Ranjana Bagwe

Others

3.0  

Ranjana Bagwe

Others

माझे गाव माझी कथा

माझे गाव माझी कथा

3 mins
28


  क्षणभराच्या विसाव्यात देखील काही दुर्मिळ आठवणी जाग्या होऊन मनात रुंजी घालू लागल्या की मन थेट भूतकाळाला कवटाळायला तयार होते . मन नावाच्या जेठ विमानातून आठवणीचा प्रवास सुखकारकच . . सुखावले मन की आठवणीत रममान होत जाते .आठवणी म्हणजे पाऊसाची पहिली थंड सर . गिष्माचा उकाड्यात कोदंटलेल्या मनावर थंड सरीचा गारवा मनतृप्तीचा ढेकर देऊनच शांत होतो तशा या आठवणी जाग्या झाल्या की मनमुराद घडून गेलेल्या आठवणीचा अस्वाद चाखला नाही तर ते मन कसले...मन नावाचा अवयवअत्यंत खट्याळ तर असतोच शिवाय त्याच्या एवढे सवेदनाशिल सहनशिल दुसरा कोणता अवयव नसावा . एक वेळ सागराला भर्ती येणे थांबेल पण मन भर्ती आणि सुक्तीत अडकलेले असते . मनाच्या भर्तीत अमाप आठवणीचे गोड ,कडू , तुरट , जल साठलेले असते . या जलाची चव चाखता कडू जल जीभेवर रेंगाळले की डोळे आपल्या वाटे बाहेर फेकायला आसुसलेले... सुखाची व्याख्या काय असते ? तर मनाला अमुक एका वस्तु ची भुरळ पडली की मन हरखुन जाते ते सुख.... असेच सुख मनाला मिळते ते आपला गाव आठवल्यावर . गावाला वरच्यावर जाणे होत नसले तरी गाव कायम मनाच्या कोपऱ्यात बसून राहिला आहे . गाव आठवला की आठवणीं सुखकारक वाटु लागतात मनाचा ठाव घेणारं गाव माझं कोकणात सावंतवाडीत नगर पालिकेच्या हददीत असल्याने गाव कमी शहरच भासायचे वर्दळ त्यावेळी कमी असल्याने गाव देखणे वाटावे एवढे निर्मळ . गावला आज पारखे झाले असली तरी गाव तिथली माणसं भाषा आजही आठवत असते.

कोकणात ले गाव म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्ग

"देव मानसात पाहवा मीतीच्या मुर्तीत नाही..हे अगदी बरोबर आहे. आपण आपल्या समाधानासाठी पूर्व पंरमपरेनुसार पूर्वजांचे संस्कार जपत असतो..भलं जीवन कीतीही खडतर असले,तरी देखील आपली रीत पद्दत पूर्वजांची जपणूक कधी विसरता येत नाही.

 महाराष्ट्रााची भुमी अभिमान वाटावा अशीच आहे.. अशी संस्कारी भुमी जन्मजात आम्हाला लाभली हे खरोखर आमच सौभाग्य.

थोर संताच्या पदकमलाने पावन झालेली..छत्रपती शिवाजी महाराजाच्या शौर्य गाथानी अमर झालेल्या भुमीत तीथल्या मातीत आमच बालपण गेलं..आम्ही नाचलो,बागडलो,हे ही आमचं भाग्यच.

बालपण कोकणातल्या कडाकपारीत,डोंगर माथ्यावर,उंचसखल वावरात,आंब्याच्या आमराईत,वेळूच्या बनात,निसर्गाच्या वनराईत,सुवासाने मस्त दरवळणा-या केवड्याच्या वनात, वावरातल्या चिखलमातीत हातापाया बरोबर बरबटलेले कपडे,वडपिंपळाच्या छायेत,माडाच्या झावळ्यात,आणि थंडगार निसर्गातल्या कुशीतल हे बालपण,अनुभवन म्हनजे स्वर्गातल्या इंद्रदेवाच्या नंदनवनात पून्हा पून्हा जाणे..

 कोकणची आनं बाण ,शान , काही वेगळीच , कोकण दुसरीकडे शोधूनही सापडनार नाही..इथल्या मातीत एकनीष्ठेची जानीव होते. कोकण म्हणजे जगातल्या सात आश्चर्या सारखच हे आठव आश्चर्य म्हटले तर वावगे वाटणार नाही.. मानसं अम्रुताहूनी गोड,जीभेवर प्रामाणीकपणाची झलक..मनमिळावू,आपल्या कोकणातल्या मानसात किंतू परंतू असे भाव मुळात नसणे हे वाखाणन्या सारखे असते..

नात जपाव कसं ,आलेल्या पाहुण्यांच स्वागत करावं,आपल्यातला घास भुकेलेल्यांच्या पोटात घालावा ,तो कोकणातल्या मानसांने,

जीवातला जीव वाचवायला प्राण पणाशी लावून लढावे ते या राजाने,,

कोकणातल्या हापूस आंब्याला जगात राजा ही पदवी बहाल झाली..त्याच कौतुक आहेच.. शिवाय गावच्या वैभवात भर घालण्या सारखेच आहे..हे आपलं सौभाग्यच.

तोच आंबा व्यवस्थीत पिकवून , इतर राज्यात मिळावा,, व प्रत्येक मानसाला तो चाखता यावा, त्या करीता रातदीवस झटणारा माझा कोकणचा माणूसच, ख-या अर्थााने

 राजा आहे..हेही तीतकेच खरे,

बालपण तस सर्वांच छान असते..परंतू तेच बालपण कोकणातलं असलं,तर मात्र सोन्याहून पिवळच...

 बोली भाषा जरी मालवणी असली तरी तीच्यातला गोडवा ईतर भाषात क्यचीत आढळेल, कुठलाही वाटसरू मग तो परप्रांतातला असला तरीही त्याची आपूलकीने चौकशी करावी ,ती कोकणच्या मानसाने ..

त्याही पेक्षा आस्थेन परीपूर्ण काटोकाट,भरलेल्या माझ्या गावच्या,ललनांचा( स्त्रियांचा) थाट काही औरच असतो..जवळ पैसा असो नसो,प्रत्येक सण आवर्जून साजरा करावा तो या गावच्या ललनेन, छोट्या खुषीत आंनदीत होना-या या ललनांच्या चेह-यावरचा आनंद प्रत्येक सणाला ओसंडत असतो...

माझ्या गावतलीतली स्त्री जास्त नट्टा पट्टा करत नाही..पण जे काही करते ते प्रत्येक वेगवेगळ्या प्रातांतल्या वेष भूषेला मागे टाकते..

 नऊवारी साडी , नाकी नथ गऴा मंगळसूत्र, कपाळावर कुुंकुं, हाती हीरवागार चुडा,(बांगड्या), आणि या सौदंर्यात भर म्हणजे केसाच्या आंबाड्या वरची वेणी, असं हे लाखात देखणं रूप पाहून वाटते साक्षात लक्ष्मीची अनेक रूपे केकणातल्या धरतीवर नांदत आहे.. आणि हे सौदंर्य खुलते ते आल्या गेल्याचं स्वागतार्ह तप्तर असणारी ललना,प्रत्येकाचं मन राखावे कसे हे जानुन असतेे .सदैव लिन राहून नम्रपना जपावा.. सौदंर्या ने परीपूर्ण असलेली माझ्या कोकणची ललना दुसरीकडे सापडणे कठीण,,

 देव दर्शनाला निघताना यांचा थाट काही औरच असतो..

हाती फुलांची परडी,डोईवर पदर,तोंडावरचा आंनद तर गगनात न मावनारा असतो.

हिरवळीतल्या हीरवळीतून नागमोडी मोडी वळणे घेत जानाऱ्या लाल तांबड्या पिवसर वाटेवरून या ललना चालायला लागल्या की स्वर्गातून उतरलेल्या अप्सरांनाही लाजवतील अशा सुदंर दिसतात.. त्याना पाहूण मीही त्याच्यातलीच एक असल्याचा अभिमान वाटतो.. आठवणी अनेक असतात परंतु मन लुभवणारी आठवण झाली मन हरखुन जाते . 

मोरपंख लेवून बागडू लागते गाव गावचा इतियास भरपूर मनावर कोरला गेलेला असतो . .


Rate this content
Log in