Ranjana Bagwe

Others

4  

Ranjana Bagwe

Others

सानूल पण सोनूल बालपण

सानूल पण सोनूल बालपण

18 mins
319


 कोकण आणि कोकणातली मानस ही नारळाच्या पाण्यासारखी गोड असतात.मन तर शाहाळ्यातल्या मलाई प्रमाणे मऊ असत त्यात परोपकार हा एक मेव गुण विकासीत जास्त झालेला.त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्याचे आदरातीथ्थ कस कराव हा प्रश्न त्याना पडत नसतो.अथिती देव भव ,या म्हणी प्रमाणे दारी आलेला मानूस विमुख जावू नये ,याची खबदारी कोकणातला मानूस मनापासून घेत असतो घरात काही असो ,या नसो,कुणाचही उसनवार करूण पाहूण्याना खाऊ घालाव, मायेन चौकशी करावी, निरोप देताना अंगणातल्या कडेवर येत सांगाव"


" या वो पाउन्यानू परत कदी,

सगळी घाय जाली तुमका बरा काय करूऩ घालूक मिळाक नाय ,मगे येशात तेव्हा बरा कोंबडा कापूया परत येवा हा""

हे सांगणारा कोकणवाशी अर्ध्यारात्रीत कोणी दारीआला तरी पदरचे बी बीयाने मोडूनही त्याच स्वागत करतो......कोकणचा माणूस कधीही दुस-याची अपेक्षा मात्र करत नसतो...

आयेची बडबड मनसोक्त ऐकूण घेतल्यावर, आम्ही दोघांनी शाळेचा रस्ता एकमेकांच्या हातात हात घालून अर्ध अधिक पार केला.काही वेळात लांबून शाळा दिसू लागली .तशी हूरहूर वाढली व एका अनामीक भीतीने काळजाची धडधड वाढली. भीती या साठी होती .की आम्ही दोघ आमच्आमच्या पाल्यासोबत नव्हतो.. म्हणून कोणी काही विचारल तर? आम्हाला शाळेत घेतले नाही तर? असे मनाला खूप प्रश्न पडले. होते,.परंतू शाळेत जायला तर हव ,नाही तर घरात सर्व पून्हा हसतील, याची जाणीव होती. मनाचा हीय्या ,करूण आम्ही शाळा गाठली.प्रथम शाळेच्या पटगंणात पाय ठेवताच मनाला बर वाटल ,पण आत कस जाव ,हे न समजून आम्ही पटगंणातच उभे होतो. मनाला कुठेतरी भीती वाटत होती.कारण आपल्या मुलांना शाळेत घालायला त्यांचे आई-वडील येत असतात.आम्ही मात्र दोघ एकटेच निघालो होतो.शाळेत मुल मुली येत होते.आम्ही उभे राहून पाहात होतो.काही वेळाने शाळेतील सर्व मुले अचानक पटांगणात येताना दिसली .त्याबरोबर काळजातली धडधड आणखी वाढली ,मनाला एक वेडा प्रश्न पडला. ही सर्व आम्हाला पकडून न्यायला तर येत नाहीत ना? असा विचार येत आहे, तोच ती मुले आमच्या उजव्या बाजूला एकएक करत रांगेत उभी राहू लागली. सर्व मुल बाहेर पटगंणात आली असनार कारण मागून गुरूजी व बाई बाहेर आले .सर्वांनी मिळून कसल तरी गाण गाईल खर ,पण तेव्हा ते समजण कठीण होत. नतंर आम्ही नियमीत शाळेत यायला लागल्यावर समजल की ती सामुदायीक प्रार्थना होती. प्रार्थनेचे सोपास्कार पार पडताच मुले शाळेत आत गेली.तरी आम्ही तीथेच घुटमळत होतो.काय कराव समजेना,कोणतही काम करताना मनात त्या कामा बद्दलची आस्था असली म्हणजे देवाची साथ आपोआप लाभते. हे काही खोट नाही.आम्ही असेच उभे असताना एक मध्यम वयाच्या बाई आम्हाला घाईत शाळेत येताना दिसल्या, त्या घाईत असूनही आमच्या पुढ्यात आल्यावर म्हणाल्या ,"काय पोरानो शाळेत आलात का??""

मी मानेन होकार दिला,त्या बरोबर त्यानी आपल्या मागून आत यायला लावले... त्या एका वर्गात गेल्यावर आम्हाला बसायला सांगितले.आमच्या पेक्षा एक दोन वर्षानी लहान असनारी मुलात आम्ही बसलो. शाळेत प्रवेश तर झाला होता. काही वेळाने बाईंनी आम्हाला उठवून प्रश्न केला ,"" तुम्ही रोज शाळेत याययच!! येनार ना?""

मानेन आमचा होकार बाईना कळला असावा. "

" तुमची नावं पटापट सांगा""

 प्रथम त्यांनी राजाला उभा केला व टेबलच्या ड्रॉवर मधून एक वही आणि पेन बाहेर काढत बोलल्या 

"""हा बोल रे"तुझं नाव काय ?""

राजांने पटकन आपलं नाव सांगितलं 

"""राजाराम आत्माराम सावंत""

 त्याला खाली बसायला सांगून बाई नी आपला मोर्चा माझ्याजवळ वळवत म्हणाल्या"

""अग तू उभी रहा बोल तुझं नाव""

पण मला कापर भरल्या कारणाने माझ्या तोंडातून आवाजच बाहेर पडेना. राजा आमचा कोणी काही विचारलं की पटकन उत्तर दत असे, पण मी लाजवट असल्याने ,मला पटपट बोलायला जमत नसे .हा माझा फार मोठा विक पाँईंट तेव्हाचा.. आज मी फार बोलते एवढी की समोरचा मला म्हणेल गप, किती बोलते. मी बोलत नाही म्हटल्यावर बाई म्हणाल्या 

"""अग बोल की मुकी आहेस का?""

