STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Tragedy Action

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Tragedy Action

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
170

"आई, ए आई..! कधी येणार ग दादा घरी? कधी मिळेल माझं सरप्राईज गिफ्ट मला?" स्वरा दारातच, हातात राखी आणि आरतीचे ताट घेऊन तिच्या दादाची म्हणजेच रामची आतुरतेने वाट बघत उभी होती. राम हा आर्मी ऑफिसर होता. त्याला सहसा सुट्टी मिळत नसे. मात्र दोन वर्षांनी पहिल्यांदाच त्याला रक्षाबंधना करीता सुट्टी मिळाली होती. "येईल गं, पोहचतच असेल तो."आई स्वराला समजावून बोलू लागली. थोडयाच वेळात दारावरची बेल वाजली. स्वरा ने धावत जाऊन दार उघडलं. आणि स्तब्ध झाली. रामने खरंच मोठं सरप्राईज त्यांना दिल होतं. अचानक झालेल्या हल्ल्यात राम शहीद झाल्याची बातमी घेऊन दारात जवान उभे होते. स्वराच्या हातून राखी कधीच गळून पडली होती...!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy