एटीएम...
एटीएम...


सकाळी ऑफिसला निघाले.
अंमळ उशीरच झाला होता.
बँकेतून पैसे काढणंही अत्यंत गरजेचं होतं.
कितीही डिजिटल इंडिया...म्हणलं तरी बर्याच ठिकाणी अजूनही नोटांची देवाणघेवाण करावीच लागते. एटीएम बाहेर हीsssss रांग.
नंबर आला तशी आत गेले.
जरूरी ऑप्शन्सची पूर्तता करून किती पैसे काढायचे आहेत ते टाईप केले.
आता मशीन खडखड वाजून पैसे बाहेर...
सोप्पंय...
पण हे काय???
पुढची स्क्रीन...
कुठल्या नोटा म्हणजे १००,२००,५००...
किती प्रमाणात...
इथेच संपलं...
इतका वेळ लिलया बटणं दाबणारी माझी बोटं गोंधळली.
काहीच ठरेना..
100 च्या किती, 200 च्या किती....
इथेही मी सुट्ट्या पैशांचेच हिशेब घालत होते
500...2000 ची मोठी नोट घेण्यासाठी अजूनही मनाची तयारी होत नाही.
मागचे ओरडायला लागले.
कसंतरी भांबावलेल्या अवस्थेत ट्रान्झॅक्शन पूर्ण केलं आणि बाहेर पडले
जगण्याचं खरं थ्रिल यातच ......
ऑप्शन्स नसतात तेव्हा आहे ते निमूट स्वीकारलं जातं, आणि आनंदानं साजिरं होतं.
ऑप्शन्स मिळाले की मात्र...
आपण बावचळतो, गांगरून जातो..
अन् कधीकधी समाधानाचे, आनंदाचे क्षण हातातून नकळत निसटून जातात......
खरतर खुप काही हवंय आपल्याला पण नेमकं काय हेच कळत नाही आणि ते कळे-कळेपर्यंत हाती असलेलं जुनं होउन जातं... हरवतं कुठेतरी मनाच्या पसाऱ्यात
सगळंच...जगण्याचे क्षण...
अगदी आत्ताचा पळ ही...
आssनेवाला पलss
जाssनेवाला है ।
हो सके तो इसमें जिंदगी बितालो
पल ये भी जानेवाला है। ।