STORYMIRROR

Ashutosh Purohit

Abstract

3  

Ashutosh Purohit

Abstract

* emojis *

* emojis *

1 min
9.1K


 काही emojis नवीन सापडले आज..
 होतेच ते माझ्या पोतडीत खरंतर..
 तरी त्यांच्याकडे लक्ष नव्हतं गेलं माझं. गरज नाही वाटली त्यांची कधी.
 या अशा भावना कधी उमटल्याच नाहीत बहुतेक माझ्या मनात! किंवा उमटल्या, पण express कराव्याशा नाही वाटल्या!
 असंख्य भाव-भावनांची दाटी जमलेलं ते माझं emojisचं पोतडं, मी कौतुकानं न्याहळत होतो.
 आपण mall मधे गेल्यावर नव्या छान छान वस्तू न्याहाळतो ना, तसं!
 माणसांच्याच मनातल्या भावना किती भिन्न प्रकारच्या असू शकतात, याचं थक्क करणारं चित्र ते.
 प्रत्येक emoji शेजारच्या आणि समोरच्या emoji पासून ठरलेल्या अंतराने उभा होता.
 मनातही असे "ठरलेल्या अंतराने" विचार आले असते तर किती सोपं झालं असतं

ना आयुष्य!
 एक विचार, जरा वेळ निवांत. मग पुढचा विचार!
 कसलं भारी ना!

    पण तरीही त्यात एक उणीव भासली मला. एक emoji, फक्त एकंच भाव व्यक्त करत होता..
 माणसाच्या मनात जेव्हा खूप काही साचलेलं असतं तेव्हा त्याने कुठली emoji वापरायची? दुःखी? हसरी? की आणखीन कोणती?

 खरंतर तेव्हा त्या माणसाला काय वाटतंय हे तो स्वतःतरी धड सांगू शकतो का?
 एक emoji = एक भाव, या सूत्रात "मन" मांडता येऊ शकतं का?
 नाहीच!
 अशा वेळी अशा माणसाला एका ऐकणा-या "काना"ची गरज असते. कुठल्या emoji ची नाही!

 Emoji फक्त एक भावना व्यक्त करतो..
 ऐकणारा कान मात्र सगळं "सामावून" घेऊ शकतो!

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract