STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Tragedy

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Tragedy

अजुनी रंग ओला

अजुनी रंग ओला

1 min
258

       समिधा आज खूप खुश होती. आज लग्नानंतरची पहिलीच रात्र. सौरभ आणि ती खऱ्या अर्थाने आज एकमेकांशी प्रेमाच्या नाजूक धाग्याने घट्ट बांधले जाणार होते. तिच्या मनाला वेगळीच हूरहूर लागलेली होती. आज तिने सौरभच्या आवडीची , त्याने तिला भेट म्हणून दिलेली कंच हिरव्या रंगाची साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, भरगच्च गजरे, हिरव्या मेहंदी ने रंगलेले तिचे हात आणि तो सुगंध तिच्या मनाची हुरहूर आणखीन वाढवीत होते. इतक्यात फोन वाजतो, सौरभ असावा म्हणून ती लगबगीने फोन घेते, पुढून आवाज येतो..."समिधा, आपल्या सौरभचा अपघात झालाय... आपला सौरभ आपल्यात नाही." तिच्या मेहंदीचा रंग अजूनही ओलाच होता, आणि हिरवा रंग तिच्या आयुष्यातून कायमचा पुसला गेला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract