STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Action Inspirational

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Action Inspirational

चूक

चूक

1 min
197

           वृद्धाश्रमात असणाऱ्या आपल्या आजी-आजोबांची भेट घेतल्यानंतर तो त्या वृद्धाश्रमाची प्रत्येक एक खोली निरखून बघायला लागला. तेथे असणाऱ्या लोकांच्या भावना कळलतील इतकी समज त्याला नव्हती. तरी सर्वांची खूप आपुलकीने विचारपूस करत तो तेथून बाहेर पडला बाहेर पडला. आलिशान कारमधून त्याच्या आई-बाबांबरोबर घरी परतताना तो अगदी सहजच बोलून गेला, " बाबा, मी ना तुम्हाला आणि आईला यापेक्षाही मोठ्या वृद्धाश्रमात ठेवीन. कारण इथल्या सर्व रूम आपल्या बाथरूम पेक्षाही खूप लहान आहेत "

            त्या दोघांचीही मान शरमेने खाली झुकली. त्यांना त्यांची चूक कळून चुकली होती.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Action