पून्हा मी मान नाकार्थी हलवली.

"""नुसती मान हलवू नको नाव सांग

""शोभा""

 ""पूर्ण नाव सांग ""

"""शोभा सहदेव सावंत""

 मी एका झटक्यात सांगून मोकळी झाली .आणि बाई काही बोलायच्या आतच मी धपकन खाली बसली. आमच्या दोघाीच्या पाटीवर काहीतरी लिहून दिल. ते गिरवायला सांगून म्हणाल्या,

""".घरी पण हेच गिरवून आणा ""

हा आता या अक्षरांना काय म्हणतात तेही माहीत नव्हत. तरी गिरवत बसलो. घरी जायच्या अगोदर बाईंनी जवळ बोलवून सांगितल या अक्षरांना  काय म्हणतात ते कळल, "श्री ग णे शा असं म्हणतात". बाईंनी पाटीवर पून्हा तेच लिहून दिलं होतं ही अक्षरं गिरवून आणा, दहा वाजले चला घरी जावा, बाई म्हणाल्या, आणि आमचा तो शाळेतला हिला दिवस आणि आम्ही बालवाडीत बसलो होतो ,आम्ही पटपट घरी आलो. वाटेत आम्ही कुठेही थांबलो नाही एरवी आम्ही कुठे गेलो तर रमत-गमत या झाडाखाली त्या झाडाखाली अस करत घर गाठायचो.मला आज घरी जायची उत्कंठा लागल्या कारणाने राजाला जवळजवळ फरफटत घरी घेऊन आली .घरी येऊन मला झालेला आनंद आयेला आईला सांगायचा होता .येऊन पाहिलं घरात आये नव्हती, मी हिरमुसलेली झाली .आणि मनातच म्हणाली आज तरी आये लवकर घरी यायला हवी होती .पण आये लवकर येनार नाही हे माहीत होत.तरीही वेढ मन आयेला शाळेत गेल्याच सांगायला उतावळी झालेल..आये नाही म्हटल्यावर मी अंगणातच काही वेळ बसून राहिली. पण तोवर मला माझ्या पोटाने भुकेची जाणीव करून दिली. भुकेने पोटात कावळे ओरडत होते आई घरात नसल्याने खायला मिळणे फार कठीण होतं .मग राजा आणि मी तसेच दोघेही भटकून काही कंदमुळे पोटात ढकलून आलो.एक वाजता आये डोक्यावर टोपली होऊन घरी आली . त्याच्यात कायही खायला नसनार कारण आये बाजारात नाही तर कामावर गेली होती. पाहून उपयोग नाव्हता त्याही परिस्थितीत मी आयेला म्हणाली ...

""""आये मीया शाळेत जावन इलय, बाईनी आमची नावा लीवून घेतल्यानी, आनी उद्यापासून शाळेत रोज बोलवल्यानी""

 आयेची प्रतिक्रिया काहीच दिसली नाही .आणि ती दिसण्यातली नव्हती. कारण आये चूल पेटवण्यात मग्न होती .पटपट चूल पेटवून आयेने चुलीवर पाणी ठेवलं तांदूळ घेऊन निवडायला सुरुवात केली थोड्या वेळाने आयेने भात केला पण मला लागलेली भूक अजून शमली नव्हती .ती आयेन केलेला भात पाहून आणखी उचबंळून वर आली. मी आयेकडून पेज भात घेऊन मी खाल्ली.शाळेत गेल्याच कौतुक आयेकडून झाल नाही. पण तो दिवस आठवला की वाटते त्या दिवशी खरच आम्ही शाळेत गेलो नसतो तर आज निरक्षर राहीलो असतो.आणि आज माझी लेखणी तूमच्या पर्यन्त पोचलीही नसती.आयेन त्या दिवशी भल कौतुक केले नसेलही,पण नतंर नतंर आये माझ कौतुक सर्वांना सांगत असे.

 पण काही असो.स्वर्ग सुखाची अनूभूती घ्यावी, ती कोकणात.

वसंत ऋतूत तर धरतीवर जणू गुलाबी थंडीत गुलाबी धुक्यात साक्षात देव धरतीवर अवतरल्याचा भास होतो.धुक्यातून चालताना वाट समजत नसली ,तरी धुक्याने जणू पूर्ण सुष्टीला विळखा घातलेला धुक्याच्या धवल रंगाने धरतीच धवल वाटायला लागली की ...पाणवट्या वर आलेल्या बाया धुक्याच्या घागरी भरूण नेतात की काय ?अस वाटत राहत. वरवर आपल्या सोबत चालनार धुक पाहून धरतीवर जणू धवल ढगच खाली उतरले दिसतात .गूरांच्या पायात घुटमळत असलेल धुक धरतीला स्पर्श करत असल्याचा जाणीव होते. कोकणात हिरव्या गार वन राईत धुक दाटलेल पाहील की आभाळ फाटलेल वाटत...सूर्याला देखील धुक्यान सुट्टी दिल्याच वाटणे

म्हणजे सूर्य धरतीवर अजून अवतरलाच नसून तो निवांत पणे विश्रांती घेत असावा....हे वाटणे वावग नसाव....आणि मग दोन ओळी गुणगुणल्या शिवाय मन स्वस्थ बसत नाही..


**धुक दाटल दाटल ***

**वाटे आभाळ फाटल**

**भुमीवरी विखुरले ढगाचे लोट**

सूर्य देवा र उघड डोळ

वाट गावना पूढ दिसेना

काय कराव काही सूचेना.....


 दिवसामागून दिवस कसे भूर्रकन उडाले कळलही नाही.बघता बघता वर्ष संपत आले,.परीक्षा ही संपल्या. आम्ही शाळेत व्यवस्थित अभ्यास केला की नाही .ह्याचा पूरावा म्हणून आज आमचा रिझल्टचा दिवस, मी आणि राजा फारच खूष होतो. नेहमीप्रमाणे आम्ही शाळेत पोहचलो .त्यावेळी आम्हाला रीझल्ट हातात देत नसत.फक्त तोंडाने सांगत. कोणाचा पहिला दुसरा तिसरा नंबर आल्यास त्याचं नाव जाहीर केले जायचं.प्रार्थणा संपली आणि आम्ही सगळे वर्गात आलो वर्गावर गुरूजी नसल्याने आम्ही नुसती दंगा मस्ती करत होतो.काही वेळाने गुरुजी वर्गात आले .त्यांच्या हाती आमचा रिझल्ट एका वहीत बंदिस्त होता. आमचा पहिलाच रिझल्ट असल्याकारणाने माझ्या छातीत फारच धडधड वाढलेली,गुरूजी वर्गात येताच आम्ही सोपास्कार जपत एक साथ नमस्ते करूण जाग्यावर बसलो...गुरूजी म्हणाले.तुमचा रीझल्ट माझ्या जवळ आहेत.मी जी मूले पास झालीत त्यांची नावे तूम्हाला वाचून दाखवनार आहे.शांतपणे ऐका, गुरुजी नी नाव वाचायला सूरवात केली.एका पाटोपाट नाव सांगत गुरूजी पूढच नाव घेत होते.पण माझ नाव अजूनही गूरूजींच्या तोंडी आल नव्हत.राजाच नाव पण पास झालेल्या यादीत होत.मी फार घाबरले मला रडायला येत होत.माझी उत्कंठा शिगेला पोचली होती .आणि अचानक गूरूजी थांबले,आणि माझ्या मनान स्वत:हाचा रिझल्ट जाहीर केला..शोभा सावंत नापास!!! मला हुदंका आवरेना व जाहीर पणे रडायलाही येईना आतल्या आत कोंडमारा होवू लागला त्याही परस्थीतीत,मी गुरूजींच्या तोंडून मी नापास झाले ऐकायच होत.. मी नापास झाली हे माझ्या मनान पक्क केल,आणि मी हातावर हात चोळत रडत होती.एवढ्यात गुरूजी म्हणाले...आता मी त्या तीन मुलांची नाव सांगणार जी प्रथम ,दुसरा,आणि तिस-या क्रमांकान पास झाली आहेत.मी नाव घेईन तेव्हा तूम्ही टाळ्या वाजवायच्या.प्रथम मी त्या मुलाच नाव सांगतो ज्याचा 3 रा क्रमांक आलाय...त्याच नाव विजय म्हपसेकर... सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या..दुसरा क्रमांक कु मीऩा तावडे.... पून्हा टाळ्या ,आणि पहीला नबंर पटकवला त्या मुलीच नाव आहे.

"शोभा सावंत,,"

, टाळ्यांच्या आवाजात क्षण भर माझा माझ्यावर विश्वास बसेना, परंतू सर्व मुल माझ्या कडे पाहून टाळ्या वाजवत होती.काही क्षणा पूर्वी मी रडत असणारी,,आंनदाने बेभान होवून राजाला मिठी मारली...

"""राजग्या माजो पयलो नंबर इलो ,तीया आयकलय ना??

राजा काही बोलला नाही ,पण मानेन होकार दिला.राजाच तोंड मात्र एवढस दिसल.पण कदाचीत राजाचा नंबर आलेला नसावा म्हणून असाव..आयुष्यात मी कधीही खुष झाली नाही तेवढा आंनद मला आता झालेला पहीली परीक्षा पहीला रिझल्ट आणि पहीला नंबर मला काय करू?? कस ?करू? अस वाटत राहील .माझ्या आयुष्याचा पहीला निकाल तोही कल्पनेच्या पलीकडे लागलेला,मी धावतच घर गाठल,प्रथम आयेच्या शोधात सरळ आयेच्या खोली जवळ गेले....आणि माझ्या सर्व आनंदावर विरजन पडाव आणि तो लुप्त व्हावा तस झाल,आयेच्या खोलीला भलस कुलूप होत.आये तर नाही ,निदान कुलूप तरी या भावनेन मी कूलूप हातात धरूनच म्हणाली...

""""आये खय गेलय,आज तरी तीया घराक व्हई होती,मीया पास जालेला तुका सांगाचा आसा...ये मगे बिगीना,,,,

पण कुलूप आये नव्हती ,निर्जीव वस्तू काय बोलनार,, मी तशीच बाहेर येवून अंगणातल्या मातीच्या धक्यावर आते विड्या वळत होती तीथे येवून बसली....आतेला मी पास झाल्याच सांगून सरळ शेजारच्या चार घरांना खबर देवून आली...तोवर राजा, अन्ना, पण आलेले अन्ना, पण पहील्या नंबराने 4थीत गेला होता.आम्ही दोन्ही भावंड प्रथम क्रमांकाने पास झालेलो,पूढे कधीही आम्ही आमचा नंबर सोडला नव्हता हे विषेश...

आये नसल्यान मला काय करावं सुचेना,ती कुठे कामावर आहे, हे माहिती असतं तर मी धावत धावत तिथे जाऊन आयेला ही बातमी दिली असती... घरातच दाजी आई या सर्वांना मी पास झाल्याची बातमी देऊन टाकली राजा फक्त पास झाला होता. माझ लक्ष आयेच्या येण्यात गुतंलेल..

 भूक लागली होती.पण आज तीच्याजवळ फारस लक्ष नव्हत.लक्ष असूनही काही फायदा नव्हता,आये आल्या शिवाय पोट भरण्यातल नसल्याने, मी तशीच बाहेर खेळण्यात गुतलेली,पण डोळे आयेच्या वाटेकडे होते. काही कारणा मुळे घरात काय झाल माहीत नाही पण आये मला घेवून वेगळी राहीली,व वेगळ जेवण करत असल्याने मला आई(काकी) हीने जेवण 

थोड दिल.परंतू ते पोटाला पुरेस नव्हत. कारण 

 1दिवसा आड ज्या घरात अन्न शिजते,तेही पूरेस नसेल तर वाढनारी तरी कसी वाढेल,आणि जेवणारी तोंड मात्र अनेक, .असा मीच माझ्या मनाला समजवत जे दिल ते पोटात ढकलून बाजूला व्हायची...

"माझ्या आयेन मात्र कष्ठ करूण आणून शिजवलेल्या अन्नात किंवा इतर खाण्यात कायम घरच्याना सामावून माझी माऊली खुष असे..घरात सर्व उपाशी असली की माझ्या माऊलीच्या घश्याखाली घासही उतरत नसे...ती आम्हा तीन्ही भांवडना वाढत असे,पण त्या माझ्या भावंडानाही घासातला घास देई ... आई ही शेवटी आईच असते.तीच आपल्या पिलावर जीव सारखाच असतो.तीची आभाळागत मया दुजा भाव करत नाही.तशी माझी आये..खरोखर मायेला भर्ती आलेल्या सागरा प्रमाणे होती.. राग आला तर सोड्याची बंद बाटली खोलल्यावर जसा तो फसफसत बाहेर येतो ,तसा तीचा राग होता..तर तीच बाटली जेवड्या जलद गतीन फसफसते तेवड्याच गतीन ती शांत होते,काही तशाच प्रकारे आयेचा राग शांतही होई... "पूष्पा बाबा महादेव राजा यांना आये खायला देवू लागली की मला आगळी, वेगळी खुषी मिळे...आजही मला कुणाला काही देताना मन समाधान पावते.मी कूणालाही विमुख कधीच पाटवत नाही.त्या वेळच्या त्या एका घासाची .बरोबरी आज पंचपक्वान्नाने भरलेले ताट ही करू शकनार नाही...मी त्या वेळी अनूभवलेल्या त्या एक एक क्षणाची आठवण म्हणून ,अधीक घरात शिजललेल अन्न वाया घालवू देत नाही.ते शेळे अन्न खाण्याची परस्थीती आज राहीली नाही.हे खर असूनही मी ते अन्न खाते.किंवा कुणा गरीबांच्या झोपडीत स्वत:हा पोचत करूण येते... मला देव कधी भेटला नाही पण तो माझ्या आयेच्या रूपात सदैव माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहीला.... ते. प्रेम ,ती आयेची प्रेमळ सोबत आजही मनाला हर्षभरीत करते...आणि मनात आयेची सय दाटून आल्यावर डोळ्यातून गंगा जमुना अलगद बाहेर पडतात.......आणि वाटत मला त्या वेळी कुणीही आये शिवाय गृहीत धरल नाही .मी मात्र कायम सर्वांना गृहीत घरूण चाललली त्याच मला आजही समाधान मिळत....

सुगीच्या दिवसात कोकणात फार गमंत वाटते.सुगीत गावरान वारा पिंगा घालायला लागला की उन्हााने तापलेल्या मानसांना 

वार्‍याची झुळक सुखवून जाते.

परसात फुललेल्या फुलांचा सुगंध

वा-याला साथ देतो. गोठ्यातली गाई 

गूर दावनीला बांधलेली असली,तरी त्यानाही

या वा-यावर मुक्त पणे चरायला आवड असाव

ते सांगण्यासाठी ती गोठ्यातच मोठ्यान

हंबरत असतात. त्यांच ते हंबरण थांबलेल

 नसल की त्यांचा मालकही त्याना दावणीतून मुक्त करतो .मुक्त झालेली ही गूर आपला आनंद 

रानोमाळ भटकत साजरा करतात.

एकूण कोकणातला वारा प्राणी मात्रा पासून

कोकणातल्या सर्वच जीवाना गारव्याने तृप्त 

करतो. अवघ्या सूष्टीली गारवा प्रदान करतोच,

शिवाय चराचर व्यापूनही तो उरलेला असतो.

तसाच कोकणातल्या मानसांच्या मनात देखील 

प्रसन्नतेचा गारवा साठलेला असतो.....हे वेगळ सांगायला नको....

. आयेची वाट पाहून मी थकली. सकाळी पास झाल्याचा उत्साह संपत आलेला. मी पास झाल्याच्या कौतुका पेक्षा लागलेली भूक कशी मिटवावी ? याची चिंता होती.आंधळ्याने एक डोळा मागावा व देवान दोन्ही डोळे द्यावे . तशी आये येताना दिसली...आये जवळ येताच मी धावतच तीच्या जवळ जात म्हणाली..

"""काय गे कितको उशिर केलय, माका भूक लागली गे!!

"""अगो व्हय गो माका कळता !!म्हनान मिया तूका भजी हाडलय ती देतय,तवसर ही खा ! बघ तीया भजी खायसर, मीया भात पिटला करतलय,आणी पास जालय काय नाय"""

"""जालय गे मगे सांगतय पन आता गप रव""

"व्हय गो व्हय मीया गपच रवतय""

अस म्हणत आयेने टोपलीतून भाजी काडून दिली..

 बाजारात इतर लोक जाताना पिशव्या नेत,पणआये बाजारात,जाताना टोपली नेई, डोक्यावरच्या टोपलीला एका हातान धरी व दुस-या हातान घेतलेल सामान त्यात टाकी. कधी तरी घेतलेले सामान वजनदार असले ,तरच ती टोपली खाली उतरवी,आयेने जशी मला टोपलीतून पूडी माझ्या हाती दीली.ती उघडून पाहीली,ती भजीच होती. .. ही भजी आये मोहन राऊळ,किंवा अरावंदेकर बाबा ,या दोन दुकाना शिवाय तीस-या दुकानातून आणत नसे.दहा पैशाची भजी आणत असे,त्यांचा आकार पाहिल्यावर मी ओळखत असे.की भजी कुठल्या दुकानातून आणलेली आहेत.मोहन राउळ यांच्या दुकानातली भजी आकाराने मोठी असत ,त्यामुळे 10 पैशाची सात किंवा आठ येत.अरावंदेकर बाबांकडची भजी आकाराने लहान असायची ती 10 पैशात बारा-पंधरा यायची .ही भजी मी त्यावेळी खूप आवडीने खायची. पण नंतर मला समजायला लागल्यावर मी अरावंदेकर बाबांच्या दुकानातली भजी खात नसे ,याचे कारण ते काळी मशेरी त्यांच्या तोंडात कायम भरलेली असे, त्यामुळे त्यांचे चाफेकळी बोट काळे दिसे.ते एक बोट उभे ठेवून उरलेल्या चार बोटांनी ते भजी तळायचे .बाजारात गेली की मी ते पाहायची,मला ते पाहून फार घाण वाटायची, मग मी आयेला म्हणायची ....

""""माका हि भजी नको,मीया ती खावचय नाय"""

"""अगो त्याका काय जाला बरी ताजी भजी करून दितत बगतय मा"""

""""होय गे ताजीच आसत,पन त्यांच्या बोटाक मशेरी आसा ती घुनत नाय कीत्याक"""

"""अगो ता बाँट काय ते पिटात घालत नाय ना""

"""अगे तरी माका नको"""

"""सवळ्याची भटीन ती असाच घराक चल"""

"""चल असीच जावया माका काय्येक नको तूजा"""

या ओळीने आये नरम पडायची व रागात पाच पैसे हातावर ठेवायची,,.. व आपन बाबाच्या दुकानात मी भजी घेई, कारण ही जास्त येत, असल्याने ती सर्वांना होतील हा विचार करूनआये तिथेच भजी घ्यायची. मग मी हट्टाला पेटून काहीतरी घेऊन द्यायाला सांगायची यावर आई माझ्या हातात पैसे ठेवी, त्यात मी,रावळगाव चॉकलेट किंवा चिमणी ,मोर,बदक,पोपट,

असलेल्या आकाराची बिस्कीट घ्यायची. ह्या दोन्ही गोष्टी मला फार आवडायच्या.आये बरोबर बाजारात जाणे मला पहिले खूप आवडायचे. पण नंतर मात्र आये बरोबर बाजारात जाणे मला आवडेनासे झाले .कारण एकच होते .आईची बाजारात ओळख भरपूर होती .ती सर्वांशी बोलत, जायची, आणी प्रत्येक ठिकाणी मला थांबायला लागायचे. त्यामुळे पाय फार दुखत असत. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे आडनाव सावंत होते .पण आमच्या आयेला सर्व बाजारातली ओळखीची लोक तिला सावतीन म्हणत, ते मला आवडायचे नाही .मला राग यायचा . आणी जेव्हा जेव्हा  मी आये बरोबर बाजारात जात असे. त्या त्या वेळी ते लोक मला ओळखत असूनही आयेला विचारायचे....

"""गे सावतीनी तुजा चेडू काय गे"""

 मी मात्र खाली मुंडी घालुन जमीन पायाच्या अंगठ्याने खुरपत राहायची चेहरा रागाने लाल व्हायचा, मला राग आलेला आहे. माझ्या आयेला बरोबर समजायचे,मग माझ्या समजूती साठी आये लटक्या रागाने दम द्यायची..

"""अरे कीतक्या यळा सांगलय ता माझा चेडू! ,पन तुमच्या लक्षात कसा रवना नाय रे,?मेल्यानू मस्करी करतात काय रे,व्हय? परत कदी इच्यारू नको हा??"""

 """नाय गे बाये नाय इच्यारूचो मगे तर जाला"!!""

पण मला कळायच हे मला दाखवण्या साठी तेवड्या पुरतीचा देखावा आहे. बाकी हे असच चालनार हे मला माहीत होत. पण मी काही आयेला बोलायची नाही. पण पून्हा बाारात गेली की तोच प्रकार ,आयेच तेच उत्तर ठरलेल.. परिनामी मी मात्र आहे बरोबर बाजारात जायचे सोडून दिले....

