STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Inspirational

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Inspirational

आनंद शोधताना

आनंद शोधताना

1 min
240


        "आनंदाचे डोही आनंद तरंग

         आनंदची अंग आनंदाचे ||"


     आनंद ज्यालाच आपण सुख देखील म्हणतो , हा नक्की कुठे भेटतो ? अहो! तो कुठल्याच बाजारात मिळत नाही ! तो ज्याचा त्यालाच शोधावा लागतो. आपल्या आयुष्यात रोज बऱ्याच गोष्टी घडत असतात. या साऱ्याच गोष्टी म्हणजे सुख-दुःखाचं मिश्रण असत. श्रावणाच्या सरी प्रमाणेच त्यांची बरसात प्रत्येकाच्या आयुष्यात होत असते. मनाला आनंद देणाऱ्या, सुख देणाऱ्या आठवणी सर्वांनाच हव्या असतात , कारण त्या जेव्हाही येतात आपल्या ओठांवर सुंदर अस हसू फुलवत असतात किंवा अलगद डोळ्यातून मोती बनून उतरत असतात. 

       

      खर तर आपल्या आयुष्यात दुःख देणाऱ्या गोष्टींपेक्षा आनंद देणाऱ्या गोष्टी जास्त घडत असतात. मात्र त्या एका दुःखा पुढे आपण साऱ्याच सुखाच्या आठवणी विसरून जाऊन त्या दुःखाला कुरवाळत बसत असतो...आणि मग साऱ्याच सुखाच्या, आनंदाच्या गोष्टी कुठेतरी हरवून जातात..आणि आपण परत त्याच्या शोधात भटकत असतो.


      खर तर.., त्या दुःखाचे आपण किती लाड करायचे हे आपल आपण ठरवायचं असतं; कारण प्रत्येक रात्री नंतर सकाळ ही होतंच असते हे विसरून कसं चालेल.. ?? म्हणून आज एक गोष्ट सर्वांना सांगावीशी वाटते ती म्हणजे,


आनंद शोधताना..

भूतकाळात रमू नये

आनंद शोधताना..

भविष्य चिंतू नये

आनंद शोधताना..

वर्तमानात जगावे

प्रत्येक क्षणाला 

आनंदी करावे..!!

       


       आपण जर हे करू शकलो तर आनंद नेहमी आपल्या अंगणात खेळेल. आपल्याला आपला आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही शोधता येईल आणि कोणीही कधीही तो हिरावू शकणार नाही.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational