीच्या आशिर्वादा शिवाय शक्य हे अशक्य शक्य होते बघ""
""असेल कदाचीत,पण बाबा तुमच्या त्या मालकीन बाईला ईथे खाली बोलवा की,म्हणजे तूम्ही थकनार नाही"
""अस कस होईल पोरी,"
"तुमच्या वर तीचे प्रेम असेल तर येईल की ती"
""पण"
""पण बिन काही नाही,एखदा बोलवून तरी बघा"
""हो हो तूझ मागन मोडत नाही ..फक्त तुझ्या खातर बोलतो हं"
""बर"
""बोलू"
""अस नाही डोळे मिटा,हात जोडा डोगंराच्या दिशेने
तोंड करून उभे रहा""
"बर ,अस म्हणत ते वळले मागणे मागून ते पून्हा पाठी वळले ती मुलगी नव्हती.कूठे गेली इतक्यात म्हणून तीने दाखवलेल्या झाडा पाशी ते पाहायला गेले असता ,क्षण भर डोळ्यांवर विश्वास बसेना,त्याच्या कुळाची मालकीन रखमा माऊली झाडाखाली विसावली होती.. त्याची खुण म्हणून त्यानी नेलेला गुळाचा खडा समेर होता.. तो तिथेच नतमस्तक झाला..आणि त्याला पाणी पाजलेली ती मुलगी रखमा माऊलीच्या पाषाणात उभी दिसता त्या डोळ्यातून धारा वाहायला लागल्या..
सदगदीत नयनांनी त्याने देवीला नमस्कार करत म्हणाला.."धन्य जाहलो मी,आज मला तू पाणी पाजून माझ्या दर्शनाची महती राखत स्वत:खाली आलीस माय खरच तुझ्या प्रेमाचा अंत नाही... मी अनेक वर्षे तुझ्या वाटेवरून चालत असताना वाटाड्याची पदवी ह्या देहाला लोकांनी दिली तरी चालत राहीलो..शेवटी ह्या वाटाड्याचा वारकरी बनवून तूच खाली आलीस..धन्य जाहलो..माझे कष्ट तुला पाहवले नाही..खरच गं माय तुझी लीला अपरंपार आहे...