STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Comedy Romance

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Comedy Romance

प्रेमात पडल्यावर (कल्पनारम्य)

प्रेमात पडल्यावर (कल्पनारम्य)

1 min
202

        सारंग आणि स्वप्नाली दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण अजूनही त्यांचे मनातले शब्द ओठांवर मात्र आलेले नव्हते. आपल्या प्रेमाची कबुली द्यायची म्हणून ते भेटायचं ठरवतात. काय आणि कस बोलायचं दोघेही त्यांच्या कल्पनारम्य विश्वात हरवून उघड्या डोळ्यांनी स्वप्न रंगवत असतात.


       सारंग स्वप्नालीची वाट बघत उभा असतो. इतक्यात स्वप्नाली येते आणि तो हसायला लागतो. ती ही खळखळून हसत असते. तो तिला म्हणतो, "अग वेडे, तुझा कंगवा तसाच राहिलाय ना तुझ्या केसात.!" तिला स्वतः च हसू येत.. आणि ती त्याला म्हणते, "अरे माझं ठीक आहे, पण ब्लेझर आणि बर्मुडा हे कॉम्बिनेशन जाम भारी दिसतय तूला.!!" आता दोघेही खळखळून हसतात. साऱ्या गोष्टीचे भान विसरून ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Comedy