नंतर मला कळायला लागल आयेचा विनोदी स्वभावा मुळे सर्व लोक आयेशी बोलत तीही मस्करीत त्यांच काही बाकी ठेवत नसे...तरी हेच लोक आये बाजारात 8 दीवस नाही गेली. तर ज्या वेळी ती जाई त्या वेळी आपूलकीने चौकशी करत...मन मोकळा स्वभाव ,सदा हसरा चेहरा.सर्वाच्या आनंदात सामील होण,कोणाच अडल नडल तर मदत करण. अजारी मानसांची सेवा करण, ह्या गुणानी आये परिपूर्ण असल्या कारणाने सर्व समाजाची लोक आयेला मान ,देत व तीची आस्थेन चौकशी करत....

मला वाटत पाँपूलर व्हायला एखादा हुद्दा किंवा श्रीमंती हवीच अस नसत.काही वेळा झोपडीतला गरीब देखील त्याच्या चांगल्या स्वभावा मूळे नावा रूपाला आलेला असतो.....त्या वेळी आमच्या घरात सकाळ संध्याळाळ हाता तोंडाची भेट होणे मुस्कील असे.त्याही परस्थीत आयेला मान होता हे विषेश.....

सह्याद्रीच्या पायथ्या पाशी वसलेल कोकण पाहील 

 की गर्द हीरव्या झाडीनी व्यापलेली राने वणे डोळ्यांची पारणे फेडल्या शिवाय राहत नाही...निळ्या शार आभाळाला लांबून पाहीले की आभाळ जमनिला टेकलय की काय अस वाटत...क्षितीजा वरील तांबडे निळे पिवसर रंग रंगात मिसळून अधिक मजेदार पाहायचे असतील तर ते कोकणच्या भुमीतून... नभीचे हे रंग पाहून कोणी चित्रकाराणे हे रंग कुचल्याने रंगविले असे वाटणे स्वभाविक.....संध्याकाळी सूर्य अस्ताला जाताना हे रंग अजून गडद होत जाताना पाहून मन हरकून जाते.पक्षी आपल्या घरट्यात जातानाही क्षितीजावरूण रांगेत उडत जाताना काल्पनीक एकाच रंगातली फुले एका धाग्मायात ओवून तीच तोरण आकाशी बांधल्याचा भास होणे स्वभाविक ......

" दुपारच्या जेवणा नतंर वामकुषी घेतली नाही तर तो कोकणवासी कसला.पणआम्ही मुले सुट्टीत कधीच दुपारची झोपत नसू बाहेर अंगणात उनाडक्या करत असू.कसलेही खेळ खेळत बसू,त्यामुळे कधी पाहुणा आमच्या घरी येताना प्रथम आमच्या नजरेस पडे.मग पाहुणा कोणाचा येतोय हे सांगण्या साठी आम्ही घरात धावत जात असू अर्थात पहील कोण जाईल याची आमच्यात चढाओढ असायची.आमच्या घरात पूण्या प्रमाणे मुबंईचे देखील पाहुणे येत.या पाहुण्या ,पैकी मोठी आईचे पाहुणे जास्त असत.तर माईचे पाहुणे जरा कमीच,असायचे .आणी त्या खोलोखाल आमचा नबंर असायचा.आमचे मुबंईचे पाहुणे दोनच एक मावशी,व दुसरा मामा ,मावशी क्वचीत येई ,पण मामा मात्र मुंबईवरूण आला की पहीला आमच्या घरीच यायचा मगच आपल्या घरी जायचा.कारण असे गावात तेव्हा एसटी वेळेवर सोडल्या जायच्या त्या मुळे मामा आमच्या घरी येई.हे दोघ सोडल्यास मधीच कधी तरी येवून जाणारे आमचे पाहुणे म्हणजे माझे आजी,आजोबा,आजोबा आले ,म्हणजे ते आमच्या घरी चांगले आठावडा भर राहात असत.त्यामुळे आयेला ते बरीच मदत करत.आजोबाबांना आम्ही आज्या बोलायचे.आमचा आज्या येताना मी लांबून पाहीला की सर्वात आधी मी मोठ्याने अंगणातूनच आयेला बोब मारूण सांगायची.

"""गे आये....आज्या इलो गे.... तीया भायर बिगाना येवन बघ...आज्या इलो...

अशी आयेला तंबी देत मी आज्याला आणायला धावत पूढे जावून,आज्याच्या ढोपराला बिलगत असे.याच कारण आमचा आज्या उंचीने चांगलाच 6फुट होता.त्या मुळे माझी उंची त्याच्या ढोपरा एवढीच व्हायची.माझा आज्या उंच मध्यम बांधा,कणखर,दिसायचा.गोरा पान असलेला आज्या अंगात पैरण पायापर्यन्त सफेद धोतर डोक्यावर पांढरी किंवा पिवळी पगडी परीधान केलेला आज्या एखाद्या पेशवाईला लाजवेल अस भरदस्त व्याक्ती महत्वाचा वाटायचा.त्या मनाने आजी खुप बुटकी होती.ती आज्याच्या मागे उभी राहीली तरी दिसत नसे....पण घरात हुकूम शाही आजीचीच होती.आजही मला आज्याच ते रूप आमच्या अन्नात(भाऊ)याच्यात पाहायला मिळते तीच,उंची तोच बांधा तीच करारी मुद्रा,फक्त फरक एवढाच आहे.अन्ना पँन्ट शर्ट वापरतो.तर आज्या धोतर पैरण..

आम्हा तीघाच काय पण सख्या चुलत भावंडातअन्ना एवढा रूबाबदार,उंच देखणा,भरदस्त व्याक्ती महत्व दुस-या कोणातही दिसत नाही.

आज्या आला म्हणजे मी त्याच्या हातातली पिशवी रापत असे.आजी ने काही बाई जमा करूण आयेला पाटवलेल असे..ते पाहताना माझ्या हाती खावू लागल की मी बाजूला होई...

आज्याला बाकी कसलही वेसन नव्हत..वेसन होत ते फक्त गुळाच ...

तो आला म्हणजे आये आधी गूळ कूठे तरी लपवून ठेवी..पण आयेने कुठेही लपविलेल गूळ आज्या शोधून काडून ते फस्त करी..आयेला कळल की ती ओरडत असे..पण आज्या गूळ खाल्याचा आरोप अंगाला न लावून न घेता आयेलाच म्हणे.."

"""गो पिर्थ्या कीत्याक आरडतय ??माज्या नावान !मीया तूजा गाँड नाय खावक गो !!हयता सोबला होता घरात त्याका इचार"!"

इथेई माझ्या आईच नाव प्रीती होत. माहेरच तीच हे नाव आज्या लांबलचक करूण पिर्थ्या...म्हणी..

आये आज्यावर मनापासून रागवत नसे. तर ती लटक्या राग आणून ओरडी...कारण तीचे ते वडील होते.आपल्या वडीलांवर मुलीची विषेश माया असते.आये कूठूनही येताना आज्या आमच्या घरी असताना गूळ घेवूनच येई.कारण तीला माहीत असायच,कूठेही कसही लपवून ठेवल तरी आज्या गूळ खाणार आणी सकाळी चहाला गूळ मिळनार नाही...पण आये रागवली की आज्याला ते खर वाटून तो लटकाच राग घेवून बोले "

""मी उद्या घराक जातय गो""

पण तो उद्या कधी लवकर येत नसे.पण आये गालातच हसत असे..

नतंर नतंर आज्या एका ठरावीक वयाचा झाल्यावर वेडसरपणा करायचा..मग तो सारखाच आयेला बघायला चालत तर चालत लांबून आमच्या घरी येई...मग.मग आज्या थकला ,तो येईनासा झाला ...मग मला आये आजी जवळ दहा पंधरा दिवस नेवून सोडायची,, तेव्हा आये एसटीची वाट न पाहता सावंतवाडी ते वेगुंर्ला अशी एक काँलीस सारखी पोकळे बंधूची गाडी पँसेजरना घेवून ये जा करी या गाडीने आम्ही जावू...या गाडीचा रंग मला फार मजेदार वाटे खाली काळा व वर टपाला पिवळा कलर असे...हा पिवळा कलर उन्हात चमचम करी त्या मुळे माझे लक्ष त्या गाडीवर खिळून असायचे..

या गाडीत दाटीने बारा तेरा मानस बसत..आये मला घेवून या गाडीत दाटीने बसायची आमच टेशन आल की आम्ही खाली उतरलो की आये त्याला 40 पैसे देई..ते पैसे मोजल्यावर तो मालक म्हणे..

""""अशी काय ती 10 पैसे कमी दिलय मगे"""

आये पण तेवढ्याच जोशात म्हणे...

""""कमी नाय बरोबर दिलय वो""

"""कसे गे..या चेडवाचे खय दिलय"""

"""तेचे खयचे मीया त्याका मांडेयेर घेवन इलय माजे पाय दुकासर""

या दोघांच बोलन ऐकूण वाटे आयेन माजे पैसे दिल्यान असते तर मी खिडकी कडे बसलय असतय...

पण तस कधी झाल नाही मला खिडकीपाशी बसायला कधी मिळाले नाही.खिडकीतून बाहेर पाहण्यातली मजा कधी लुटता आली नाही.आता स्वत:हाची गाडी असूनही खिडकी जवळ बसण्याची ईच्छा होत नाही..तेव्हाच ते अल्हाड असलेल मन मात्र खिडकी जवळ बसण्याची इच्छा अपूरी  राहील्याच सांगत असत...आयेन तेव्हा काटकसर करत करत आम्हाला कस मोठ केल, ते आता ऊमगायला ,लागल्यावर कळत, की तेव्हाची आयेची काटकसर आमच्या साठीच असायची....

मला मात्र राग यायचा आये मुद्दाम पैश्यासाठी मला मांडीवर घेवून आजोळी जायची..

त्या मागच गमक त्या वेळी कळले असते तर ?परंतू त्या वेळी बालमनाला जे दिसत तेच ते धरून बसत..नंतर आपण मोठे झाल्यावर कळते की आम्ही अर्धवट डोक्याचे होतो. ऊशिर लागला कळायला... 

