Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Fantasy Inspirational

4.0  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Fantasy Inspirational

एक सांताक्लोज असाही

एक सांताक्लोज असाही

3 mins
168


        कड्याक्याची थंडी पडली होती. आज ऑफिस मधून निघायला स्नेहलला जरा उशीरच झाला होता. उद्या नाताळ सणाची सुट्टी असल्यामुळे स्नेहल आज तिच्या घरी म्हणजेच गावी जायला निघाली होती. बस कामगारांचा संप असल्या कारणाने पाहिजे तशी वाहनेही उपलब्ध नव्हती. पण नंतर तिला काम असल्यामुळे जाता येणार नव्हतं त्यामुळे ती गावी जायला निघाली. ती ऑटो पकडून बस स्टॉप वर पोहचली. साधारणतः संध्याकाळचे आठ साडे आठ झाले असतील. पण स्टॉप वर पाहिजे तशी लोकांची वर्दळ नव्हती. थोड्या वेळ पूर्वीच एक बस निघून गेल्याने दुसरी येण्यास निदान तास अर्धा तास तरी अवकाश होता. ती तिथेच एका बाकड्यावर बसली. थंडी इतकी वाढली होती की रस्त्यावरची दुकाने सुद्धा बंद झालेली होती. दूरवर कुठेतरी एकट दुकट दुकान दिसत होत. यापूर्वी कधीही इतकी शांतता स्टॉप वर तिने पाहिलेली नव्हती. त्यामुळे तिला जरा भीतीही वाटायला लागली होती. शिवाय हा बस स्टॉप गावाच्या बाहेरच असल्या सारखा होता. आजूबाजूने शेतं लागलेली होती, त्यामुळे थंडीही खूप जोर करत होती.


        चार पाच कामगार माणसेही तिथेच बस ची वाट बघत रस्त्यावर शेकोटी पेटवून उभी होती. शेकोटीमुळे त्यांच्या अंगाचे थंडी पासून रक्षण होत होत. आणि शरीरात गरमी निर्माण करण्यासाठी ती बिड्या फुकत बसली होती. त्या बिड्यांचा वास आता स्नेहलला असह्य झाला होता. पण बोलणार कुणाला. त्यामुळे ती गपचूप बसून अंगावर शॉल ओढून, नाकाला रुमाल लावून बसली होती. इतक्यात तिच्या पायाला कसला तरी स्पर्श जाणवला, तिने लगेच खाली वाकून पाहिले तर, बाकडा खाली असलेलं गवत हवेच्या झोताने हलून तिला स्पर्श करत होत. तिने भीतीने ओढून धरलेला स्वाश हुशsssss करत सोडला.


       थोड्या वेळाने समोर बसलेले कामगार स्नेहल कडे बोट दाखवून एकमेकांशी काही तरी कुजबुज करायला लागले. आता तिला भीती वाटायला लागली. कारण सर्व रस्ता सुनसान झाला होता. ती चार पाच माणसे आणि तिच्या व्यतिरिक्त तिथे कोणीही नव्हतं. त्यामुळे तिला खूप भीती वाटायला लागली होती. मात्र कुठलाही भीतीचा भाव चेहऱ्यावर न आणता ती तशीच बसून राहिली आणि जाणूनबुजून त्या माणसांकडे बघण्याचं तिने टाळलं. मात्र आता हद्दच झाली. त्या माणसांपैकी एक माणूस उठून तिच्या दिशेने येऊ लागला. आता मात्र स्नेहल भलतीच घाबरली होती. इतक्या थंडीतही तिच्या अंगाला घाम फुटू लागला होता. त्या माणसाच्या हातात एक काठी देखील होती. त्यामुळे तिला जरा जास्तच घाबरायला झाला. ओरडावं तर तिथे तिचा आवाज ऐकणार त्या माणसांन व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. शिवाय भीतीमुळे तिचा आवाजच बसून गेला होता. ती आपल्या अंगावर शॉल ओढून स्वतःला सगळीकडून झाकण्याचा प्रयत्न करत होती. जसं जसा तो माणूस जवळ येऊ लागला तस तशी ती आणखी भीतीने पाणी पाणी होऊ लागली. तो माणुसही दिसायला जरा भयानकच वाटत होता. डोक्यावरचे केस कानाच्या खाल पर्यंत वाढलेले, लांब वाढलेली दाढी मिशी...जरा वयाचा असल्यामुळे तीही अधे मधे पांढरी झाली होती. एका हातात काठी आणि दबक्या पायाने पाऊले मोजत मोजत तो स्नेहल कडे येत होता. तो जसाच जवळ आला स्नेहलने घट्ट डोळे मिटत एक आवंढा गिळला. इतक्यात तिला आवाज आला.., " पोरी हलू नग.. न्हायतर जीवाणीशी जाशील!"


       स्नेहलने लगेच डोळे उघडले. तर तो माणूस खाली वाकला आणि त्याने काडीचे एक टोक स्नेहलच्या तळ पायाजवळ दाबून धरले आणि मोठयाने ओरडला, " पोरी.. लवकर बाजुले हो..!!" असं म्हणताच स्नेहल पटदिशी उठून बाजूला झाली. बघते तर काय... एक मोठा नाग तिथे होता. त्या माणसाने काडीने त्याच तोंड धरून ठेवलं होत. इतक्यात बाकीचीही माणसे तिथे येऊन हजर होती. त्यांनी त्या नागाला पद्धतशीर पकडले आणि थोड्या दूर शेताच्या दिशेने नेऊन सोडले. स्नेहलला आता स्वतःच थोडं गिल्ट वाटत होत. तिने नाही नाही ते विचार मनात आणून त्या माणसाबद्दल गैरसमज करून घेतले होते. तिने त्या सगळ्यांचे खूप आभार मानले. जर ते लोक नसते तर कदाचित तो नाग तिला चावूही शकला असता.


      त्या क्षणी तो दाढी वाला माणूस तिला जणू सांताच वाटला. ज्याने तिला आयुष्यरूपी भेटच दिली होती. इतक्यात बस आली. स्नेहलने त्या सर्व माणसांच्या पायाला स्पर्श करत त्यांचे उपकार मानले. आणि सुखरूप तिच्या घरी पोहचली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract