एक दिवस
एक दिवस
"भारतीय योग संस्थान नवी दिल्ली " ह्यांच्या योगा अधिकारीच्या शिबिरासाठी गेल्या २२ नोव्हेंबरला २०१८ ला जम्मुला गेले होते. प्रत्येक प्रांतातुन सगळे अधिकारी जम्मुला येत होते. सर्वांना विमानतळ, रेल्वे स्टेशन,बस मधुन उतरुन घ्यायला तेथले साघक आप आपल्या गाड्या घेऊन आश्रमात न्यायला आले होते. ना ओळख ना पाळख सगळे वेगवेगळ्या राज्यातले. जुजबी ओळख करून घेतली व चार पाच जणांना गाडीत बसवून आम्हाला आश्रमात आणलं. सगळे सोपस्कार झाल्यावर त्याच माणसाने सगळा आश्रम दाखवला व माहिती ही पुरवली.
आजचा दिवस संपूर्ण आमच्याकडे होता. जम्मुला पहिल्यांदाच आलो होतो. तिकडचं बघण्या सारख काय आहे असं आम्ही त्या
माणसाला विचारले जरी माहित होते तरी. आणि कसं काय करावे लागले हे ही त्यालाच विचारले. तेव्हा तोच माणूस बोलला. " मैं हुँ ना, मैं आप लोगोंको गुमाकर सभ दिखाकर रात को आश्रम छोड देता हुँ।" त्या बरोबर सगळे तयार झाले. माझे मन जरा शांशक झाले. सगळेच अनोळखी. आताच एका तासा पुर्वी एकमेकांना भेटलो नीट ओळख ही नाही.
पण म्हणतात ना अनोळखी असली तरी माणसांत माणुसकी आणि एकमेका साह्य करण्याची वृत्ती जम्मु मधील लोकांमध्ये आढळली. आम्ही मुंबईकर सहसा दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याला कारण ही तसेच आहे. कारण मुंबई आपण कसे फसू ह्याचा काहीच अंदाज नसतो.
शेवटी सगळे त्याच्या गाडीत बसून निघालो. एक गाइड सारखा तो बातमी पुरवत होता. मी ही डोळे भरुन व कानाने सगळं साठवत होते.
थोड्या वेळाने तो बोलला " मेरा घर इधर नजदिक है। आप आईए घर देखिये चाय पानी भी होगा।" माझ्या मनात परत विचार आला ह्याच घर काय बघायच? नुसता टायम पास असेल. हा ना करून त्याच्या जिद्दीपुढे नाईलाज झाला व त्याच्या घरी गेलो. वाटेत गाडी थांबवून त्याने खायचे बरेच जिन्नस घेतले. घर खरंच टुमदार मस्त वरच्या मजल्यावर होते. सर्वांशी ओळख करून लगेच चहा आणला.
आणि ढेर साऱ्या वस्तु खायला ठेवल्या. खादाडानी हाणल्या मी जरा जपूनच खात होते. त्याच्या घरची ही खुप चांगली होती म्हणजे त्याची बायको मुलगा आणि मूलगी. त्यांच्याशी बोलताना आपण परके हे अनोळखी असं मुळीच वाटलं नाही . एकदम रक्ताची नाती सुध्दा करायला तयार होणार नाही तशी त्याने आणि त्याच्या बायकोने केलं म्हणजे तिचं पोष्टपेड कार्ड माझ्या मोबायल मध्ये घालुन मलाच ठेवायला दिलं .आम्हा कुणाकडेच पोस्टपेडकार्ड नव्हते. तेथे सगळी पोष्ट पेडच वापरायची मला माहीत नव्हते. त्यामुळे माझी खूप पंचाईत झालेली. मुंबई फोन कसा लावावा हा प्रश्न होता .तो त्या माणसांने पटकन् सोडवला. त्यामुळे मी तर हा अनोखा रिस्ता पाहून खरंच देवाचे आभार मानले.नंतर त्याने सगळी म्हणजे बरीच सारी देवळे दाखवली पंच मंदिर , लिंग मंदिर बऱ्याच साऱ्या देवीची मंदिरे व जम्मुची मोठी बाजार पेटहे सगळं करून दहा वाजता त्याने आश्रम मध्ये पोचवलं.
त्याला अनोळखी समजत होते. अख्खा दिवस त्याच्या बरोबर फिरतान हे अजिबात जाणवंले नाही. ना नाते गोते पण नात्याहुन श्रेष्ठ असे नाते त्या माणसांशी जोडले. आता कुणाला सांगीतले तर खरं वाटणार नाही. पण असं म्हणतात जम्मुची सगळी माणसें अशीच गोड व प्रेमळ असतात. थोड्याशा सहवासाने ती परक्या माणसांना आपलीशी करतात. आणि मला हे तंतोतत पटलं कारण आज सुध्दा त्या माणसांशी माझे अलोकिक नाते जुळलेले आहे. एक दिवस घालवल्याने अमोल अशी मैत्री जोडली गेली.