गाडीतून उतरल्यावर आये काही सामान आजी साठी घेवून आम्ही आजीच घर गाठू मी पूढे धावत जाई पण आजीच्या कुंपणाला भली मोठी जाडी काठी आडवी लावलेली असे.ती ओलांडायला मला जमत नसे...परंतू गाई म्हशी आत येत नसत..आजीच्या घराचे कंपाउंन्ड म्हणजे मातीच्या ढीगा-यावर निवडूंग लावून बनवलेल मधी मधी मस्त रान फुलांची अंगणी झाडे असायची ..ती फुललेली असली की रंगात रंग मिसळलेली फूले फार सुंदर दिसत ही फुल काडण्याचा मोह मला आवरता येत नसे.जमेल तशी फूल काडून मी ती सूइने धाग्यात ओवून गजरे बनवायची.फुल आणि माझ जवळच नात असायच, फुल सुदंर दिसली की ती तोडून गजरे बनवावे ,पण मी घालत नसे, तर सर्वाना वाटत असे..ते समाधान वेगळच असायच...या फुला बरोबर आजीने औषधी वनस्पती ची झाडे केळी व एक गुलाबाच्या झाडांचा 10बाय10चा गोलाकार ताटवा होता यावर कायम तीस च्याळीस गुलाबी गुलाब फुललेली असायची ती तोडून आजी आपल्या कमळेवीर या बाजारात विकी ,आलेल्या पैशातून तीचा दिन क्रम चालायचा...

मामा असूनही तो आजीला मुबंई वरून कधी पैसे पाटवत नसे .आजी पण तक्रार करत नसे,पण आजीलाही जीव तोडून काम करताना पाहीलय,कधी तरी काही सण असला तर मामाची मनी आँर्डर यायची, नाही तर सर्व कष्ट आजीच करी..मामा कधी आला तर तो पहीला आमच्या जवळ .त्याने बरोबर आणलेली पत्र्याची ट्रंक कलर फूल असे .ती कधी एकदा मामा उघडतो अस होई..मामा मला काही तरी आणायचा पण त्या सर्वात गुलीबी टेलकम पावडर सर्वात जास्त मन मोहून घ्यायची..आणी नविन फ्राँक आणला की त्या गंधात मी भान हरपून जायायची...मामा मात्र आता आमच्यात नाही.पण तो आणत असलेली ती गुलाबी पावडरचा मोह आजही सूटलेला नाही परंतू मी कधी ती घ्यायची इच्छा असूनही ती आता मिळत नाही.....मी आजी जवळ राहायला गेली की सकाळी माझ व आज्याच वेगवेगळ जेवण काडून मगच मजूरीला जाई...असच एके दिवशी आजी गेल्या गेल्या मी भूकेच्या आहारी जावून ते जेवण जेवली खरी,पण पून्हा दुपारी भूक लागली... 

आजी येईस्तोवर माझा जीव भूकेणे खासाविस झालेला आजी येताच मी भोकाड पसरल मी रडते हे पाहून आजी मला जवळ घेवनू काय झाल ते विचारू लागली..मी भूकेन आधी अर्धी मेली झलेली त्यात भर म्हणून आजीने जवळ घेतलेल.मला भरूण आलेल ,त्यातच मी मोठी चूक करूण बसली. चूक नाही तर मोठा अपराध केला तो कधी भरूण येनारा नव्हता मी खोट बोलून वयाने पोक्त झालेल्या आज्यावर आरोप लावून तेव्हा मोकळी झाली खरी ,पण ते मन तेव्हा तरी जाग झाल नाही... खोट बोलन वाईट असत ,हे कधी कळल नसून मी आज्याने माझ जेवण खाल्ल म्हणून खोट आजीला सांगून आज्याला आजी कडून खरी खोटी सूनवायलाही भाग पाडल .पण मी उपाशी राहीली म्हणून आजीचा जीव दुखला असावा ...तीने रागा अंती किंवा माझ्या वरील प्रेमा मुळे आज्याला काठीने दोन काठ्या मारल्या... पण मला खर काही बोलता आले नाही...पूढे आज्या वारला...कालतंराने आजी आमच्या जवळ राहीली. तीच मी सर्व केल..पण आजी मी त्यावेळी आज्या बद्दल खोट बोलली हे सांगण राहून गेल ..नतंर आजी असून नसल्या सारखी होती .तेव्हा ती कायम स्वरूपी आमच्या जवळ होती.तेव्हा ही मनात असूनही तीला सांगता आले नाही. आणि मी ते तेव्हा सांगीतल असत ,तर ते आजीला कळलही नसत.आजीच मात्र मी मरेपर्यन्त सर्व मन लावून केल , कारण आये नतंर माझ्या वर भरभरूण कोणी प्रेम केल असेल ते माझे आजी व आज्या भाताचा कोंडा वाडीत आणून विकूण माझ्या साठी फ्राँक आणनारी माजी आजीने अखेरच्या क्षणी मला आमच्याच घरी आशिर्वाद दिला..

"""सोबा माझ्या सोना तूका काय कमी पडाचा नाय तूजा बरा होताला"" व अखेरच्या क्षणी हे राम बोलत आजीने कायमचे डोळे मिटले.

आजीच्या बोलण्या प्रमाणे माझ सर्व चांगल आहे.पण मला माझ्या अपराधाची कबूली मात्र आजीला देता आली नाही. ही गोष्ट राहून गेली. ते सल मनातून जात नाही. मन आत्मगँलनीने भरूण जाते.पण आज मी माझ्या अजानते पणी तो घडलेला अपराध मात्र सर्व जगा समोर कबूल करताना मला खुप बर वाटतय....आजी आजोबाबा तूमचा आत्म्याला स्मरूण,मी माझ्या चुकीची कबूली जी तूमच्या जवळ देवू शकली नाही .ती आज जगा समोर दिली .मला तूम्ही माफ ही कराल अस ग्रुहीत धरूण मन हलक केले. इतक्या वर्षाने का होईना , माझ्या या चुकीची कबूली देताना संकोच मात्र वाटत नाही....क्रमश:.



Rate this content
Log in